लहान मुलांचे वजन

Submitted by मी अमि on 26 June, 2015 - 06:16

माझ्या मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे आणि वजन ९.८ किलो आहे. इतके दिवस डॉक ना विचारले तेव्हा ते त्याचे वजन ठिक आहे वगैरे म्हणायचे. दुसर्‍या डॉक ना दाखवले तेही तसेच म्हणाले होते. यावेळच्या व्हीजीट मध्ये मी डॉक ना परत सांगितले की त्याचे वजन बरेच दिवसांपासून स्थिर आहे. तेव्हा ते म्हणाले की त्याचे वजन १ वर्षे ते २ वर्ष या काळात १.५ किलो वाढायला हवे होते. सध्या ते फक्त ६०० ग्रॅम वाढलय.

त्याचा आहार असा आहे: - सकाळि ७.३० ते ८ - नाचणी सत्व (दुध घालून)
सकाळी ११ ते १२ - पोळी भाजी, भात, अंड्याची बुर्जी/ ऑम्लेट, वरण/ ताक
दुपारी ३ ते ४ - रव्याची खीर/ गव्हाच्या पीठाची खीर/ फळांचा मिल्क शेक
संध्या काळी - ७ ते ७.३० - पोळी भाजी, भात,वरण
रात्री १० - मिश्र धान्याच्या पीठाची खीर (दुध घालून)

डॉ म्हणाले की संध्याकाळचे आणी रात्रीचे खाणे स्वॅप करा. पण रात्री १० वाजता जेवायला देणॅ आम्हाला योग्य वाटत नाही.

वजन वाढण्याचे काही उपाय/ सल्ले मिळू शकतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं पण या दोघी बघ ना काय म्हणतायत, प्लेन, नुसतं दूध द्यायचं नाही, खीरीतून वगैरे जे जाईल तेच. पण असं का?

मी पुन्हा (पुन्हा पुन्हा) वाचल्या त्या दोघींच्या पोस्टी. आता नीट कळलं Wink
मला वाटलं होतं की प्लेन दूधच द्यायचं. त्यातली खिरींची अट आत्ता लक्षात आली. माझ्या लेकीला ती जवळपास सात-आठ महिन्यांची असल्यापासून सकाळ - संध्याकाळ दोन वेळा एक कप दूध एक चमचा साखर घालून देत आले आहे. तिला शिंग फुटल्यावर बोर्नव्हिटा घालायला सुरूवात केली.

पंढरपुरी डाळं मुळात हरभर्‍याच्या डाळीवर काही प्रोसेस करून बनवतात. ते तसंच किंवा खुतखुटीततपणा येण्यासाठी जरा भाजून घेतलं तर ठीक आहे पण धुवायचं का कळलं नाही.

मुलांना जेवू घालताना टीव्ही बंद, आप्लं तोंड चालू ठेवायचं (गाणी नर्सरी र्‍हाईम्स गोष्टी काय वाटेल ते) पण एकाच जागीबसून खायचं असतं असा नियम करायचा, आपण जेवायला बसू तेव्हाच मुलांनाही वाढून द्याय्चं. सांडत लवंडत खातात, पण स्वतःच्या हातानं खायला शिकतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीपण छान डेव्हलप होत जातात.

कुठलाही पदार्थ अतिपौष्टिक गिळगिळीत गबगबीत करायला जाऊ नका. वेगवेगळ्या टेक्चर्स आणि चवींची सवय होऊ देत. अतिसाखर, तूप, गूळ, ड्राय फ्रूट्सची पावडर यांचा सोस थोडा कमी ठेवावा. प्रत्येक मीलमध्ये सर्वच्य सर्व घटक येऊ शकत नाहीत त्यामुळे एका मीलला ब्भाजीच खाल्ली तर पुढचं मील वरणभाताचं असलं तरी चालू शकतं. रोजच्या रोज त्याच वेळेला तोच तोच आहार अजिबत देऊ नका, त्यात वैविध्य ठेवा, मुलांना हे खाणारेस का ते असे ऑप्शन्स द्या. मुलं एकावेळी थोडंच खातात, तेवढंच खाऊ द्या. अति भरवू नका. चांगली कडकडून भूक लागू द्या, मग मुलं स्वतःहून जेवतात.

'प्लेन दुध देऊ नका, बोर्नव्हीटा वगैरे घालून देऊ नका, लापशी खीर वगैरेत घालून द्या' असं डॉ नी सांगितलय. मला असं वाटतं की काही जण एका वेळचं मील म्हणून फक्त बॉटलभर दुध देतात. दुध हे पुर्णान्न नाही. म्हणून सांगत असावेत. दुसरं म्हणजे काहीवेळा प्लेन दुधाने कॉन्स्टीपेशन होऊ शकते.

पंढरपुरी डाळं मुळात हरभर्‍याच्या डाळीवर काही प्रोसेस करून बनवतात. ते तसंच किंवा खुतखुटीततपणा येण्यासाठी जरा भाजून घेतलं तर ठीक आहे पण धुवायचं का कळलं नाही .>>>
पंढरपुरी डाळं बनवताना ते वाळुत भाजतात. आणि बाळासाठी करायचं म्हणुन मी शक्यतो सगळं धुवुन घेते.

बादवे, काल मोठया मुष्किलीने त्याला वजन काट्यावर एका मिनिटासाठी उभे केले तेव्हा वजन १० च्या वर गेलय असं लक्षात आलं. (मुलांना एका मिनिटासाठी एका जागी उभं ठेवणं किती महामुष्किल काम आहे Sad )खाण्यात शिंगाडा पीठ, खारीक, अंजीर , काळ्या मनुका, राजगिरा यांचे प्रमाण वाढवलय.

दुध हे पुर्णान्न नाही.
दुसरं म्हणजे काहीवेळा प्लेन दुधाने कॉन्स्टीपेशन होऊ शकते.>>>

नाही गं राणी, असं काहीही नाही. हे वेगवेगळ्या डॉक्टरांचे वेगवेगळे मतप्रवाह असावेत आणि ते ते डॉक्टर स्वतःला जे पटतं तेच आपल्या पेशंटला पटवत असावेत.
उदा. रात्रीचे दही खाणे. काही डॉक्टर रात्री अजिबात दही खाऊ नका असं सांगतात तर काही डॉक्टर दह्याताकातल्या प्रोबायोटिक्सचा उदोउदो करतात. या सगळ्यांत आपण आपल्या मनाला जे पटतं, जीभेला रुचतं, पोटाला पचतं तेच करतो तोच नियम मुलांच्या बाबतीतही लावावा अश्या मताची मी आहे.

हम्म तेही खरय :)मग कपभर दुध देताना त्याबरोबर काहीतरी खायला दिले म्हणजे उपमा वगैरे तरीही ठिक आहे.

दूध जेवण म्हणून नाही दिलं तरी नेटवरच्या बर्याचशा चार्टसनुसार दोन कप दूध पोटात गेलं पाहिजे. आणि वर नंदिनीने म्हटलंय तसं सारखं लापशी, खिरी असं गिळगिळीत, सेमीसॉलीड खायची सवय आता बंद करायला हवी. खुटखुटीत, दाताने तोडण्याजोगे पदार्थ द्यायला हवं. मी ही राधाला दूधात पोळी कुस्करून देते ते आता कमी करणार आहे. तो एक चमचा गोळा तोंडात बसला की संपलंच, पाच मिनीटं मारूती. Lol आणि मुलांना येता जाता खायला चुरमुरे, ज्वारी, गव्हाच्या लाह्या, दाणे, गुळाचा बारीक खडा वगैरे आपण देतो त्यानेही पोषण होतच असतं.
तुम्ही मुलांसाठी सेपरेट कमी तिखट भाजी करता का पोळी भाजी देताना? कोणत्या भाज्या? मी अजून हे केलेलं नाहीये.

जीभेला रुचतं, पोटाला पचतं तेच करतो तोच नियम मुलांच्या बाबतीतही लावावा>> +१

नंदिनी +१

मी ही राधाला दूधात पोळी कुस्करून देते ते आता कमी करणार आहे. तो एक चमचा गोळा तोंडात बसला की संपलंच, पाच मिनीटं मारूती. >> दात खराब होतील अशाने.

अमि ह्या वयात तरी दूधासोबत मीठ घातलेले पदार्थ नको देऊस शक्यतो. तसे तर आयुर्वेदाप्रमाणे दूध आणी मीठ घातलेले पदार्थ जसे पोळी ब्रेड इत्यादी एकत्र कधीच खाऊ नयेत.. माझ्या घरी पोळी आणि दूध एकत्र खाल्लं जातं त्यादिवशी आवर्जून पोळीत मीठ नसतं.

