आपुलालें चित्त

Submitted by नवनाथ राऊळ on 18 June, 2015 - 03:10

आपुलालें चित्त । विठुचें राऊळ ।
राखावें निर्मळ । सकळांनी ॥१॥

काम क्रोध माया । मद मोह द्वेष ।
किंचितही लेश । धरों नये ॥२॥

विषय समूळ । कुर्वाळितीं चित्तां ।
अलिप्त सर्वथा । विठू राहें ॥३॥

नाथ म्हणें रितें । चित्त शुचिर्भूत ।
नित्य वसें तेथ । विठाबाई ॥४॥

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाथ म्हणें रितें । चित्त शुचिर्भूत ।
नित्य वसें तेथ । विठाबाई ॥४॥ >>>>>> केवळ सुंदर ....

विषय समूळ । कुर्वाळितीं चित्तां ।
अलिप्त सर्वथा । विठू राहें ॥३॥ >>>> हे नीट समजले नाही -- चित्तामधे जर विषय असतील तर त्यात विठूराया रहाणार नाही (त्यापासून विठूराया अलिप्त असेल ) - हा मी लावलेला अर्थ बरोबर आहे का हे कृपया सांगावे...

धन्यवाद ...

छान! Happy
चित्तामधे जर विषय असतील तर त्यात विठूराया रहाणार नाही (त्यापासून विठूराया अलिप्त असेल ) - >>>>>>>>>>मीही असाच अर्थ लावला.

शशांकजी, आपण जो अर्थ लावलाय नेमके तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय मी.. मलाही तेच अभिप्रेत आहे...

विषयविकारांनी पूर्णतः वेढलेल्या मनात विठ्ठलास जागा ती कशी राहिल.. किंबहुना विठूराया स्वतःच अशा मनांपासुन दूर राहिल असे लिहीण्याचा मानस होता...

तरीपण नेटाने विठूरायास बोलावत राहिले. हृदयाचे कवाड त्याच्यासाठी उघडे करुन ठेवले तर तो येईलच, कितीही विषयांनी मन बरबटलेले असले तरी. तो येताच जे सामान्य माणसास अहितकारक विषय असतील ते आपोआप काढता पाय घेतील. कारण तो तर पतीतपावन आहे. शुद्ध ठिकाणीच तो जात राहिला तर पतीतांचं काय होणार? त्यांचा उद्धार कसा होणार? वाल्मिकींचं उदाहरण आहे आपल्यासमोर Happy उलट तो अश्यांच्या बाबतीत जास्त कनवाळू असेल, त्यांच्यासाठी त्याचे नियम जास्त शिथील केले असतील. कारण कडक नियम पाळायची त्यांची ताकद नसते.अच

अश्विनीजी, अगदी बरोबर बोलताय आपण.. विठ्ठल पतितांकडेसुद्ध जाईल.. परंतु विठूला बोलावत राहणे म्हणजे निव्वळ calling नव्हें... ती आर्त हाक असली पाहिजे जी भावाविना कशी देता येईल..? आणि विषयांसोबत भाव येईल तरी कसा..?

पतित हे कर्माने पतित असले तरी चालतील परंतु चित्ताने नक्कीच असु नयेत नाही का?
वाल्या कोळी पश्चातापाच्या अग्नित जळाला.. आपल्या पापांचा भागीदार कोणी नाही ही जाणीव होताच त्याला विरक्ती आली... परिवाराचीही आसक्ती राहिली नाही... अश्या आसक्तीविरहीत रित्या मनांत विषय कसें बरे राहतील..?? तिथे विठूच नाही का राहणार..?

आणि मी 'विठू अलिप्त राहील' हे केवळ लाक्षणिक अर्थाने म्हटले आहे.. तो कर्ता आहे..! निर्णय त्याचा असतो या अर्थाने.. त्याला ठेवणारे आपण कोणी नाही असे नम्रभावे म्हणू इच्छितो..

विठ्ठल पतितांकडेसुद्ध जाईल.. परंतु विठूला बोलावत राहणे म्हणजे निव्वळ calling नव्हें... ती आर्त हाक असली पाहिजे जी भावाविना कशी देता येईल..? आणि विषयांसोबत भाव येईल तरी कसा..? >>>> अगदी नेमके लिहिलंय....
म्हणतात ना -एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसेच - मनात एक तर विषय असतील नाहीतर विठूराया ...