स्वीट दही ( स्वीट कर्ड )

Submitted by मनीमोहोर on 10 May, 2015 - 12:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उन्हाळ्यात जेवण झालं की बाहेर एक चक्कर मारताना पाय आपोआपच ऑफिस च्या जवळ असलेल्या मेहेर या अगदी छोट्याशा कोल्ड्रिंक हाऊस कडे वळतात, जिथे लंच टाईम मध्ये अनेक जण लस्सी, ताक आणि हे वर लिहीलेलं स्वीट दही खात असतात. काचेच्या छोट्या ग्लासात विरजलेलं, बेताच गोड, थंड, घट्ट, पांढर शुभ्र दही उन्हाळ्यात खाताना जणुं स्वर्गीय सुखाचा आनंद्च मिळत असतो प्रत्येकाला. ह्या दह्यापासून प्रेरणा घेऊन मी तसं दही घरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला म्हणून इथे लिहीत आहे. कृती तशी अगदी सोपी आहे
साहित्य
१/२ लिटर होल मिल्क (मी गोकुळ घेतले )
चार मोठे चमचे साखर
दोन छोटे चमचे डेअरी व्हाईट मिल्क पावडर
विरजणासाठी दही
थोडे बदाम पिस्त्याचे काप आणि दुधात भिजवलेलं केशर (ऐच्छिक )

क्रमवार पाककृती: 

प्रथम दूध उकळून घ्यावे . त्यात साखर घालावी. दुधाचं पातेलं पाण्यात ठेऊन आणि येता जाता ढवळत राहुन ते विरजणाला योग्य अशा तपमानाला आलं की त्यात दूध पावडर मिक्स करावी आणि नॉर्मल आंबट अर्धा चमचा दही त्यात नीट मिसळावे. आता हे दूध आपल्याला आवडत असेल त्या आकाराच्या ग्लास मध्ये ओतावे. एका परातीत पाणी घालुन त्यात हे ग्लास सेट होण्यासाठी ठेऊन द्यावेत. मी सकाळी अकराला विरजण लावल आणि संध्याकाळी चारला दही सेट झालं . खाण्या आथी हे दही कमीत कमी चार पाच तास फ्रीज मध्ये ठेवावे . आपल्याला आवडत असेल त्या ड्राय फ्रूट ने सजवावे. काही न करता पांढर शुभ्र ही छान दिसतं

हा फोटो

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एकेक ग्लास ( छोटा)
अधिक टिपा: 

श्रीखंडाच्या आणि ह्याच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक आहे.
श्रीखंडा प्रमाणे हे पोटाला जड होत नाही.
होल मिल्कच वापरावे.
अर्ध्या लिटर दुधाचे सहा ग्लास ( शॉर्ट ग्लास) तयार झाले.
साखर व्यवस्थित घालावी कारण दही थोड तरी आंबट असतच आणि गार झाल्यावर पदार्थाची गोडी कमी होते थोडी.
डेअरी व्हाईट मुळे दही मस्त घट्ट होतं त्यामुळे ती घालणंआवश्यक आहे.
कमीत कमी चार पाच तास फ्रीज मध्ये ठेवावे म्हणजे अधिक घट्ट होते अणि थंडगारच खावे.
हे एक उत्तम प्रकारचे डेझर्ट होईल.
सजावटी साठी पुदिन्याचे पान ही छान दिसेल.
ड्राय फ्रुट जास्त घालु नयेत . एकसुरी पांढरा रंग मोडण्या पुरतीच घालावीत.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सुंदर आहे!!! आवडले.

१ टेबलस्पून = ३ टीस्पून म्हणजे ४ टेस्पू = १२ चमचे, ०.५ लिटर = २ कप, म्हणजे १ कपाला ६ चमचे साखर?? ६ चमचे साखरची साथ आली काय माबोवर Wink Biggrin

सीमंतीनी, मला असं वाटत की एक टेबल स्पून म्हणजे दोन चहाचे चमचे.
मी बोर्नविटाच्या चमच्याने साखर घातली आणि पोहे खायच्या चमच्याने दूध पावडर

मस्तच.. मुंबईला के रुस्तम मधे मिळते असे दही.. या दुकानात गेली ३० / ३५ वर्षे तरी मी असे दही खातोय. ( तिथे फक्त आईसक्रिम, ज्यूस आणि दही मिळते )

मस्त दिसतंय हे दही.
स्वीट बंगालमध्ये 'मिष्टी दोही' म्हणून छोट्याश्या मडक्यात जे देतात, ते हेच असावे काय?

