कैवल्य कैवल्य फ्यान क्लब .. (बदाम बदाम बदाम)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 April, 2015 - 14:25

जर आदित्य देसाई नामक मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....

तर आजघडीचा मराठी मालिकासृष्टीचा आमीर खान, चॉकलेट बॉय, दिल दोस्ती दुनियादारी फेम कैवल्य (उर्फ जे काही त्याचे रीअल लाईफ नाव असेल, नावात काय आहे, आम्ही त्याला कैवल्य म्हणूनच ओळखतो) त्याचा फ्यान क्लब तर हक्काने बनलाच पाहिजे. Happy

दिल दोस्ती दुनियादारी या तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या मालिकेला नेमका कितपत टीआरपी मिळतोय याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, पण जो काही मिळत असेल त्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो छावा म्हणजे कैवल्य कैवल्य !

मालिकेच्या पोताला साजेशी त्याची बेफिकीर स्टाईल,
बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक, (असे डोळे आणखी एका मराठी अभिनेत्रीचे आहेत, पण तिचे नाव इथे नको)
आणि फायनली त्याची सुपर्ब टायमिंग संवादफेक, हा तर मालिकेचा यूएसपी ठरावा.
तर, अल्पावधीतच आपला कैवल्य लक्षवेधक आणि दिलखेचक ठरला यात रत्तीभरही नवल नसावे.

या चार शब्दांसह मी माझ्या कैवल्यपुराणाला ब्रेक देतो आणि इतर कैवल्यप्रेमींना इथे आमंत्रित करतो Happy

kaiv 2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Smita +1
Kaivalya ♥♥♥♥♥♥♥♥♥♥

Poonam +1

बरं हे शीर्षकात कैवल्य कैवल्य असं दोनदा का लिहिलय? आणि बदाम बदाम बदाम तीनदा??>>>>> खरे तर ऋन्मेषला, नारदमुनीन्सारखे चिपळ्या घेऊन नारायण नारायण सारखे कैवल्य कैवल्य म्हणायचे असेल.:खोखो:

बदाम बदाम बदाम तीनदा??>>>>> लेखाचं नाव 'एलिझाबेथ' मधल्या 'दगड दगड' च्या चालीत वाचा. फिट्ट बसेल Happy

ह्या मनुकक्षाला कुठल्याश्या सैपाक बनवाच्या सिरेलात बघिटलो.
हेच्या भोकरासारख्या डोल्यानी बाकी काय बी लक्शात नाय आलो.

हो इ टिव्हिवर संध्याकाळी वेगवेगळ्या घरात जाऊन सासु-सुनांचा स्वयंपाक स्पर्धेचा शो होता त्याचा अँकर होता अमेय वाघ. त्याचे बटबटीत डोळेच मला दिसतात पहीले.

A gapp basa g
Ka tyachya dolyanchya mage lagalay sagale

Smite, najar nako lagayala mhanun kale Lol

रिया काय करणार त्याच्या डोळ्यांकडेच नजर जाते. एकदा डोळे बंद केलेन की बघेन नीट (मीन्स झोपला असेल तेव्हा).

आत्ता मायबोलीवर "फ्यान क्लब" असा एक ग्रुपच काढा त्यात विविध मराठी उपग्रह वाहिनीवरचे नायकांचे / नायिकेंचे. हिंदी उपग्रह वाहिनीवरचे नायकांचे / नायिकेंचे... मराठी सिनेमातले नायकांचे / नायिकेंचेआणि हिंदी सिनेमातल्या नायकांचे / नायिकेंचे अशी वर्गवारी करा . त्यात आणखीन एक भर मायबोलीवरच्या पुरुष आयडीचे आणि स्त्री आयडीचे

त्या त्या फ्यान क्लबात शाहरुख खान / स्वप्नील जोशी / सोनाली सिन्हा / सई ताम्हणकर /आदित्य देसाई/ कैवल्य /मुक्ता बर्वे या सगळ्यांची भरती करून टाका बघू Happy

<,ऋन्मेऽऽष : तुमचा खरच कौतुक आहे.
मुख्य म्हणजे तुमचे २४ तास तुम्ही माबो ,, दिनक्रम आणि नोकरी / धंदा ... आणि गफ या सर्वामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे घालवता की तुम्हाला इथे पुरेसा वेळ मिळतो.

