ड्रंक लेडी विथ ऑडी..

Submitted by अश्विनीमामी on 10 June, 2015 - 01:28

आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.

मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...

जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग

त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?

सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.

पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या बाईला तिच्या किंवा तिच्या परीजनांनासुद्धा त्याच प्रमाणे उडवावं का?
या केस मधे पब्लिक मार कसा बसला नाही तिला याचे ही आश्चर्य आहेच.

शिक्षा तर मिळायलाच हवी, मिळेलच कि नाही ते सांगता येत नाही :रागः

<<<कुठे चालली आहे भातताची संस्कॄती बायापण पियक्कड!>>>

अहो असे एकदम सबंध भारतीय संस्कृतीवर घसरू नका. एक यडपट बाई म्हणजे सगळा समाज नव्हे.
आता हेच पहा ना, भारतीय संस्कृतीत स्त्रियांचा आदरच केला जातो म्हणूनच <<<या केस मधे पब्लिक मार कसा बसला नाही तिला>>> असा प्रश्नच अजून कुणाला पडला नव्हता.

त्यात आश्चर्य कसले, उच्च भारतीय संस्कृती आहे ती.

बन्डु, माझ्या अंदाजाप्रमाणे मुक्तमार्ग अधांतरी आहे. त्यामुळे जमिनीवरील लोकवस्तीशी संपर्क येत नाही. म्हणून मार पडला नसावा.
आ.न.,
-गा.पै.

या केस मधे पब्लिक मार कसा बसला नाही तिला याचे ही आश्चर्य आहेच.
>>
अहो अपघात रात्री दोन अडीच वाजता घडला . तेव्हा तिथं कोण कडमडायला जातंय मार द्यायला. पुन्हा आणखी लेडीज बाई ....

अ‍ॅडव्होकेट जाह्नवी गडकर अपघात प्रकरणात दोन मुद्दे आहेत.
मद्य पिऊन वाहन चालविणे.
मार्गिकेतून चूकीच्या दिशेने वाहन चालविणे.

पैकी मद्य पिऊन वाहन चालविणे हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे कारण यापूर्वी सलमान खान, ऑलिस्टर परेरा, नुरिया हवेलीवाला या व अशा अनेक प्रकरणांत हा मुद्दा होता. त्यातही मद्य पिऊन वर जास्त जोर देत ऋन्मेऽऽष यांनी दारूबंदीचा मुद्दा मांडला व मी त्यास सहमती दर्शविली. त्यावर इतर काही मद्यसमर्थक सदस्यांनी मार्गिकेतून चूकीच्या दिशेने वाहन चालविण्याच्या मुद्यावर जोर दिला. त्यातही मी असे केले असल्याचा दाखला देत (माझ्याच लेखातले संदर्भ घेऊन) माझ्यावर वैयक्तिक हल्ला चढवित मला याप्रकरणी काहीही मत प्रदर्शित न करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा दावा केला. अशा सदस्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात बराच वेळ व ऊर्जा खर्च झाली. असो. तरीही त्यांना माझ्या त्या प्रसंगातील कृतीवर आक्षेप आहे की एकुणातच चूकीच्या दिशेने वाहन चालविण्याच्या प्रवृत्तीवर आक्षेप आहे? कारण माझ्या त्या प्रसंगातील कृतीचे मी स्पष्टीकरण दिले आहे

तरी त्यांना एकूणच या प्रवृत्तीवर धोरणात्मक आक्षेप असावा असे समजून वादविवाद बाजूला ठेवित पुन्हा असे मीच काय कुठल्याही वाहनचालकाने उलट दिशेने वाहन चालवू नये याकरिता एक सुलभ उपाय सुचवित आहे.

खाली डकविलेल्या रेखाचित्रानुसार महामार्गावर ठराविक अंतरावर नॉन रिटर्न जर्नी रॅम्प्स उभारावेत. म्हणजे रस्त्याच्या रुंदीइतकी रूंद, अर्धा ते पाऊण इंच जाडीची प्लेट साधारण दोन फुट अंतरापर्यंत ३० अंशाच्या कोनात उचलली जाईल अशा पद्धतीने जाड स्प्रिंग्सच्या साहाय्याने रस्त्यावर बसवावी. ज्या दिशेने वाहन प्रवास करणे अपेक्षित आहे त्या दिशेने ती खालून वर उचलली जाईल अशी तिची रचना असावी. साधारण १०० किग्रॅ वजन तिच्यावर पडले म्हणजे ती दाबली जाऊन रस्त्याच्या पातळीत सपाट होईल अशा स्प्रिंग्ज असाव्यात. म्हणजे सरळ दिशेने जाणारे वाहन त्यावर चढले की ती प्लेट दाबली जाऊन रस्त्याच्या पातळीत येईल व वाहन सहज पार होईल. याउलट विरुद्ध दिशेने जाणारे वाहन या प्लेटसमोर आले की स्प्रिंगमुळे फुटभर वर आलेली ही प्लेट अडथळा बनून या वाहनाला अटकाव करेल. वाहन विरुद्ध दिशेने प्रवासच करू न शकल्याने संभाव्य अपघात टळतील.

