माहिती हवी आहे - Paris & switzerland मध्ये काय बघावे

Submitted by मृणाल १ on 5 May, 2015 - 04:52

जूनच्या शेवटच्या आठवड्यात Paris & Switzerland ला जाणार आहोत . आम्ही दोन couple आहोत . काय काय बघावे ? काय टाळावे? राहणे आणि खाणे या विषयात काही मार्गदर्शन मिळाले तर उत्तम .
गूगलवर माहिती आहे पण जर कोणी स्वतः गेले असतील आणि अनुभव सांगितले तर खरच फायदा होईल.
आधी Switzerland -३ - ४ दिवस नंतर Paris. असा plan आहे.. इतके दिवस पुरे होतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मृणाल १ इथे मायबोलीवर दिनेशजी आणी कुलु या दोघानी स्वित्झरलन्ड विषयी लिहुन फोटो पण टाकले आहेत. ही खालची मिसळपावची लिन्क बघ. मधूरा देशपान्डे या मुलीने डिटेल्स दिले आहेत

http://www.misalpav.com/node/29049

Switzerland ला कमित कमी ४ दिवस तरी ठेवा. शक्यतो टुर घेउ नका, पॅरीस्ला ३ दिवस तरी पाहिजेत.

आम्ही २०११ मध्ये ३० दिवसाची बॅक पॅक टुर केली होती तेव्हा स्विस ला ६ दिवस (स्विस ला महिना असेल तरी पुरे पडणार नाही Happy ) आणि पॅरीस ला ३ दिवस ठेवले होते. आमच्या बरोबर लहान मुले असल्याने आम्ही पॅरीस डिसनी मध्ये गेलो होतो.

तुमच्या बरोबर लहान मुले आहेत का? आणि तुम्हाला म्युसियम ची किती आवड आहे?

स्विस मध्ये ४ दिवसाचा ट्रेन पास घेता येईल. स्विस ते पॅरीस ट्रेन ने गेल्यास चांगले.

लहान मुले नाहीत त्यामुळे पॅरीस डिसनी करणार नाही .
स्विस मध्ये ५ दिवस & पॅरीस ३ दिवस २ रात्र असा plan आहे
स्विस ते पॅरीस ट्रेन ने गेल्यास चांगले - हो तसेच आहे

Zurich - Interlaken
Interlaken – Jungfraujoch – Interlaken
Interlaken – Lucerne
Day 4: Lucerne - Mount Titlis - Lucerne
Day 5: Lucerne - Zurich – Rhine Falls - Zurich
असा plan साधारण पणे ठरला आहे .
हि ठिकाणे overhipped आहेत का ?
अगदी tourist spot असतील तर गर्दी & व्यावसायीकरण जास्त असते असा अनुभव आहे . हि ठिकाणे तशी आहेत का ?
निसर्ग बघायला , अनुभवायला जास्त आवडतो
Paris मध्ये Musium बघणार आहोत. Lourve तर नक्कीच. Lourve थोडक्या वेळात कसे बघावे याच्या काही टिप्स असतील तर welcome

स्विस मध्ये ४ दिवसाचा ट्रेन पास घेता येईल - Thanks हे लक्षात नव्हते आले

पॅरीस -- Louvre हे जगप्रसिद्ध म्यूझीयम बघाच. याला एक पूर्ण दिवस लागेल.

"शातो द व्हर्साय"( व्हर्सायचा राजवाडा) -- अर्धा दिवस, पॅरिस शहराच्या थोडेसे बाहेर आहे.

आयफेल टॉवर - दुपारी उशीरा जा व संध्याकाळपर्यंत थांबा म्हणजे लाइटींग बघता येईल.

सेन नदीवरची दोन तासांची क्रूझ घ्या.

नॉथ्र दामचं चर्च बघा.

Place de la Concord आणि Arc de Triomphe या दोन मॉन्यूमेंटना जोडणारी बुलेवार्ड म्हणजेच शाँज-एलिझे. या रस्त्यावर संध्याकाळी जेवा/कॉफी प्या (दोन्ही तिथे खूप महाग पडते) किंवा नुसते हिंडा.

