महाराष्ट्र : इतर देशवासीयांच्या नजरेतून

Submitted by प्रकु on 24 March, 2015 - 07:09

बंगळूरू मध्ये राहायला आल्यावर, मला इथे विविधं प्रांतांतील अनेक लोक भेटले. दक्षिणेतल्या चार (आता पाच) राज्यांतील लोक तर होतेच शिवाय उत्तरेकडील पंजाब, UP; ईशान्येचा आसाम; पूर्वेकडील छत्तीसगड, बंगाल, झारखंड ते अतिपूर्वेकडील मणिपूर, इतक्या सगळ्या राज्यांतील लोकांशी मला सवांद साधण्याची संधी मिळाली. हे सगळे माझे मित्र साधारण २१ ते २५ वयोगटातील आहेत. त्यांच्या नजरेतून मला आपल्या महाराष्ट्राकडे पाहायला मिळालं. आणि मराठी असल्याचा मला अधिकच अभिमान वाटू लागला. हा एक छान अनुभव होता. तो तुमच्या बरोबर share करतोय.

मराठी म्हणल्यावर पहिला विषय निघतो तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा. संपूर्ण देशावर यवनांचे राज्य असताना आपलं एकच राज्य अस होत जिथे आपला स्वतःचा राजा होता. आपल्या महाराजांनी एवढ्या बलाढ्य असलेल्या मुघलांना कशी धूळ चारली, याबद्दल सगळ्यांना प्रचंड कुतूहल आणि तेवढाच आदर वाटतो. संपूर्ण भारतवर्षात फक्त मराठी माणसाने स्वराज्य स्थापन केलेलं, त्यामुळे लोक आपल्याकडे आदराने बघतात. खूप खूप अभिमान वाटतो अशा वेळी मराठी असल्याचा.

महाराष्ट्रातलं दुसरं फेमस व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब. प्रत्याकाला बाळासाहेबांचा दरारा कसा होता ते ठाऊक असत. बाळासाहेबांच्या बोलण्यातली हुकुमत, त्यांची स्टाईल यावर सगळे जाम फिदा असतात.(हो स्टाईल! त्यांचा तो गॉगल, रुद्राक्षाची माळ घातलेला भगव्या कपड्यातला फोटो खूप प्रसिद्ध आहे.) त्यानंतर विषय निघतो तो राज ठाकरेंचा. मनसेने बिहारी लोकांना दिलेला ‘प्रसाद’ या एका घटनेने राजसाहेब भाव खाऊन जातात. महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासातील सगळ्यात महत्वाची घटना म्हणून या घटनेकडे पाहिलं जात.

आपली मुंबईपण चर्चेचा एक महत्वाचा विषय असते. मुंबईमध्ये असेलली लोकल ट्रेन, तिथली गर्दी, डबेवाला या गोष्टी लोकांनी चित्रपटांमधून पाहिलेल्या असतात. Bollywood मुंबईला आपल्या देशातील most happening city बनवत. मला वाटत लोकांना हेवा वाटत असावा मुंबईचा. ते पाहून मलापण मग भारी dialogue सुचतात. like ‘If you want something and you are not getting it anywhere in the world, then you should search it in Mumbai, you will definitely get it!’ Lol Lol ‘आमची मुंबई’ हि आपली घोषणा सुद्धा सगळ्यांना माहित असते. Lol

सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी हे महाराष्टातले सगळ्यात विशेष सण आहेत, अस लोक मानतात. कारण त्याचे photos देशभरातल्या वर्तमानपत्रात येतात. महाराष्ट्राने स्वतंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल लोकांना आदर असतो. पण त्याबद्दल बोलणारे लोक कमी भेटतात. टिळक, सावरकरांचे विषय निघावे अस मला वाटत असत. पण ते फारसे निघत नाहीत. असो. अस सगळं बोलताना मधेच ‘देशाच्या total FDI पैकी सगळ्यात जास्त ३०% वाटा महाराष्ट्राचा’ अशी एखादी बातमी माझी कॉलर आणखी टाईट करून जाते.

