होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...

Submitted by vishal maske on 22 April, 2015 - 10:05

मी शेतकरीच बोलतो आहे,...

तुम्हा सर्वांना आपुलकीनं सांगतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||धृ||
आजवर खुप भोगलं आहे
अजुनही खुप भोगतो आहे
जीवनावरती कर्ज काढून
जीवन आज जगतो आहे
आजही जगण्यासाठी धडपडतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||१||
दूष्काळानं होरपळलं आहे
अवकाळही छळतो आहे
आता निसर्गही आमच्या
जगण्याशीच खेळतो आहे
तरीही जगण्याला उमेदीनं पेलतो आहे
होय, मी शेतकरीच बोलतो आहे,...||२||
दुष्काळात अन् अवकाळात
कित्तेकजण दौरे करून गेले
कुणी सांत्वन करून गेले तर
कुणी-कुणी फक्त फिरून गेले
कुणी अजुनही कागदोपत्री फिरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||३||
शेतकर्‍यांच्या आत्महत्तेचे
इथे अभुतपुर्व तांडव होते
ते दूसरे-तिसरे कुणी नाही
तुमचे-आमचेच बांधव होते
त्यांच्यासाठी आजही जीव तळमळतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||४||
मात्र शेतकर्‍याच्या मदतीचे
आजही प्रश्न प्रलंबित आहेत
अन् सरकारी धोरणांमुळे
भावनाच आचंबित आहेत
मात्र मदतीसाठी,शेतकरी ना मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||५||
आत्महत्त्याग्रस्तांच्या आकड्यांतही
इथे भ्रष्टाचार घडतो आहे
अन् मृत्युच्या कारणांच्या
लिखावटीचा प्रश्न पडतो आहे
मृत्युच्या कारणांचे कुणी लेखी पुरावे मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||६||
तुम्हाला काय सांगु आमचे
जगणे कीती जर्जर आहेत
कसे लिहीणार मृत्युची कारणे
आम्ही आजही निरक्षर आहेत
कुणी गजेंद्रसिंह कारणे लिहून मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||७||
पण आता मृत्युचे कारणे
आम्ही लिहून ठेवणार नाहीत
अन् आत्महत्याग्रस्त म्हणून
शेतकरीही मरणार नाहीत
पण जगण्यासाठी मदतीचा हात मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||८||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

( कविता जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या मरण्याने काहीही फरक पडणार नाहीये हे माहित असूनही राजकीय लोकांसमोर आत्महत्या करण्याचं कारण काय ?
असे दशावतार असतानाही लग्न करून संसार मांडायचा . ४-४ ५-५ मुलांना जन्माला घालायचं आणि पोसता नाही आलं कि आत्महत्या
करायची आणि त्यांना उघड्यावर टाकायचं . पोसायची ताकद नसल्यामुळे २ लहान मुलींचा त्यांच्या वडिलानेच खून केल्याची बातमी हि आलीय आज
पेपर मध्ये Sad

सारीका३३३ अनुमोदन .
सोबत आणखी एक बातमी आहे . माय बापानी मिळून स्वतःच्या तीन पोरांना मारुन टाकल आणि मग गळफास लावला .. ३५ एकर शेती आणि लेकराम्चे वय तरी काय तर सर्वात मोठी २२ , मग १९ , १७ , आणि १५ ..
एव्ढ्या मोठ्या पोरांना मारल कस असणार .. कारण अजुन कळलेल नाहिये आणि मोठी पोरगी आजीकडे होती म्हणुन वाचली . काहीच का विचार नाही कुणाचा :रागः

टीना आनी सारीका,
शेती ही निसर्गावर अवलंबुन आहे व भांडवला शिवाय शेती नाहि.पाउस पडला नाहि तर उत्पन्न होत नाहि.पन बैंकेच कर्ज काहि थाबत नाहि.कर्ज फेडन्यासाठि जमीन विकने ह पर्याय उरतो. शेतकरी जमीनीला कालिआई म्हनतो आनि ती वीकने म्हनजे मरन.
ही मानसिकता साह्जासहजी बदलने शक्य नाहि.
क्रुपया त्यंच्या विषयि सहानभुति आसावी.

शेती ही निसर्गावर अवलंबुन आहे व भांडवला शिवाय शेती नाहि.पाउस पडला नाहि तर उत्पन्न होत नाहि.>>>
कितीही पावूस पडला तरी पाणी अडवण्याच , पाणी जिरवण्याच ह्या लोकांना कधी कळणार ? स्वतः हि काही करत नाहीत , सरकार कडून हि काही करवून घेत नाहीत . दुष्काळावर किवा नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी काही पुढाकार घेताना दिसतात का ? आंदोलन करण , सरकारला धारेवर धरण असं काहीही करताना दिसत नाहीत . फक्त आत्महत्या करताना दिसतात . विकतचं बियाणं , विकतची खत ,औषधं कशासाठी ? बँकेकडून , सावकाराकडून कर्ज घेताना पण अंथरून पाहून पाय पसरावेत कि .
क्रुपया त्यंच्या विषयि सहानभुति आसावी.>>
सहानुभूती अर्थातच आहे .