Submitted by वैवकु रीटर्न्स on 4 May, 2015 - 10:05
जन्म सरतो नवा मिळत जातो
मी चुका त्याच त्या करत जातो
एक रस्ता जिथून येतो हा
त्या ठिकाणीच तर परत जातो
तीच ती बात छेडते दुनिया
तोच काटा उरी सलत जातो
एक अंधुक छटा हवा घेते
भूतकाळात मी बुडत जातो
ह्या नदीची प्रथा प्रवाहाची
आणि मी थेंब साचवत जातो
हे मनाचे तळे भरत नाही
मी तुझा मोह वाढवत जातो
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्कृष्ट गझल! क्या बात है!
उत्कृष्ट गझल! क्या बात है!
धन्यवाद सर आपले असे प्रतिसद
धन्यवाद सर
आपले असे प्रतिसद येत गेले की मला अजून छान लिहायची प्रेरणा मिळत जाते
मध्यंतरी आपल्याला माझ्या काही रचना तितक्या आवडू शकल्या नाहीत म्हणून फार चिंतेत होतो मी
असो
असाच आशिर्वाद पाठीशी असू द्यावात ही एकमेव प्रार्थना
आपला नम्र
~ वैवकु
रचना छानच आहे. जन्म सरतो नवा
रचना छानच आहे.
जन्म सरतो नवा मिळत जातो
मी चुका त्याच त्या करत जातो
>>
हे अखिल भारतीय माबो डुआय मंडळाला समर्पित.
माबो डुआय मंडळाला समर्पित.
माबो डुआय मंडळाला समर्पित.
व्वा व्वा. पूर्ण गझल आवडली.
व्वा व्वा. पूर्ण गझल आवडली.
सुंदर गझल दुसरा किंचित
सुंदर गझल
दुसरा किंचित predictable वाटला
बाकी सर्व शेर मस्तच!!!
सुन्दर गझल .
सुन्दर गझल .
सूंदर आहे गज़ल.अतिशय आवडली.
सूंदर आहे गज़ल.अतिशय आवडली.
जन्म सरतो नवा मिळत
जन्म सरतो नवा मिळत जातो>>
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-न्यन्यानि संयाति नवानि देही ।।
आवडली.. जन्म सरत नाही, जीवन
आवडली..
जन्म सरत नाही,
जीवन सरत जाते,
संपते.
झकास ..
झकास ..
व्वाह.. व्वाह.. बेस्ट
व्वाह.. व्वाह.. बेस्ट
अत्यंत परिणामकारक शब्द आणि
अत्यंत परिणामकारक शब्द आणि समयोचित सुद्धा ! शुभेच्छा
वाह ! सर्व शेर आवडले. मस्तच
वाह ! सर्व शेर आवडले. मस्तच गझल ...
सर्वांचे अंत:करणपूर्वक आभार
सर्वांचे अंत:करणपूर्वक आभार
सुर्रेखच .....
सुर्रेखच .....