शिवाय असंख्य छोटी मोठी म्युझीयम्स आहेत. वेळ असेल त्याप्रमाणे पहा. पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला व सोयीचा अहे.

टिटलिस ओवर हाईप्ड आहे. खुप गर्दी असते. माउंट पिलाटस चांगला वाटला त्या पेक्षा.

मृणाल, गेल्या गेल्या आधी ट्रेन/रेल पासची चौकशी करा! ट्रेन बरोबरच सगळ्याच टुरिस्ट डेस्टिनेशनवर खुप पैसे वाचतात. आजिबात विसरु नका! लुसर्नला जात असाल तर तिथल्याच टिकिट ऑफिस मध्ये चौकशी करा.

शुगोल नी पॅरीस चे चांगली माहिती दिली आहे. आम्ही हाच प्लॅन कला होता फक्त "शातो द व्हर्साय"( व्हर्सायचा राजवाडा) सोडुन डिसनी केले होते.

स्विस मध्यी आम्ही ४ दिवसात त्यात बर्न आणि थुन लेक टुर पण केली होती (कुलु नी ह्याचे बरेच फोटो टाकले आहेत. ). Rhine Falls ला गेलो न्हवतो. पण आम्ही रोज १४ तास फिरायचो. टिट्लिस आणि Jungfraujoch सकाळी लवकर गेल्यास गर्दी नसते. बाकी ठिकाणि कधीही गेल्यास problem नाही.

आम्ही फक्त टीटलीस केलं होतं कारण तिकडं आणि युंगफ्राउ ला शेवटी बर्फाळ डोंगरच आहेत. युंगफ्राउ बरंच महाग आहे. इंटरलॅकनहून तुम्ही गिमेलवाल्ड, लॉटरब्रुनन, ट्रमेलबाख फॉल्स आणि ग्रिंडेलवाल्ड करू शकता.

आम्हाला ग्रिंडेलवाल्ड खूप आवडलं होतं. तिकडं गर्दी अजिबात नव्हती आणि वरती फिरायला खूप मजा आली. ग्रिंडेलवाल्ड फर्स्टवरून आम्ही ट्रॉट्टी बाइक्स (स्कूटर्स) वरून खाली आलो. तो मस्त अनुभव होता.

गिमेलवाल्डलाही वर डोंगरांवर भटकणं मस्त होतं. लुझर्न पण मस्त आहे. बोटीचा अनुभव घेण्यासाठी लुझर्नहून इंटरलॅकन ला जाताना आम्ही बर्नपासून बोट घेतली होती. स्वीस पास मधे बोटीचं तिकीटपण इन्क्लुडेड असतं.

शुगोलनं पॅरीसबद्दल सांगितलंच आहे. व्हर्सायचा पॅलेस बघाच. शिवाय पॅरीसमधले सॅक्रे कोअर (Sacre Coeur) नक्की बघा. आम्ही पॅरीसमधे ४ दिवस होतो. स्वीस ४ दिवस आणि पॅरीस ४ दिवस केलात तर दोन्ही बरंच कव्हर होइल.

पॅरिसमधे

लूव्ह्र ची २-३ तासाची गाइडेड टूर असते ती नक्की घ्यावी. अजून वेळ असेल तर त्या गाईडलाच विचारुन मस्ट सी काय आहे ते पहावे .

म्यूझी दॉर्से २-३ तासात धावती व्हिझीट होऊ शकेल . रॉदँ, देगा यांच्या शिल्पाकृती मस्ट सी.. कुठल्या तरी मजल्यावर एका कोपर्‍यात ( एकुलती ) एक अमेरिकन इम्प्रेशनिस्ट पण आहे - . आमचं स्पेशल पेन्सिल्व्हेनिया कनेकशन असल्यामुळे ते पण मस्ट सी .

रोदँ म्यु़झीयम - ३-४ तास लागतील. आतून , बाहेरुन अतिशय सुंदर वास्तू / बाग.

