ड्रंक लेडी विथ ऑडी..

Submitted by अश्विनीमामी on 10 June, 2015 - 01:28

आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.

मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...

जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग

त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?

सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.

पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटले तिकडे सूर्य दर्शन दुर्मिळ, चांगलं वेदर असेल, ऊन असेल तर येऊ दे आत येईल तेवढे यासाठी सनरुफ.

माझ्या वयाचे म्हणजे पोरं लग्नाला आली, त्या वयाचे उच्चशिक्षित लोक सर्रास लॉंग ड्राइव्ह करतात दीड दोन पेग मारून. हाय वे ला. आणि म्हटलं, तू घेतोयस तर मी चालवतो, तर "तुला काय वाटलं मी पिऊन चालवल्यावर ठोकेन आता?"

काय सांगणार पोरांना ते आणि सांगितलं तरी, पोरं घेणार का गांभीर्याने.

Hi horrible accident. All. Under 25 kids. They were racing to over take a bmw. Bmw kuthe aami Innova kuthe.

I just returned from Dehradun somehow was not comfortable on the roads. The whole region is eco sensitive and large roads like in Bombay Delhi are dangerous to build.

Please read my travel experience in pravasache anubhav India. . Riksha bari.

Lovely place but Mumbai bari.

सनरूफमधून बाहेर डोकं काढणं इतक्या सर्रासपणे दिसतं की मला वाटत होतं की तसं अपेक्षित आहे! (आम्ही काही वर्षांपूर्वी नवीन कार घेतली तेव्हा सनरूफवालं व्हर्जन एक लाखाने जास्त महाग होतं आणि आम्हाला ते वर्थ वाटलं नाही. नंतर जेव्हा जेव्हा मी अशी सनरूफमधून डोकी वर काढलेली मुलं/माणसं बघते तेव्हा तेव्हा आपण योग्य निर्णय घेतला असं वाटतं. )

Sunroofs in cars have many uses, including:

Air circulation: Sunroofs can help with air circulation, which can dissipate stale air or too much heat.

Light: Sunroofs let in natural light, which can brighten up the cabin.

Fresh air: Sunroofs can let in fresh air.

Vitamin D: Sunroofs can help occupants get some Vitamin D.

Stargazing: Sunroofs can be great for stargazing.

Photography: Sunroofs can be useful for photographers.

Luxury feeling: Sunroofs can add a visual appeal and a luxurious touch to the car's overall feel.

Cruise feel: An open sunroof can give people a feel of a convertible car without the expense associated with one.

Less wind noise: A panoramic sunroof can produce less wind noise within the cabin.

Less claustrophobic: A panoramic sunroof can
help drivers feel less claustrophobic when driving long distances.

However, standing out of the sunroof of a moving vehicle is against the law and dangerous.

मुंबैच्या ट्रॅफिकात सन रुफ मधुन डोके काढणारे ग्रेटच.. थोड्या वेळात तोंड, केस सगळे करडे होणार.. Happy मुम्बै पुणे हाय्वेवरही असे स्टंट्स करतात म्हणे.

एखाद्या व्यक्तीने स्वत: कधी सनरुफ पाहिले नाही, तिला सनरुफ म्हणजे काय असतं ते व्यवस्थित फोटो / व्हिडिओद्वारे समजावुन सांगितलं आणि तिला म्हटलं आता लिही बघु सनरुफचे काय फायदे उपयोग, तर शेवटले दोन वगळता वरील सर्व लिहुन काढेल.

मुळात भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात सनरुफची गरज मला समजत नाही. मूंबईच्या ट्रॅफीकमध्येही हा आचरटपणा चालतो. सनरुफमधून बाहेर बघताना नुसता ब्रेक मारायला लागला तरी मान किंवा मणक्याला इजा होऊ शकते>> +११११११

मुळात भारतात जिथे गाडीच्या बाजूच्या काचेवर सुद्धा sun-film लावून ऊन रोखावेसे वाटते (ज्याला परवानगी नाही) तिथे आणखी अगदी वरच्या बाजूस sun-roof असलेली गाडी घेणे म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. गाडी धावत असतांना sun-roof मधून डोकावणाऱ्याना तर २१ तोफांची सलामी!!!

आपल्या घरात गाडी असल्यास त्याला speed lock करुन घेणे हे उत्तम! त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. authorised service center मध्ये जाऊन गाडीच्या ECU मध्ये setting करुन speed lock करता येतो.

