पर्यावरण म्हणजे काय रे भाऊ?

Submitted by जिज्ञासा on 5 May, 2015 - 16:11

मायबोलीवर गेल्या काही दिवसांत पर्यावरण ह्या विषयाशी संबंधीत दोन धागे निघाले आणि त्या दोन्ही धाग्यांवरील चर्चेतून बरेच चांगले आणि महत्वपूर्ण मुद्दे समोर आले. मात्र ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या धाग्यावर प्रामुख्याने पर्यावरणस्नेही उपाय आणि त्यांची अंमलबजावणी असा उद्देश होता. मात्र त्यावर काही पोस्ट्स ह्या पर्यावरणाच्या अनुषंगाने निर्माण होणारे/झालेले प्रश्न ह्यावर होत्या. त्या वाचून वाटलं की ह्या प्रश्नांना मांडण्यासाठी/त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा हवा.
जेव्हा आपण पर्यावरणासंबंधी काही माहिती/चर्चा वाचतो तेव्हा त्यात अनेक संकल्पना, शब्द वापरलेले असतात ज्यांचा अर्थ समजल्यास ती चर्चा अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येते. ह्या धाग्याचा उद्देश पर्यावरणासंबंधी संकल्पनांची माहिती, वाचनीय लेख/चर्चा/बातम्या ह्यांचे दुवे, प्रश्न-त्यावर चर्चा/उत्तरे असा आहे. ह्या धाग्याच्या पहिल्या काही पोस्ट्स मध्ये मी अशाच काही संकल्पनांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. मायबोलीकरांनी त्यात आपल्या परीने भर घालावी.
वि.सू. पहिल्या काही पोस्ट्स ह्या थोडक्यात ecology/environmental science 101 असेल. मराठी प्रतिशब्द माहिती नसला तर इंग्रजीत लिहिणार आहे (चुकीचे लिहिण्यापेक्षा). ही माहिती परिपूर्ण नाही. It also may not be a universal truth since there are always exceptions to facts. So consider this as just a primer to the subject/concept/terminology. काही चुकीची माहिती असल्यास मला लगेच सांगा! मी आवश्यक तो बदल करेन.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी,
ग्रोइंग सिझन लहान असलेल्या भागात ग्रीन हाउस वापरुन ग्रोइंग सिझन लांबवता येतो तसेच जी झाडे विंटर ओवर करणे आवश्यक आहेत त्यासाठीही ग्रीन हाउस लागते. वर्टिकल फार्मिंग, अक्वापोनिक वगैरे पद्धत वापरुन बर्‍याच ठिकाणी वर्षभर स्थानिक भाज्या मिळ्णे शक्य होते. या पद्धतीत खते आणि पेस्टिसाईड्स ची गरजही कमी होते.
http://www.pbs.org/newshour/rundown/food-for-9-billion-singapore/

बी, मला ग्रीनहाउस बद्दल फारशी माहिती नाही. मला फक्त त्यांचा उपयोग फुलझाडांची/इतर काही झाडांची रोपे तयार करण्यासाठी नर्सरीमध्ये केला जातो हे माहिती आहे. शिवाय ऑर्किड्स सारख्या फुलांची शेती ही ग्रीनहाउस मध्ये करतात कारण त्यांना वातावरणातील बदल सहन होत नाहीत.

प्रकाश घाटपांडे, खरंय! मी स्वतः अशा अतिरेकी हटवादी लोकांच्या प्रेमात नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. पण जेव्हा निर्णय डोळसपणे घेतले जातात तेव्हा ते अधिक शाश्वत असतात हे ही खरे. सध्या आपण शेखचिल्लीप्रमाणे ज्या फांदीवर बसलो आहोत त्याच फांदीवर करवत चालवत आहोत. किमान अशी करवत चालवू की फांदी भी न टूटे और हमारी जान भी बच जाये! जितक्या आपल्या गरजा वाढवत नेऊ तितकी जास्त करवत चालवावी लागणार ह्याची जाणीव ठेवून गरजांचा विचार झाला पाहिजे. We must never cross the tipping point (if we haven't already)! Again, as Gandhiji said, "there is always enough for everybody's need, but not for everybody's greed".

माझ्या निवडक दहात नोन्द केली आहे. धागा मागे राहिलेला आपल्याला परवडणारा Happy नाही म्हणुन अजुन वाचायला आवडेल.

जिज्ञासा - सहज मराठी मधे तुम्ही पर्यावरण हा विषय मान्डत आहात, त्या साठी वेळ देत आहात याचे कौतुक वाटते. या विषयातील सामान्यान्च्या ज्ञानात भर टाकण्याचे कार्यासाठी धन्यवाद.

उदय, मनापासून आभार!

Organic farming/सेंद्रिय शेती
आज आपण बाजारात खरेदीला जातो तेव्हा organic ह्या लेबलखाली अनेक गोष्टी विकायला ठेवलेल्या आढळतात. पण Organic ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर organic म्हणजे कोणतीही रसायने न वापरता पिकवलेले धान्य/फळे/भाज्या इ. किंवा कोणतीही प्रतीजैवके (antibiotics), hormones न देता वाढवलेले प्राणी/त्यापासून मिळणारे पदार्थ. उदा. अमेरिकेत अनेक ठिकाणी कोंबड्यांना रोग होऊ नयेत म्हणून प्रतीजैवके दिली जातात, गायींची दूध उत्पादन क्षमता वाढावी म्हणून hormones दिली जातात. किंवा फळे/भाज्या पिकवताना कीटकनाशक/herbicides इ. वापरली जातात. अशा प्रकारे तयार झालेले उत्पादन हे organic नसते.
organic पद्धतीने शेती/पशुपालन करताना तितके उत्पादन होत नाही जितके conventional पद्धतीने होते अर्थात त्यामुळे organic पदार्थांची किंमत बरेचदा खिशाला न परवडणारी असू शकते.