एकंदर काय... तर आपली (आपली सगळ्यांची) हवा असते. आपण आपल्या मतानुसार चालतो, कोणाचही ऐकत नाही. बाहेरच्या कोणाची मुजोरी महारष्ट्रात खपवून घेतली जात नाही, लगेच आरे ला कारे करून मुजोरी करणाऱ्याचे कान उपटायला आपल्याला वेळ लागत नाही, हे लोक जाणतात. आणि त्याचवेळी आपण perform पण करतो, हे पण लोकांना माहिती असत. त्यामुळे ते खुप भाssरी वाटत. अभिमान वाटतो महाराष्ट्रीयन असल्याचा. 

जय महाराष्ट्र! जय भवानी, जय शिवाजी!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीनचंद्र आणि प्रतिक कुलकर्णी,

बाळासाहेबांबद्दल तामिळी माणसाच्या मनात आजून एका गोष्टीबद्दल आदरयुक्त जिव्हाळा आहे. ती म्हणजे त्यांनी श्रीलंकेतल्या तामिळींना दिलेला नि:संशय पाठिंबा. भारतातल्या फार कमी बिगरतामिळ नेत्यांनी असा थेट पाठिंबा व्यक्त केला आहे.

आ.न.,
-गा.पै.

@पैलवान,
अच्छा अच्छा असे आहे तर .. बरोबर आहे मग आदर वाटणारच त्यांना ..

@सोन्याबापू , बिहारी लोक आणि मनसेचा राडा झालेला त्यावेळी तुम्ही तिथेच होतात का ?
त्यावेळची तिथली reaction कशी होती ते जाणून घ्यायला आवडेल.

मूळ धागा मध्यंतरी वाचला होता. अ‍ॅक्च्युअली बेसिक मुद्दे पटलेले नव्हते.

जगात इतके बालिश लोक आहेत ह्यावर विश्वास बसला नाही.

क्षमस्व!

@चेतन ,
तुमचा अनुभव छान हटके आहे एकदम. पवार साहेबांना एक धन्यवाद पत्र पाठवलात कि नाही Lol

बाळासाहेबांबद्दल सगळ्या बाहेरील लोकांना कुतूहल/ आदर/ राग होता. त्यांच्या एका शब्दावर मुंबई बंद होत असे याच आश्चर्य वाटत असे. शरद पवारांबद्दल पण खूप आदर आहे. त्यांनी पंतप्रधान व्हावे असे बर्याच उत्तरेकडील लोकांना वाटे.

@बेफिकीर,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. मी हे नक्कीच गांभीर्याने घेऊन अजून प्रगल्भ होणाचा प्रयत्न करीन..
या platform जितके प्रगल्भ वाचक आहेत, अशा वाचकांसमोर लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. प्रतिक्रिया पाहून मला खरेतर वाचकांच्या जाणकारपणाची जाणीव झाली, तेव्हाच मला अधिक प्रगल्भ होण्याची गरज आहे हे मला जाणवले...

श्रीयुत बेफिकीर, तुम्ही लिहिलेली एक खूपच सुंदर कथा मध्ये वाचण्यात आलेली, तेव्हा मी सभासद नसल्याने बोलण्याचा योग आला नाही. त्यामुळे मला तुमची प्रतिक्रिया अधिकच महत्वाची वाटली.
शतशः धन्यवाद !

>>>श्रीयुत बेफिकीर, तुम्ही लिहिलेली एक खूपच सुंदर कथा मध्ये वाचण्यात आलेली, तेव्हा मी सभासद नसल्याने बोलण्याचा योग आला नाही. त्यामुळे मला तुमची प्रतिक्रिया अधिकच महत्वाची वाटली.
शतशः धन्यवाद !<<<

मी नम्रपणे आभार मानतो कुलकर्णी!

