उगादी म्हणजे गुढीपाडवा. आंध्रप्रदेश, तेलंगणामधे या दिवशी कैरीचा भात, सांजाची पोळी किंवा पुरी आणि कडुनिंबाच्या फुलांच्या पाकळ्या घालुन चिंतपंडु पचडी म्हणजे चिंचेचे पन्हे केले जाते. यासाठी लागणारे जिन्नस पुढीलप्रमाणे
लिंबाएवढा चिंचेचा गोळा २ तास पाण्यात भिजवून ठेवावा, नंतर तो व्यवस्थी दोन तीनदा पाणी वापरुन सगळा कोळ काढुन घ्या यामुळे पचडी खुप टेस्टी लागते.
१ लिटर थंड पाणी
अर्धी वाटी गुळ + अर्धी वाटी साखर
चवीनुसार मीठ
२ चिमूट ओवा
पाव वाटी अगदी बारीक चॉप केलेले कैरी
पाव वाटी चारोळी
पाव वाटी सुक्या खोबर्याचा किस
कडुनिंबाच्या फुलांच्या पाकळ्या ( या पाकळ्यांसाठी टिप बघा)
एक लिटर पाण्यात चिंचेचा कोळ, गुळ, साखर, मीठ आणि ओवा टाकून सरबतासारखे चांगले घुसळून ढवळून मिक्स करुन घ्या. त्यामधे सुक्या खोबर्याचा किस, चॉप केलेली कैरी, चारोळी आणि कडुनिंबाच्या फुलांच्या पाकळ्या घालुन पुन्हा ढवळा.
पचडी तयार.
कडुनिंबाचा मोहोर एका सुपात घेऊन हलक्या हाताने चांगला चोळावा, मोहोर पाखडुन त्याच्या हलक्या पाकळ्या पुढे येतील त्या अलगद काढुन घ्याव्या.
आवडी प्रमाणे चिंच, साखर, गुळ व मीठाचे प्रमाण कमी जास्त करावे.
कैरी शक्यतो आंबट गोड घ्यावी.
आंबट गोड किंचीत कडवट अशी छान चव असते.
अरे वा.. मस्त पाककृती..
अरे वा.. मस्त पाककृती.. चवीच्या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटले.
हो दिनेशदा, आंबट गोड किंचीत
हो दिनेशदा, आंबट गोड किंचीत कडवट अशी छान चव असते या पचडीला.
हे सरबत आहे का?
हे सरबत आहे का?
अदिती हे पन्हं आहे.
अदिती हे पन्हं आहे.
छान
छान
उगादी कर्णाटकातही असते ना?
उगादी कर्णाटकातही असते ना? बेंगळुरुत पाहिल्याचे आठवते .....
गुढी पाडव्याच्या दिवशी, चिंच,
गुढी पाडव्याच्या दिवशी, चिंच, कैरी, कडुलिंबाचे पाने, गुळ आणि सुखं खोबरं ह्यांचे मिश्रण करुन देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी माझी आई करते, त्याला नीम पंचामृत म्हणतात. साखर ही घालते
जबरी लागतं.
मा़झ्या आत्येसासु बनवित असतं
मा़झ्या आत्येसासु बनवित असतं पाडव्याला फक्त कडुनिंबाच्या फुलांच्या पाकळ्यांऐवजी कडुनिंबाची पाने तोडुन घालत असतं आणि सर्वांना प्रसाद म्हणुन हे सरबत देत. कडु अजिबात न खाणापिणारी मी ते सरबत आवडीने पीत असे. गेले २ वर्ष आत्येसासुबाई गेल्याने नाही मिळाले
धन्यवाद सारीका रेसीपीसाठी, आता पुढील वर्षीपासुन मी चालु ठेवीन आत्येसासुचा वारसा.
छान! आम्ही एच के रिजनवाले
छान!
आम्ही एच के रिजनवाले याला बेवु म्हणतो.
मस्त.. बाकी पदार्थांची पण
मस्त.. बाकी पदार्थांची पण रेसिपी द्या की. कैरीचा भात, सांजाची पोळी/ पुरीची.
रॉबीन्हुड, उगादी कर्णाटक
रॉबीन्हुड, उगादी कर्णाटक आंध्र, तेलंगणामधे साजरी केली जाते, कानडी लोक पण पचडी करतात का ते माहित नाही.
म्हमईकर इसरु नका आमाले
निल्सन तुमच्यकडची कृती जमली तर नक्की शेअर कर.
चैत्रगंधा, नक्की लिहिन कैभा आणि सापो ची रेसीपी
सातीतै एचके रिजन म्हणजे कोण्ता भाग?
तुमाले इसरुन कसं चालल. वळख
तुमाले इसरुन कसं चालल.
वळख ठेवल्याबद्दल आभारी आहे
याच्यासोबत हरभरा डाल अस्ते
याच्यासोबत हरभरा डाल अस्ते भिजवलेलि
हैद्राबादच्या आसपासचे
हैद्राबादच्या आसपासचे कर्नाटकचे काही जिल्हे.
तन्मयी तुला आंबे डाळ वा डाळ
तन्मयी तुला आंबे डाळ वा डाळ कैरी म्हणायचे आहे का?
.
.
खरे तर ते युगादि आहे. त्याचा
खरे तर ते युगादि आहे. त्याचा अर्थही लागतो. बोलीभाषेत उगादि झालेले दिसते. मागच्या युगादिला बंगळुरात होतो.... लैच बकाल शिटी....
कानडीमध्ये पचडी म्हणजे डाळीची
कानडीमध्ये पचडी म्हणजे डाळीची कोशिंबीर
हे सरबत माह्त नव्हते. कडुनिंबाचा मोहोर मिळालातर करून बघणार.
धन्यवाद रॉबीनहुड मला युगादी
धन्यवाद रॉबीनहुड मला युगादी शब्द माहीत नव्हता.
नंदीनी, मी तीन चार वेळा सासर्यांना विचारले याला नक्की पचडीच म्हणतात ना! ते म्हणाले की कोशिंबीर म्हणजे पण पचडी आणि हि उगादी पचडी!
यातील सर्वच पदार्थ आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकतो, कडुनिंबाच्या मोहराशिवाय देखील सुरेख लागते पचडी उन्हाळ्यातला पोट थंड ठेवण्यासाठी मस्त पेय आहे हे.
अरे व्वा .. मस्त वाटतयं ..
अरे व्वा .. मस्त वाटतयं .. करुन बघणार.
तिकडचं पन्हच हे.
तिकडचं पन्हच हे. उन्हाळ्यात्लं उपयुक्त पेय्य.
तिकडचं पन्हच हे.
तिकडचं पन्हच हे. उन्हाळ्यात्लं उपयुक्त पेय्य.
एकदा पोष्ट टाकून तृप्ती होत
एकदा पोष्ट टाकून तृप्ती होत नाही काय ?
तुम्ही मला म्हणालात का
तुम्ही मला म्हणालात का रॉबीन्हुड?
@एकदा पोष्ट टाकून तृप्ती होत
@एकदा पोष्ट टाकून तृप्ती होत नाही काय ? >> दुसर्यांदा खास तुमच्याच साठी टाकलेली आहे. तस्मात.. वेंजॉय इट.
सारिका... टोपी फिट्ट बसलेली
सारिका... टोपी फिट्ट बसलेली पाह्यली न्हवं ? ::फिदी: