असा मस्त कुरकुरीत डोसा, आतमधे भरलेली बटाट्याची भाजी, सोबत खोबर्याची चटणी आणि वाटीत सांबारही.
एक प्लेट मसाला डोसा मागितला तर असा मस्त सरंजाम समोर येतो..
पण ते भारतात महाराजा. इथे अंगोलात कोण देणार मला आयता डोसा ? आले दिनेशच्या मना... असे म्हणूनही
लगेच डोसा होत नाही. इये अंगोला नामे देशी, भारतीय वस्तू मिळण्याचे एकच दुकान आहे. तिथेही जायला
मला सवड होत नाही. माझी भिस्त असते भारतातून जे सामान आणतो त्यावरच.
पण त्यात तरी काय काय आणणार ?
तर हा डोसा कसा जम(व)ला त्याची सुरस कथा..
१) खुद्द डोसा.
डोसा करण्यासाठी बासमती तांदूळ ( आरतीच्या मते याचे डोसे करू नयेत... पण इथे मिळणारे बाकीचे तांदूळ
.. असो ) १ कप, त्यात १ टेबलस्पून उदीद डाळ ( जपून वापरायची भाऊ, यापेक्षा जास्त घालून चालत नाही ) १ टेबलस्पून साबुदाणा आणि १ टिस्पून मेथी असे भिजत घातले. झोपायच्या आधी आठवणीने ते वाटून ठेवले.
एरवी असे वाटण सकाळी नीट आंबलेले असते. पण त्या दिवशी सूर्य स्विच ऑफ केल्यासारखी थंडी पडली.
तशी इथे आता थंडी पडणारच होती, पण ती हळू हळू पडते. अशी एकदम नाही. बहुतेक इथल्या समुद्रात शीत
प्रवाह आला असावा. तर तात्पर्य असे कि पिठ आले नाही. मग मी त्यात ब्रेड मेकिंग मशीन साठी लागते ती इंस्टंट यीस्ट टाकली. ती मात्र नावाला जागली आणि अर्ध्या तासातच पिठ मस्त फुगून आले. मग डोसे बनवायला काय ?
२) बटाट्याची भाजी
अंगोलाच्या पूर्व भागात बटाटे होतात. ( सफरचंदेही होतात ) पण त्यांच्या सिझन असला कि दुकानात दुसरे बटाटे
नसतात. हे बटाटे नेहमीच चांगले निघतात असे नाही. म्हणून मी पोटॅटो फ्लेक्स नेहमी घरी ठेवतो.
या भाजीसाठी पण तेच वापरले.
तेलाची हिग मोहरीची फोडणी करून त्यात हळद व मिरच्या परतल्या. मग कांदा परतला. त्यात पाणी ओतले आणि त्याला छान उकळी आल्यावर त्यात पोटॅटो फ्लेक्स टाकल्या. फोडणीत उडदाची डाळ टाकायची राहिली होती, म्हणून हाताशी नेहमी असणारे शेंगदाणेच टाकले. झाली भाजी तयार.
३) सांबार
सांबार मसाला मी नेहमी रुचिरातील प्रमाणानुसार घरून करून आणतो. तो संपला होता. इथेही केला असता पण कढीपत्ता मिळत नाही इथे.
मग कूकरमधे त्याचे घटक म्हणजे धणेजिरे पूड, मिरपुड, हिंग, तिखट असे किंचीत भाजून घेतले. तुरीची डाळही
भारतातूनच आणली आहे. ती पण जरा शेकून घेतली. मग त्यात पाणी ओतले व चिंचेचा कोळ, हळद टाकले.
घरात ज्या भाज्या होत्या ( ब्रोकोली, गाजर, मश्रुम ) त्या सांबारात घालण्याजोग्या नव्हत्या. सुट्टी होती म्हणून
घराजवळचे दुकानही उघडले नव्हते. तसेही तिथे टोमॅटॉ शिवाय दुसरी भाजी मिळालीच नसती. मग त्या सांबारात
फक्त कांदा घातला. आणि शिजवून घेतले. वरुन फोडणी दिली.. बर्यापैकी चव जमली.
४) चटणी
एवढ्याश्या चटणीसाठी पण उद्योग करावा लागला बरं का ? इथून समुद्रकिनारा जवळ असला तरी नारळाची अजिबात लागाव्ड नाही. बाजारात कधी असले तर ते वट्ट साडेसातशे रुपये किलो दराने लावलेले असतात.