पण त्यामुळे माझी येथील प्रतिक्रिया महत्वाची वाटणे हे थोडेसे चुकीचे वाटते. Happy

असो!

मला तुमचे वय व भारतप्रवासाचा अनुभव ज्ञात नाही. त्यामुळे मी मला जे वाटले ते बोलून गेलो. ह्याला हवे तर दुराभिमान म्हणू शकता Happy

महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींनी महाराष्ट्रातील व्यक्ती भेटल्यानंतर 'तुम्ही म्हणता त्या 'च' गोष्टींचा उल्लेख करणे'' हे मला थोडेसे अग्राह्य (?), अस्वीकारार्ह वाटले.

क्षमस्व!

>>>>>>>>>>> पण त्यामुळे माझी येथील प्रतिक्रिया महत्वाची वाटणे हे थोडेसे चुकीचे वाटते.<<<<<<<<<<<

अनुभवी माणसाकडून आलेली प्रतिक्रिया महत्वाची वाटणारच कि ! त्यात चुकीचे काय Happy ?

>>>>>>>>> मला तुमचे वय व भारतप्रवासाचा अनुभव ज्ञात नाही. त्यामुळे मी मला जे वाटले ते बोलून गेलो. <<<<<<<<<<<<<

हे मात्र बरेच झाले. मला रोकठोक प्रतिक्रिया मिळाली. वयाच वगेरे कारण सांगून त्यामागे लपण्यात मलासुद्धा रस नाही. जे आहे ते स्वीकारावं आणि सुधारणा करावी हे मला बर वाटत.

>>>>>>>>>> 'तुम्ही म्हणता त्या 'च' गोष्टींचा उल्लेख करणे' <<<<<<<<<<<<<

हा 'च' खरेतर माझ्यापण मनात नव्हता. तुमच्या दृष्टीकोनातून मी लिहिलेलं मी पुन्हा वाचुन विचार करेन ..

आभार !!

@ शाहिर
"गुज्जूंच्या मते मराठी लोका घाटी आणि मॅनर्स नसलेली आहेत. बरेच गुज्जूं मराठी लोकांना दुजाभावाची वागणूक देतात. बहुधा सुरत लुटलेला राग अजून असावा"
पण तरिसुद्धा माझ्या माहिती प्रमाणे गुजरात वर आधी मुघल (चु भु द्या घ्या) आणि नंतर मराठ्यांचे राज्य होते,त्याचि सल सुद्धा असु शकेल.

रात्रभर धिंगाणा घालता येतो म्हणजे तो बाहेरच पाहिजे असा नाही. तर कोणाच्याही घरात एकत्र जमून धिंगाणा (?) घालता येतो. तसेही पुण्याच्या उपनगरात बाणेर, बावधन, केपी, विमाननगर, मगरपट्टा इकडे पोलिसांचा त्रास कमी होतो. झाला तरी पैसे देऊन सुटता येत.
>>>

खोटं वाटत असेल तर सई ला विचारा.....

खुद्द मुंबई मध्ये, खास करून बिगर-मराठी लोकांमध्ये मराठी कर्मचारी वर्गाची प्रतिमा कामचुकार, गैर-जिम्मेदार अशी आहे...म्हणजे ह्यांचा काही भरवसा नाही, जास्त काम नको असते, कामावर कधी दान्डी मारतील सांगता येत नाही आणि सगळ्यात खराब म्हणजे attitude...आम्हाला कामाची गरज नाही ह्याच वृत्तीने येतात कामाला!

कदाचित ह्याचमुळे, खुद्द मुंबई मध्ये, निदान फ़ायनन्शिअल सेक्टर मध्ये, वरच्या/मोठ्या हुद्द्यांवर त्या मानाने कमी मराठी माणसं दिसत असावीत! इथे स्वतः च्या बिझनेस बद्दल तर मी बोलतच नाहीये, पण आपण मराठी माणसं नोकऱ्या करणं पसंत करतो, तरीही खाजगी नोकऱ्यामध्ये पण ही स्थिती आहे हे पाहून वाईट वाटते….त्यामुळे उगीच स्वतः ची पाठ थोपटणे सोडून वस्तुस्थिती चा स्वीकार करून त्यावर काम करणे हेच आपल्या हिताचे ठरेल!

