पारंपारीक ईडली
ईडली राईस - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी.स्पून
रवा ईडलीसाठी
ईडली रवा - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी.स्पून
सॉफ्ट पांढरी शुभ्र ईडली
१. सकाळी ईडली राईस, मेथी एकत्र भिजत घाला. उडीद डाळ वेगळी भिजत घाला.
२. संध्याकाळी डाळ तांदूळ वाटायच्या १५ मि. आधी पोहे थोड जास्त पाणी घालून भिजत घाला.
३. ईडली राईस, मेथी पोहे अगदी बारीक वाटून घ्या. अजिबात रवाळ नको. उडीद डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.
४. दोन्ही मिश्रण एकत्र करा. त्यात चवीपुरत मीठ घालून एकाच दिशेने ढवळून घ्या. १ टे. स्पून कच्च तेल घालून आंबवायला ठेवा.
५. सकाळी ईडलीपात्रात पाणी घालून ५ मि. उकळवून घ्या. नंतर ईडली स्टॅन्ड ठेवून १५ मिनिटे वाफवा. पहिल्या घाण्याच्या नंतर ईडली पात्रातील पाणी उकळवायची गरज नाही.
रवा ईडलीसाठी
ईडली रवा, मेथी, उडीद डाळ वेगळ भिजत घाला. उडीद डाळ, मेथी, पोहे घालून बारीक वाटून घ्या. ईडली रवा वाटलेल्या मिश्रणात घालून मीठ घालून ढवळून कच्च तेल घालून पीठ आंबवायला ठेवा.
अजून काही ईडलीचे प्रकार
१. ईडलीच पीठ ईडलीपात्रात घातल्यावर त्यात वरून भिजवलेल्या चणाडाळीचे ४-५ दाणे घाला. ही ईडलीसुद्धा छान लागतात.
२. ईडलीच पीठ ईडलीपात्रात घातल्यावर त्यात वरून साधी किंवा रंगीत साखर शिंपडा. ही गोड ईडली गोडप्रेमींना खूप आवडते.
३. तट्टे ईडली - ईडलीच पीठ छोट्या डीशमध्ये वाफवा. असच छोट्या वाटी किंवा ग्लासमध्ये वाफवता येते.
४. कांचीपुरम ईडली - ईडलीच पीठ आंबवायला ठेवल की २ टे. स्पून चणाडाळ भिजत घाला. सकाळी काजूचे तुकडे तुपात तळून घ्या. ईडलीच्या पिठात भिजवलेली चणाडाळ, बारीक चिरलेली हि.मि., कढीपता बारीक चिरून, १/२ कप ओल खोबर, १/२ इंच किसलेल आल, काळी मिरी खडबडीत वाटून १ टी.स्पून. हे सर्व मिक्स करा. पिठात काजूचे तुकडे मिक्स करा किंवा वेळ असेल तर ईडलीपात्रातील तेल लावलेल्या प्रत्येक वाटीत काजूचे दोन तीन तुकडे ठेवून् त्यावर पीठ ओता. आणि १५ मिनिट वाफवा.
वरच्या फोटोतील ओल्या खोबर्याची चटणी प्रकार १
ओल खोबर, बेडगी मिरची, आल, लसूण. मी लिंबूरस घातला होता, तुम्ही कैरी किंवा चिंच वापरू शकता. चवीपुरत मीठ घालून ग्रांईड करा. वरून कढीपता, हिंग, राई ची फोडणी द्या.
ओल्या खोबर्याची चटणी प्रकार २-ओल खोबर, हिरवी मिरची, आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.
ओल खोबर चटणी प्रकार ३ - ओल खोबर, चटणीची डाळ / पंढरपूरी डाळ, हि.मि. आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.
लाल टॉमेटोची चटणी
तेल किंवा तूपामध्ये कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, लसूण, आल, बेडगी मिरची परतून घ्यायची. थंड झाल्यावर चवीपुरत मीठ घालून हे मिश्रण वाटायच. वरून हिंग, राई, कढीपत्ताची फोडणी द्यायची. ही चटणी ईडली बरोबर एकदम टेस्टी लागते.
डोसासाठी शेंगदाणा चटणी एकदम बेस्ट.
शेंगदाणे भाजून, साल काढून, लसूण, आल, बेडगी मिरची, चिंच हे मिक्सरला वाटून घ्या. वरून फोडणी.