आणि तेही खराब निघायची १०५ टक्के खात्री. नारळाचा किस मात्र मिळतो. तो छान स्वादाचा असतो.
तोच कोमट पाण्यात भिजत घातला. त्यात थोडे टिनमधले कोकोनट क्रीम घातले. तव्यावर परतून चण्याची डाळ व मिरच्या घातल्या. आणि वाटले. चटणी पण जमली.
सबस्टीट्यूट डोसा फ्रॉम दिनेश शेट्टी ऑफ अंगोला
बाप्रे! खरच कमाल आहे.
बाप्रे! खरच कमाल आहे. कोन्ड्यातुन मान्डे करावे तशा तुमच्या एकेक कृती असतात, आणी तुम्ही वापरता ते पर्याय पण लय भारी. खूप छान दिसतोय डोसा आणी साम्बार पण चटकदार आहे. चटणीची आयडीया मस्त!
मस्तच! काय उत्साह आहे
मस्तच! काय उत्साह आहे तुम्हाला. एकट्याकरताही सगळं साग्रसंगीत सजवलेलं दोश्याचं ताट + गोडात मांडे
छानच!
कमाल आहे आपल्या इच्छाशक्तीची
कमाल आहे आपल्या इच्छाशक्तीची आणि कल्पकतेची.
मस्त जमलाय.
खोबर्याकरता आच्यारीलोक जो
खोबर्याकरता आच्यारीलोक जो प्रयोग करतात तो तुम्हाला नक्की जमेल. सरळ खोबरा डोल आणायचा. वेळ नसेल तर डायरे़क्ट कुकरला उकडायचा; अगदी खोबर्यासारखी नाही पण ऑल्मोस्ट 'ती' चव येते.
नाहीतर थोडा भिजवून ठेवून मग वाटायचा; सेम इफेक्ट.
सुक्या खोबर्याच्या वाट्या टिकतातही बरेच महिने.
खासच!! छान जमलाय
खासच!!
छान जमलाय डोसा.
सबस्टीट्यूट डोसा फ्रॉम दिनेश शेट्टी ऑफ अंगोला
<<
<<
तुम्ही 'शेट्टी' असुन मराठी छान जमते तुम्हाला.
दिनेशदा, एकच
दिनेशदा, एकच वाक्य................... तुस्सी ग्रेट हो!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मांडे म्हणू नका, डोसा म्हणू
मांडे म्हणू नका, डोसा म्हणू नका, अफगाणिस्तान म्हणू नका, कोरिया म्हणू नका.. काहीच सोडत नाही तुम्ही !
_/\_ एवढंच करु शकतो मी
धन्य तो डोसा आणि धन्य ते
धन्य तो डोसा आणि धन्य ते दिनेश!
धन्य रे
धन्य रे देवा..................... अजुन काय काय पाहावे लागणार???
किती ती धडपड करावी लागते. इथे सगळे असुनही मला करायचा कंटाळा....
बाजारात कधी असले तर ते वट्ट साडेसातशे रुपये किलो दराने लावलेले असतात.
आणि तेही खराब निघायची १०५ टक्के खात्री.
कोकणी माणसांसमोर बोलु नका हो असले काही. हार्ट अॅटॅकने मरतील. (पण एक्ष्पोर्टचा धंदा टाकावा हा विचार मात्र करणार नाही
)
मला एकतर डोसे जाम
मला एकतर डोसे जाम आवडतात.
त्यात ते बघुन च खावेसे वाततात
आणि त्यात इतके अप्रतिम दिसत आहेत की मला आत्ताच्या आत्ता हेच किंवा असलेच डोसे हवेत
भ्याआआआआआआआआआआआ


भारी.. आपली स्वयंपाकाची आवड
भारी..
आपली स्वयंपाकाची आवड पुरुषांसाठी आदर्श आहे आणि त्यासाठी जमेल ती खटपट करायची वृत्ती बायकांसाठी
ग्रेट्ट!
ग्रेट्ट!
प्रयत्नांती डोसा! मस्त.
प्रयत्नांती डोसा! मस्त.
दिनेशदांच्या हौसेला आणि
दिनेशदांच्या हौसेला आणि चिकाटीला _/\_ हुबेहुब डोसा!
