Submitted by दिनेश. on 29 June, 2015 - 04:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ ते ६ अडै होतील
अधिक टिपा:
डाळींची निवड व प्रमाण आवडीप्रमाणे घ्या.
माहितीचा स्रोत:
पारंपरीक दाक्षिणात्य पदार्थ आहे.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती
नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु............
रच्याकने, पहिल्यांदा पाककृतीचे नाव मी अंडै/अंडाई असे वाचले आणि क्षणभर गोंधळलो. म्हटलं दिनेशदा आणि अंडे. पण नंतर लक्षात आलं ये अंडे का नही तो अडै का फंडा है!:)
सुपर्ब ! मुगाच्या डाळीच्या
सुपर्ब !
मुगाच्या डाळीच्या हेडण्यांच्या जवळ्पास जाणारा पदार्थ.
मस्त पदार्थ. माझा आवडता. पण
मस्त पदार्थ. माझा आवडता. पण कढीपत्ता मस्त आहे या साठी तुम्ही म्हणता तसं
मस्त! लहान मुलांसाठी चांगला
मस्त!
लहान मुलांसाठी चांगला पदार्थ आहे.
मस्त! मी पण करते . पीठ जास्त
मस्त! मी पण करते . पीठ जास्त करायचे एक दिवस आडई व नंतर हेच पीठ आंबवून आप्पे करते..
सोपं दिसतय करायला.
सोपं दिसतय करायला.
mastay adai... soppi
mastay adai... soppi vatatey... mazya avakyatli asel asa vatatay!!!!
वॉव.. खूप पूर्वी परप्पु अडै
वॉव.. खूप पूर्वी परप्पु अडै करून पाहिलं होतं.. पण का कोण जाणे हे पीठ आंबलं कि अडै खाऊन अॅसिडिटी व्ह्यायची,,
त्यामुळे इतक्या वर्षांत केलंच नाही परत.. पण आवडतं तर खरी, आता हे ट्राय करीन , कारण वाटल्यावर लगेच करायचंय , न आंबवता..
फोटो मस्त! वाह रे वाह शेफने
फोटो मस्त!
वाह रे वाह शेफने लाल सुकी मिरची , कढीपत्ता पण भिजवायला सांगितला होता डाळ-तांदुळासोबत..
हे आमच्याकडे लेकीचं अति
हे आमच्याकडे लेकीचं अति आवडतं. शिवाय तिला तो साऊथ इंडियन अडै असा उच्चार बरोबर जमतो.
मी यात दही घालत नाही. कढीपत्ता मस्ट अणि आलं कोथिंबीर मिरची अशी पेस्ट करून मग प्पिठात मिक्स करते.
मस्त रेसिपी. आंबवायचे नाही
मस्त रेसिपी. आंबवायचे नाही म्हणजे झटपट करायला हरकत नाही.
मस्त आणि सोप्प दिसतय एक शंका
मस्त आणि सोप्प दिसतय
एक शंका आहे - मेथीदाणे आणि उड़ीद डाळ वगळल तर चालेल का ?
अरे वा..हे तर मला इथ पन करता
अरे वा..हे तर मला इथ पन करता येईल..
एक वेळेच खाणं होऊन जाईल..मस्तच..
नंदिनी, आलं कोथिंबीर पेस्ट वाला नुस्खा पन छानच.. लसुण टाकु का दोन तीन पाकळ्या..पहिल्यांदा करणारे म्हणुन चौकश्या आपल्या..
टीना, टाक बिनधास्त जाई,
टीना, टाक बिनधास्त
जाई, मेथीदाणे वगळ. मला पित्ताचा त्रास होतो म्हणून म्हीही घालत नाही. उडीद डाळ वगळून कराअचा अनुभव नाही.
धन्यवाद, उडदाची डाळ मिळून
धन्यवाद, उडदाची डाळ मिळून येण्यासाठी फक्त, नाहितर तूकडे पडायची शक्यता असते, कढीपत्ता हवाच
इथे मिनीनं दिलेली कृती आहे.
इथे मिनीनं दिलेली कृती आहे. मी नेहमी त्याच पद्धतीनं करते. आताशा ब्राऊन राईस, सगळ्या डाळी, स्टील कट ओट्स, थोडे लाल पोहे, मेथ्या, लाल मिरच्या, कडीपत्ता, आलं-लसूण, जीरं घालून करते. कधी ताजी मेथी किंवा पालक बारीक चिरून घालते. पोटभरीचा, हेल्दी प्रकार होतो.
हळद टाकलीय म्हणून पिवळा रंग.
