खग ही जाने खग की भाषा - भाग 5

Submitted by कांदापोहे on 12 May, 2015 - 01:40

पक्षीनिरीक्षणाची लागलेली आवड लक्षात आल्यावर जुना कॅमेरा व लेन्स विकुन टाकली व नविन गियर घेतला. हा नविन गियर टाकल्याने आमची पक्षीनिरीक्षणाची गाडी या वर्षी सुस्साट धावली. आता गरज आहे ते फोटोशॉप, लाईटरुम सारखे सॉफ्टवेअर शिकुन आणखी चांगला प्रयत्न करायची.

खाली दिलेले सर्व फोटो आधी फेसबुकावर प्रकाशित आहेत पण इथले सर्वच जण तिकडे असतीलच असे नाही. त्यामुळे इथेही ते प्रकाशित करत आहे.

यापूर्वी केलेले प्रयत्न खाली बघता येतीलच.

उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 1 इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 2 इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ३ इथे http://www.maayboli.com/node/42131 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 4 इथे http://www.maayboli.com/node/51921 बघता येईल.

पाठलाग - Catch me if you can!!. मोर (Peacock) (ARAI टेकडी)
पुण्यातील ARAI च्या टेकडीवर अनेक पक्षी येतात त्यामुळे अनेकदा जाणे होते. हे प्रकाशचित्र मिळाले त्या दिवशी पहिल्यांदा एकाचा मोराची मान दिसली. झाडीमधे खुसपुस ऐकु आली म्हणुन मी जागेवरच उभा राहीलो. बघतो तर काय एका पाठोपाठ ४ मोर बाहेर आले. पापणी लवायच्या आत एक एक करत त्यातील तिन उडले व काही क्षणात अचानक भटक्या कुत्र्यांचा एक मोठा गट त्या झाडीतुन बाहेर पडला. हे महाशय मात्र आपल्या तोर्‍यात उभे राहीले व अखेरच्या क्षणी उडुन गेले.

सिंहगड व्हॅली हा भागही पक्षीनिरीक्षणाकरता असलेला उत्तम भाग. इथे पाणवढ्यावर सकाळी जाऊन बसल्यास अनेक पक्षी नक्की बघायला मिळतात. सध्या उन्हामुळे येथील पाणी जरी आटले असले तरी एका झाडावर गुलाबी रंगाची अनेक फळे आली आहेत त्यामुळे हमखास न्याहारी करणारे पक्षी इथे कॅमेरामधे टिपता येत आहेत.

चष्मेवाला Oriental White Eye (सिंहगड व्हॅली)
याचा फोटो काढणे म्हणजे डोक्याला ताप असतो. अरे बाबा किती हालशील असे ओरडावेसे वाटते.

रानखाटीक (Common WoodShrike)(सिंहगड व्हॅली)

Blackbird (सिंहगड व्हॅली)

खालच्या दोन पक्षांना तर 'अरे हावरटपणा पुरे!! किती खाल' असे ओरडुन सांगावेसे वाटले. पण ओरडलो असतो तर फोटो नसते मिळाले. Happy

कुर्टुक (White-Cheeked Barbet)(सिंहगड व्हॅली)

तांबट Coppersmith Barbet (सिंहगड व्हॅली)

शाही बुलबुल, पतंग पक्षी, पतंगा, बाणपाखरु, स्वर्गीय नर्तक, सुरंगी, नंदन Asian Paradise Flycatcher (सिंहगड व्हॅली)
हा पक्षी बघणे म्हणजे निव्वळ सुख असते. आपली लांबचलांब शेपटी सांभाळत हा उडुन तुमच्यासमोर येते तेव्हा कॅमेरावर हात चालत नाहीत.

