जन्म सरतो नवा मिळत जातो

Submitted by वैवकु रीटर्न्स on 4 May, 2015 - 10:05

जन्म सरतो नवा मिळत जातो
मी चुका त्याच त्या करत जातो

एक रस्ता जिथून येतो हा
त्या ठिकाणीच तर परत जातो

तीच ती बात छेडते दुनिया
तोच काटा उरी सलत जातो

एक अंधुक छटा हवा घेते
भूतकाळात मी बुडत जातो

ह्या नदीची प्रथा प्रवाहाची
आणि मी थेंब साचवत जातो

हे मनाचे तळे भरत नाही
मी तुझा मोह वाढवत जातो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर
आपले असे प्रतिसद येत गेले की मला अजून छान लिहायची प्रेरणा मिळत जाते
मध्यंतरी आपल्याला माझ्या काही रचना तितक्या आवडू शकल्या नाहीत म्हणून फार चिंतेत होतो मी

असो
असाच आशिर्वाद पाठीशी असू द्यावात ही एकमेव प्रार्थना

आपला नम्र
~ वैवकु

रचना छानच आहे.

जन्म सरतो नवा मिळत जातो
मी चुका त्याच त्या करत जातो
>>
हे अखिल भारतीय माबो डुआय मंडळाला समर्पित.

जन्म सरतो नवा मिळत जातो>>

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-न्यन्यानि संयाति नवानि देही ।।