Submitted by साधना on 20 April, 2015 - 01:28
ठिकाण/पत्ता:
राणी बाग, भायखळा
निसर्गप्रेमी मंडळींनो,
सालाबादाप्रमाणे राणीबागेत वसंताचे आगमन झालेले आहे.
राणीबागेबद्दल पेपरात येऊन धडकणा-या विविध बातम्या वाचल्यास अजुन काही वर्षांत वसंताला राणीबागेचा पत्ता सापडणे कठिण होईल असा रंग दिसतोय. असे कधीही न होवो ही इच्छा मनी धरुन आपण आपल्याला जेवढे जमेल तसे, जेव्हा जमेल तेव्हा राणीबागेतल्या निसर्गाचे दर्शन घेऊया.
तर सालाबादाप्रमाणे आयोजित केलेल्या या उत्सवास भरभरुन हजेरी लावा.
राणीबाग दर्शन करुन दमलेले निगप्रेमी चर्चगेटच्या सत्कार मध्ये थालीचा आनंद घेत श्रमपरिहार करतील असा एक विचारप्रवाह पुढे येत आहे. तर या प्रवाहास अजुन पुढे घेऊन जावे ही विनंती.
माहितीचा स्रोत:
असेच रिकामटेकडे लोक, ज्यांना शनवार रविवार कुठे जावे हा प्रश्न कायम पडलेला असतो.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, April 25, 2015 - 00:00 to 06:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधना मला पण यायचे आहे ग पण
साधना मला पण यायचे आहे ग पण कदाचीत ऑफीस मधे यायला लागेल म्हणून नाव नोंदणी केली नाही. जर ऑफीस मधे लवकर येऊन निघायला जमले तर नक्की येईन. फोन करेनच.
<< येणा-यांनी मायबोली टी
<< येणा-यांनी मायबोली टी शर्ट्स घालुन या म्हणजे ओळखणे सोप्पे जाईल. >>
माझ्याकडे नाहीये..
चालेल ग सामी. फोन कर पोचलीस
चालेल ग सामी. फोन कर पोचलीस की.
चेतन, चालेल हो, तुम्ही घातला नाही तर टपरीजवळ कोणीतरी घातलेला असेल म्हणजे तुम्हाला ओळख पटेल की हेच ते दिव्य माबोकर जे तुमच्या सोबत राणीबागेत फिरणार आहेत म्हणुन.
पण अजुनही कुणीच पुणेकर तयार
पण अजुनही कुणीच पुणेकर तयार झालेले नाहीयेत गटगकरिता. मी एकट्याने येऊन काय करणार? सोबत पुणेकरांपैकी कुणी असेल तर येईन.
सहसा मुंबई आणि नवी मुंबई
सहसा मुंबई आणि नवी मुंबई सोडता बाहेरुन कुणी येत नाही ह्या गटगला. प्रवास खुप पडतो. त्यामुळे असावे.
कसे झाले गटग?
कसे झाले गटग?
नेहमी प्रमाने आजचा गटग मस्त
नेहमी प्रमाने आजचा गटग मस्त पार पडला.इंद्रधनुष्य श्रीशैलसोबत, जागु सहकुटुम्ब, इन मिन तिन सहकुटुम्ब, उजू इशिकासोबत, जिप्सी, एसार्डी व् मी इतकी मंडली जमलेली.
उन ज़रा जास्त होते पण बागेत जाणवले नाही. १० वाजता बागेत प्रवेश करून साधारण २ २.३० च्या सुमारास बाहर पडलो. फिरून फिरून पायाचे तुकडे पडायची वेळ आली. शेवटी नेहमि प्रमाणे काय काय मिसले याची चर्चा करत बाहर पडलो. एसर्डी नि ऑडियो रिकॉर्डिंग केले
यावेळी पिकॉक फ्लॉवर हे एक नवे फुल पाहिले (आपल्या गुलमोहरासारखेच दिसते)
उन्हामुले आणि पोटात कोकलणार्या कावळ्यान्मुले खादाडिसाठी जास्त लांब न जाता जवळच्या आनंद भुवन मिसळिचा पर्याय इंद्राने सुचवला तो सगळ्यान्नि उचलून धरला. क्षुधाशान्तिनंतर दमलेली मंडळी आपापल्या घरी जाऊन सुशेगाद निजली.
वा छान झालं निसर्ग-गटग.
वा छान झालं निसर्ग-गटग.
व्वा कीत्ती छान ....
व्वा कीत्ती छान ....
राणीबागेत हत्ती आणि मनुष्य
राणीबागेत हत्ती आणि मनुष्य प्राणी सोडून दुसरे कोणी नव्हते परंतू आम्ही झाडे पाहण्यास गेलो होतो आणि त्या उपक्रमात पूर्ण समाधान मिळाले. नवीन ओळखी झाल्या.नवीन मोबाइलवर हातसाफ करायला मिळाला.


