ड्रंक लेडी विथ ऑडी..

Submitted by अश्विनीमामी on 10 June, 2015 - 01:28

आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.

मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...

जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग

त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?

सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.

पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष यांच्याशी सहमत. दारुबंदीविरोधक नेहमीच असा युक्तिवाद करतात की दारुबंदी केल्यास हातभट्टी / गावठी दारूचा पूर येईल आणि लोक खराब प्रतीची दारू पिऊन अजुनच धुडगूस घालतील. या युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवर सदर उच्चभ्रू महिलेने तितकीच उच्च प्रतीची मदिरा प्राशन करून केलेला तमाशा देखील विचारात घेण्याजोगा आहे.

थोडक्यात सर्वच प्रकारच्या दारूवर बंदी घालणे हा मुद्दा ऋन्मेऽऽष यांना मांडायचा आहे असे दिसतेय आणि त्याला माझे समर्थन.

सहा पेग हार्ड ड्रीँक घेतल्यावर मी तर जागीच तर्रर्रर्र होतो ,ही बाई त्यातही ऑडी चालवत होती ही कमालच म्हणायला हवी, फारच टॉलरंस बिल्ड झाला असावा तिचा.

हा रस्ता अलिकडेच खुला झाला. या संपुर्ण रस्त्यावर सिग्नल्स नाहीत. बसेस पण नसतात त्यामूळे दिवसा गर्दीच्या वेळी फार सोयीस्कर पडतो. पण हा रस्ता मधे इलेव्हेटेड आहे शिवाय बाहेर पडायचे मार्गही मोजकेच आहेत.
त्यामूळे असा कुणी वेगात गाडी चालवत असेल, तर इतरांना स्वतःचा बचाव करणेही अवघड आहे.

भयानक :(. ड्रंकन ड्राईव्ह करणारीला जास्तीतजास्त शिक्षा झालीच पाहिजे. सलमान, अंबानी पुत्र, ही केस पाठपुरावा करून शेवटच्या कोर्टा पर्यंत निकाल लवकर लागो. पण असं होऊ नये यासाठी लॉंग टर्म शिक्षण, इमर्जन्सी नंबर ज्यावर फोन केला त्वरित पोलीस येऊ शकतील आता हे लिहूनपण गुळगुळीत झालय. Sad
दारू बंद करून काहीही होणार नाही कारण मूळ मुद्दा बेमुर्वतखोर,चलता है, पैशाने मिटवू मनोवृत्तीचा आहे. ड्रंकन ड्राईव्ह निमित्त झालं. टॅक्सीचालक आणि त्या मुलांचं कुटुंब लवकर सावरो आणि केस तयार होऊन, निकाल लागून लवकर क्लोजर मिळो.

अमा, अतिशय दुर्दैवी घटना आहे. वाचून खुप वाईट वाटले.