एकदा गुजरातमधे फिरून या , तिथे मराठी माणसांसाठी खास शब्द आहेत
>>>>
यातला एक खास शब्द घाटी का?

तसे आपल्याकडे देशावर म्हणजे घाटावर राहणार्‍यांना घाटी म्हणतात,
पण घाटी या शब्दाचा उगम बहुधा चिडवण्यासाठी झाला असल्याने तो शब्द संबंधितांना चीड आणतो.

मी मात्र हा शब्द सहजपणे वापरायचो बरेचदा,.. असेच एकदा एका मित्राशी बोलताना `आम्हा कोकणी लोकांमध्ये असे असते आणि तुम्हा घाटी लोकांमध्ये तसे असते', अशी सहज चर्चा चालू होती. यात काही चिडवणे वगैरे नव्हते. पण वर्गातल्या (आमच्या ग्रूपमध्ये नसलेल्या) एका मुलाला ते खटकले आणि तो वाद घालायला आला. मी त्याला म्हणालो सुद्धा अरे चिडवायला नाही उल्लेख केलाय तर तुम्ही घाटावर राहतात म्हणून घाटी बोलतोय. तसे तो म्हणाला घाटावर म्हणून नकोस आम्ही देशावरचे आहोत. तर मी उत्तरलो, मग काय देशी बोलू का तुला.. बस्स, फार मोठा जोक झाल्यासारखा कल्ला झाला आणि त्याला `देशी' असे नावच पडले. Happy

असो, वर गुज्जू वरून एक आठवले,
शाळेत असताना (जेव्हा मी कमालीचा शीघ्रकोपी होतो तेव्हा) क्रिकेट खेळत असताना एका गुज्जू मित्राशी माझे चिडवाचिडवीचे भांडण सुरू झाले, ज्यात त्याने त्या लोकांचा आपल्यासाठी असलेला वर्ल्डफेमस डायलॉग मारला, "मुंबई तुमची, भांडी घासा आमची" .. बस्स झोंबले मला ते शब्द, आणि पेटवली त्याच्या कानाखाली. चला जेवून येतो, पुढचे किस्से नंतर Happy

>>तमिळ- केरळी - शिवसेना - मनसे नालायक आहेत. महाराष्ट्रात नोकर्या भरपूर आहेत. आमचे पण खूप लोक आहेत. मराठी लोक कधी कधी चांगले तर कधी कधी नालायक पणे वागतात>><<

+११

एक तामिळ जो मुंबईत राहून आलेला तो तर खूपच चरफरडतो. साले गुंडे है वगैरे. मुंबई अपने बाप की समझते है वगैरे... (कारण काय तर लुंगी ना पळवायचे प्रकार केलेले ते सांगत).

>>माझी पत्नी दिल्लीची. २०११ साली तिनं मला पसंत केलं ते मी महाराष्ट्राचा म्हणजे संयमी आणि सभ्यच असणार या गृहीतकावरू>><<

पुण्यात शिकायला आलेल्या कितीतरी नॉर्थ मुलींनी मराठी लडका अच्छा होता है(मनात खर तर, बुद्धु होता है, शादी करके उसको मुठठी मे रख सकते है हे त्यांचे गणित).

आमच्या बॅचचे बरेच मराठी मुलगे आता उलट सांगतात भेटले की, गुरगाव की लडकिंयो से दूर रहना. शादी तो सोचो मत.

(हि त्यांची मतं व अनुभव आहेत).

