लहान मुलांचे वजन

Submitted by मी अमि on 26 June, 2015 - 06:16

माझ्या मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे आणि वजन ९.८ किलो आहे. इतके दिवस डॉक ना विचारले तेव्हा ते त्याचे वजन ठिक आहे वगैरे म्हणायचे. दुसर्‍या डॉक ना दाखवले तेही तसेच म्हणाले होते. यावेळच्या व्हीजीट मध्ये मी डॉक ना परत सांगितले की त्याचे वजन बरेच दिवसांपासून स्थिर आहे. तेव्हा ते म्हणाले की त्याचे वजन १ वर्षे ते २ वर्ष या काळात १.५ किलो वाढायला हवे होते. सध्या ते फक्त ६०० ग्रॅम वाढलय.

त्याचा आहार असा आहे: - सकाळि ७.३० ते ८ - नाचणी सत्व (दुध घालून)
सकाळी ११ ते १२ - पोळी भाजी, भात, अंड्याची बुर्जी/ ऑम्लेट, वरण/ ताक
दुपारी ३ ते ४ - रव्याची खीर/ गव्हाच्या पीठाची खीर/ फळांचा मिल्क शेक
संध्या काळी - ७ ते ७.३० - पोळी भाजी, भात,वरण
रात्री १० - मिश्र धान्याच्या पीठाची खीर (दुध घालून)

डॉ म्हणाले की संध्याकाळचे आणी रात्रीचे खाणे स्वॅप करा. पण रात्री १० वाजता जेवायला देणॅ आम्हाला योग्य वाटत नाही.

वजन वाढण्याचे काही उपाय/ सल्ले मिळू शकतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिनुल, तुम्ही मुलाला अंडे देऊ शकता. आम्ही उकडलेल्या अंड्याचा पिवळा बलक द्यायला सुरुवात केली होती. कारण तो मऊ असतो. सध्या तो बुर्जी आणि ऑम्लेट सुद्धा खातो. डॉ ने अंडे रोज द्यायला सांगितले आहे. पण तो रोज खायला कंटाळा करतो म्हणून एक दिवस आड देतो.

ड्रीम गर्ल, खरं तर आपण रिलॅक्स व्हायचा प्रयत्न केला की आजुबाजुचे लोक 'किती वाळलाय, अजिबात तब्येत भरत नाही, अमुक तमुक का देत नाहीस/ का देतेस?' वगैरे विचारुन टेन्शन आणतात आणि चेहर्‍यावर भाव असे की, कशी आई आहे ही मुलाच्या तब्येती कडे मुळीच लक्ष नाही Sad

मी हल्ली दुर्लक्ष करते असल्या शेर्‍यांकडे. पण स्वतः चे प्रयत्न सुरू आहेत.

ड्रीम गर्ल, खरं तर आपण रिलॅक्स व्हायचा प्रयत्न केला की आजुबाजुचे लोक 'किती वाळलाय, अजिबात तब्येत भरत नाही, अमुक तमुक का देत नाहीस/ का देतेस?' वगैरे विचारुन टेन्शन आणतात आणि चेहर्‍यावर भाव असे की, कशी आई आहे ही मुलाच्या तब्येती कडे मुळीच लक्ष नाही >> अगं मला तर निर्लज्जपणे म्हणतात मुलाचं सगळं खाणं तूच खातेस की क्कॉय!! Uhoh

हायपर अ‍ॅक्टीव्ह मूल असेल तर व्यवस्थित आहार असलेल्या मुलाचं वजनही अंगावर दिसणारे का? डॉ. ने सांगितले तुमची हौस व हट्ट म्हणून त्याला खायला घालू नका! मूल ड्राऊझी नाहीये आणि अ‍ॅक्टीव्हीटीज नीट आहेत तर जाड दिसण्याचा हट्ट कशाला? मग नंतर बारीक होत नाही म्हणून पुन्हा त्याला घेऊन याल! Proud

खाण्याची वेळापत्रकं तर अगणित केली इतकी तर शाळकरी वयात अभ्यासाची पण केली नसतील हौसेने!! Lol मुलांच्या खाण्याच्या बाबतीत पेशन्स ठेवणे आणि मुलांच्या कलाने घेणे एवढंच आहे हातात.