ऋन्मेऽऽष, तू दारुबंदी चा कट्टर समर्थक आहेस असं दिसतय! पण दारुवर बंदी घालणे हा उपाय होऊ शकत नाही. कारण त्यामुळे दारु फक्त 'कायदेशीररित्या' मिळणार नाही. बेकायदेशीररित्या मिळत राहिलच आणि दारुबंदी ची अंमलबजावणी करण्यात पोलीसांना जास्त कष्ट होतील व त्यानिमित्ताने पैसे खायला अजुन एक निमित्त मिळेल.
तसही दारु पिणार्‍याला त्याच्या परिणामांची कल्पना नक्किच असते. सलमान किंवा ही बाई, दोघही शिकले सवरलेले (सलमान किती शिकला आहे माहिती नाही पण अंगुठाछाप नसावा) व कळत्या वयातले लोक. दारु प्यायल्यावर काय होतं हे त्यांना चांगलं माहिती होतं तरिही त्यांनी गाडी चालवायची मस्ती केली कारण त्यांना कायद्याची भीती नव्हती हा खरा प्रश्न आहे. दारु पिऊन केलेल्या वर्तनाबद्दल जबरी दंड होत असेल तर माणूस दारु पितानाच दहा वेळा विचार करेल. उदाहरणार्थ, कायद्याने आखुन दिलेल्या मर्यादेबाहेर दारू पिऊन कोणी गाडी चालवत असेल (अपघात घडला नाही तरिही) तर ५००० रु. वगैरे फुटकळ दंड असू नये. चांगला ५०००० तरी असावा. (मला दंडाच्या रकमा माहिती नाहित पण उदाहरणा दाखल एक आकडा देतो आहे) आणि ह्या असल्या अपघाताच्या गुन्ह्याबद्दल दंडाच्या रकमा माणसाचे "अक्ख्या वर्षाचे उत्पन्न" अशा काहीतरी ठेवाव्या व त्या सरकारने थेट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट्च्या मदतीने व्यक्तीच्या खात्यातून वसून कराव्या. अन्यथा ती रक्कम जमा करेपर्यंत अजामीनपात्र कारावास व्हावा. पोलीसांनी गुन्हा पुराव्यासहित सिद्ध केल्यास दंडाच्या रकमेतील ५०% त्यांना बोनस म्हणून दिली जावी (जेणे करुन चार पाच हजारांच्या चिरीमिरी साठी पोलीस गुन्हा दडपून टाकणार नाहीत). एकूणात काय तर जोपर्यंत लोकांना कायद्याच्या बडग्याची भिती बसत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही.
अमेरिकेत दारु पिऊन गाडी चालवल्याचे सिद्ध झाल्यास नंतर अशी काही कटकटींची मालिका मागे लागते कि बरेच लोक एकटे असताना न पिणेच पसंत करतील. त्या गुन्ह्याची नोंद सुद्धा तुमच्या ड्रायव्हिंग रेकॉर्डवरून लगेच जात नाही. ह्याशिवाय पोलीसाला पैसे चारुन सुटता येत नाही हा भाग निराळा. पण त्या विषयावर इथे चर्चा नको कारण तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घटना आहे. कुठल्याही परिणामांची काळजी न करता इतकं बेदरकार वर्तन करणार्‍या व्यक्तीला कायद्यातून पळवाटा काढून सुटता येतं ही शोकांतिका आहे.

>>एकूणात काय तर जोपर्यंत लोकांना कायद्याच्या बडग्याची भिती बसत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही.
अंशतः सहमत.

चौकट राजा ह्यांनी अमेरिकेविषयी लिहिलेलं आहे त्यात बर्‍यापैकी तथ्य असलं तरीही DUI मुळे होणार्‍या दुर्घटना इथेही कमी नाहीत.

Dram Shop Laws: Bar Owner Liability for Drunk Driving Accidents

>>पोलीसांनी गुन्हा पुराव्यासहित सिद्ध केल्यास दंडाच्या रकमेतील ५०% त्यांना बोनस म्हणून दिली जावी

बापरे रोगा पेक्षा उपाय भयंकर. हा बोनस मिळवायला आपले पोलिस कुठल्या थराला जाऊ शकतील याची कल्पना करुनच अंगावर शहारा आला.

"अमेरिकेत दारु पिऊन गाडी चालवल्याचे सिद्ध झाल्यास नंतर अशी काही कटकटींची मालिका मागे लागते कि बरेच लोक एकटे असताना न पिणेच पसंत करतील. त्या गुन्ह्याची नोंद सुद्धा तुमच्या ड्रायव्हिंग रेकॉर्डवरून लगेच जात नाही. ह्याशिवाय पोलीसाला पैसे चारुन सुटता येत नाही हा भाग निराळा. पण त्या विषयावर इथे चर्चा नको कारण तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे."

चौकट राजा, हा विषय स्वतंत्र नाहीये. भारतात वाहतुकीच्या गुन्ह्याला कुठलच long term dimension नसणं हे बर्याच गुन्ह्यांचं (traffic violation) मुळ आहे असं मला वाटतं. अमेरिकेत speeding ticket मिळाल्यावर माणूस निदान काही काळ तरी काळजीपूर्वक गाडी चालवतो (driving records points, insurance वगैरे सगळ्या गोष्टी ओघानं येतातच). भारतात तशी गरजच भासत नाही, कारण एकदा अधिकृत / अनधिकृत दंड भरला की त्याचा पुढे काही मागमूस रहात नाही.

अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घटना आहे.

कुठे चालली आहे भातताची संस्कॄती बायापण पियक्कड!

घरचे संस्कारच चुकिचे असतिल.

योग्य ती शिक्शा व्हावी ही अपेक्शा. सिनिकल व्हावे अशी परीस्थिती आहे. जनतेचा एक दिवस रोष उफाळून येणार नक्की!

चेतनजी, कर्रेक्ट..
आणि रश्मी, दक्षिणाजी गैरसमज नसावा, मला ठाऊक आहे दारू ती दारूच पण काही लोक दारूच्या बचावात जो युक्तीवाद करतात त्याला खोडायला मी ते वाक्य उपरोधाने लिहिलेले.

असो,
वर चौकट राजा व अन्य काही जणांनी असे लिहिलेय की पैश्याची मस्ती आणि कायद्याची भिती नसणे यामुळे असे गुन्हे घडतात...

पण इथे एक लक्षात घ्या, दारू पिऊन गाडी चालवणारा स्वताचा जीवही धोक्यात घालत असतो. त्याचा स्वताचाही अपघातच होणार असतो. त्याला या अपघातातून काही थ्रिलिंग एक्सपिरीअन्स वा मजा येणार नसते.. थोडक्यात दारूने त्याचा ताबा घेतला असतो, त्याची अक्कल गहाण पडली असते. म्हणून तो दुसर्यांबरोबर स्वताचाही जीव डावावर लावतो.

पैश्याचा माज मस्ती हे मुद्दे अपघात घडून गेल्यावर त्यातून ते बचावले असतील आणि ईतर कोणाचा बळी गेला असेल तर स्वताच्या सुटकेवेळी लागू होतात. एखादा गरीब ट्रक ड्रायव्हर सुद्धा दारू पिऊन अपघात करतो ते त्याला पैश्याची मस्ती वा कायद्याची भिती नसते म्हणून नाही.

" थोडक्यात दारूने त्याचा ताबा घेतला असतो, त्याची अक्कल गहाण पडली असते." - हा अत्यंत तोकडा बचाव आहे दारू पिऊन वाटेल तसं वागून पुन्हा 'प्यायलेलो असल्यामुळे काय झालं / केलं ते लक्षात नाही' म्हणणार्यांचा (ऋन्मेऽऽष, तुमचं वाक्य वापरतोय फक्त, तुम्हाला उद्देशून लिहीत नाहीये). असं नाही घडत. कायद्याच्या दूरकालीन परिणामांची जाणीव असली की वागणं कायद्याच्या अनुशंगानं होतं.

>>एखादा गरीब ट्रक ड्रायव्हर सुद्धा दारू पिऊन अपघात करतो ते त्याला पैश्याची मस्ती वा कायद्याची भिती नसते म्हणून नाही.>> नक्की काय म्हणायचय तुला? त्या गरीब ड्रायव्हरला प्यायच्या आधीच ही जाणीव असेल कि पिऊन गाडी चालवताना पकडले गेलो तर उरलेला जन्म तुरुंगात काढावा लागेल तरिही तो पिऊन गाडी चालवेल? मुळात लोक दारू का पितात हा प्रश्न आहे का दारु पिऊन गाडी का चालवायला जातात हा प्रश्न आहे? थोडीशी दारु पिऊन जे गपचुप घरी बसतात किंवा न प्यायलेल्या मित्राला गाडी चालवायला सांगुन शेजारी / मागे बसतात त्यांचं काय? मी दारु पिण्याचे समर्थन करत नाही आहे हे लक्षात घे. पण सरसकट बंदी आणणे हा उपाय होऊ शकत नाही कारण लोक दारु / सिगरेट पिणे ह्याकडे "जगण्याचे स्वातंत्र्य" म्हणून बघतात. त्यामुळे होणार्‍या परिणामांची जाणीव असुनही तिच्याकडे दुर्लक्ष करतात हा खरा प्रॉब्लेम आहे असं नाही वाटत?

