महाराष्ट्र : इतर देशवासीयांच्या नजरेतून

Submitted by प्रकु on 24 March, 2015 - 07:09

बंगळूरू मध्ये राहायला आल्यावर, मला इथे विविधं प्रांतांतील अनेक लोक भेटले. दक्षिणेतल्या चार (आता पाच) राज्यांतील लोक तर होतेच शिवाय उत्तरेकडील पंजाब, UP; ईशान्येचा आसाम; पूर्वेकडील छत्तीसगड, बंगाल, झारखंड ते अतिपूर्वेकडील मणिपूर, इतक्या सगळ्या राज्यांतील लोकांशी मला सवांद साधण्याची संधी मिळाली. हे सगळे माझे मित्र साधारण २१ ते २५ वयोगटातील आहेत. त्यांच्या नजरेतून मला आपल्या महाराष्ट्राकडे पाहायला मिळालं. आणि मराठी असल्याचा मला अधिकच अभिमान वाटू लागला. हा एक छान अनुभव होता. तो तुमच्या बरोबर share करतोय.

मराठी म्हणल्यावर पहिला विषय निघतो तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा. संपूर्ण देशावर यवनांचे राज्य असताना आपलं एकच राज्य अस होत जिथे आपला स्वतःचा राजा होता. आपल्या महाराजांनी एवढ्या बलाढ्य असलेल्या मुघलांना कशी धूळ चारली, याबद्दल सगळ्यांना प्रचंड कुतूहल आणि तेवढाच आदर वाटतो. संपूर्ण भारतवर्षात फक्त मराठी माणसाने स्वराज्य स्थापन केलेलं, त्यामुळे लोक आपल्याकडे आदराने बघतात. खूप खूप अभिमान वाटतो अशा वेळी मराठी असल्याचा.

महाराष्ट्रातलं दुसरं फेमस व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब. प्रत्याकाला बाळासाहेबांचा दरारा कसा होता ते ठाऊक असत. बाळासाहेबांच्या बोलण्यातली हुकुमत, त्यांची स्टाईल यावर सगळे जाम फिदा असतात.(हो स्टाईल! त्यांचा तो गॉगल, रुद्राक्षाची माळ घातलेला भगव्या कपड्यातला फोटो खूप प्रसिद्ध आहे.) त्यानंतर विषय निघतो तो राज ठाकरेंचा. मनसेने बिहारी लोकांना दिलेला ‘प्रसाद’ या एका घटनेने राजसाहेब भाव खाऊन जातात. महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासातील सगळ्यात महत्वाची घटना म्हणून या घटनेकडे पाहिलं जात.

आपली मुंबईपण चर्चेचा एक महत्वाचा विषय असते. मुंबईमध्ये असेलली लोकल ट्रेन, तिथली गर्दी, डबेवाला या गोष्टी लोकांनी चित्रपटांमधून पाहिलेल्या असतात. Bollywood मुंबईला आपल्या देशातील most happening city बनवत. मला वाटत लोकांना हेवा वाटत असावा मुंबईचा. ते पाहून मलापण मग भारी dialogue सुचतात. like ‘If you want something and you are not getting it anywhere in the world, then you should search it in Mumbai, you will definitely get it!’ Lol Lol ‘आमची मुंबई’ हि आपली घोषणा सुद्धा सगळ्यांना माहित असते. Lol

सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी हे महाराष्टातले सगळ्यात विशेष सण आहेत, अस लोक मानतात. कारण त्याचे photos देशभरातल्या वर्तमानपत्रात येतात. महाराष्ट्राने स्वतंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल लोकांना आदर असतो. पण त्याबद्दल बोलणारे लोक कमी भेटतात. टिळक, सावरकरांचे विषय निघावे अस मला वाटत असत. पण ते फारसे निघत नाहीत. असो. अस सगळं बोलताना मधेच ‘देशाच्या total FDI पैकी सगळ्यात जास्त ३०% वाटा महाराष्ट्राचा’ अशी एखादी बातमी माझी कॉलर आणखी टाईट करून जाते.