माझ्या स्वतःच्या TATA Indica मध्ये, जेव्हा ती Ola / Uber ला जोडलेली होती तेव्हा ८० किमी /तास हा max. speed सेट केलेला आहे. कारण नियमानुसार सर्व transport गाड्यांना तसे करणे बंधनकारक आहे. आता गाडी private केली तरीही मी speed unlock केलेला नाही. कारण तो unlock करून घ्यायला पुन्हा २५००/- खर्च आणि पुन्हा कधी कोणत्या रस्त्यावर speed violation झाले तर पुन्हा २०००/- चे चलान! म्हणजे दोन्ही बाजूने माझेच नुकसान!!! वर अपघाताची भीती जास्त! त्यापेक्षा असू देत max. speed 80 KM/h. अगदीच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, अटल सेतू अशा ठिकाणी (जेथे कारला १०० किमी/तास वेगमर्यादा आहे) चालवायची झाली तर सगळ्यात डावी लेन पकडून ८० च्या वेगाने जायचे!

ज्यांच्या घरात १५-१८ या वयोगटाची मुले आहेत, ज्यांच्याकडे चालक परवाना नाही, पण आई-वडिलांच्या नकळत गाडीची किल्ली घेऊन जाऊन गाडी चालवण्याची शक्यता आहे व त्यामुळे अपघात झाल्यास आई-वडिलांना जबाबदार धरले जाऊ शकते (उदा. वेदांत अगरवाल प्रकरण) अशांनी गाडीची किल्ली मुलांना माहित नसेल अशा सुरक्षित ठिकाणी ठेवणे आदी उपाय करावेत. सर्वात खात्रीशीर उपाय म्हणजे आजकालच्या जवळपास सर्वच गाड्यांत engine immobilizer हे feature असते, ज्यामुळे गाडीच्या original किल्लीशिवाय गाडीचे इंजिन सुरु होत नाही. अशा किल्लीमध्ये एक छोटीशी चीप बसवलेली असते. जर गाडीच्या किल्ल्या मुलांपासून दूर ठेवणे काही कारणामुळे शक्य नसेल किंवा लपवलेली किल्ली मुले शोधून काढत असतील तर मुलांच्या नकळत गाडीची किल्ली चावीवाल्याकडे घेऊन जाऊन त्याच्याकडून ही किल्लीमधील चीप काढून घ्यावी आणि ती आपल्या पाकिटात ठेवावी. म्हणजे मुलांनी किल्ली शोधून काढलीच आणि मित्रांसोबत बाहेर जायला निघालेच तरीही किल्लीत ती चीप नसल्याने (जी पालकांनी काढून घेतली आहे आणि आपल्या पाकिटात ठेवली आहे) गाडी सुरूच होणार नाही!

देहराडून अपघाताची घटना अगदीच वाईट आहे. Sad
दोष कुणाला द्यायचा - दारुच्या नशेमधे वेगाने गाडी चालविणे की पालकांनी गाडीची किल्ली हातामधे देणे ?

ताशी १७० किमी असा वेग आणि जोडीला ड्रायव्हरने नशा केली असेल तर गाडीवर नियंत्रण रहाणे अशक्यच. बिकट प्रसंग ओढवला तर निर्णय क्षमता कमी होणारच.

<< >>> भरत, स्वकष्टार्जित का वडिलोपार्जित याने काय फरक पडला असता समजलं नाही
स्वकष्टार्जित असलं की घ्यायची ऐपत येईपर्यंत वाढलेल्या वय आणि अनुभवातून काही शहाणपण आलेलं असण्याची शक्यता जास्त. >>

------ सहमत.
एखादी गोष्ट आयती विनासायास मिळाल्यावर त्याचे मोल रहात नाही. स्वकष्टाने कमाविलेले पैसे असतील तर त्याची खरी किंमत कळते.

मोल आणि अक्कल वगैरे या मुलांना आणखी दोन वर्षांनी आलं असतं का? मला भाबडेपणाचे वाटतंय. बरं, साधारण अशी मुलं घराच्या बिंनेस मध्ये कामाला लागतात. आता वडिलोपार्जित ही धूसर होऊ लागतं. कुठे नोकरी केली तरी डाऊन पेमेंट चे पैसे कमवायला दोन चार महिने पुरे ना? लक्षात घ्या, कितीही स्टिरीओटाइप वाटलं तरी इतर गरजा घरून पूर्ण होत असल्या आणि डोक्यात हवा असली की पाय चार बोटं वरून चालतात असं समाजात दिसतं. हे मध्यावर्गीय लोक नाहीत. हा माज नशा हा सुद्धा वडिलोपार्जित मिळालेला असण्याची पुरेपूर शक्यता आहे.

रेकलेस गाडी चालवण्याची नशा/ सवय, फक्त गाडी चालवण्याची कशाला... एकूणच डोक्यात गेलेला वडिलोपार्जित माज स्वकष्टाने धुवून काढणारे किती लोक असतील? मोठ्या ब्रेशने चित्र रंगवतो आहे.
तुमचा मुद्दा समजला तो जनरली पटला सुद्धा, हे वय असं असतं हे ही मान्य आहे. पण ही जमात वेगळी लीग आहे त्याला आपले नियम लागू होतील का शंका आहे.

अल्कोहोल घेतलं होतं हे पोलिसांनी कन्फर्म केलं होतं का?
घेतलं असल्यास ते लीगल लिमिट बाहेर होतं हे पोलिसांनी कन्फर्म केलं होतं का?
Bmw बरोबर रेस लावली होती हे पोलिसांनी कन्फर्म केलं होतं का?
Sunroof मधून डोकं काढून चालले होते हे पोलिसांनी कन्फर्म केलं होतं का?

https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/accident-six-youth-dead-de...

धंदेवाईक मीडियातले स्पेक्युलेशन वाचून सो मि वर सुरू होण्याआधी शहानिशा करणे योग्य की कसे?

नव्या मुम्बैत माझ्या घराजवळच्या एका महत्वाच्या जंक्शनवर ११ वर्षापुर्वी असाच अपघात झाला होता. पाम बिच रोडवरील एका बारमध्ये मद्यपानासाठी पुण्याहुन आलेली मंडळी परत जाताना इतक्या वेगात होती की जंक्शनवर असलेला कंटेनरवाला ट्रेलर त्यांना दिसला नाही. पाम बिच वरुन आलेली गाडी जे एन पिटीला जाणार्‍या कंटेनरच्या खाली गेली. जे बसले होते ते जागीच गेले. मागच्या सिटवर एकजण झोपलेला तो वाचला. तिथले कॅमेरे सुरु असल्याने हे सगळे कॅमेर्‍यात रेकॉर्ड झाले व न मु पोलिसांनी तो विडिओ असे करु नका हे सांगण्यासाठी खुप वापरला.

https://youtu.be/LcTp4rapI5c?feature=shared

डेहराडुन घटनास्थळीचा कॅमेरा त्याच रात्री बंद पडला असे वाचले. त्यामुळे नेमके काय झाले ते कळणे कठिण.

मोरोबा, बरोबर आहे.

अनेकदा पोलीस दबावाखाली येतात, सॅम्पल बदलते वगैरे खरे असले तरीसुद्धा इथे तसेच झाले असेल/होईलच असे गृहीत धरणे आणि एवढ्या रात्री, पार्टी म्हणजे ड्रंक ड्रायव्हिंगच असणार असे गृहीत धरणे चुकीचे आहे. शहनिशा करायला हवा आधी. आपला अंदाज बरोबर निघाला/नाही निघाला याला अर्थ नाही, अधिकृत माहितीनुसार जावे.
इथे ड्रंक ड्राइव्हिंगच असेल असे मी गृहीत धरले होते.

<< एवढ्या रात्री, पार्टी म्हणजे ड्रंक ड्रायव्हिंगच असणार असे गृहीत धरणे चुकीचे आहे. शहनिशा करायला हवा आधी. >>

इनोव्हा ने एक कंटेनर को पीछे से जोरदार टक्कर मारी >> ज्याने मागून टक्कर दिली तोच दोषी. केस डिसमिस्ड.

दुसऱ्याच्या चुकीमुळे जीव गेला तर सहानुभूती आहे (उदा. सलमान केस). स्वतः जबाबदार असताना जीव गेला तर ड्रायव्हरबद्दल अजिबात सहानुभूती नाही. मित्रांना त्या गाडीत न जाण्याचा पर्याय होता, तरीही ते गेले आणि जीव गमावला. त्यांचा सारासार विचार चुकला हे नक्की म्हणू शकतो.

सनरूफमध्ये उभे राहताना अपघात होऊन जीव गेला, तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता. जसे की पुण्यातले दीडशहाणे लोक हेल्मेट वापरायला नकार देतात. या दोन्ही प्रकारात जीव गेला तर सहानुभूती शून्य. अपघात झाला, जीव गेला असे म्हणून केस बंद करावी.

पार्टी म्हणजे ड्रंक ड्रायव्हिंगच असणार असे गृहीत धरणे चुकीचे आहे. शहनिशा करायला हवा आधी >>>>
त्यांचा त्या पार्टीचा व्हिडीओ ट्विटरवर होता. क्लिअरली मुलं ड्रंक आहेत. पार्टीत ड्रिंक करण्यात काही गैर नाही. पण त्यानंतर ड्रायव्हिंग अनॲक्सेप्टेबल, इल्लीगल.

ज्याने नवी कार घेतली म्हणून सेलिब्रेट करायला गेले होते तो सिद्धेश अगरवाल (तोच ड्राइव्ह करत असेल ना?) हॉस्पिटलमध्ये आहे, स्टेबल आहे, पण अपघाताबाबत त्याला काही आठवत नाहीए.

