रताळ्याच्या साटोर्‍या

Submitted by सुलेखा on 9 June, 2015 - 19:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खव्याच्या साटोर्‍या आपण नेहमी करतो किंवा खातो.त्यावरुन रताळ्याच्या साटोर्‍या करण्याची कल्पना आली.एरवी आपण उपवासाच्या नांवाने रताळी-तिखट किंवा गोड किस किंवा काप/चकत्या करतो.थालीपिठात बटाट्याच्या जागी वापरतो.भाजुन वा उकडुन खातो.क दाबेलीच्या सारणात वापरतो.कधीतरीच वरी /मोरधन पिठ वापरुन गुलाबजाम करतो.ह्या साटोर्‍या करायला सोप्या आणि हमखास यश मिळेल आणि सगळ्यांना आवडतील अशा आहेंत.
साहित्य :- वरील आवरणासाठी :--
कणिक २ वाट्या.
३ चमचे तेलाचे मोहन
चवीनुसार मीठ.
सारण :--
रताळ्याचा किस अंदाजे २ वाट्या
मिल्क पावडर ४ते ५ चमचे
साखर २ ते ३ चमचे.
जायफळ व दालचिनीपुड १/२ टी स्पून
७ ते८ बदाम साले काढुन बारीक काप करुन घ्या
३चमचे तूप.

क्रमवार पाककृती: 

कणिक ,तेलाचे मोहन ,मीठ व लागेल तसे पाणी घालुन भिजवा.पोळ्यासाठी भिजवतो तितका मऊसर गोळा असावा.नेहमीसारखे या कणकेच्या गोळ्याला वरुन थोडेसे तेल लावा.
आता सारण तयार करायचे आहे. मी हे सारण मायक्रोवेव्ह मधे केले आहे,पण नॉन स्टीक पॅन/कढई त मधे मध्यम आचेवर करता येईल. मायक्रोवेव्ह बाऊल मधे अर्धा चमचा तूपमपातळ करुन त्यात रताळ्याचा किस घालुन चमच्याने परतुन घ्या.आता मायक्रोवेव्ह मधे दोनदा १-१ मिनिट ठेवा. आता त्यात मिल्क पावडर आणि साखर घालुन चमच्याने ढवळा आणि आधी प्रमाणे १-१-१ मिनिट असे तीनदा ठेवा.प्रत्येक १ मिनिटानंतर बाऊल बाहेर काढुन सर्व मिश्रण छान परतुन घ्या. आता सारण तयार आहे.त्यात जायफळ -दालचिनी पूड आणि बदामाचे काप घाला.मिश्रण थंड होऊ द्या.
कणकेच्या भिजवलेल्या गोळ्याचे लहान पुर्‍यांसाठी करतो त्या आकाराचे गोळेतयार करा.तेवढ्याच आकाराचे सारणाचे गोळे करा. किंवा चमच्याने तितकेच सारण भरायचे आहे.लहान पुरी लाटुन त्यात सारण भरुन पिठी लावुन जाडसर साटोरी लाटुन घ्या. मध्यम आचेवर पॅन/जाड तवा तापवून या साटोर्‍या दोन्ही बाजूने खरपुस भाजुन घ्या. भाजलेली साटोरी एका ताटात काढुन त्यावर चमचा तूपाच्या भांड्यात बुडवून, चमच्याच्या पालथ्या बाजुने दोन्हीकडून तूप लावा. कमीत कमी प्रमाणात तूप वापरतायेईल.
अशा सगळ्या साटोर्‍या तयार करा.
1-IMG_20150608_034701.JPG

अधिक टिपा: 

या साटोर्‍या फ्रीज मधे ठेवल्यास टिकतील.थंड वा गरम दोन्हीची चव छान आहे.
जर रताळ्याचा किस फार ओला नसेल तर मिल्क पावडर कमी लागेल.मिल्क पावडर मुळे किस मिळुन येतो.
साखरेचे प्रमाण रताळी व मिल्क पावडरआणि किती गोड आवडते यावर अवलंबुन आहे.
मी इथे रताळी वापरली आहेत.कारण उपवास सोडून , आवडीने फारशी खाल्ली जात नाहीत.मुले तर सदैव रताळी खायला नाखुष असतात.
गाजर व बटाटा[ मायक्रोवेव्ह मधे भाजुन,कारण उकडलावर बटाटा जास्त ,चिकट आणि ओलसर होतो] अशा साटोर्‍या करता येतील.
डब्यासाठी व मुलांसाठी एक पौष्टीक खाऊ आहे.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! फोटो पाहिजे Happy

कधीतरीच वरी /मोरधन पिठ वापरुन गुलाबजाम करतो >> उप्वासाचे गुलाब्जाम!! पहिल्यांदा ऐकलं... ह्याची पण रेसिपी लिहा प्लीज

चनस, उकडलेली रताळी , वरी पिठ आणि तवकील किंवा आरारोट किंवा मिल्क पावडर[रताळ्याला बाईंडिग म्हणुन अगदी थोडेसे घ्यायचे. वरी पिठ साबुदाणा पिठापेक्षा खरखरीत असते त्याने गुलाबजाम आतुन गिच्च होणार नाहीत.] कणीभर मीठ, किशमीश्/काजु वापरुन गुलाबजाम करतात.

