Submitted by बेफ़िकीर on 29 April, 2015 - 13:01
बरसण्याची ठराविक वेळ असते
इथे आभाळ केव्हाही बरसते
कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते
कुणाचाही न जे करतात हेवा
अश्या लोकांमुळे हे जग धुमसते
अशी जागा मला का सापडेना
जिथे कोणीतरी नुसतेच बसते
हवी ती संस्कृती अभ्यासुनी बघ
निसर्गाचे तुला वरदान डसते
इथे होणार नव्हती विहिर बहुधा
तरी कोणीतरी पाणी उपसते
मनाला कायदे नसतात काही
कुणाचे 'बेफिकिर' कोणात वसते
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम .. >>> कदाचित हे
अप्रतिम ..
>>>
कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते
कुणाचाही न जे करतात हेवा
अश्या लोकांमुळे हे जग धुमसते
<<<
हे दोन , क्लासिक !
धन्यवाद प्रकु
धन्यवाद प्रकु
मस्त! आवडली.
मस्त! आवडली.
कदाचित हे तुला पटणार
कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते
अशी जागा मला का सापडेना
जिथे कोणीतरी नुसतेच बसते
क्या ब्बात!
कदाचित हे तुला पटणार नाही
कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते
कुणाचाही न जे करतात हेवा
अश्या लोकांमुळे हे जग धुमसते
व्वावा
सर्वच शेर सुंदर इंद्रजीतशी
सर्वच शेर सुंदर
इंद्रजीतशी सहमत
आवडली. अवांतरः गझलेचं नाव मी
आवडली.
अवांतरः गझलेचं नाव मी चुकून "बसण्याची ठराविक वेळ असते" असं वाचलं आधी
अशी जागा मला का सापडेना जिथे
अशी जागा मला का सापडेना
जिथे कोणीतरी नुसतेच बसते
अप्रतिम. मक्ताही आवडला. अभ्यासुनी हा शब्द खटकला.
कदाचित हे तुला पटणार
कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते
े
अशी जागा मला का सापडेना
जिथे कोणीतरी नुसतेच बसते
वाव्वा !
छान! आता शीर्षकाच्या पहिल्या
छान! आता शीर्षकाच्या पहिल्या शब्दातील र हे अक्षर काढून बनणार्या नव्या शीर्षकांतर्गत एक खुसखुशीत विडंबन होऊन जाऊ द्या.
@चेतन सर, हे बघा
@चेतन सर, हे बघा http://www.maayboli.com/node/53765
फालतु
फालतु
छान जमलंय.
छान जमलंय.
गझलेचं नाव मी चुकून "बसण्याची
गझलेचं नाव मी चुकून "बसण्याची ठराविक वेळ असते" असं वाचलं आधी>>>> मी पण
>>> ब(र) सण्याची ठराविक वेळ
>>> ब(र) सण्याची ठराविक वेळ असते
सहमत आहे. मुडबिड असावा लागतो.
बाकी, रचना कुंथुन आल्यासारखी वाटली.
मजा नै आली, काही तरी चांगलं लिहा.
-दिलीप बिरुटे
सर्वांचा आभारी आहे.
सर्वांचा आभारी आहे.
झकास एकदम!
झकास एकदम!
वा वा !!
वा वा !!
अशी जागा मला का सापडेना जिथे
अशी जागा मला का सापडेना
जिथे कोणीतरी नुसतेच बसते>>>
खरंच आहे !!
व्वा!
गजलेती प्रत्येक शेर मस्त,अप्रतिम !