<< डेहराडुन घटनास्थळीचा कॅमेरा त्याच रात्री बंद पडला असे वाचले. त्यामुळे नेमके काय झाले ते कळणे कठिण. >>

---- एका बातमीत म्हटले आहे, या स्मार्ट शहरांत एकूण ५३६ कॅमेरा आहेत, पैकी १३४ बंद आहेत.
https://timesofindia.indiatimes.com/city/dehradun/dehradun-tragedy-the-l...

<< ज्याने नवी कार घेतली म्हणून सेलिब्रेट करायला गेले होते तो सिद्धेश अगरवाल (तोच ड्राइव्ह करत असेल ना?) हॉस्पिटलमध्ये आहे, स्टेबल आहे, पण अपघाताबाबत त्याला काही आठवत नाहीए. >>

------ अग्रवाल नावाने गोंधळ होत असावा. सुनील अग्रवाल ( व्यापारी) यांनी गाडी मुलाला अतुल अग्रवाल भेट दिली. गाडी अतुल चालवत होता. अपघातात गेला बिचारा.

अतुलच्या गाडीची पार्टी सिद्धेशकडे ( अग्रवाल ) होती. सिद्धेश गाडी चालवत नव्हता, मागे बसला असावा ( म्हणून वाचला), सध्यातरी धोका टळलेला आहे असे म्हणतात पण काय / किती डॅमेज झाला असेल याची कल्पनाही करवत नाही. Sad

भयानक अपघात! गाडी चालू असताना कुठल्याच भागातून आपले अवयव बाहेर काढणं चुकीचं आहे. चालू गाडीतून उभे राहून डोकी वर काढणे या प्रकाराला बॉलिवूड चित्रपटात भारी दाखवल्याने हे आकर्षण आणि सन रूफ त्यासाठी आहे हा समज दृढ झाला असेल का?

चालू गाडीतून उभे राहून डोकी वर काढणे या प्रकाराला बॉलिवूड चित्रपटात भारी दाखवल्याने हे आकर्षण,
>>>> हॉलिवुडी व चोप्रा, जोहर चित्रपटातल्या कन्वर्टीबल्समुळे आकर्षण वाटूच शकते. पण एवढ्या महागाच्या गाड्या घेणाऱ्यांकडे त्याच्या निम्मा तरी कॉमन सेन्स आहे का? मेंढरासारखे एकाने केलं की सगळे करायला लागतात.

पण एवढ्या महागाच्या गाड्या घेणाऱ्यांकडे त्याच्या निम्मा तरी कॉमन सेन्स आहे का?.....
उलट जितकी गाडी मोठी (महागडी), तितकी अक्कल कमी! असे निरीक्षण आहे.

कुर्ला येथे बेस्ट बसने अनेकांना चिरडले. या अपघातांत किमान पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा फार मोठा आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बस आगरातून गाडी निघाल्यावर केवळ ३०० -४०० मिटर मधे एव्हढा मोठा अपघांत घडलेला आहे. गाडी चालक नशेमधे होता का याचे उत्तर पोलीस तपासांत कळेल अशी अपेक्षा आहे.
https://www.youtube.com/watch?v=fk6YFYfuKAQ&t=145s

सन-रूफबद्दल वावेशी सहमत.
इथे चालत्या गाडीत शाळकरी पोरं सनरूफमधून डोकं बाहेर काढून उभी असलेली नेहमी पाहिलेली आहेत. एकदा तर तीन लहान-लहान पोरं एकावेळी एकाच सनरूफमधून बाहेर बघत होती.
गिअर बदलताना त्या पोरांचे पाय मध्ये मध्ये येत नसतील का? किमान त्या कारणाने तरी चालवणार्‍याने तसं उभं रहायला मनाई केली पाहिजे.

कुर्ला बेस्ट अपघातामधे आसपासच्या लोकांनी, रिक्षा चालकांनी जखमींना दवाखन्यांत पोहोचविण्याची महत्वाची मदत केली.

चालकाला ट्रक, ट्रॅव्हल बस तसेच बेस्टच्या मॅन्युअल बस चालविण्याचा अनुभव होता पण अशा प्रकारचे EV basa बस त्याने दहा दिवसां पूर्वी चालवायला सुरवात केली होती.
अनेक प्रश्न उपस्थित होतात. चालक नशेत गाडी चालवित होता ? ब्रेक फेल झाले, का गाडीचा वेग कमी करण्यासाठी चुकून अ‍ॅक्सलेटरवर पाय पडला होता?

गाडीचा हत्यार म्हणून वापर झाला आहे का या दृष्टीने पण पोलीस विचार करत आहे.
https://www.ndtv.com/india-news/mumbai-bus-accident-best-bus-accident-ku...

Pages