>> बेशुद्ध
Biggrin
तो दीडेक वर्षाचा होईपर्यंत सलग ४ तासही झोपायचा नाही. ८ तास झोपेल तेव्हा उघडायला आम्ही एक शँपेनची बाटली आणून ठेवली होती. सगळे दात येऊन, तो सगळे जेवू लागला; अंगावरचे दूध संपले; आणि धावायला शिकला. त्यानंतर ४/ ८/ १०/ १२ तास अश्या टप्पे २/ ३ आठवड्यात पार झाले.
खाण्याच्या बाबतीत आम्ही "बेबी लेड वीनिंग"चे तंत्र वापरले. कोणतेही पदार्थ मुद्दाम मॅश/ पावडर/ मऊ करून दिले नाहीत. आपण खातो तेच, त्याच टेक्ष्चरचे खाणे त्याला सुरुवातीपासून (६ म) दिले. आणि काय ते स्वतःच्या हाताने खायचे. सुरुवातीला चमचे भरून देत असू, पण चमचा तोंडात आपापलाच घालायचा. पुरे म्हटले की पुरे. आग्रह नाही. प्रत्येक जेवणासाठी १ तास वेळ राखून ठेवत असे तेव्हा. त्यामुळे खाणे हा रोहनचा आवडता प्रकार आहे. हल्ली गेल्या २/ ३ महिन्यात अगदी घाईच्या वेळी मी "घाई आहे. मी भरवू का/ मदत करू का?", असे विचारून बघते.

म्हणजे ८-९ महिन्याचे होण्याआधी की ८-९ महिन्यांपुर्वि?
त्याने काही फरक जाणवला का?

.

अमि, थांब. इतक्या प्रकारच्या डब्यांनी आणि ब्रांडांनी गोंधळ झाला आहे. Happy
गैरसमज टाळण्यासाठी मी वरच्या पोस्टी तात्पुरत्या एडिट करतो आणि मग लिहितो. आता वेळ कमी आहे.

आमच्या पेडिच्या मते कुठलेही डाएट सप्लिमेन्ट डॉ़क्टरने प्रिस्क्राईब केली नसतील तर (म्हणजे वैद्यकीय कारण असेल तरच डॉक सांगणार) अजिबात द्यायचे नाही. या बहुतेक सर्वच सप्लिमेन्ट्समधे भसाभसा साखर आणि स्टार्च इत्यादि असतं आणी अंतिमतः ते मुलांसाठी हानीकारक असतं. त्याऐवजी घरच्या जेवणातले विविध पदार्थ, चवी, फळं, दूध हाच आहार कायम द्यावा. शिवाय मिल्कशेक किंवा सूप्स शक्यतो न देता चावून फळं, भाज्या खायला शिकवा हेही आमच्या पेडिने आवर्जून सांगितले आहे.

माझ्यामते या सगळ्या बाहेरच्या सप्लिमेन्ट्समधे त्याचत्याच चवी असतात - चॉकोलेट, वॅनिला, स्ट्रॉबेरी, इ. औषधांच्याही त्याच असतात. त्यामुळे त्यांच्या चवीच्या सवयी फार ठराविक व्हायला लागतात असं नाही का वाटत?
तसंही मुलांचं वजन दुसर्‍या वर्षी खूप हळूहळूच वाढतं. तुम्हाला जर कमी वाटत असेल तर परत एकदा डॉकशी बोला किंवा सेकंड ओपिनिअन घ्या. पण एरवी मूल अ‍ॅक्टिव आणि नॉर्मल असेल तर फार काळजी करू नये हेमावैम.

अमि, सॉरी. मगाशी पेडिया शुअर, लॅक्टोजन, सिमिलॅक, इझम यांमध्ये गोंधळ झाला. पैकी पेडिया शुअर हे आमच्याकडे एका बालकाच्या वजनवाढीकरताच डॉ. ने दुसर्‍या वर्षानंतर चालू केले होते. आम्हाला वजनात फारसा फरक जाणवला नाही. त्यामुळे ते मागे पडले.

आमचं पार्सल वय वर्ष ३ पूर्ण.. वजन १२ किलो फक्त.. डॉक्टरला विचारल्यावर म्हणतात... मलूल दिसतो का? अ‍ॅक्टिव्हीटीज कमी आहेत का? सारखा झोपतो का? ह्या सगळ्याला उत्तर नकारार्थी असल्याने ते म्हणतात की काही काळजी करु नका वाढेल वजन आपोआप.. जास्त अ‍ॅक्टीव्ह असल्याने असे आहे..

