मासे ५०) शेवंड

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 May, 2015 - 07:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ शेवंड
३ मोठे कांदे (चिरुन)
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
४-५ लसुण पाकळ्या (फोडणीसाठी)
पाव चमचा हिंग,
१ चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला
१ वाटी सुके खोबरे किसून
फोडणीसाठी तेल
चवीपुरते मिठ
अर्धे लिंबू किंवा थोडासा चिंचेचा कोळ

ह्या फोटोत कोलंबी सोबत शेवंडी आहेत.

From mobile 2015

क्रमवार पाककृती: 

शेवंड ही दिसायला कोलंबीसारखी परंतू मोठ्या आकाराची डोक्यावर खडबडीत काटे, मधला भाग साधारण स्प्रिंग सारखा, लांबलचक शेपट्या कवच टणक असलेली असते. शेवंडीच्या डोक्यावरच्या शेपट्या काढाव्यत. पाठचे शेपूट काढावे व त्याचे आकारमानानुसार दोन किंवा तिन तुकडे करावेत.

ह्या तुकड्यांना आल,लसुण्,मिरची, कोथिंबीर चे अर्धे वाटण चोळून ठेवा.

आता गॅसवर भांडे गरम करून त्यात तेल घालून लसुणपाकळ्या ठेचून फोडणी द्या.

त्यावर कापलेल्या कांद्यापैकी अर्धा भाग कांदा परतवा. बदामी रंगाचा होऊ द्या. नंतर त्यावर उरलेली आल-लसुण पेस्ट घाला.

त्यावर हिंग, हळद, मसाला घालून परतवा व शेवंडीचे तुकडे घालून थोडे पाणी घालून झाकण ठेऊन शिजवत ठेवा.

आता उरलेला कांदा व खोबरे भाजून घ्या व त्याचे वाटण करा.

साधारण 10 मिनीटे तरी शेवंड चांगली शिजू द्या व त्यावर आता कांदा खोबर्‍याचे वाटण, गरम मसाला, लिंबू किंवा चिंचेचा कोळ, मिठ व ग्रेव्ही पातळ हवी असेल तर थोडे पाणी घालून परतवून थोडा वेळ पुन्हा शिजू द्या म्हणजे सगळे जिन्नस चांगले मिसळती. थोड्या वेळाने गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

सर्वप्रथम सगळ्या मायबोलीकरांचे मनापासून आभार कारण तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे आज मला हा ५० व्या माश्याचा प्रकार गाठता आला. अगदी मांसाहार खाणार्‍यांनी व न खाणार्‍यांनीही मनापासून जी दाद दिलीत त्याबद्दल मला खरच धन्यता वाटते. धागे काढताना खुप जणांनी मला पुस्तक काढण्याचा सल्ला दिला तेंव्हा मी म्हणत होते की ५० रेसिपीज झाल्या की मी पुस्तक काढणार आहे व आज इथे तुमच्या बरोबर शेअर करताना अतिशय आनंद होत आहे की त्या शब्दाला जागून माझे लवकरच माश्याच्या रेसिपीज चे पुस्तक येत आहे. तुमच्या शुभेच्छा अशाच कायम रहाव्यात. पुन्हा एकदा धन्यवाद.

आता शेवंडीविषयी.

शेवंडी चे मांस साधारण कोलंबीसारखेच असते. तिच्या डोक्यातही मांसल भाग असतो त्यामुळे डोके न फेकता ते घेतात. ताजी शेवंड कडक असते. तर डोक्यापासून वेगळी होत चाललेली जरा जास्त वेळ झालेली असते.
हिचे कवच टणक असल्याने जरा जास्त वेळ शिजवून घ्यावी.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागूच्या होऊ घातलेल्या पुस्तकाबद्दल एक खास सीफूड असलेली पार्टी होवून जाउ द्या. Happy

अभिनंदन.

पब्लिकेशन सोहळ्या साठी आम्हाला बोलावायला विसरू नकोसः-) >> तिथेच तुझ्या पाककृतीही असतील तर .. Happy

बापरे ५० !! कमाल
अभिनंदन

यातील पाकृ पण तोंलासु

जागु पुस्तकाबद्दल अभिनंदन. रेसिपी छान. मी एकदाच शेवंड खाल्लेत. पण विषेश आवडले नव्हते. कोलंबीपेक्षा थोडे चिवट असतात.

जागु पुस्तकासाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

हा मासा नाही आवडला. अंगावरच आला फोटो पाहिल्यावर Sad
मला नाही वाटत मी कधी खाऊ शकेन हा.

तांदळाची भाकरी सोबत घेऊन ती शेवटची प्लेट पळवावीशी वाटत्येय. >> साती | +100 तों.पा.सु.
पुस्तकाबद्दल अभिनंदन!! Happy

सगळ्यांचे धन्यवाद.

दक्षे रुपावर जाऊ नको चवीवर जा. Lol

अग कोलंबी खाल्लीस ना तसेच लागते साधारण. खेकड्याच्या मासासारखीही लागते चव.

जागू, पुस्तकाबद्दल अभिनंदन! मत्स्यप्रेमींना खूप उपयोगी असेल.

तुझ्या रेसिपीची कोलंबी खिचडी घरी प्रचंड आवडते. बरेचदा होते. खेकडे (कालवण)पण इथली तुझी रेसिपी बघून करायचे आहेत.

शेवंड नक्की करणार. फोटो छान आहेत. शेवटल्या फोटोसाठी सर्व्हिंगचं मोठं आणि वेगळ्या रंगाचं भांडं/प्लेट घेतलं असतं तर आणखी छान दिसलं असतं असं वाटलं. Happy

अग कोलंबी खाल्लीस ना तसेच लागते साधारण. खेकड्याच्या मासासारखीही लागते चव.
>> Proud असं सांगतेयंस जसं काही मी ढिगभर खेकडे खाऊन बसली आहे आधीच Proud Lol

त्या दिवशी माझ्याकडून काही रेसिपीज होणार नाहीत. <<< मग त्या दिवशी रेसिप्या कर. प्रकाशन दुसर्‍या दिवशी ठेऊ... Proud
.
.
.
शिवड = शेवंड = Lobster हा प्रकार मला 'डोंगर पोखरून उंदीर' वाटतो.. त्यापेक्षा मी चार मोठे टायगर प्राँस खाईन.. Happy

शेवंड = लॉबस्टर ना?
हो.

शिवड = शेवंड = Lobster हा प्रकार मला 'डोंगर पोखरून उंदीर' वाटतो..
खरे आहे पण कधीतरी चेंज म्हणून मला आवडतात.

मृण्मयी Happy

झंपी मी तो वेळ बदलते. अ‍ॅक्च्युली तशी उकळी यायला वेळ लागतो त्याची ४-५ मिनीटे माझ्या मनात होती. पण हे इतर कालवणांपेक्षा जास्त वेळच ठेवावे लागते ह्याच्या कठीण कवचामुळे.

नेहमीप्रमाणेच मस्त रेसिपी
पुस्तक तर करायलाच पाहिजे , अभिनंदन आणि शुभेच्छा

मस्त

जागुले तोंपासु आहे रेस्पी........

तुझ्या पुस्तकाच्या प्रती मी घेणारच बघ.......... Happy

लेकीला, बहिणी ला पाठवायला Happy

Pages