स्वैपाकघरातले माझे घोषवाक्य -
नसेल साहित्य तर खाऊ नको पण धोपटमार्ग सोडू नको:)
कारण प्रयोग करून फसलेले पदार्थ सुधारण्यासाठी आणि ते घरात खपवण्यासाठी जास्त संशोधन आणि श्रम करावे लागतात!
खूप सुरेख दिसत आहेत. तुमच्या
खूप सुरेख दिसत आहेत.
तुमच्या प्रयोगशीलतेला सलाम दिनेशदा!
तुमच्या हातचं काहि खायला
तुमच्या हातचं काहि खायला मिलेल का कधी असा विचार करतोय.
मिळणार असेल तरच तुमच्या पाकृ ना छान छान म्हणणार.
मस्त दिसताहेत .. २
मस्त दिसताहेत ..

२ दिवसांपूर्वीच केले डोसे आणि इडली .. आठवली परत
बाकी तुम्ही ग्रेट आहात _/\_
मा बो. च्या वतीने, मा. रा.
मा बो. च्या वतीने, मा. रा. रा. दिनेश दा ह्यांना "मास्टर शेफ ऑफ दी युनीवर्स" असा पुरस्कार देण्यात यावा अशी आम्ही सर्व खादाड मंडळी मा.बो. प्रशासनाला विनंती करित आहोत.
_________/\____________
-प्रसन्न हरणखेडकर
अध्यक्ष, अखिल मा. बो. खादाड मंडळ
इतके छान डोसे सगळ साहित्य
इतके छान डोसे सगळ साहित्य व्यवस्थित असतानाही जमणार नाही.
__________/\__________ इतकचं
__________/\__________ इतकचं करु शकते !!!
दिनेशदा, तुम्हाला अन्नसिद्धी
दिनेशदा,
तुम्हाला अन्नसिद्धी प्राप्त झालेली आहे बहुतेक. उद्या तुम्ही लाकडापासून पक्वान्नंसुद्धा बनवून दाखवाल!
आ.न.,
-गा.पै.
मस्त!
मस्त!
धन्यवाद...खुप छान वाटलं
धन्यवाद...खुप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून.
पाककलेत सरावाचा भाग महत्वाचा आहे. माझीही पहिली काही वर्षे उमेदवारीतच गेली.. पण आता सहसा कुठला पदार्थ चॅलेंज वाटत नाही. फक्त जास्त साखर असेल, तळणे असेल तर ते पदार्थ मी टाळतो.
गल्फमधे घटक पदार्थ मिळवायचा प्रश्नच नव्हता. केनया आणि नायजेरियातही नव्हता. इथे अंगोलात ते आव्हान आहे. पण तेही मी एंजॉय करतो.
सरावानंतर आवडही महत्वाची.. या सगळ्या घटकांचे रंग रुप.. त्यातून आकार घेणार्या पदार्थाचे रंग रुप.. याचे मला खुप आकर्षण वाटते. स्वतःशीच स्पर्धा असते. मागच्यापेक्षा यावेळी तो चांगला जमला पाहिजे, असा प्रयत्न असतो.
आणि प्रत्यक्ष न चाखताही, इथे ज्या कौतूकाच्या प्रतिक्रिया येतात.. त्या तर अगदी महत्वाची प्रेरणा ठरतात.
दिनेशदा, एकदम भारी फोटो आहे.
दिनेशदा, एकदम भारी फोटो आहे. तों.पा.सु.
तुम्ही ग्रेट आहात _/\_
तुम्ही ग्रेट आहात _/\_ .
मस्त.
तुमचं भारिये राव, तुम्हाला
तुमचं भारिये राव, तुम्हाला कस्लाच कंटाळा येत नाही...
कधी कधी तर मला खाण्याचा ही कंटाळा येतो....( म्हणजे चावण्याचा) ....
<<मांडे म्हणू नका, डोसा म्हणू
<<मांडे म्हणू नका, डोसा म्हणू नका, अफगाणिस्तान म्हणू नका, कोरिया म्हणू नका.. काहीच सोडत नाही तुम्ही !>> +१००००००००००००००००
खरंच .. इच्छाशक्तीच दुसरे काय
खरंच .. इच्छाशक्तीच दुसरे काय !
रीया सेम हिअर . मला पण अस्साच
रीया सेम हिअर . मला पण अस्साच डोसा आत्ताच्या आत्ता पाहिजे . डोसा लैच आवडतो मला
मस्तच दिनेशदा ...सलाम
मस्तच दिनेशदा ...सलाम तुम्हाला -----------------------^---------------
Pages