आल्याची चटणी
ही सुद्धा ईडलीबरोबर झणझणीत टेस्टी लागते. आल छोटे तुकडे करून पाव वाटी, बेडगी मिरची, चणाडाळ आणि उडीद डाळ १ टे.स्पून, लसूण १-२ पाकळ्या नसल्यातरी चालतात, हे तेलात भाजून चिंच, गूळ मीठ घालून मिक्सरवर बारीक पेस्ट करा. वरून फोडणी द्या.
डोसे प्रकार इथे बघा. http://www.maayboli.com/node/53541
प्लीज ईडलीच्या पीठात भात घालू नका. आंबण्याच्या प्रक्रियेत भात नासतो आणि अशी ईडली खाल्ली की पोट बिघडत. अशा ईडल्यांची चव आणि रंगसुद्धा वेगळाच असतो.
पोहे नसतील तर कुरमुरे घाला.
पीठात तेल घातल्यावर ढवळायच नाही.
जी काही पिठाची कंन्सिस्टंसी करायची असेल ती पीठ आंबवायला ठेवण्या अगोदर करावी.
एकदा पीठ आंबल्यावर त्यात अजिबात पाणी घालायच नाही.
काल खोट्टं करायची इच्छा
काल खोट्टं करायची इच्छा झालेली पण फणसाची पाने मिळेना म्हणून आज इडलीवर भागवली तहान..


श्रवु, आमुपुरी, डीजे .. थँक्स
श्रवु, आमुपुरी, डीजे .. थँक्स.
मला तेच कन्फर्म करायचं होतं.
इडलीपात्रात आणि कुकरमधे बनवलेल्या इडलीत फरक पडतो का ? मंडईत मिळेल का असे भांडे ?
भारीच झाल्यात इडल्या...
भारीच झाल्यात इडल्या... तोंपासू
वर दिलेले सेम प्रमाण घेउन
वर दिलेले सेम प्रमाण घेउन इडली करुन पाहिली.
माझी इडली पांढरी शुभ्र झाली पण म्हणावी तशी सॉफ्ट (लुसलुशीत, अलवार) झाली नाही.
इडली चे पीठ व्यवस्थित फुगले होते.
मीठ आणि तेल रात्रीच घालुन ठेवले होते सकाळी अज्जिबात ढवळाढवळ न करता इडल्या केल्या.
तरी पण काहीतरी चुकले बहुतेक.
पीठाच्या कन्सिस्टन्सी मुळे पण काही फरक पडत असेल का ?
माकाचु ?
आम्ही पोहे घालत नाही. मार्केट
आम्ही पोहे घालत नाही. मार्केट यार्डात रमेशचंद्रच्या दुकानात साउथला चालतो तो उकडा राईस घेतो. बरेच मारवाडी इडली राईस म्हणून रेशनिंगचा तांदूळ देतात.
वाण्याकडे मिळतो तो उकडा
वाण्याकडे मिळतो तो उकडा तांदूळ आणि इडली राईस म्हणून बिग बझारमधे मिळतो तो वेगळा दिसतो. दोन्हीत फरक दिसतो.
ईडली राईस वायला आणि उकडा
ईडली राईस वायला आणि उकडा तांदूळ वायला. ईडली राईस वापरला तर अजिबात प्रॉब्लेम येत नाही. पुण्यात दोराबजी कडे एकदा घेतला होता सध्या बॉडिगेट पाशी (औंध गाव) जे केरळी शॉप आहे तिथून घेतो. मोस्टली सगळ्या केरळी शॉप मध्ये मिळतोच मिळतो. ती उडीद डाळ पण मिळते.
मीठ तेल रात्री घालायचे नाही
मीठ तेल रात्री घालायचे नाही.किण्वन हे एमुख्य प्रोसेस पिठात बुडबुडे आणते आणि त्यातून हवा निसटत असताना भोकं पडून जाळी पडते.मीठ किंवा तेल ही प्रोसेस स्लो करतात.साखर पण(ऑफिस कँटीन ला खाल्लेला डोसा गोड लागला तर समजून घ्या पीठ खूप जास्त आंबलंय गरम जागी ठेवल्याने किंवा 2 दिवस जुनं आहे म्हणून साखर घातलीय)
पीठ नीट फुगवून मग अगदी इडली करताना मीठ मिसळावे.
सकाळी इडली करताना मीठ घालायचे
सकाळी इडली करताना मीठ घालायचे..
फायनली सॉफ्ट, लुसलुशीत, डेन्स
फायनली सॉफ्ट, लुसलुशीत, डेन्स नसलेल्या इडलीसाठी काय प्रमाण घ्यावं? गोटा उडीद डाळ असेल तर आणी साधी स्प्लिट उडीद डाळ असेल तर काय?