प्लेन दूध एखाद्याला पचत नसेल तर त्याला बोर्नव्हिटावालं दूध तरी कसं पचेल? एखाद्याला अ‍ॅलर्जी असेल तर ती काय प्लेन दूध न देण्यानं जाणार आहे का? की खीरीत दूध घातल्यानं जाते? मला तरी लॉजिकच कळत नाहीये प्लेन दूध न देण्याचं. असं काही आहे का की फक्त लिक्विड प्यायलं जाऊ नये सोबत काही तरी सॉलिड असावं आणी ते बिस्किट नसावं म्हणून डॉ आसं सांगत आहेत?

कॉन्स्टिपेशनची भीती वाटत असेल तर आयुर्वेदिक डॉ च्या सल्ल्याने गरम दूधात थोडसं तूप घालून द्यावं. चवही छान लागते आणि कॉन्स्टिपेशनची भीतीही नाही.

दूधात राजगिर्‍याच्या लाह्या आणि थोडी साखर किंवा सातूचं पीठ आणि थोडी साखर किंवा ज्वारीच्या लाह्या आणी साखर हे प्लेन दूधापेक्षा अधिक पौष्टिक..ज्वारीच्या लाह्यांचं पीठ सुद्धा मिळतं बाजारात. किंवा गव्हाचं पीठ भाजून मग ते तूपावर भाजून दुधात साखरेसोबत घालून दिलं तरी छान चव लागते. मी कधी केलं नाही पण तसंच ज्वारीचं पीठ सुद्धा भाजून ठेवलं आधी नुसतं आणि मग तूपावर खरपूस तरी तेही दूधात घालून देता येईल.

नहीहीहीही... आशुसोबत मलाही कॉम्लेक्स यायला लागलाय तुमची बाळं इतकं नीट एका जागी बसुन खातात ते वाचुन. आमच्याकडे थोड थोड्ं दर दोन तासांनी लागतं. चपाती ग्रिलमध्ये बसवुन भरवली तरच एका जागी खाल्ली जाते. बस झालं की वरती भरवायचंच नाही काहीच हा नियम पहिल्यापासुन घालुन घेतलाय. त्यामुळे लेक एकदा नाही म्हणाली कि पुन्हा घास घ्यायचाच नाही.

मृण्मयीने दिलेली लिंक आता पाहिली. चांगली आहे.

हातात पोळी, खाकरा वगैरे दिला तर दाताने चावून खातो. पण थोडंस खाऊन सोडून देतो. त्यामुळे त्याला बसवून भरवावं लागतं. लाह्या वगैरे डीशमध्ये दिल्या तर त्या पहिल्यांदा घरभर लादीवर पसरवल्या जातात आणि मग एक एक वेचून तोंडात टाकायचा प्रयत्न केला जातो Happy

आम्ही दोघंही दिवसा घरी नसल्याने बाळाला उन्हात नेता येत नाही. शनिवार -रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी मी त्याला जवळपास अर्धा पाऊण तास उन्हात फिरवून आणते. तसे व्हिटॅमिन डी सप्लिमेंटहि सुरु आहे.

हातात पोळी, खाकरा वगैरे दिला तर दाताने चावून खातो. पण थोडंस खाऊन सोडून देतो. त्यामुळे त्याला बसवून भरवावं लागतं.<<<< तो जितका तुकडा खाईल त्याहून छोटा तुकडा द्यायचा, तो खाल्ला की मग परत तितकाच तुकडा. असं करत रहायचं. चावून खाणं ही प्रोसेस एंजॉय करायला शिकायला हवंय Proud

(मुलं एकट्यानं खात अस्ताना त्यांच्यावर लक्ष ठेवणं अति गरजेचे आहे!!!)

तुम्ही मुलांसाठी सेपरेट कमी तिखट भाजी करता का पोळी भाजी देताना? कोणत्या भाज्या?<<< मी सुनिधीसाठी आजही अजिबात तिखट न घातलेली भाजी आधी करून घेते, तिची भाजी बाजूला काढून मग तिखट मसाला घालते. बहुतेक भाज्या मी प्रेशरकूक करून घेते. वांगी आणि गवार (तिला या दोन भाज्या आवडत नाहीत) इतर सर्व भाज्या आणि कडधान्यं उसळ ती खाते. बहुतेकदा पोळी आणि भाजी असं खाण्यापेक्षा वाटीभर भाजीच खायला आवडते. आणि मी खाऊ देते. नंतर थोड्यावेळानं नुसती पोळी खाते.

तिला सहन होत नाही. परिणामी आम्ही तिखट अथवा मिरची देत नाही. तसंही आम्ही दोघंही फार तिखट मसालेदार वगैरे खात नाही.