एकंदर काय... तर आपली (आपली सगळ्यांची) हवा असते. आपण आपल्या मतानुसार चालतो, कोणाचही ऐकत नाही. बाहेरच्या कोणाची मुजोरी महारष्ट्रात खपवून घेतली जात नाही, लगेच आरे ला कारे करून मुजोरी करणाऱ्याचे कान उपटायला आपल्याला वेळ लागत नाही, हे लोक जाणतात. आणि त्याचवेळी आपण perform पण करतो, हे पण लोकांना माहिती असत. त्यामुळे ते खुप भाssरी वाटत. अभिमान वाटतो महाराष्ट्रीयन असल्याचा. 

जय महाराष्ट्र! जय भवानी, जय शिवाजी!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्फ्ह, टायटल आणि ललित थोडा गोंधळ झालाय (माझ्यामते). सेम गोष्टी इतर राज्यांबद्दलही लागू होतात

म्हणजे शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व इतर राज्यांच्या इतिहासातही नक्कीच सापडतील.
नक्कीच मुंबई मोठे शहर आहे, मेट्रोपोलीटन आहे (त्याचेही प्लस, निगेटीव्ह points आहेतच). पण याचा अर्थ असा होत नाही की Mumbai is the best. प्रत्येक शहराचे स्वतःचे असे वैशिष्ठ्य आहे. दिल्ली, कलकत्ता, चेन्नई यांसारखी अनेक शहरे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी यांप्रमाणेच (किंबहुना जास्तच) इतर राज्यांमधील सणही popular आहेतच
उदा. दुर्गापूजा

सो, इतर देशवासीयांच्या नजरेतून महाराष्ट्राबद्दल वेगळे असे काय अनुभवास आले?

महाराष्ट्राचा एक क्लासिक प्रॉब्लेम होतो. उत्तर भारतीय आपल्याला दाक्षिणात्य समजतात आणि दाक्षिणात्य आपल्याला उत्तर भारतीय.

माझी गणना आजवर चेन्नईमधेय "नॉर्थ इंडियन" म्हणून केली जाते (जास्तक्रून मी हे पूजा वगैरे धार्मिक बाबींबद्दल बोलतेय) म्हणजे तमिळ तेलुगु कानडी बायकांनी साड्या नेसून यावं असं सांगतात आनि मला "तुम्हारे नॉर्थ मे चलता है, तो तुम ड्रेस पेन्ना" असं औदार्यानं ऐकवलं जातं Proud ओळखीमधली नॉर्थ इंडियन मला "तुम भी तो साऊथ इंडियन हो" असं कायम म्हणते. अर्थात मी जन्मानं कानडी असल्यानं ते खरं आहेच. Proud

बाकी नॉन महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही रोजच्या रोज घरात वडापाव आणि मिसळपाव खात नाही आणि आमच्याकडे इतरही भाज्या आमट्या बनतात हे समजावून सांगावं लाग्णं, "ही आमटी आहे, सांबार नाही आनी ही डाळ्तांदळाची खिचडी आहे पोंगल नाही" हा आमचा नैमित्तिक कार्यक्रम असतोच.

नंदिनी - << महाराष्ट्राचा एक क्लासिक प्रॉब्लेम होतो. उत्तर भारतीय आपल्याला दाक्षिणात्य समजतात आणि दाक्षिणात्य आपल्याला उत्तर भारतीय.>> + १००

@प्रशू
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. मी अशाच खऱ्या आणि अनुभवी प्रतिक्रियांच्या शोधात मायबोली पर्यंत पोहोचलो. 