![]()
१)ओफनेट gps trackingचे एक अॅप प्रथम सुरू करून backgroundला टाकले.तीन तास भटकंतीशेवटी रूट मिळाला.स्क्रीन शॅाटस -
२)ओडिओ रेकॅार्डींग केले-(लिंक्स देत आहे,ओडिओ मीडिया कोड थोडा गंडतोय.)
अ)मुचकुंद फुले?
मुचकुंद?
http://vocaroo.com/i/s0ODt6uJamel
ब)गुंजा-
गुंजा
http://vocaroo.com/i/s1QyXFw6CqaL
क) रबराचे झाड?-
रबर?
http://vocaroo.com/i/s0ZXWgy1j0XN
ड)नागकेसर?
नागकेसर?
३)काही फोटो -
सुरेख प्र.ची..
सुरेख प्र.ची..
सुरेख प्र.ची.. दुसर्या
सुरेख प्र.ची..
दुसर्या चित्रातला लांब पाकळ्यांच्या फुलांचे नाव काय (मुचकुंद?)? त्याला सुगंध येतो न? आम्ही एक फुल घरी आणलेले.
चौथ्या चित्रातल्या पिवळ्या तांबड्या फुलांचे नाव काय? पाचवे चित्र दिसत नाही
सहाव्या चित्रात तो कांचन न? मी पहिल्यांदाच पाहिलेला. सुंदर आहे. नंतर अंधेरी-कुर्ला रोडवर एक दिसला.
मुचकुंद आणि कनक चम्पा या
मुचकुंद आणि कनक चम्पा या दोघात गोंधळ आहे. ते वरचे मुचकुंद असे आम्ही समजत होतो पण त्याच्यावर कनक चम्पा ही पाटी लावलेली. नेट वर खुप ग्रुप मध्ये ह्याला कनकचम्पा म्हटले आहे. नेटशोध करता ही दोनहीं नावे एकाच झाडाची आहेत असे वाटतेय.
पोवई हीरानंदानी गार्डेन मध्ये कनक चम्पा आणि मुचकुंद शेजारी शेजारी लावलेत असे जिप्सी म्हणालेला. कोणाला जमत असेल तर कृपया तिथे जाऊन फोटो काढा आणि इथे टाका. सध्या फुले आली असणार.
आणि ज्याला आम्ही कनक चम्पा समज्तोय तो रामधन चम्पा आहे
.
पिवळे लाल ऑस्ट्रेलियन चेस्टनट.
तुम्हाला कांचन कुठे दिसला? शेवटचा फोटो तळ्याचा आहे आणि त्यातले झाड चाफा आहे. प्लुमोरिया, फ्रंजिपनी इ. नावानेही ओळखतात.
गुलाबी केसर असलेले तळव्यात ठेवलेले समुद्रफुल.
मुचकुंद आणि कनकचंपा एकच!
मुचकुंद आणि कनकचंपा एकच! "http://www.flowersofindia.net/catalog/slides/Kanak%20Champa.html" मराठीत त्याला कर्णिकार म्हणतात.

हम्म तळ्याच्या फोटोत चाफा आहे नाही का?! इथे फोटो खूप छोटा दिसतो त्यामुळे लक्षात आले नाही. माझ्या आठवणीप्रमाणे तिथेच बाजूला कांचन आहे. आम्ही गेलेलो तेव्हा चाफ्याला बिलकुल पाने नव्हती. कांचनला थोडी फुले होती. मला फोटोज कसे टाकायचे माहित नाही. हि लिंक पहा.
"http://www.flowersofindia.net/catalog/slides/Kachnar.html"
ऑस्ट्रेलीयन चेस्टनट छान आहेत.
कनकचंपा ओडिओ रेकॅार्डींग
कनकचंपा
ओडिओ रेकॅार्डींग प्रयोग कसा वाटला ते लिहा.
राणीबागेतली हि काही
राणीबागेतली हि काही छायाचित्रे:
महाराष्ट्राचे राज्यफुल "तामण"

