निसर्ग गटग - राणी बागेत

Submitted by साधना on 20 April, 2015 - 01:28
ठिकाण/पत्ता: 
राणी बाग, भायखळा

निसर्गप्रेमी मंडळींनो,

सालाबादाप्रमाणे राणीबागेत वसंताचे आगमन झालेले आहे.

राणीबागेबद्दल पेपरात येऊन धडकणा-या विविध बातम्या वाचल्यास अजुन काही वर्षांत वसंताला राणीबागेचा पत्ता सापडणे कठिण होईल असा रंग दिसतोय. असे कधीही न होवो ही इच्छा मनी धरुन आपण आपल्याला जेवढे जमेल तसे, जेव्हा जमेल तेव्हा राणीबागेतल्या निसर्गाचे दर्शन घेऊया.

तर सालाबादाप्रमाणे आयोजित केलेल्या या उत्सवास भरभरुन हजेरी लावा.

राणीबाग दर्शन करुन दमलेले निगप्रेमी चर्चगेटच्या सत्कार मध्ये थालीचा आनंद घेत श्रमपरिहार करतील असा एक विचारप्रवाह पुढे येत आहे. तर या प्रवाहास अजुन पुढे घेऊन जावे ही विनंती.

माहितीचा स्रोत: 
असेच रिकामटेकडे लोक, ज्यांना शनवार रविवार कुठे जावे हा प्रश्न कायम पडलेला असतो.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 25, 2015 - 00:00 to 06:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं आहे हा अनंताचा भाऊ!
Wink

त्यानिमित्ताने चाफ्याला काय म्हणतात इंग्रजीत हे शोधलं.
frangipani
अशी एक रेस्तराँची चैन असल्याचं आणि ट्रायडेंटमध्ये एक पाहिल्याचं आठवलं. पण त्यावेळी असेल काहीतरी झँगो नाव म्हणून सोडून दिलं होतं.
तर हे चक्क चाफ्याची फुलं !

चाफ्याला एकाचवेळी डेड मॅन्स फ्लॉवर आणि टेंपल फ्लॉवर.. अशी दोन नावे आहेत.

भायखळ्याला रेल्वेलाईनजवळ एक कब्रस्तान आहे. तिथली एक देखणी कबर आणि त्याच्या जवळचा फुललेला चाफा, हे माझ्या मनात कोरलेले चित्र आहे.

गायत्री च्या वरचा फोटो क्लाईनहाॅविया चा आहे किका? बाकु जिप्सी, सगळे फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम!!!!

सगळ्या निसर्गप्रेमींनी खूप धमाल केलेली दिसतेय. हे कळत नाही की या ऋतूने फुलांना इतकं लोभस रूपड दिलंय का जिप्सीच्या जादुई फोटोग्राफीने त्यांना बेफाम लावण्य बहाल केलंय ?उदाहरणार्थ ती गायत्रीची फुलं आणि लाल केशरी अग्नीगोलकासारखी सीता अशोकाची फुले ...
ओडिओ रेकॅार्डींगही ऐकल ., सर्वांच्या गप्पांमधून बरयाच गोष्टी कळत गेल्या
.रबरबद्दल नवी माहिती कळली. साधना तुम्ही आणि हे सर्व नि.प्रेमी अगदी के . अंजलीच्या कवितेतली ग्रीन फिंगर्स वाली माणसं आहात
एकुणच निसर्ग-गटग वसन्त सोहळा छानच पार पडलाय. .

हि देखणी झाडे दुर्मिळ का राहिलीत कळत नाही. तिथे वाढताहेत म्हणजे मुंबईच्या हवेचे वावडे नाही या झाडांना. ( कदाचित ज्या काळात ती रुजली असतील त्या काळात हवामान वेगळे असेल. )

जितकी संख्या वाढेल तेवढी चांगलेच.

छान झालेले दिसते आहे गटग. आॅडिओ रेकॅार्डिंग नाही ऐकले अजून. पण सगळ्यांकडून आलेले फ़ोटो मस्तच
बहुतेक फुले सुगंधी दिसतायत. राणीबागेच्या परिसरात सुगंध दरवळत असेल नाही? ( कल्पनेनेच सुगंध अनुभवणारी बाहुली)
मला खूप इच्छा आहे आहे अशा गटगला यायची. बघू कधी जमते ते

सुरेख प्र . ची .
क्रुष्ण व ड खुप च भावला... या बद्दल अ जुन ऐकायला आवडेल . सीता अ शोक ,नाग केसर ,गायत्री ,सारेच अ नो खे....
र च्याक ने अनंता च्या फुलाला उडीया मधे सुगंध राज म्हणतात... कीती समर्पक नाव आहे नाही!

रामधनचंपातल्या बिया पुढे काळ्या होतात.. तेव्हा ते सगळे एखाद्या कर्णफुलासारखे दिसते.

पानघोड्याच्या जागेजवळचा कळम फुलला नव्हता ? तो तर फारच देखणा दिसतो.

सायली
हो, पहिला फोटो कृष्णवडाचाच आहे.
दा
कळम दोन तीन ठिकाणाचा फूललेला, फोटो घ्यायचे राहिले.
जिप्सी किंवा जागुने घेतले असतील.

ऊजु खुप सुरेख आ हे कृष्ण व ड.... सावळा अtसतो का हा? पानांचा आकार खुप वेगळा आहे... छान आहे...
याला कृष्ण वड का म्हणतात? काही आख्यायीका आहे का या मागे?

वा! मस्त मज्जा आली तुमची चालती बोलती चर्चा एकून.

नागकेशराचे फुल बिलकुल अनंतासारखे दिसते आहे.

कृष्णवड पहिल्यांदा बघत आहे.

anant apeatim.... ase phulalele kadhich pahil navte.... Nehmi ardhawat umalalele...

Pages