पिकासो अन साल्वादोर दाली म्यूझीयम ( इथे ज्येनांना भोवळ आली होती)

आयफेल टावरच्या आवारात पिकनिक डिनर - कुठल्याही Charcuterie मधून ब्रेड्स, स्प्रड्ड्स, कोल्ड कट्स इत्या दी घ्या. बॉटल ऑफ वाइन , एखादे ब्लँकेट आंथरायला , दिवेलागणीच्या वेळी गेलात तर टावर वरचे दिवे चालू होताना ४-५ मिनिटांचा मस्त शो असतो ...

http://www.sacre-coeur-montmartre.com/english/ इथे वरती जायला एक ट्रॅम / एलेव्हेटर टाइप आहे. त्यातून शहराचा मस्त व्ह्यू आहे.
तिथून चालत खाली यायच्या रस्त्यावर अनेक स्ट्रीट आर्टिस्ट्स आहेत. तिथे क्रेप्स नक्की खा .

लक्झेमबुर्ग गार्डन्स - मध्यावर एक छोटं तळं आहे. बारक्या बोटी भाड्याने घेउन रेसिंग करा.

वर रश्मी यांनी जो दुवा दिलाय त्याचा हा अंतिम भाग.
http://www.misalpav.com/node/29371
मधुरा देशपांडे मीच. Happy

Grindelwald देखील सुंदर आहे. याच भागातील Shilthorn, बिर्ग जेथुन आयगर, युंगफ्राऊ आणि म्योंश ही शिखरे दिसतात ते देखील करु शकता. बर्फात खेळणे वगैरे नाही पण त्यामानाने कमी गर्दी आणि युंगफ्राऊपेक्षा बरेच स्वस्त.

आलेच हे ग्लेशियर देखील फार सुरेख आहे. (भाग ७) परंतु तुमचा मुक्काम झुरिचच्या जवळ असेल तर कदाचित लांब पडेल. या भागातील ट्रेन किंवा बसची माहिती काढली तर अंदाज येईल.

निसर्ग बघायला , अनुभवायला जास्त आवडतो असे म्हणालात तर तुमच्या प्लॅन मध्ये बसेल तेव्हा अगदी अर्धा दिवस का असेना, जवळपासचा एखादा छोटा ट्रेल करु शकता.
आम्ही शिल्थोर्नहुन येताना गावागावातुन भटकत खाली उतरलो होतो. आयगर जवळ देखील दिवसभराचा ट्रेक केला होता. टुरिस्ट लोकांची गर्दी अजिबात नसते आणि निवांत निसर्ग अनुभवता येतो. वर ट्रॉटी बाईकचा उल्लेख आला आहे तो जमल्यास अवश्य करा.
या वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल.
http://www.myswitzerland.com/
http://www.myswissalps.com/hiking

एकुण ४ दिवस बघता Rheinfalls मस्ट नाही, टाळले तरी चालेल. खास वेगळी वाट काढुन जाण्यासारखे नाही.

राहण्यासाठी जास्त दिवस असतील तर अपार्ट्मेंट्स बर्‍या पडतात. पण ४ दिवस असतील तर हॉटेल्सही साधारण सेम रेंज मध्ये येतात. शाकाहारी असाल तरीही अडचण येणार नाही. बहुतेक ठिकाणी व्हेज मिळतं. खास म्हणुन चीज fondue ट्राय करु शकता.

स्वीत्झर्लंड
शक्य असेल त्या टप्प्यावर ही ट्रेन घेता आली तर पहा. ट्रेन जास्तीत जास्त खिडक्या आणि काचेचे छप्पर असलेली असते. अशीच एक ट्रेन (दुसर्‍या कंपनीची) इतरही मार्गावर आहे. किंवा तुमच्याच ट्रेनचे काही डबे खास सृष्टीसौंदर्य पाहण्यासाठी केले असतात त्याचे आरक्षण करता येते का ते पहा.
http://www.goldenpass.ch/en