>>>>>>>>>>>> सगळ्यात खराब म्हणजे attitude <<<<<<< +१
हि एक खरच विचित्र गोष्ट आहे मराठी माणसाची.
आपण सगळीकडे आडमुठे धोरण स्वीकारतो. तडजोडी करीत नाही. ते आपल्या रक्तातच आहे . व्यवसाय वगेरे करताना अशा गोष्टी त्रास देतात मग.
अर्थात याची एक positive बाजू पण आहे . आपण चांगल्या गोष्टींना टिकवून ठेवण्याकरता तडजोड न करण्याच धोरण स्वीकारलं तर ठीके. पण योग्य ठिकाणी तडजोड करायला शिकण गरजेच आहे.

मराठी उद्योजक परिषदेतील व्यावसायिक श्रीयुत कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषणात या मराठीपणावर मार्मिक भाष्य केले आहे , ते म्हणतात,
"मी रोज माझ्या बायकोला सांगतो की जर माझे आडनाव कुलकर्णी नसतं आणि मी साला मराठी नसतो तर मी आज अंबानीला मागे टाकलं असतं. आपल्यातील जे मराठीपण आहे ना, मीच किती वेळा बोलतो पण मला सुद्धा अजून पूर्णपणे ओवरटेक करता येत नाही "

पूर्ण भाषण इथे वाचा,
http://abnnitv.blogspot.in/2015/02/blog-post_12.html

आम्ही मराठि आहोत, म्हणुनच केवळ महाराष्ट्रातच तेवढी सुधारकता/स्त्रीपुरुषांना सुरक्षितता व त्यांची बर्‍यापैकी समानता- त्यात सुधारणा/मोकळेपणा दिसतो. पुण्यामुंबैत-महाराष्ट्रात जितक्या सन्ख्येने स्त्रीया गाडी चालवतात, त्याच्या एक हजारांश इतक्याही सन्ख्येने अन्य राज्यात (अपवाद सोडा) दिसणार नाहीत, गाड्या चालविणे सोडाच, त्यांच्या माजघरातून कधी रस्त्यावरही दिसणार नाहीत. तेव्हा महाराष्ट्र व येथील कणखर जनतेची इतरांशी तुलनाच होऊ शकत नाही.

मराठी म्हणल्यावर पहिला विषय निघतो तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा.>>>>> शिवाजी महाराजांबद्दल परप्रांतीयांना जुजबी माहिती असते बर्याच परप्रांतीयांना शिवाजी महाराज माहितही नाहीत.
महाराष्ट्रातलं दुसरं फेमस व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब. प्रत्याकाला बाळासाहेबांचा दरारा कसा होता ते ठाऊक असत>>> प्रत्येक राज्यात अस एखाद दुसरे फेमस व्यक्तिमत्व असतच त्यात काही नवल नाही.मात्र परप्रांतीयांच्या नजरेत महाराष्ट्रातील नेत्यांची प्रतिमा हि आदराची नाही.

परप्रांतीयांना मुख्यत आकर्षण असते ते मुंबई ह्या शहराचे नि इथे असलेल्या बोलीवूड चे

>>>>>>>. मात्र परप्रांतीयांच्या नजरेत महाराष्ट्रातील नेत्यांची प्रतिमा हि आदराची नाही. <<<<<<<<
मनसे कडून प्रसाद खाऊन गेलेले बिहारी अथवा लुंगी हटाव मुळे वाताहत झालेले लुंगीवाले यांना आदर नाही ,आणि तेवढ तर असणारच.. परंतु जे सामान्य मनात काही तेढ नसलेले नाक्रिक आहेत त्यांना आदरच वाटतो अस मला जाणवल.
असो. व्यक्ती तितक्या वल्ली ! कोणाला कसे माणसं भेटतात तर कोणाला कसे .

@ लिंबूटिंबू, खरे बोललात.
तेव्हा महाराष्ट्र व येथील कणखर जनतेची इतरांशी तुलनाच होऊ शकत नाही.<< +१

Pages