ट्यूलिप फेस्टीव्हल... (नवीन फोटोंसहित)

Submitted by rar on 21 April, 2015 - 11:47

अमेरिकेतील पॅसीफीक नॉर्थवेस्ट (म्हणजे कॅलिफोर्नियाच्या उत्तरेचा भाग) ट्युलिप्सच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
विविध प्रकारच्या ट्युलिप्सच्या जाती इथे तयार केल्या जातात . विविध रंगछटांच्या या जाती तयार करण्यासाठी बरेच प्रयोगही केले जातात.
नुसताच वुडबर्न, ऑरेगन इथल्या ट्युलिप फेस्टीव्हलमधे काढलेले काही फोटो.
मागे बर्फाच्छादित माऊंट हूड, ट्यूलिप्स आणि मस्त सूर्यप्रकाश असलेला दिवस...
(कॅमेरा : Nikon coolpix)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आलेत फोटो. मी हॉलंडमधला ट्युलिप फेस्तिव्हल बघितलाय आणि इथे ऑस्ट्रेलियात कॅनबेरात होतो तो.

ह्या फोटोंमधून एकदम अमिताभ आणि रेखा धावत येतिल पुढे असं वाटतय...

आहा.. मस्त.. ते लॉग शॉट्स वालेही भारी आलेत. खुप छान.

शेअर केल्याबद्दल मनापासुन आभार.

ह्या फोटोंमधून एकदम अमिताभ आणि रेखा धावत येतिल पुढे असं वाटतय...>>
१ल्या फोटोत रेखा आहेच, बर्फ पण आहे अमिताभ मात्र पाघळुन गायब झालेला वाटतोय.

त्या फोटोतली ती मागची मुलगी व तो बर्फाच्छादीत डोंगर नीट दिसत असता तर तोच फोटो २००% भारी झाला असता. (ड्रीम शॉट का काय तो) आत्ता भारी आहेतच १००% पेक्षा जास्ती.

आहा!! सुंदर!! प्रचिंमध्ये हा नजारा तर प्रत्यक्षात काय असेल!!! साध्या कॅमेर्‍याने हे प्रचि काढलेत , खरंच वाटत नाहीये! सुंदर आलेत..!!

अतिशय सुरेख फोटो आहेत.

आमचे कॅमेरे महागातले नसल्यामुळे आमचे फोटो चांगले येत नाहीत या आमच्या सबबीला तुम्ही सुरुंग लावला आहे.

Pages