पॅरीस
पूर्ण शाकाहारी माणसांसाठी पॅरीसमधे थोडी खाण्याची बोंब होऊ शकते, सकाळी भरपूर नाश्ता करून निघणे हे उत्तम. क्रायसॉ आणि चहा सगळीकडे मिळतो त्यामुळे थोडे सोपे होऊ शकते. जवळ भारतीय खाण्याचे सापडले तर फारच उत्तम. मी जगात इतरत्र खाल्लेले फ्रेंच भोजन आवडले होते पण नेमके पॅरीसमधल्या मुक्कामात कुठलेच आवडले नाही (काय एकेकाचे नशीब). कुठेही जेवण निवांतपणे येते, त्यामुळे पटकन खाऊन निघालो असे करणे अवघड असते. पण तो फ्रेंच संस्कृतीचा एक भाग आहे.
व्हर्सायला पूर्ण एक दिवस जाईल. पण माझ्या मते तरी ते बघायलाच पाहिजे या प्रकारात मोडते.

हे पण पहा

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/37122.html?1122907386
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/5000.html?1098790871
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/87337.html?1069614897
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/3820.html

सापळ्यांची भीती वाटत नसेल आणि वेळ असेल तर पॅरिस मध्ये catacombes पाहु शकता.
१ ते २ तास लाइन मध्ये उभे रहावे लागेल. विश्वास बसणार नाही पण लोक इथुन हाडे नेण्याचा प्रयत्न करतात म्हणुन बाहेर पडताना बॅगेची चेकिंग केली जाते.

शुगोल, अग्निपंख, अजय, मेधा, मनीष, साहिल,वैद्यबुवा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
मधुरा तुझे सर्व लेख वाचले होते . खूप मस्त फोटो & वर्णन.
स्वीत्झर्लंडला जाणे ही एक स्वप्नपूर्ती आहे माझ्यासाठी

मृणाल१,

>> स्विस मध्ये ४ दिवसाचा ट्रेन पास घेता येईल - Thanks हे लक्षात नव्हते आले

तुम्ही चार लोकं आहात. तेव्हा चार वेगळे पास घेतलेत तर महाग पडतील. जर चौघांचा एकंच ग्रुप पास घेतला तर आजून स्वस्त पडेल. जोडप्यांना स्वतंत्र फिरायचं असल्यास दोन X दोन असेही घेता येतील.

पॅरीसमध्ये ला बलाल नावाचे अप्रतिम देशी भोजनालय (रेस्तेराँ) आहे. पंजाबी मुस्लिम लोकांचं आहे. तिथला माणूस आपल्या देशी लोकांना बघून खुश होतो. निदान एक निवांत जेवण तिथे घ्याच. थोडं महाग आहे. (मी तिथे गेल्याला पाच वर्षं होऊन गेलीत.)

आ.न.,
-गा.पै.

ज्यांना या ठिकाणी जायचंय त्यांच्यासाठी हा बीबी व अमेरिका टूरचा बीबी खूपच उपयोगी होतील.

मधुरा, तुमचे लेख इथेही टाकणार कां?

@मृणाल १ - धन्यवाद.
@आऊटडोअर्स - अवश्य टाकेन. जसे जमेल तसे एकेक टाकते. धन्यवाद.

मस्त धागा. कधी जायचे ठरले तर खुप उपयोगी. अर्थात हे फक्त २-३च ठिकाणे आहेत पण बाकी ठिकाणांबद्दल काही लिहिले गेले असेल तर दुसर्‍या कोणत्यातरी धाग्यावर मिळेल का पहावे लागेल.

नाही. ह्यातिल बर्याच रुट वर साध्या गाड्या पण धावतात (ज्या स्विस रेल पास मध्ये covered असतात) आणि गाड्याना गर्दी नसल्याने फारसा फरक पडत नाही. साध्या गाड्याना पण मोठ्या काचा असल्याने view मध्ये फरक नसतो. फक्त जेवण स्टेशन वर pack करुन घ्यावे लागते.

पॅरिसला Montmartre ची वॉकिंग टूर घेतली होती आम्ही, ती आवडली होती. एखादी वॉकिंग टूर शक्य असेल तर घ्या.