>>बापरे रोगा पेक्षा उपाय भयंकर. हा बोनस मिळवायला आपले पोलिस कुठल्या थराला जाऊ शकतील याची कल्पना करुनच अंगावर शहारा आला.>> टग्या, मान्य आहे. उदाहरण देण्याच्या नादात मी जरा जास्तच केलं.

दारुबंदी झालेली पहायला नक्की आवडेल पण ते होणे सर्वस्वी अशक्य आहे त्यामुळी कायद्याचा अतीकडक धाक मनात निर्माण झाला तरच जरा फरक पडायची शक्यता. (आता दारुबंदी जास्त अवघड की कायद्याची जरब निर्माण जास्त अवघड हे ठरवणे मुश्किल).

पार्टीत कधी कोणी घेतली व तो स्वतःच गाडी चालवुन घरी जाणार असेल तर त्याला अडवण्यात येते त्यावेळेस कधीकधी दारु घेतलेली व्यक्ती म्हणते, 'मला अजिबात चढलेली नाहिये, आरामात गाडी चालवुन घरी जाईन'. असेपण अनुभव आलेत. असल्या युक्तीवादावर काय बोलायचं? टोणग्यांना (स्त्री-पुरुष दोन्ही आले यात) साखळी घालुन डांबुन तर ठेवता येत नाही. मग कोणातरी त्यांना घरी सोडुन येतो.

अत्यंत संतापजनक तितकीच हतबल वाटायला लावणारी घटना आहे ही.

अमितव यांचे 'मूळ मुद्दा बेमुर्वतखोर,चलता है, पैशाने मिटवू मनोवृत्तीचा आहे. ड्रंकन ड्राईव्ह निमित्त झालं' हे पटले.

चेतन सुभाष गुगळे तुम्ही drugs घेउन आजीबात योग्य नसलेली धोकादायक गाडी विकृत पणे चालवली तर ते साहस ... तुम्हाला इकडे बोलायचा की नैतिक अधिकार आहे ?

मी दारू चा प्रचार करणाऱ्या साईट बनवत असलो तरी मी प्रथम पासून - absolute no encouragement od drunken driving चे धोरण ठेवले आहे.

दारूबंदी ने प्रश्न वाढतात ... तसे नसते तर गुजरात मध्ये गावठी पिऊन लोक मेले नसते ..... आणि तशी हि गुजरात मध्ये भरपूर दारू मिळते ( स्वताचा अनुभव)

कायद्याची कडक आणि झटपट अंमल बजावणी आणि दहशत वाटावे आसे कायदे हाच या वर उपाय आहे.

गुन्हेगाराला पोसायचा पण फार खर्च येतो . खरे तर अनेक गुन्ह्यांना फाशी चीच शिक्षा योग्य आहे . आपल्या कडे लोकच इतके आहेत कि बर्याच जणांना फाशी दिले तरी काहीही फरक पडणार नाही. तसेच शिक्षेनंतर हि त्या शरीरावर सर्कारी हक्क असायला हवा. म्हणजे सरकार गुन्हेगाराचे अव यव जसे कि किडनी , हृदय , डोळे विकून गरिबांची सेवा करू शकेल किंवा कमाई करू शकेल..

अरेरे! दुर्दैवी घटना. हकनाक बळी आणि मनुष्यजीवनाची किंमत नसलेले वर्तन.

मध्यंतरी वाचलेल्या एका प्रश्नाची आठवण झाली - दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे व अशी गाडी चालवणे जर प्राणघातक आहे तर पब्ज व बार असणाऱ्या, राजरोस मद्यविक्री करणाऱ्या रेस्तेराँना गाडी पार्किंगची सोय का दिली जाते? दारावरच गाडीच्या चाव्या ताब्यात घेऊन मद्यसेवन केलेल्या अतिथींना टॅक्सीत का बसवून दिले जात नाही? तसे सेवन करणाऱ्याची जशी जबाबदारी आहे व असते त्याचप्रमाणे ती जबाबदारी संबंधित आस्थापनांचीही असायला हवी.