सुरेख....

हे सारण आदल्या दिवशी करुन्ठेवता येइल का? फ्रीज मधे ठेवले तर पाणी सुटेल का? कारण अशा साठी की ड्ब्यात द्यायला एकदम मस्त पदार्थ.... पण सकाळी ५.३० ला येवढे सगळे जमणे कठिण....

हे बेक करुन चलतिल का ?

मस्त आहेत. अर्थात माझ्याकडे तिखट कराव्या लागतील.

मोकिमि, बेक कशाला करायच्यात? जर शॅलो फ्राय नकोत तर आपल्या पोळ्यसारख्या तव्यावर भाजुन घेतल्या तरी चालण्यासारख्या आहेत की. बेक केल्या तरी असाच इफेक्ट येईल.

या साटोर्‍या तव्यावर पोळीसार ख्याच दोन्हीकडुन भाजायच्याआहे त, साटोरी भाजुन झाली कि प्लेट मधे काढुन ठेवा यची ,नंतर त्यावर दोन्हीकडुन तूपात भिजवलेला चमचा पालथ्या बाजुने फिरवायचा आहे,म्हणजे सगळीकडे तूपाचा पातळ थर लागेल्,जर तूप नको असेल तर नाही लावायचे,आपण कणिक भिजवताना तेलाचे मोहन घातलेआहे,त्यामुळे त्या खुसखुशीत्/ मऊ आहेतच, तूप लावल्याने साटोरीचा " फील "येतो,
मी सगळ्या साटोर्‍या एकाच वेळी केल्या, डब्यात भरताना प्रत्येक ४ साटोरी नंतर त्या आकाराचा पेपर नेपकिनठेवला,,हा डबा फ्रीज मधे ठेवला,लागतील तशा डब्यातुन बाहेर काढल्ञा,जर लगेच खायला हवी असेल तर १० सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये गरकेली,अगाअणि डब्यात न्यायला तशीच ठेवली,
गरम वा गार अजिबात तूपकट लागत नाही,
सारण तयार करुन फ्रीज मधे ठेवले तर ते घट्ट होईल कणकेचा गोळा व सारण एक सारखे होणार नाही, , त्यापेक्षा एकसाथ जमेल तेव्हा करुन ठेवाव्या, गोडासारख्या तिखट हे छान लागतात, साखर बेतशीर चवीपुरती घालायची आहे,कारण रताळी व मिल्क पावडर दोन्हीची गोडी असतेच ना,ही साटोरी मिट्ट गोड लागत नाही,

अरे वा.... ही आयडिया चांगली आहे. एकदम करुन हव्या तश्या मावे मधे गरम करुन देणे...हे बेस्ट.....

माझ्या आजवरच्या ट्रॅक रेकॉर्डपेक्षा फारच लवकर केली मी. मला एकंदरित पराठे वगैरे प्रकारात गती नाहीये तस्मात थोडं सारण बाहेर येणं वगैरे झालं पण ओव्हरऑल फार किचकट नाही वाटले.

मांसाहेब, दोन रताळ्यांवर प्रयोग केले Wink धाकलं खूश आणि थोरलं, "आई, तू याच्यात पेढ्यातलं काहीतरी घातलंय ते आवडलं नाही",असा तु.क. सो डब्याला नाही देता येणार पण दूधाबरोबर (पुपोप्रमाणे) छान लागतील असं वाटतंय.

फोटू त्यातल्या त्यात रंगाने बर्ञा असणार्ञा जोडीचा.

धन्यवाद सुलेखाताई.

RataleSatori.jpg

वेका धन्यवाद थोरल्याला गोड फारसे आवडत नसावे,त्याच्यासाठीतिखट रताळी पराठे कर्, रताळी मावेत भाजुन [मी प्लास्टीक पिशवीत रताळे ठेवून बटाट्यासारखे भाजते/ बेक करते].साले काढुन कुसकरुन त्यात हि.मि-आले ,जिरे,मि.पूड्,चाट मसाला,मीठ घालबिन्धास्त्गोड,
मो.मी. गोड वा तिखट कोणताही प्रकार कर.फ्रीज मधे ठेव.