हळद टाकलीय म्हणून पिवळा रंग. मी आपली विचार करतेय इतका पिवळा का दिसतोय अडाई.
मस्त आणि सोप्पा प्रकार ..
मस्त आणि सोप्पा प्रकार .. नक्की करेन .
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
अरे वा छान फोटो आणि रेसिपी ..
अरे वा छान फोटो आणि रेसिपी .. अंजली, मलाही मिनीचीच रेसिपी आठवत होती वाचताना आणि तिकडच्या "जळक्या वरणाचा वास येतो" ही चर्चा ..
तुझा फोटो ही छान आहे पण डोशासारखे दिसत आहेत अडै .. थोडे जाड असतात ना ते?
चटणी कसली आहे अंजली छान दिसत आहे ..
मला कांदा आणि दही घालायची आयडिया आवडली .. त्याने कदाचित हलकेपणा येत असेल .. मी मागे मिनीच्या कृतीप्रमाणे केले होते पण ते हलके झाले नव्हते असं वाटत आहे ..
छान रेसेपी ..उद्याचं करुन
छान रेसेपी ..उद्याचं करुन पाहते
सशल, मी थोडे पातळ पसरते.
सशल, मी थोडे पातळ पसरते. वैयक्तिक आवड. दोसा या पेक्षा पातळ होतो. अडईत मी कधी कांदा आणि दही घातलं नाही. माझ्या साउथ इंडियन मैत्रिणीपण घालत नाहीत. पण रवा दोसा करताना मात्र घालते. त्याने छान चव येते. हलके व्हायला फर्मेंटेशनसाठी वेळ हवा. अडई फर्मेंट करत नाही त्यामुळे मी तांदूळ डाळ भिजवण्याचा वेळ ८-१० तास ठेवते. त्याने छान हलके होतात.
चटणी: दाण्याचं कूट, दही, मीठ, साखर, तिखट. वरून फोडणी. सोलापूरी प्रकार :).
अंजली मला तर हा डोसा दिसतो
अंजली मला तर हा डोसा दिसतो आहे अडई नाही.
दिनेशदा मस्तच.
नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती
नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु............ >>>> +१००
अंजली, अडै ची जी पारंपारिक
अंजली, अडै ची जी पारंपारिक कृती आहे त्यात कांदा घालतातच. गुगल केल्यावर ज्या पहिल्या ३ रेसिपी येताहेत त्यातही कांदा आहेच.
http://www.chitrasfoodbook.com/2014/10/adai-recipe-south-indian-tiffin-r...
http://www.rakskitchen.net/2009/08/adai.html
http://www.tarladalal.com/Adai-(-Protein-Rich-Recipes-)-33240r
अडै ची जी पारंपारिक कृती आहे
अडै ची जी पारंपारिक कृती आहे त्यात कांदा घालतातच. गुगल केल्यावर ज्या पहिल्या ३ रेसिपी येताहेत त्यातही कांदा आहेच.>>> हो का? मैत्रिणींना विचारायला हवं. त्या कधी घालत नाहीत.
झक्कास! तमिळ शेजारणी कडे
झक्कास! तमिळ शेजारणी कडे खाल्लय. दिनेशजी धन्यवाद. तिने पण कान्दा घातला नव्हता यात, मात्र आरतीने ती कान्द्याची चटणी लिहीलीय इडली बाफावर तशी चटणी देतात या बरोबर.
पहिल्या फोटोला तोपासू रंग
पहिल्या फोटोला तोपासू रंग आलाय.. पाकृमध्ये न शिरताच चवीचा अंदाज येतोय
दिनेशदा, फोटो मस्तच आला आहे.
दिनेशदा, फोटो मस्तच आला आहे. यम्मी जाळीदार अडाई.
मेथीदाणे आणि उड़ीद डाळ वगळल तर चालेल का ? <<<< जाई, हो चालेल.
टिना, ऑथेंटीक चव हवी असेल तर लसूण नको किंवा दोन्ही पद्धतीचे बनवून बघ. आल किसून आणि कोथिंबीर, कढीपता बारीक चिरून घाल. हि.मि. नाही घालत बेडगी मिरची घालतो.
आम्ही ह्यात १ टि. स्पून काळि मिरी घालतो.
अडाई, सेट डोसा, दावणगिरी डोसा हे पिझा बेसच्या जाडीचे असतात.
आम्हीपण कांदा घालूनच बनवतो काहीजण कांदा नाही घालत. प्रत्येक घराची वेगळी पध्द्दत असतेच.
धिरडे !!
धिरडे !!
Pages