प्रथमतः मी हे मान्य करतो कि माझा अनुभव सीमित आहे.
ललित बद्दल बोलायचं झाल तर हे मी लिहिलेलं कुठे टाकावं हे माझ्या लक्षात आले नाही. मी फारसा विचार न करता ते ललित मध्ये टाकले. आपण हि गोष्ट निदर्शनास आणून दिली ते बरेच झाले. इथले इतर लेख वाचून मी ललित म्हणजे काय हा सेन्स अजून विकसित करून योग्य तेच इथे टाकेल. धन्यवाद!

बाकी बाळासाहेबांसारख व्यक्तिमत्व (कदाचित) इतर राज्यांच्या इतिहासात असू शकेल हे मी मान्य करतो. परंतु स्वराज्य आणि शिवाजी महाराज या नक्कीच महाराष्ट्राच्या विशेष गोष्टी आहेत. अलिकडचा इतिहास पाहता इतर राज्यांच्या इतिहासात इतक्या अभिमानाने बोलाव अशा गोष्टी अपवादात्मकच आहेत. असो. हे मुद्दे काही मुख्य नाहीत, मी तुमच्या मूळ प्रश्नाच उत्तर देतो.

कि वेगळ अस काय अनुभवलं?
तर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र किती खास आहे हे सांगायचा माझा हेतू नव्हता. त्यामुळे इतरांच्या तुलनेत वेगळं अस काही त्यात आहे अस मला वाटल म्हणून मी हे लिहील अस नाही.

मी हे लिहिण्यामागच कारण अस कि आपल्या लोकांची (सगळ्या भारतीयांचीच) एक असंतुष्ट अशी मानसिकता आहे. कि आपल्याकडे रस्तेच नाहीत, टोलच खूप आहे etc etc. या गोष्टी खऱ्यासुद्धा आहेत(पण अस काहीतरी नेहमीच असणार आहे).आणि या सगळ्या बद्दल बोलून बोलून आपला दृष्टीकोनच negative होत चाललाय. आणि त्यामुळे आपल्याला अभिमान वाटण्या सारख्यापण काही गोष्टी आहेत, सगळंच काही negative नाही हे आपण विसरत चाललो आहोत अस मला वाटत. ते indirectly remind करून द्यायचा माझा प्रयत्न आहे.

या मानसिकतेचा परिणाम खोलवर गेलेले आहेत उदा. भारतीय बनावटीची वस्तू म्हणली कि नाक मुरडणे etc. त्यामुळे लिहिणाऱ्याने काहीतरी positive लिहावं, अस माझं मत आहे. त्यामुळे समाजाचा स्वतःबद्दलचा लुप्त झालेला आदर पुन्हा जागृत होऊ शकेल अस मला वाटत. धन्यवाद..

नंदिनी, "महाराष्ट्राचा एक क्लासिक प्रॉब्लेम होतो. उत्तर भारतीय आपल्याला दाक्षिणात्य समजतात आणि दाक्षिणात्य आपल्याला उत्तर भारतीय" - हे बरेच वेळा अनुभवलय. एका कानडी मित्राने मात्र, मला 'हम साऊथ ईंडियन लोग' म्हणत त्याच्यात एकदा सामावून घेतलं होतं. पण मोठ्या प्रमाणात, तुम्ही म्हणता तसाच अनुभव येतो.

मी तर हल्ली, 'वेस्ट कोस्ट' चा असल्याचं सांगतो. Happy

>>म्हणजे शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व इतर राज्यांच्या इतिहासातही नक्कीच सापडतील. <<
आयला, म्हणजे मराठी माणसाची, इतक्या दिवसांची इच्छा - "महाराज जन्माला यावेत पण दुसर्‍यांच्या घरात", हि फळाला आली तर... Happy

