मला दे नं राजा...

Submitted by मुग्धमानसी on 13 May, 2015 - 02:38

मला दे नं राजा
तुझे उन्ह थोडे
मला सावलीचा
खरा शाप आहे

कुणाला कसे
सांगुनी हे कळावे...
कसा गारव्याचा
मला ताप आहे...

कुणीही मला
त्रास नाही दिलेला
खरे सांगू का?
... हा खरा त्रास आहे!

मला मी नव्यानेच
लिहिते खरे पण...
जुना सर्व आकार
पत्रास आहे...!

नको पावसाचे
गुलाबी दिलासे..
सख्या कोवळी मीच
उरलेली नाही...

म्हणूनी तुझ्या नेत्री
दिसले समुद्र...
मला त्या झर्‍याची
अता ओढ नाही...

तुझा स्पर्श देतो
शहारे जरासे..
तरी ते उन्हाचे
दिलासे असावे!

तुझे श्वास हळुवार
रेंगाळताना,
असो सत्य ते...
भास काही नसावे!

कुणाला कळेना...
कुणी का म्हणेना
मला बोचते
सूख माझेच आहे..

सख्या या सुखाचे
तुला काय सांगू...
किती आगळे रूप
सन्मूख आहे!

मला दे सख्या
कोवळे उन्ह थोडे
मला वाढ माझी
पहायाची आहे...

इथे सावलीतून
मी खुंटलेली
मला झेप मेघांत
घ्यायाची आहे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मी नव्यानेच
लिहिते खरे पण...
जुना सर्व आकार
पत्रास आहे...!

नको पावसाचे
गुलाबी दिलासे..
सख्या कोवळी मीच
उरलेली नाही...

>>
वाह!

काही तरी खटकतंय पण कवितेत.
नेमकं काय ते सांगता येत नाहीये Uhoh