फणसाची सांदण

Submitted by देवीका on 2 June, 2015 - 04:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

४ वाटी बरका फणसाचा रस,
२ वाटी तांदूळाचा रवा( तांदूळ धूवून, वाळवून काढलेला),
लागेल तसे साजूक तूप,
काजू तुकडे,
ओलं खोबरं पाव वाटी,
वेलची पूड,
चवीला मीठ,

क्रमवार पाककृती: 

रवा भाजून घ्यायचा तूपात आणि थंड करून रसाबरोबर एकत्र करून मीठ आणि खोवलेलं खोबरं घालून रात्री झाकून ठेवावे.
सकाळी काजू, वेलची पूड घालून इडली प्रमाणे वाफवावे.
हा जुना फोटो,
http://www.maayboli.com/node/50557?page=1

वाढणी/प्रमाण: 
हा प्रश्ण चुकीचा आहे आमच्या घरी
माहितीचा स्रोत: 
पारंपारीक कृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फणसाची सांदणं खाऊन कित्येक वर्षं झाली. भयानक आवडतात मला. बरका फणस मिळत नसल्याने हल्ली घरी करणे होत नाही.

>>>>Ras kadhaycha mhnje gare mixermadhun kadhle tar chaltil ka?<<<
सॉरी प्रतिसाद द्यायला उशीर झाला.

नाही, मिक्सर मध्ये उष्णता निर्माण होवून कडू होतील.
हँड ब्लेंडर ने पल्प करायचा.

आंब्याची होतात, नुसत्या गुळ- खोबर्‍याची( चुन) घालून सान्ना होतात.

रसाबरोबर एकत्र करून मीठ आणि खोवलेलं खोबरं घालून रात्री झाकून ठेवावे.>>>>>>> आंबत नाही का? र्स आणि खोबर्‍याला एक आंबूस वास येत नाही क?

>>>>>आंबत नाही का? र्स आणि खोबर्‍याला एक आंबूस वास येत नाही <<<<<

पारंपारीक पद्धतीत रात्रीच गर तांदूळाच्या रव्यात एकत्र करून ठेवतात ओलं खोबरं वगैरे घालून. रवा फुलतो व गर मस्त रव्यात मुरतो आणि सान्ना छान हलकी होतात. एक छान चव येते. कधीच बेकींग सोडा वगैरे घालत नाहित.
आम्ही पाणी वा दूध नाही घालत. अजीबात खराब आंबट वगैरे लागत नाही. घातलच तर नारळाच घट्ट दूध घालतो.
मूळात तांदूळाचा रवा छान तूपात परतला की मग लगेच त्यात ओलं खोबरं टाकून झाकतो. रवा खोबर्‍यातले पाणी शोषून घेतो.
मग गर टाकायचा.

जसा फणस मिळायला लागतो, तसे सांदणं बनायलाच हवीत , त्याशिवाय कोंकणी लोकांना जीवाला बर वाटत नाही. Happy
म्हणून हा फोटो, पान वर काढायला,
A56A8913-FC68-44E7-8252-53195833CF6F.jpeg

मस्तच दिसतायत .

हल्ली एक महिनाच असते मुदत संपादनाची.

मानसिक छळ करू नका हो असे फोटो टाकून...
यंदा सांजण, उकडगरे असे पदार्थ मिळणं अशक्यच. आणि ते मला आईकडे गेल्यावरच मिळतात, त्यामुळे तर ....