लोक दारु / सिगरेट पिणे ह्याकडे "जगण्याचे स्वातंत्र्य" म्हणून बघतात.
………
हे अंमली पदार्थ चरस गांजा ड्रग्स यांनाही लागू होईल ना. या पदार्थांना का वेगळा न्याय लावला जातो?

फेरफटका,
मलाही अर्थात कोणाचा बचाव करायचा नाहीयेच. पण माझा विरोध दारूला असला तरी सरसकट मद्यप्राशन करणार्यांना मी लगेच आरोपीच्या पिंजर्यात उभा नाही करत, ना त्यांचा राग तिरस्कार करतो. आपण सारे काही भगवान श्रीरामाचे अवतार नसतो. प्रत्येकाच्या स्वभावात ग्रे शेड असतात. फक्त त्यांना कंट्रोल करणारा जो मेंदूचा भाग असतो तो नेमका दारूच्या अंमलाखाली येतो.

सदर प्रकारच्या घटनांना वा अपराधांना मी दोन तुकड्यात विभागतो.
एक म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे.
दुसरे म्हणजे अपघात झाल्यावर पैसे आणि वजन वापरून त्यातून सुटायला बघणे.

अश्या घटनेत बरेचदा सामान्यजणांचा रोख दुसर्या अपराधावरच जास्त असतो.

पण पहिला अपराध तुमच्या आमच्यापैकी दारू पिणारा कोणीही करू शकतो. त्यावर उपाययोजना नको का करायला.

ऋन्मेऽऽष

अमेरिकेत चरस / गांजा ( कॅनाबीस) बर्याच ठिकाणी कादेशीर आहे ..

http://en.wikipedia.org/wiki/Legality_of_cannabis_by_U.S._jurisdiction

मी याचे समर्थन करीन नाही पण ओळखीचे काही जन भारतात आणि विदेशात गांजा मारतात. तसे म्हटले तर IIT आणि IIM सारख्या उत्कृष्ट शिक्षण केंद्रात बर्यापैकी लोक गांजा मारतात . बर्याच ठिकाणी याला joints आसे म्हटले जाते . चेतन भगत च्या ५ point someone मध्ये हि joints चा उल्लेख आहे. त्यामुळे बघ - बॉस चा बॉस च चरसी असायचा.

अमेरिकेत कायदेशीर गांजा आणि त्याच्या समन्धित industry हा येक वाढणारा धंदा आहे आणि अभिमानाचे गोष्ट आशी कि काही भारतीय यात आहेत.

अमेरिकेत कायदे मोडतात, भारताहून जास्त. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात तुरुंगातील लोकांची संख्या जगात इथे सर्वात जास्त आहे.
बाकी तुमचे नाव केनेडी किंवा ओजे सिंपसन असेल तर तुम्ही सुटु शकता, पण निदान भर समाजात वर्तमानपत्रे तुमची इतकी नाचक्की करतात की त्यांना ती जन्मभर पुरते. त्यापेक्षा शिक्षा परवडली.
सध्याच अमेरिकेतले हॅस्टर्ट यांच्या विरुद्ध खटला भरण्यात आला आहे. प्रेसिडेंट नसेल तर व्हाईस प्रेसिडेंट नि तोहि नसेल तर काँग्रेसचा स्पीकर (१९९९ - २००७) म्हणून त्याचाच नंबर होता.

बाकी सलमान खानच काय, मेल गिब्सन, लिंडसे लोहॅन, ब्रिटनि स्पीअर्स सर्वांना एक दोन वर्षाच्या आत शिक्षा झालेल्या आहेत नि ते लवकर सुटावे म्हणून कुणि सत्यनारायण घातला नाही की देवाची प्रार्थना केली नाही!