No Return Journey Ramp.jpg

नॉन रिटर्न जर्नी रॅम्प्स >>> छान आयडीया आहे. वेगवान मार्गावर अवलंबवायला हरकत नाही. फक्त खर्च आपल्या गरीब(!) देशाला परवडायला हवा

आणि त्या नॉन रिटर्न जर्नी रॅम्प्स वर तुमच्यासारख्या नियम मोडून वाहन चालवर्‍याने गाडी घालून फसवली की मग पुन्हा ट्राफिक जॅम आणि सगळ्यांच्या वेळेचा खोळंबा नाही का.
तुम्ही नियम मोडणार आणि रॅम्पचा खर्च नियम पाळणार्‍या लोकांच्या डोक्यावर टाकणार, त्यापेक्षा तुमच्या सारख्यांवर कायमची वाहन जप्ती, डबल टॅक्स, लायसेंन्स रिवोकेशन अशी कारवाई का करू नये.

पैकी मद्य पिऊन वाहन चालविणे हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे >> का? मद्य न पिता नियम मोडून चुकीच्या दिशेने गाडी चालवतांना मोठा अपघात होवून प्राणहानी होत नाही का?

धन्यवाद ऋन्मेऽऽष, पण मला नाही वाटत फारसा खर्च येईल. गतिरोवधक बसविण्याऐवजी जागोजागी हेच बसवावेत. अपघात टाळले गेल्याने कितीतरी खर्च वाचेलच.

वर कुणीतरी थर्ड पार्टी इन्श्युअरन्सचा मुद्दा टाकला आहे. त्याविषयी अधिक माहिती -

वाहनाच्या धडकेने कुणाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई करणे हे वाहनमालकाचे (चालकाचे नव्हे) काम असते. त्या वाहन मालकाने स्वतःचे वाहन योग्य व्यक्तिच्या हाती सोपविले (व्हॅलिड लायसेन्स होल्डर) असेल आणि सदर वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवित नसेल तरच वाहनमालकाच्या वतीने ही नुकसान भरपाई थर्ड पार्टी इन्शुअरन्स अंतर्गत विमा कंपनी करते. या घटनेत वाहनचालकाने मद्यप्राशन केले असल्याने हा मुद्दा आपोआपच निकाली निघतो. वाहनमालकालाच आता स्वतःच्या खर्चाने अपघातग्रस्तांची नुकसान भरपाई करून द्यावी लागणार आहे.

त्या बाईला तिच्या किंवा तिच्या परीजनांनासुद्धा त्याच प्रमाणे उडवावं का?
या केस मधे पब्लिक मार कसा बसला नाही तिला याचे ही आश्चर्य आहेच.>>>माझ्या मनात पण हा विचार आलेला.

असे पण वाटले की ज्यांचे प्राण गेले त्यांनी भुतहोउन तिच्या नरडिचा घोट घ्यावा.

अहो अपघात रात्री दोन अडीच वाजता घडला . तेव्हा तिथं कोण कडमडायला जातंय मार द्यायला. पुन्हा आणखी लेडीज बाई ....>>>
लेडीज बाई म्हणुन दया नाही दाखवायला पाहिजे.

@ हुप्पाहुय्या,

माझ्या उलट दिशेने वाहन चालविण्याने अपघात घडला नव्हताच पण माझ्यासारख्या किंवा अगदी माझ्याकडूनही जर अपघात घडला तर काय दंड / शिक्षा करावी ह्याची कायद्यात आधीच तरतूद आहे.

तुम्ही सुचविलेले उपाय अपघात घडून गेल्यावर काय करायचे त्याबद्दल आहेत. त्याने झालेले नुकसान घडलेले नुकसान कसे भरून निघणार? मी सुचविलेल्या मुद्यात अपघात टाळण्याकडे भर आहे. त्यामुळे अपघात झालेच नाहीत तर खर्च वाचतोच.

याचीही नोंद घ्यावी की मी वाहन प्रासंगिक आगतिकतेमुळे अतिशय किरकोळ अंतराकरिताच उलट दिशेने काळजीपूर्वक चालविले होते. याउलट आपल्या गंतव्य स्थानी जाण्यास सोयीचे व्हावे व जास्तीचा फेरा पडू नये या करिता कित्येक वाहनचालक (विशेषत: रिक्षास्टँडवर जाणार्‍या रिक्षा) सर्रास व नियमितरुपाने विरुद्ध दिशेने जात असतात व हा त्यांचा "एरिया" असल्याने योग्य मार्गाने जाणार्‍या वाहनचालकांनाच उलट दमदाटी करित असतात याचा मी गेले वीस वर्षे निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी या परिसरात अनुभव घेत आहे.