Why care?/Organic खाण्याचे महत्व: मी मागे एका पोस्टमध्ये biomagnification बद्दल लिहिताना अविघटनशील रसायने जशी च्या तशी अन्नसाखळीत पुढे जातात असे लिहिले आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर pesticides/herbicides चा समावेश आहे. नुकताच एके ठिकाणी एक छोटा प्रयोग करण्यात आला ज्याच्याविषयी तुम्हाला इथे (https://www.coop.se/organiceffect) अधिक बघता येईल त्यात एका कुटुंबातील सर्वांचे प्रयोगाआधी आणि प्रयोगानंतर urine samples घेण्यात आले. प्रयोगादरम्यान सगळ्यांना दोन आठवडे केवळ organic पदार्थ असलेल्या आहारावर ठेवण्यात आले. त्या दोन आठवड्यात सगळ्यांच्या urine samples मध्ये असलेल्या pesticides/herbicides च्या प्रमाणात आश्चर्यकारक फरक दिसून आला. म्हणजे आपण दररोज किती मोठ्या प्रमाणावर ही रसायने ग्रहण करीत आहोत ज्यांचे आपल्या शरीरावर नेमके काय परिणाम हे अजून कळायचे आहे!

A not so good news Sad एका ताज्या अहवालानुसार वातावरणातील CO2 चे प्रमाण गेल्या दोन बिलियन वर्षांतील उच्च्चांकी 400 ppm (parts per million) नोंदवले गेले आहे. ह्याचाच अर्थ ग्रीन हाउस गॅस एमिशन कमी करण्यात आपण अपयशी ठरतो आहोत. ही चांगली गोष्ट नाही!
http://www.iflscience.com/environment/carbon-dioxide-levels-hit-new-mile...

रच्याकाने, I fucking love science उर्फ www.iflscience.com (spare the name!) ही एक खूप छान वेबसाईट आहे जिथे सोप्या भाषेत नवीन संशोधनांची ओळख करून दिली जाते. तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजला देखील लाईक करू शकता.

नॉन-ऑरगॅनिक काय खाऊ नये ह्याचे एक डर्टी डझन म्हणून लिस्ट आहे. सगळे पदार्थ नाही परवडले तरी ते १२ पदार्थ नक्की ऑरगॅनिक खावेत. जरा वेळात टाकते लिस्ट.

>> पृथ्वीवर ७०% पाणी आणि ३०% जमीन आहे.
हे वाक्य असे हवे का? "पृथ्वीचा ७०% पृष्ठभाग पाण्याने तर उरलेला ३०% पृष्ठभाग जमिनीने व्यापलेला आहे."

>> आपण ज्या हवेत श्वासोच्छवास घेतो त्या हवेत ७०% नायट्रोजन, २१% प्राणवायू (ऑक्सिजन) आणि ३% उरलेले सर्व वायू आहेत

७० + २१ + ३ = ९४% हे आकडे बदलाल का?

>> म्हणजेच पृथ्वीवरील एकूण गोड्या पाण्यापैकी केवळ ०.३% पाणी हे वापरण्यायोग्य अशा द्रव स्वरूपांत उपलब्ध आहे.

वरच्या वाक्यातून "गोडया" हा शब्द काढून टाकावा लागेल.

>> उदा. प्लास्टिक, DTT, अनेक रासायनिक संयुगे, concentrated heavy metals like mercury. पाने, फांद्या, मृत प्राणी किंवा लोखंड, कागद इ. गोष्टी ह्या सर्व गोष्टी biodegradable आहेत.

या वरच्या वाक्यात mercury नंतरचा पूर्णविराम चटकन जाणवत नाही आणि पाने, फांद्या इत्यादी biodegradable देखील xenobiotic च्या यादीत वाचले जातात. मी या वाक्यात संभ्रम टाळण्या साठी खालील बदल सुचवेन.

"उदा. प्लास्टिक, DTT, अनेक रासायनिक संयुगे आणि concentrated heavy metals like mercury इत्यादी. या उलट पाने, फांद्या, मृत प्राणी किंवा लोखंड, कागद इ. गोष्टी ह्या सर्व गोष्टी biodegradable आहेत."

या लेखमालिकेस शुभेच्छा.

अश्विनी के, Happy
टग्या, इतक्या बारकाईने वाचून बदल सुचवल्याबद्दल आभार! सर्व ठिकाणी बदल केले आहेत Happy
सी, तुझी यादीची लिंक त्या दुसऱ्या धाग्यावर (पर्यावरणस्नेही जीवनशैली) टाकशील का? किंवा मी ती सगळ्या सूचना जिथे आहेत तिथे add करू का? (add करेन!)

जिज्ञासा,

म्हणजे 'एकुण समुद्रांची' 'एकुण सी ओ २' अ‍ॅबसॉर्ब करण्याची क्षमता मर्यादीत असते का?

बेफि, समुद्राची क्षमता भरपूर आहे परंतु अमर्याद नाही. आणि जितका CO2 शोषला जातो त्याने पाण्याची acidity वाढते (pH कमी होतो) कारण CO2 चे carbonic acid मध्ये रुपांतर होते. त्याने समुद्रात वाढणारे अनेक जीव मरून जातात Sad

जिज्ञासा,
उत्तम धागा.

फक्त एक सुधारणा हवी -

DTT - Dithiothreitol, म्हणजेच Cleland's reagent. It is a very strong reducing agent.
DDT - dichlorodiphenyltrichloroethane (not methane, as you have written).

Pages