>> मारुती
Lol

नंदिनीशी सहमत मी. रोहनसाठी (वय २.५ वर्षे) वेगळी बिनतिखट भाजी करते. जनरली फोडणीत हिरव्या मिरच्या घालत असल्याने, दोन वेगळ्या भाज्या करायला लागतात. (बटाटे सोडल्यास कुकरमधे उकडायच्या भाज्या कोणत्या हे मी नंदिनीला आधीही विचारले होते बहुतेक, पण उत्तर विसरले.) रोहनला सगळ्या भाज्या, उसळी, कोशिंबिरी इ आवडतात. अजून न आवडणारी भाजी सापडलेली नाही. आधी चमच्याने भाजी खाणे, मग मधूनच पोळी खाणे मग दोन्ही एकमेकांना लावून खायचा प्रयत्न असा प्रकार असतो. तो फियर्सली इंडीपेंडंट आहे. म्हणजे पोळीचे तुकडे करून दिले तर ही मोडकी नको म्हणून कटकट करतो. पण आई-बाळ असे खेळायचे (त्याने बाळ व्हायचे ;-)) म्हटले की मला भरवू देतो. घाई असेल तर ही युक्ती. (आणि निवांत वेळ असेल तर मी बाळ होते. ;-))

अमि, रोहनचे वजन इथल्या तक्त्याच्या बाहेर गेले आहे. म्हणजे खुप कमी आहे. तो अडीचचा असून साधारण दीड वर्षाच्या टिपिकल ब्रिटिश मुलांच्या आकाराचा आहे. दिवसा अजिबात झोपत नाही. संध्याकाळी ७ ते सकाळी ६.३०/७ झोपतो. एकूण तीन मुख्य जेवणे ७.३०, १२.००, ४.३०. प्रत्येक जेवणात एक फळ प्रकार. एक मधली वेळ १० ला. आणि संध्याकाळी झोपण्याआधी कधी कधी थोडा खाऊ. नर्सरीत त्याच्या वयाच्या (आणि आकाराने दीडपट!) मुलांएव्हढेच तो जेवतो. एका जेवणात आम्ही फक्त पोळी भाजी किंवा फक्त पास्ता किंवा फक्त वरण भात असे खातो. मला तू दिलेला आहार तक्ता व्यवस्थित वाटतो आहे खरे तर.

नुसत दूध न द्यायच कारण असेल की दूध म्हणजे पूर्ण आहार नसेल मानला जात या वयात. मग नुसतच पोट भरेल पण जीवनसत्वांची गरज नाही भरली जाणार.
मला हे कारण बाळांना पाणी का देऊ नये यासाठी सांगितलेलं.

मी सुद्धा बेशुध्द Happy

जन्मल्यापासुन एकदाही माझा मुलगा सलग ५ तास झोपला नसेल.

माझा मुलगा आता सव्वा वर्षाचा आहे. त्याला अंड कधीपासून देता येइल.. कोणत्या वेळेत द्यावं. कधितरी एखादा घास आमच्यातलं ऑम्लेट भरवलं आहे. पण रोज अंड द्याव का?

वरचा तक्ता बघून धन्य वाटलं!! गुणी आहे बाळ तुझं... नको आणखी हट्ट करूस!!

एखाद्याला अ‍ॅलर्जी असेल तर ती काय प्लेन दूध न देण्यानं जाणार आहे का? की खीरीत दूध घातल्यानं जाते? मला तरी लॉजिकच कळत नाहीये प्लेन दूध न देण्याचं. >> माझ्या मुलाला दोन वर्षांचा होईपर्यंत प्लेन दूध पचत नसे सगळ्या प्रकारचं दूध देऊन पाहीलं! (पाणी घालून, वै. वै.) पण खीरीतून पचत असे. दुधाचा नॉशिया होता तर तसेही नाही! आवडायचं फार! डॉक्टरांनी सांगितलं जसं पचतं जे आवडतं ते द्या... पोटात जाणं महत्वाचं!!

जन्मल्यापासुन एकदाही माझा मुलगा सलग ५ तास झोपला नसेल.>> आमचं रत्नं ही!!

मूळात खाण्याचाच कंटाळा असल्याने हजारो प्रकार करून, आधी स्वतः टेन्शन घेऊन मग नवर्‍याला मग डॉक्टरला देऊन, चिडचिड करून, खाण्यासाठी मागे लागून पोराने जाम दाद न दिल्याने सध्या निवांत आहे, अगदी मला हवं तसं नाही पण खूप खेळून दमला की खातो! घरातलंच हटकून खायला हवं असा हट्ट मात्र धरते!

Pages