नमस्कार, इथले अनेक प्रतिसाद वाचून बरीच माहिती मिळाली. या विषयावर इथे बरीच चर्चा झाली असली तरी मला काही प्रश्न पडले आहेत, त्यामुळे पुन्हा इथे विचारते. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.
स्वरदा, माझी मुलगी आता 15 महिन्यांची होईल. तिचं वजन वाढण्याचा स्पीड थोडा कमी आहे, जन्मवेळेस तिचं वजन 2.4 kg होतं, आणि तिचं सध्याचं वजन 8- सव्वा आठच्या दरम्यान आहे, ते वेगात वाढत नाही.
मी मूळची मुंबई, डोंबिवली येथील, पण सध्या नव-याच्या जॉबमुळे ग्वाल्हेर येथे आहे. डोंबिवली मध्ये मुलीच्या नेहमीच्या पीडियाट्रीशियनला दाखवलं तर ते म्हणतात की बाकी वाढ ( उंची, चालणे, पळणे, इतर ऍक्टिव्हिटीज) व्यवस्थित आहेत तर काळजी करू नका, वजन वाढेल.काही विशेष आहार सांगितला नाही, जे आपण खातो तेच , फक्त थोडं कमी तिखट द्या म्हणाले. ( ती सगळं खाते, पोळी, भाजी, आमटी,भात, घावन, पोहे, दूध etc etc)
पण इथले( ग्वाल्हेर) डॉक्टर म्हणाले वजन वाढलंच पाहिजे, 2-3 टॉनिक्स दिली आहेत आणि आहारात अंड, चिकन स्टॉक वगैरे द्यायला सांगितले. पण अंड्याचा पांढरा भाग (थोडासा) खाऊन तिला लगेच उष्णतेचा त्रास झाला.
सो आता मला नेमकं कळत नाहीये की तिला नक्की काय काय आणि किती खायला द्यायचं. मुलाचं खाण्याचं प्रमाण नेमकं कसं ठरवायचं ??
गुटगुटीत मुलं म्हणजेच फक्त चांगली मुलं नाही, इतर वाढ पण महत्वाची आहे, हे जरी मला पटत असलं तरी इतर लोक तिला पाहून लगेच किती बारीक असा शेरा मारतात आणि वाईट वाटतं. आणि नवऱ्यालाही तिच्या वजनाची प्रचंड काळजी वाटते, त्यामुळे अजून टेन्शन येतं मला.
कोणी गाईड करू शकेल का?

चांगल्या आयुर्वेदिक तज्ञ/ वैद्यांचा सल्ला घ्यावा. हार्मोन तज्ञांचाही सल्ला घ्यावा असे मला वाटते.

हार्मोन तज्ञ??
नक्की कशासाठी म्हणायचे आहे तुम्हाला चंद्रभान?

Oh, ok.
वजन बिलकुल वाढत नाहीये असे नव्हे पण स्पीड थोडा स्लो आहे।
Anyway thank you. Will talk to doctor.

डियाट्रीशियनला दाखवलं तर ते म्हणतात की बाकी वाढ ( उंची, चालणे, पळणे, इतर ऍक्टिव्हिटीज) व्यवस्थित आहेत तर काळजी करू नका, वजन वाढेल.काही विशेष आहार सांगितला नाही, जे आपण खातो तेच >>>>> हेच खरंय.

>>डॉक्टर म्हणाले वजन वाढलंच पाहिजे, 2-3 टॉनिक्स दिली आहेत आणि आहारात अंड, चिकन स्टॉक वगैरे द्यायला सांगितले. >>
२-३ टॉनिक्स Uhoh कशासाठी? त्यात काय घटक आहेत? लेबल्सवर काय लिहिलयं? लहान मुलांना खरे तर टॉनिक्स वगैरेची अजिबात गरज नसते. तुम्हाला तुमच्या नेहमीच्या पेडीने काळजी करु नका सांगितले आहे तर तेच ऐका.
आहाराच्या बाबतीत साधारणतः न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण , दोन वेळा मधले खाणे असे ठेवा. मोठ्या माणसाच्या १/४ म्हणजे एक सर्विंग असे धरायचे. म्हणजे १ पोळी ही मोठ्या माणसाचे एक सर्विंग तर लहान मुलासाठी १/४ पोळी म्हणजे १ सर्विंग. आपण जे जेवतो त्यातलेच सगळे थोडे थोडे वाढायचे. प्रोटिन्स साठी अंड वगैरे सोसत नसेल तर शाकाहारी भरपूर पर्याय आहेत.

धन्यवाद स्वाती२ तुमच्या प्रतिसादासाठी...
टॉनिक्स म्हणजे ताकद /, भूक वाढण्यासाठी आणि बाकी जनरल व्हिटॅमिन ची वगैरे आहेत. आम्ही वाचून, खात्री करून घेतली आहेत.
अंड सध्या तरी सुरू केलेले नाही, कारण इथे अजून बऱ्यापैकी उन्हाळा आहे, थंडीत सुरू करू गरज पडल्यास. बाकी जेवण व्यवस्थित सुरू आहे, आता क्वांटीटी वर लक्ष ठेवेन. धन्यवाद

Pages