कैवल्य कैवल्य फ्यान क्लब .. (बदाम बदाम बदाम)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 April, 2015 - 14:25

जर आदित्य देसाई नामक मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....

तर आजघडीचा मराठी मालिकासृष्टीचा आमीर खान, चॉकलेट बॉय, दिल दोस्ती दुनियादारी फेम कैवल्य (उर्फ जे काही त्याचे रीअल लाईफ नाव असेल, नावात काय आहे, आम्ही त्याला कैवल्य म्हणूनच ओळखतो) त्याचा फ्यान क्लब तर हक्काने बनलाच पाहिजे. Happy

दिल दोस्ती दुनियादारी या तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या मालिकेला नेमका कितपत टीआरपी मिळतोय याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, पण जो काही मिळत असेल त्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो छावा म्हणजे कैवल्य कैवल्य !

मालिकेच्या पोताला साजेशी त्याची बेफिकीर स्टाईल,
बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक, (असे डोळे आणखी एका मराठी अभिनेत्रीचे आहेत, पण तिचे नाव इथे नको)
आणि फायनली त्याची सुपर्ब टायमिंग संवादफेक, हा तर मालिकेचा यूएसपी ठरावा.
तर, अल्पावधीतच आपला कैवल्य लक्षवेधक आणि दिलखेचक ठरला यात रत्तीभरही नवल नसावे.

या चार शब्दांसह मी माझ्या कैवल्यपुराणाला ब्रेक देतो आणि इतर कैवल्यप्रेमींना इथे आमंत्रित करतो Happy

kaiv 2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ चे आम्ही गोन्डस रॅगिन्ग करतो.:फिदी::दिवा:

डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया'
खुशीका पयाम कही, कही दर्दनाक लाया....

सस्मित गाणे सहज लिहीले, आमचा किशोर कुमार आहे ना.:स्मित:

आणी तसेही ऋन्मेषचे धागे टपाल पेटी भरल्यासारखे असतात.:फिदी:

अप्पा आणि काका, अहो वाचुन आणि प्रतिसाद देउन आनंद घेताय. शिवाय तुमचा वेळ ही सरतोय (टाइमपास होतोय ह्याअर्थी) मग तरीही धाग्याला का दुषणं देता ओ?

रश्मी, आमचा किशोर, रफी, मुकेश, सानु, सोनु, अभिजीत, आतिफ, नुसरत, अल्ताफ, दलेर, मिका, मोहित, अर्जित आणि हो हनी पण आहेत. अजुन कुणीतरी नक्कीच राहीले असतील लिहायचे.

अमेयचे डोळे घुबडाच्या डोळ्यान्सारखे नाहीत, थोडेशे चन्द्रचुड सिन्गसारखे आहेत.
>>>

प्लस सेव्हन एटी सिक्स.. Happy

एवढ्या अवांतर पोस्ट नेटाने वाचत आलो त्यात हे सापडले..

कोणीतरी त्या अमेय वाघ ला सांगा रे कि मायबोली नावाच्या साईट वर त्याचा फॅनक्लब सुरु झालाय आणि त्याच्या डोळ्यांवर रसभरीत चर्चा चालु आहे!!
त्याचे डोळे अजून मोठे होतील आश्चर्याने Happy

काही लोकांची बोटे हिरवी असतात म्हणतात. त्यांनी लावलेले रोप हमखास जोम धरून वाढते. ऋन्मेषच्या बोटातही जादू आहे. त्याने "आठव्या पंचवार्षिक योजनेतील संकरीत ज्वारीचे स्थान" असा धागा काढला तरी तो शंभरी गाठेल.

मै इन मालिकाओं के वाटे में भी नै ज्जाता!
ल्येकिन फोटू देख क्ये भी """"बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक,"""" आपकी ये बात हजम नहीं हुई|

Are tumhi lok amey ch kam na baghata tyachya disanyawar ka comment karatay?
Disayala to khas nahich ahe pan acting jabarat ahe tyachi.
Aajchya bhagat reshmachi actingkasali sahi keli tyane Lol

रीया ,
कोणालाही पहिल्यांदा बघ्तो तेव्हा नजर नजरेकडेच जाते आणी तिथे जर असे मोठ्ठाल्ले डोळे दिसले तर.....

त्या आदित्यच्या फॅनक्लब वाल्या धाग्यासारखं..

या कैवल्यच्या उजव्या गालावर खळी पडते.
त्याच्या उजव्या भुवईच्या वर एक तीळ आहे.
त्याच्या नाकावर मध्यभागी पण जssरा उजवीकडे एक तीळ आहे.
शिवाय त्याच्या चेहेर्‍यावर एक बारीकशी व्हाईट पिंपल आहे जी क्लोजअप मध्ये दिसुन येते.

आशुचँप | 1 May, 2015 - 00:27
हाहाहा इथली चर्चा ते लोक वाचत असावेत बहुदा..कारण आजच्या भागातच रेश्मा त्याला घुबड म्हणते... Happy

आशुचँप Rofl

<<ऋन्मेषच्या बोटातही जादू आहे. त्याने "आठव्या पंचवार्षिक योजनेतील संकरीत ज्वारीचे स्थान" असा धागा काढला तरी तो शंभरी गाठेल.>>> +१११११११११ Lol

हाहाहा इथली चर्चा ते लोक वाचत असावेत बहुदा..कारण आजच्या भागातच रेश्मा त्याला घुबड म्हणते... स्मित
>>>>
शक्यय मग Proud

ईतर कोणाची चर्चा नाही, पण सईने तिची चर्चा वाचत ऋन्मेषचा शोध घेत आली तर नशीब च उघडेल माझे Happy

आणि कैवल्य दिसायला काय वाईट आहे? ??
देखणे दिसण्यासाठी नाकीडोळी नीटस आणि आखीवरेखीव मापात असणे या आता जुनाट कल्पना झाल्या... स्मार्टनेस मॅटर्स !

आणि कैवल्य दिसायला काय वाईट आहे? ??
देखणे दिसण्यासाठी नाकीडोळी नीटस आणि आखीवरेखीव मापात असणे या आता जुनाट कल्पना झाल्या... स्मार्टनेस मॅटर्स ! >> +१११

Pages