दुसरी गोष्ट - गरीब असो, श्रीमंत असो, नुकसान भरपाईचा दावा लावलाच जातो, नि त्यात ज्या ठिकाणी बाई किंवा माणूस अति जास्त दारू प्यायला असेल त्या हॉटेल, बारवर पण खटला होतो.जर दारू देणार्‍याला वेटरला वाटले की गिर्‍हाईकाला चढली आहे, तर त्याला दारू नाकारण्याचा हक्कच नाही तर त्याची जबाबदारी पण आहे, नाहीतर तोहि खटल्यात गोवला जातो.

आता तर म्हणे गाडीलाच एक यंत्र लावणार आहेत की नुसत्या श्वासावरून ड्रायव्हरला जास्त जास्त झाली आहे हे कळले तर गाडी सुरुच होणार नाही! करतीलहि, नि निदान शहाणे लोक ते आपल्या गाडीत बसवूनहि घेतील.

असो. उगाचच जिथे तिथे अमेरिकेची उदाहरणे देऊ नका - खूप खूप फरक आहे इथे नि तिथे. उगाच चारपाच वर्षे राहून, तेसुद्धा, सगळा काळ इथे येऊन हिंदी सिनेमे बघायचे, आपल्याच लोकांबरोबर रहायचे, असे करून समजत नाही.

इथे जे काय चांगले वाईट आहे तसेच भारतातहि खूप आहे पण कारणे वेगळी, परिणाम वेगळे.

अत्यंत संतापजनक घटना.
या स्त्रीला कडक शिक्षा व्हावी आणि ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द व्हावे ही अपेक्षा.
मिडीयाने सलमान खान, अ‍ॅलिस्टर परेरा, आकाश अंबानी इतक्याच काटेकोरपणे ही केस लावून धरावी.

त्यावेळेस कधीकधी दारु घेतलेली व्यक्ती म्हणते, 'मला अजिबात चढलेली नाहिये, आरामात गाडी चालवुन घरी जाईन'.>> इथे मायबोलीवरच असे वीरपुरुष आहेत. अशा किरकोळ घटनांनी ते विचलीत होणार नाहीत.

> सामान्य माणूस कुत्र्याची मौतच मरणार.
अंतिम सत्य. सामान्य म्हणजे आपण सगळेच.

जोपर्यंत कोणी गाडी अंगावर घालत नाही तोपर्यंत मजा करून घ्या - दोन बीएचके/ तीन बीएचके, ऑनसाईट.
पण योग्य वेळ आली की मरा.

पण योग्य वेळ आली की मरा <<< त्याला गरीब, श्रीमंत, साधे, फोडणीचे कसलाही अपवाद नाही.
तुम्ही सात चिरंजीवातले नाही तर मरा.

आज इकॉनोमिक टाइम्स्ला पण बातमी आहे. महेश सबनीस वकील आहेत त्यांनी तिला मेडिकल अटेन्शनची गरज आहे कारण फ्रॅक्चर्स आहेत व इंटर्नल इंज्युअरीज असतील असे वर्तविले आहे. कस्टडीत ठेवून काही उपयोग नाही असे म्हटले आहे. शी अलॅजेडली ड्रोव्ह ऑन द राँग साइड असे पेपरमध्ये दिले आहे. सर्व मशिनरी कामाला लागलेली दिसते. काही दिव्सात बातमीच दाबून टाकतील तिला बेल मिळेल. किस्सा खलास.

तिने आधी देखील मोटारबाइक वरून दोन गार्ड्सना धक्का दिला होता.

टॅक्सीवाला जो वारला त्याची बायको ४९ ची आहे. चाळीत राहतात एक लग्न झालेली मुलगी आहे. ३२ वर्शात त्याने कधी कोणाला ठोकलेले नाही का त्याल काही झाले नव्हते. काय उपयोग.

साबुवालांचा मुलगा स्वतःला ब्लेम करतो आहे. मिसेस हॉस्पिटलात आहेत व त्यांना अजून पतिनिधनाचे सांगितले नाही. सम ऑफ द वर्स्ट मोमेंट्स इन लाइफ फॉर दीज पीपल.

Pages