प्रचि ०१
प्रचि ०२

प्रचि ०३

गायत्री
प्रचि ०४


अबोली
प्रचि ०५
Fish Poison Tree - फुल
प्रचि ०६

Fish Poison Tree - पाने
प्रचि ०७

निवर
प्रचि ०८

संकासुर
प्रचि ०९
कौशी
प्रचि १०

सीता अशोक
प्रचि ११

कृष्णवड
प्रचि १२ कृष्णकमळ प्रचि
प्रचि १२

कृष्णकमळ
प्रचि १३

gardenia resinifera
प्रचि १४

नागकेशर
प्रचि १५

कांचन
प्रचि १६

Corkscrew Flower Strophanthus boivinii_Apocynaceae
प्रचि १७

प्रचि १८
चाफा

कोकोचे फळ
प्रचि १९
प्रचि २०

प्रचि २१

mast
mast
मजा आली गटगला जिप्स्या मस्त
मजा आली गटगला

जिप्स्या मस्त प्रचि तो गायत्रीचा तर नावा प्रमाणे सोज्वळ आलाय.
आज पहिला हा धागा..
आज पहिला हा धागा..
Mastach aalet photo.
Mastach aalet photo. Gayatreecha saDaa paDaayalaa laagel aataa, mag kesharee faLehee laagateel.
आहाहा, सुंदर फोटो.
आहाहा, सुंदर फोटो.
तामण राज्यफुल आहे, माहीती
तामण राज्यफुल आहे, माहीती नव्हतं मला.
गायत्रीचा फोटो मस्त.
गायत्रीचा फोटो मस्त.
सुंदर फोटो! गायत्री
सुंदर फोटो!
गायत्री पहिल्यांदाच पाहिली.
गार्डेनिआ रेसिनेफेरा म्हणजे
गार्डेनिआ रेसिनेफेरा म्हणजे अनंत का?
योगेश, गायत्रीखाली सडा नव्हता
योगेश, गायत्रीखाली सडा नव्हता का ? त्या ठिकाणी मला हटकून, बहारों गुल बरसाओ, मेरा मेहबूब आया है.. या ओळी आठवतात.
ब्राऊनिया नव्हता ?
पावसाळ्यात परत जाऊ ! करमळ फुलेल तेव्हा..
उशिराची होळी!! मस्त!
उशिराची होळी!! मस्त!
ब्राऊनिया फुलुन गेलेला. मी
ब्राऊनिया फुलुन गेलेला. मी यावेळेस ब्राऊनीया आणि सीताअशोकाच्या शेंगा आणल्यात. नागकेशराच्याही आणल्यात. गावी बाया डोक्यात घालतात याचे फुल. ऑन पब्लिक डिमांड गावी मी एक रोपटे लावलेले. पावसाळा सुरू होईतो त्याने फुले दिली आणि नंतर ते कधीतरी कुजुन गेले.
गार्डेनिआ रेसिनेफेरा म्हणजे
गार्डेनिआ रेसिनेफेरा म्हणजे अनंत का
अनंतातली एक वरायटी. अनंतासारख्या याला खुप पाकळ्या नसतात तर फोटोत दिसताहेत तेवढ्याच पाकळ्या. फोटोतले फुल सुकलेय त्यामुळे पाकळ्या खाली झुकल्यात. ताज्या फुलाच्या पाकळ्या सदाफुलीसारख्या देठाशी ९० अंशाचा कोन करुन. त्या गोलात मावतील तेवढ्याच ४-५ पाकळ्या. ओव्हरलॅप अजिबात नाही. आपल्या नेहमीच्या अनंताला लेअर्स मध्ये पाकळ्या असतात. याला मध्ये जो पिवळा केसर दिसतोय तेवढा मोठा केसर अनंताला नसतो. सुवास मात्र अनंतासारखाच.
वरती संकासुराचे फुल दिलेय. राणीबागेतल्या झाडांच्या लिस्टीत याचे नाव पिकॉक फफ्लॉवर म्हणुन सापडले. हाच संकासुर हे माहितच नव्हते. आणि माहित तरी कसे होणार? संकासुराला कायम ५-६ फुट वाढलेले पाहिलेय. त्याच्यापेक्षा जास्त वाढायला त्याला मिळतच नाही. राणीबागेतले पिकॉक फ्लॉवर चक्क उंच वृक्षावर लागलेले.
Pages