पोपट (Rose Ringed Parakeet) (एंप्रेस गार्डन)

निळा कस्तूर, नीलकस्तुरी (Rock Thrush)(कानीफनाथ मंदीर)

पट्टकादंब Bar Headed Geese (वीर धरण)
Bar-Headed Geese पट्टकादंब हंस हे दर वर्षी मंगोलियातून उडतात आणि काही लहान मोठे थांबे घेऊन पुण्यातील खडकवासला, कवडीपाट अशा काही मोजक्या पाणवठ्यांवरही ते दिसतात. जगातील सर्वांत उंच उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये पट्टकादंब या पक्षांचा पहिला क्रमांक लागतो. मंगोलिया या देशातून हे पक्षी भारतात येत असल्याची नोंद पक्षीतज्ज्ञांकडे सापडते. हिमालय पर्वत पार करणारे एकमेव पक्षी म्हणूनही या पक्षांचे विशेष असे वैशिष्ट्य आहे. सुमारे 21 हजार 500 फुटाच्या उंचीपर्यंत हे पक्षी उडतात. म्हणजेच, विमानाच्या उंचीप्रमाणे उडणारे पट्टकादंब हा एकमेव पक्षी आहे.

दरवर्षी विठुरायाची वारी करणार्‍या वारकर्‍यांप्रमाणे पुण्याजवळील पक्षीनिरीक्षक भिगवणची वारी नक्की करतात. याचे कारण म्हणजे तिथला प्रचंड मोठा जलाशय, त्यामधल्या माशांवर ताव मारणारे अनेक प्रकारचे पक्षी व मुख्य आकर्षण असते रोहीत उर्फ अग्निपंख उर्फ ग्रेटर फ्लेमिंगो. त्यावारी आस्मादीकसुद्धा गेले ३-४ वर्ष सहभागी होते आहेत.

Black Headed Gull (कुंभारगाव भिगवण)

चित्रबलाक Painted Stork (कुंभारगाव भिगवण)

Painted Stork (कुंभारगाव भिगवण)

जांभळी पाणकोंबडी Purple Swamphen (कुंभारगाव भिगवण)

शराटी (Glossy Ibis)(कुंभारगाव भिगवण)

रोहीत, अग्निपंख (Greater Flamingoes)(कुंभारगाव भिगवण)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो पाहिला कुर्टुक किती दाणे खाणारे एका वेळेस? Happy

काश मला हे फ्लेमिंगो एवढ्या जवळून बघता आले असते!!

हि मालिकाच अफलातून आहे!

मलाबी वारीला घेऊन जा की वं यकडाव>>
पुढल्या वर्षी. आत्ता वाशीला येतोस का? Happy

तिथे फांदीवर तुझं नाव कोरून आलास होय>> Lol

मस्त !
नवीन गियरच्या निमित्ताने पक्षीनिरी़क्षणाचा आनंद द्विगुणित होवो. Happy

सगळेच फोटो अतिसुंदर आहेत. शराटी हे फालतु नाव धारण करणारा पक्षी खुप आवडला. त्याचे नविन कायतरी बारसे करायला हवे.... जांभळी पाणकोंबडीही सुंदर आहे.

नविन गीअर मस्तय. . Happy

मोराचा फोटो, भीषोण भालो. नशीब लागतं असलं काहीतरी डोळ्यासमोर घडायला आणि ते तितक्याच कौशल्याने कॅमेरात कैद करायला Happy

लय भारी!!!!!!!!!!!!

सर्व प्रचि एकदम अप्रतिम. शाही बुलबुलचा फुल फ्रेम फोटो तर एकदम कातिल.......

पहिल्या प्रचिच टायमिंग परफेक्ट.
फ्लेमिंगोचे बोके सही मिळाले आहेत.

नविन गिअर सोबत खगमास्टरला टिपण्याचा केलेला प्रयत्न..

हे सगळे फोटो बघितल्यावर 'सिलेक्टर चॉइस' रिबन मिळाले याचे काहीच आश्चर्य वाटले नाही. अफाट सुंदर आहेत सगळेच फोटो.

व्वा... दिल खुष हो गया कान्देभौ..... ! चान्गले आहे तुझे "पक्षी निरीक्षण".....
पहिला फोटो बघितल्यावर मात्र मला वारेमाप निर्बंधीत "भटकी कुत्री" वन्य प्राणी/पक्षी जीवनावरही वाईट परीणाम करणार की काय असे वाटते आहे....

मस्त आलेत सगळे फ़ोटो...

हे सगळे फोटो बघितल्यावर 'सिलेक्टर चॉइस' रिबन मिळाले याचे काहीच आश्चर्य वाटले नाही >>+१

Tamron 150-600mm लेन्स आहे का ?

Pages