सुरमईचं कालवण

Submitted by मृण्मयी on 22 May, 2015 - 13:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- सुरमईचे अर्ध्या इंच जाडीचे तुकडे
- कोथिंबीर-लसूण-हिरवी मिर्ची वाटण (आलं नको.)
- चिंचेचा घट्टं कोळ
- मीठ
- हळद
- तिखट
- नारळाचं दूध
- तेल

क्रमवार पाककृती: 

- माश्याच्या तुकड्यांना वाटण, मीठ, तिखट, हळद आणि चिंच लावून फ्रिजमध्ये कमितकमी ३-४ तास मुरायला ठेवावं.
- पसरट भांड्यात तेल कडकडीत गरम करून माश्याचे तुकडे घालून ३० सेकंद ठेवावे.
- उलटे करून दुसर्‍या बाजूने ३० सेकंद ठेवावे.
- अगदी मंद आचेवर सगळं मुरवण खरपूस होईपर्यंत हलक्या हातांनी परतावं. या दरम्यान मासे ठक्कं कोरडे होऊन चिवट व्हायला नकोत.
- नारळाचं दूध घालून उकळी आणावी.
-कालवण तयार आहे.

fishcurry-2-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
माश्याचे तुकडे आणि बाकी घटकांवर अवलंबून.
अधिक टिपा: 

- पुन्हा एकदा, आलं घालण्याचा मोह टाळावा.
- उकळी आल्यावर चव घेऊन मीठ लागलं तर घालावं.
- आरती. ह्यांनी दिलेल्या कृतीनुसार केलेला स्पंज दोसा ह्या कालवणाबरोबर अप्रतिम लागतो. (http://www.maayboli.com/node/5354)

sponge-dosa-curry-maayboli.jpg

माहितीचा स्रोत: 
बहीण- मोनाडार्लिंग, आणखी कोण? :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का, पराग? का? >>>> मला बटरी किंवा फॅटी असं म्हणायचं होतं. त्याऐवजी मराठी शब्द सहज आठवला म्हणून वापरला. त्यात इतकी काकाकुई करायला काय झालं ? Happy

हॅ.. मला कसला त्रास व्हायचाय ? उलट तुलाच झाला आहे असं मला वाटतय.. मी 'बटरी टेक्स्चर' असं साध्या सोप्या मराठीत लिहिलं असतं तर नसता झाला कदाचित!
(टण्या, हेच तुझ्या पोस्टीतल्या त्या मत्स्यप्रेमींनाही "अ‍ॅप्लीकेबल" रे बाबा.. Happy )

>>मृण्मयी, सुरमइ ऐवजी तिलापिया चालेल का?

तिलापियाला हरकत नसेल तर आपल्याला चालायला हरकत नाही. Proud सिरियसली, त्याचंही ह्या प्रकारानं केलेलं कालवण चांगलं लागतं.

पराग तुला व्हेलवेटी टेक्स्चर असे म्ह्णायचे आहे बहुतेक. लसूण मिरची कोथिंबीर वाटण बद्दल अनुमोदन.
आलं घातलं की काहीतरी १९-२० होतं आलं ओव्हर पॉवर करते बहुतेक.

तिलापियाला हरकत नसेल तर आपल्याला चालायला हरकत नाही >>> हेच ते...मृणच्या सोप्या पास्त्यावर मला असंच उत्तर मिळालं होतं Proud

वा .. छान! Happy

आम्ही बटाटे घालून करून पाहू .. Proud

>> तिलापियाला हरकत नसेल तर आपल्याला चालायला हरकत नाही >>> हेच ते...मृणच्या सोप्या पास्त्यावर मला असंच उत्तर मिळालं होतं

मलाही त्याचीच आठवण झाली .. पण त्यावर मी एकदम थुफो, मुँहतोड उत्तर दिलं होतं तेही आठवलं .. तिलापियाला चालायला किंवा हरकत घ्यायला तो जिवंत हवा ना? की हे परमिशन घेणं स्वतः फिशींगला जाऊन गळ टाकण्याआधी करायचा विचार असेल? Wink

अरेच्चा...
मला वाटलं की "क्षला हरकत नसेल तर आपल्याला चालायला हरकत नाही " हे उत्तर इथे आणि पास्त्यावर मृ ने दिलं.
सिनियर मोमेंट बहुतेक माझी..जौद्या..

आजच हे कालवण केलं तिलापिया वापरून. माझ्या कालवणाचा रंग पण कोथिंबीर मिरचीच्या वाटणाने हिरवा आला. तुझ्यासारखा नाही Uhoh
कै का असेना सर्वांना चव आवडली..
धन्यवाद!

Pages