आम्ही लुझर्न वरून इंटरलाकेन ला जे ट्रेन ने गेलो होतो ती नेहमीचीच गाडी होती बहुधा. ते गोल्डन पास वगैरे चेक केले होते पण फोरम्स वरच्या माहितीवरून वरती साहिल शहा यांनी लिहीले आहे तसेच वाचले. तो लुझर्न-इंटरलाकेन प्रवास जगातील सर्वात सुंदर प्रवासांपैकी असावा. आम्ही ऑगस्ट मधे केला होता पण समर असल्याने आताही तसेच असेल. आणि तो रेल्वेनेच करा.

खर्च हा कसा कराल त्यावर अवलम्बुन असतो. जर स्वता टुर केली आणि बजेट वर राहिले तर केसरी ( किंवा त्यासारख्या ) टुर कंपन्याच्या वेबसाईट च्या टुरच्या किंमतीच्या ७५-९०% पर्यन्त खर्च येतो, जेवढ बजेट वर राहाल तेवढा खर्च कमी.

मृणाल १,
पॅरीस मध्ये Parisapartment.com वर स्वस्तात घर मिळु शकते. उत्तम सुविधा असतात. किचन असते. पण घेण्यापुर्वी check-in & check-out च्या वेळा आणि अटी बघुन घेणे. आम्हाला खुप चांगला अनुभव आला होता.

प्राजक्ता - आम्ही चार दिवस होतो तेथे. तीन रात्री लुझर्न ला व एक रात्र वेंगेन ला (इंटरलाकेन जवळ). दोन्ही कडे हॉटेल्स प्रचंड महाग होती, पण चांगली होती ($३००). युरोप मधली हॉटेल्स शोधताना मोठे व मुले दोन्हींची संख्या टाकूनच एकदम शोधावीत म्हणजे (अमेरिकेत प्रत्येक वेळेस आवर्जून तसे करावे लागलेले नाही, कारण सहसा हॉटेल्स मोठ्या रूम्स असलेली असतात). नाहीतर सर्च मधे येतात ती फक्त दोन अ‍ॅडल्ट्स पुरतीच असतात.

हॉटेल चा खर्च, जेवणाचा खर्च साधारण ४०-५० युरोज एका वेळेस, साध्या रेस्टॉ मधे व स्विस रेल चा चार दिवसांचा फॅमिली पास (किंवा दोन अ‍ॅडल्ट साठी घेतले तर दोन मुले त्यातच असे काहीतरी होते) हे मुख्य खर्च. बाकी इतर आपण जे काही विकत घेउ ते. आम्ही ३ वर्षांपूर्वी गेलो होतो, पण भारतातून अमेरिकेत येताना मधे चार दिवस स्टॉप ओव्हर केला होता, त्यामुळे त्या तिकीटाचा वेगळा खर्च नव्हता. अजून काही माहिती हवी असेल तर जरा जुन्या मेल्स वगैरे चाळून देउ शकेन.

फारएण्ड नी बर्यापैकी माहिती दिली आहे. जर घर भाड्याने घेतले तर $१००-१५० मध्ये होउ शकते आणि जेवण घरी बनवल्यास जेवणाचा खर्च दिवसाला $१५-२० युरो मध्ये होउ शकतो. तुम्हाला युरोप मधील कुठे जायचे आहे ते जर सांगितले तर त्यानुसार त्या भागातिल घरासाठीची वेबसाईट जुना डेटा काढुन सांगिन. २०११ मध्ये आम्ही (दोन लहान मुला सकट) ९ देशाची १ महिना टुर केली होती आणि बर्याच ठिकाणी घर भाड्याने घेतले होते आणि आम्हाला चांगला अनुभव आला होता.

२०११ मध्ये आम्ही (दोन लहान मुला सकट) ९ देशाची १ महिना टुर केली होती >>> सही! Happy आवडेल वाचायला त्याबद्दल.

आम्ही कोठेही गेलो तरी साधारण ५-६व्या दिवसापासून होमसिकनेस यायला सुरूवात होते Happy

Pages