मी वर दिलेल्या 3 वाटी इडली
मी वर दिलेल्या 3 वाटी इडली रवा आणि 1 वाटी उडीद डाळ या प्रमाणे इडल्या केल्या . या वेळी पाणी उकळल्यावर उकडायला ठेवल्या . त्यामुळे फुगल्या छान . या टिप बद्दल धन्यवाद. पण कोरड्या वाटल्या खाताना . लुसलुशीत झाल्या नाहीत . मुलीच्या भाषेत granules लागतायेत खाताना . साधा तांदूळ वापरून लुसलुशीत होतील का ? मी इडली रवा भिजवून वाटलेल्या डाळीत मिसळला होता . तो पण वाटून घ्यायला हवा होता का ?
पाणी उकळल्यावर उकडायला
पाणी उकळल्यावर उकडायला ठेवल्या . त्यामुळे फुगल्या छान . या टिप बद्दल धन्यवाद. >>>>>> +१००००
माझ्याही गेल्यावेळी छान फुगल्या
श्रवू तुमच्या इडली चा आकार
श्रवू तुमच्या इडली चा आकार छान वाटतो आहे कोना सारखा. >>> अगदी अगदी.
रानभुली मस्तच.
मागे कुठेतरी युट्युबवर उंच मोठ्या कुकरमधे, उभ्या भांड्यात केलेल्या इडल्या बघितल्या, नाव विसरले (कांचीपुरम इडली मोस्टली, पण ह्यात जी कांचीपुरम रेसिपी आहे तशी नव्हती). त्यात पण भांड्यांत पाने वापरलेली, केळीची बहुतेक. परत बघेन तो व्हिडीओ, बरंच आठवत नाहीये. खूप दिवस झाले तो बघून.
मी वर दिलेल्या 3 वाटी इडली
मी वर दिलेल्या 3 वाटी इडली रवा आणि 1 वाटी उडीद डाळ या प्रमाणे इडल्या केल्या . >>
माझे प्रमाण १ वाटी उडीद डाळीला २ वाटी इडली रवा असे आहे. आणि मुठभर पोहे आणि १/४ चमचा मेथ्या.
रेसीपी डिटेल मध्ये दुसरीकडे लिहिते.
मेथ्या आणि पोहे यासाठी वापरायचे कारण उडीद डाळ नविन असेल तर इडल्या हलक्या होतात . पण प्रत्येक वेळी नविन उडिदडाळ मिळेच अस नाही.
डोसा (इथे लिहिला आहे पेपर डोसा) आणि इडल्या सहसा कधी चुकत नाहीत. बरेच वेळा नविन काहीतरी रेसीपी ट्राय केल्यावर मात्र हमखास बिघडल्या आहेत.
साधारण 30 मीडियम साईजच्या
साधारण 30 मीडियम साईजच्या इडल्या बनवायच्या आहेत तर तांदूळ आणि उडीद डाळीचं काय प्रमाण घ्यायला हवं?
तीन वाट्या तांदूळ आणि सव्वा
तीन वाट्या तांदूळ आणि सव्वा वाटी उदीद डाळ....... + एक चमचा मेथी दाणे भिजवितना!

Thanks! मी कोणाच्या तरी
Thanks! मी कोणाच्या तरी उत्तराची वाट पाहत होते. आता भिजवते
उकडा तांदूळ घ्या हं...!!
हा इडली राईस...उकडा तांदूळ
हा इडली राईस...उकडा तांदूळ यालाच म्हणतात का?
माझ्या कडे इडली राईस च आहे.
माझ्या कडे इडली राईस च आहे. तोच भिजवला
Mrunali, उकडा तांदूळ वेगळा
.
Mrunali, उकडा तांदूळ वेगळा
Mrunali, उकडा तांदूळ वेगळा दिसतो. Transperent दिसतो तो.
अच्छा..मी कधी वापरला नाहीये
अच्छा..मी कधी वापरला नाहीये उकडा तांदूळ..मला वाटलं इडली राईसलाच म्हणत असावेत उकडा..
आमच्याकडचा उकडा तांदूळ पण
आमच्याकडचा उकडा तांदूळ पण ट्रान्स्परन्ट आहे..
मृणाली हाच तो ईडली राईस जो
मृणाली हाच तो ईडली राईस जो केरळी दुकानात मिळतो. उकडा वेगळा.
भारी.
भारी.
Pages