इच्छा असून देखील मला हे जमत नाही. तुमच्या>> +१००००००००

बरं हे शीर्षकात कैवल्य कैवल्य असं दोनदा का लिहिलय? आणि बदाम बदाम बदाम तीनदा??>>>>> खरे तर ऋन्मेषला, नारदमुनीन्सारखे चिपळ्या घेऊन नारायण नारायण सारखे कैवल्य कैवल्य म्हणायचे असेल.

>>>>>>>>

कर्रेक्ट रश्मी ..
फक्त नारायण नारायण च्या जागी विठ्ठल विठ्ठल डोक्यात होते..

बदाम बदाम बदाम .. माझी फेसबूक स्टाईल आहे ..
वाटल्यास याला बदाम रेटींगही म्हणू शकता.. कैवल्यला ३ .. शाहरूखला ५ हा बेंचमार्क आहे .. त्याच्यावर मी स्वतालाही देत नाही.. बाकी सईला साडे ४, स्वजोला ४ .. वगैरे वगैरे इतर उदाहरणे ..

<< वाटल्यास याला बदाम रेटींगही म्हणू शकता.. कैवल्यला ३ .. शाहरूखला ५ हा बेंचमार्क आहे .. त्याच्यावर मी स्वतालाही देत नाही.. बाकी सईला साडे ४, स्वजोला ४ .. वगैरे वगैरे इतर उदाहरणे .. >>

बदाम कडू पण असतात ठाऊक आहे का?

चेतनजी, तुम्ही बहुधा खायच्या बदामाबद्दल बोलत आहात. कदाचित तुम्ही प्रेम या संकल्पनेला फार सिरीअसली घेत नसावात जे बदाम उच्चारताच तुमच्या डोळ्यासमोर ते आले Happy

<< चेतनजी, तुम्ही बहुधा खायच्या बदामाबद्दल बोलत आहात. कदाचित तुम्ही प्रेम या संकल्पनेला फार सिरीअसली घेत नसावात जे बदाम उच्चारताच तुमच्या डोळ्यासमोर ते आले >>

असेल, असेल. कदाचित तुम्ही म्हणता तसेही असेल कारण माझा जन्म कराची, पाकिस्तान येथे झालेला नाहीये.

अले बाबा , फाल लाग आलेला दिशतोय काही मंडलींना, दिवे घ्या दिवे

असो , तुम्ही तुमचा फॅन क्लब चालवा, तुम्ही काय पहावे किंवा काय आवडून घ्यावे याबाबत मला सांगण्याचाही मला काहीच अधिकार नाही ,हे खरेच आहे पण वर "आपून बोल्लो कि ह्ये माझं पर्सनल मत हाये".

माझ्या मते (फक्त माझ्याच मते) असे डेली सोप पाहणारे पुरुष थोड्याशा बायकी स्वभावचे किंवा बायकांद्वारे जास्त डॉमीनन्ट झालेले असतात , धागाकर्त्याचा धागा काढण्याचा हेतू दूसरा आहे त्यामुळे या धाग्यावरुन कायमचा अलविदा.

तरीही धागा वृद्धीसाठी शुभेच्छा ..

अप्पाकाका.:राग::अरेरे::फिदी: काय हा चावट्टपणा म्हणते मी. तो घुबडाचा फोटो काढा बघु तिथुन आधी. शुभ असो वा अशुभ, नक्कोच ते घुबडुल.

अमेयचे डोळे घुबडाच्या डोळ्यान्सारखे नाहीत, थोडेशे चन्द्रचुड सिन्गसारखे आहेत.

शुभ असो वा अशुभ, नक्कोच ते घुबडुल.
>>
असं काही नसतं गं रश्मी Happy

आप्पाकाका, तुमचा पण प्रतिसाद विखारयुक्तच आहे.
माझ्या मनाला लागली तुमची तुलना Proud

ए अरे काहीही काय लिहिता. कैवल्य आवडत नाही इथवर ठीके. पण ऋ बद्दल काही मंडळी मुद्दाम कैच्याकै लिहितात. काय पण उगीचच.

Pages