वा मस्तच, dannon चे yogurt आणण्यापेक्शा हे मस्तच . ते छोटेसे कप लगेच संपतात. Happy

धन्यवाद सगळ्यांना.

दिनेश, फोर्ट मधले मेहेर हे दुकान ही पारश्याचेच आहे आणि आज इतकी वर्ष क्वालिटी तीच आहे. मीही यांची खूप जुनी कस्टमर आहे.

सामी , आशिका, मिष्टी दोही किंवा योगर्ट असचं लागत असेल असं वाटतय.

मस्तच .. Happy

दह्याला फ्लेवरींग देता येईल काय असा विचार करते आहे ..

केशर अर्थातच छान लागेल पण इतर काही (कृत्रिम फ्लेवर्स नव्हेत!) .. आणि वरून घातलंय तसं नव्हे तर संपूर्ण दह्यालाच की असं काही घातलं तर देही लागायचं नाही कळत नाही ..

सशल, लॅव्हेंडर. कुकींग लॅव्हेंडर थोड्या गरम दूधात टाकायचे आणि विरजताना ते दूध अर्धा लिटर दूधात घालून ही रेसिपी करायची. हा प्रकार आवडतो.
ऑरेंज झेस्ट +साखर पाण्यात उकळून, गाळून फक्त पाणी दूधात घालून पण दही चांगले होते. पण हा प्रकार वेळखाऊ आहे आणि उगीच वाटतो.

मॅप्रोचं रोझ सिरप (ज्यात क्रश्ड गुलाबाच्या पाकळ्या असतात ते) घालून वरच्या पद्धतीने लावलेलं दही मस्त होतं. माझ्या मुली शाळेत असताना दुपारी आल्यावर खायला म्हणून त्यांना हेच लागायचं. फ्रीजमधे गारेगार सुरेख लागायचं.

मात्र मी दही लावून झाल्यावर शेवटचा चमचा फिरवताना ते मिक्स करायचे. एकदाच हलक्या हाताने. त्यामुळे त्याची छान गुलाबी रेषा यायची दह्यात.

लॅव्हेंडर आणि ऑरेन्ज झेस्ट .. दोन्हीं मस्त कल्पना आहेत .

झेस्ट + साखर घालून उकळलेलं पाणी ह्याकरता प्रमाण काय ते बघायला हवं .. आधीच गायीचं दुध फुलकवणी की काय म्हणतात तसं वर पाणी घातलं तर पाणचट नाही ना व्हायचं? Happy

व्हॅनिला बीन (म्हणजे त्यातलं कॅव्हिया) किंवा मग अख्खी बीनच घातली दुधात दह्यासाठी उकळताना तर?

(टीव्हीवर बघून एकदा तरी अशी चांगली बीन आणावी आणि काहितरी करावं असं नेहेमी वाटतं ..)

>> मात्र मी दही लावून झाल्यावर शेवटचा चमचा फिरवताना ते मिक्स करायचे. एकदाच हलक्या हाताने. त्यामुळे त्याची छान गुलाबी रेषा यायची दह्यात.

वॉव! असा स्वर्ल इफेक्टही देता येतो? Happy

मला एकदमच स्फुरण चढलं आहे आता हे ट्राय करून बघण्यासाठी ..

मात्र मी दही लावून झाल्यावर शेवटचा चमचा फिरवताना ते मिक्स करायचे. एकदाच हलक्या हाताने. त्यामुळे त्याची छान गुलाबी रेषा यायची दह्यात. >> काय मस्ट आणि मस्त आयडीया!

हाहा सिंडरेला .. Happy

मी काही पदार्थ केला की आपला परक्यांसमोर नेताना पर्दानशीं रहावा एव्हढीच अपेक्षा .. Wink

Pages