चेतन, उत्तम आयडिया आहे. तुम्ही याचा पाठपुरावा करा, पेटंट मिळते का बघा (जर अजून कुणी केले नसेल तर). मी चेष्टेने नाही, मनापासून सांगतो आहे

धन्यवाद टण्या.
खरं तर मला विरुद्ध मार्गिकेतून वाहन चालविल्याबद्दल दोष देणार्‍या सर्वांना माझे हेच सांगणे आहे की मी स्वतः विरुद्ध दिशेने वाहन चालवून दादागिरी करणार्‍या रिक्षाचालकांचा गेली दोन दशके त्रास भोगत आहे. माझ्या भावाला निगडी चौकात एका रिक्षावाल्याने अशा पद्धतीने रिक्षा चालवून धडक दिली तेव्हा पोलिसांत तक्रार केली असता चूकीच्या दिशेने मार्गिकेतून वाहन चालविणार्‍यांचा गुन्हा पोलिसच इतका मनावर घेत नाही असा अनुभव आहे.

मला पेटंट मिळाले नाही तरी चालेल पण हा उपाय सरकारने केला तर आनंदच होईल. तो सरकारपर्यंत पोचविण्याकरिता आवश्यक ते सर्व प्रयत्न मी करीन.

तसेच मी ज्या परिस्थितीत (म्हणजे हक्काची मार्गिका कित्येक तास वाहतूक खोळंब्यामुळे बंद असणे) विरुद्ध मार्गिका वापरली ती परिस्थितीही वाहनचालकांवर न यावी हे देखील महत्त्वाचे आहे. तासाला किमान १५ किमी तरी पुढे जाता यायला हवे इतपत सर्वच रस्ते मोकळे आणि खड्डेमुक्त असावेत. जर अर्धा / एक किमी कापायला तीन चार तास रांगेत उभे राहावे लागले तर तहान, भूक व इतर शारिरीक गरजांनी त्रस्त होऊन वाहनचालक नाईलाजाने विरुद्ध मार्गिका वापरणारच ही सामान्य बाबदेखील विचारात घ्यायला हवी.

चेतन सुभाष गुगळे,

तुम्ही म्हणता ती स्प्रिंगची कल्पना इथे इंग्लंडमध्ये काही ठिकाणी वापरली आहे : http://www.hazard.co.uk/one-way-traffic-flaps.html

त्यांची मासलेवाईक वेगमर्यादा ५ मैल (८ किमी) प्रतितास आहे. भारतात कितपत उपयोगी पडेल यावर अधिक संशोधन व्हायला हवं.

आ.न.,
-गा.पै.

ती spring वाली सोय इथे पाहिलीये पण अत्यंत गाडी हळु चालवताना योग्य आहे. जोरात एखादी गाडी आली व या स्प्रिंगला अडखळली तर ती वेगामुळे उलटीपालटी होऊन भयंकर अपघात होईल. आणि वर पुन्हा सरळ दिशेने येणार्‍या गाड्या पण अडखळतील व त्याही उलटल्या तर?

गुगळे, त्या परिस्थितीत सध्या जे होते आहे ते प्रत्यक्ष पाहिले नाही त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. पोलीस जाऊद्यात, कायदाही जाऊद्यात पण अपघाताची शक्यतेची जास्त भिती वाटते त्यामुळेच उलटे जाणे नको असे वाटते. ओव्हरटेक केलेलं पाहिले आहे पण ते केवळ काही सेकंद असते.
बाकी, ट्रॅफिकमधे ३-४ तास अडकायचे भरपुर अनुभव आहेत त्यामुळे त्या कारणासाठी उलट जाणे वैयक्तिक जमणार नाही.

या बाईंचे पुढे काय होते ते पाहुया. आग थोड्या दिवसांने थंड होईलच. अरेरे!!

http://www.ndtv.com/blog/she-drank-whiskey-for-fun-my-father-died-uk-bas...

टॅक्सी वाल्याच्या मुलीचे मनोगत!

दारू पिऊनही गाडी चालवणारे आपल्याबरोबर इतर अनेकांचे जीव धोक्यात घालतात आणी वर आम्ही पिऊनही व्यवस्थीत चालवतो अशी फुशारकी मारतात. त्या सार्‍यांना गावाबाहेर मोकळ्या मैदानात नेऊन सोडावे, प्या दारू, द्या धडका आणी मरा एकदाचे !

Pages