बरेच उत्तरेकडचे non-marathi मित्र मैत्रिणी आहेत. त्यांच्याशी बोलताना दोन गोष्टी जाणवल्या
१. शिवाजी महाराज तितकेसे माहिती नाहीत पण मराठे/पेशवे माहिती असतात! आणि काही वेळा मराठ्यांची इमेज चांगली नसते कारण ते आक्रमण करायला/लुटायला आले होते! पण मराठ्यांच्या शौर्याच्या कथा आवर्जून सांगितल्या जातात!
२. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अफाट गैरसमज! आणि सगळे वाईट. मराठी माणसाला बाळासाहेब/शिवसेनेविषयी जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो उत्तर भारतीय लोकांमध्ये आजिबात नाही! बाळासाहेब आणि एकूण शिवसेनेची (आणि आता मनसेची पण ) इमेज ही nuisance value जास्ती आणि उपयोग शून्य अशी आहे! ह्यात इंग्रजी मिडियाचा फार मोठा हात आहे असं मला वाटतं. म्हणजे ते गेल्यावर "बरं झालं!" असं ऐकल्यावर माझं डोकं सटकलं! त्या ग्रुपला मी मग बरंच सुनावलं. आणि मग त्यांच्या अंत्ययात्रेला आलेला प्रचंड जनसमुदाय दाखवला आणि सांगितलं की ही विकत आणलेली माणसं नाहीयेत. पण एकुणात उत्तरेकडे राजकारणी म्हणजे एकजात चोर असं समीकरण आहे! महाराष्ट्रात जशी लोकप्रियता राजकीय नेत्यांना मिळते तशी लोकप्रियता मिळालेले सध्याचे उत्तर भारतातले नेते मला फारसे आठवत नाहीत (निवडून येणे म्हणजे लोकप्रियता असं नाही).

आणि उत्तर भारतात राहणाऱ्या अनेक मित्रांचे विशेषतः मैत्रिणींचे अनुभव ऐकून मला महाराष्ट्र (सगळ्याच दृष्टीने) तुलनेने खरंच किती चांगला आहे असा साक्षात्कार झाला!

<<<<पण याचा अर्थ असा होत नाही की Mumbai is the best. >>>

हे मुंबईबद्दल लिहीलेत म्हणून ठीक. मुंबईकर बिचारे गरीब स्वभावाचे आहेत, किंवा त्यांना इतकी खात्री आहे की
Mumbai is the best की इतर कुणि काय म्हणतात ते ऐकत नाहीत.

पण, देव करो नि पुण्याबद्दल असे गंमतीत सुद्धा लिहू नका. इथले जुने पुणेकर तुटून पडतील तुमच्यावर!!
त्याबाबतीत त्यांची विनोदबुद्धि झोपलेली असते. Light 1

<<<<पण एकुणात उत्तरेकडे राजकारणी म्हणजे एकजात चोर असं समीकरण आहे! >>>>

त्यांच्या देशातले राजकारणी पाहून त्यांना तसे वाटले तर नवल नाही. नशीब त्यांना कळले तरी.

त्यांच्या देशातले राजकारणी पाहून त्यांना तसे वाटले तर नवल नाही. नशीब त्यांना कळले तरी.>>झक्की Lol खरे आहे!

बरेच बहुभाषिक मित्र/मैत्रिणी आहेत. महाराष्ट्रात शिकायला/ नोकरीला आलेले. तसेच महाराष्ट्राबाहेर/ देशाबाहेर नोकरी करताना ऐकलेल्या प्रतिक्रिया -
काश्मिरी - महाराष्ट्र चांगला आहे. सेफ आहे. लोक मदतीला तयार असतात
पंजाब - दिल्ली - मुंबई, पुणे सेफ आहे. रात्रभर धिंगाणा घालता येतो. पैसे फेकले कि सगळी कामे होतात. नोकरीला काही प्रश्न नाहीत.
उ. प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड - शिक्षण, नोकरी आणि सुरक्षा आहे. परत आपल्या गावी जावेसे वाटत नाही. उलट घरातील लहान भाऊ बहिण पण इकडे यावेत. मुलींसाठी खूपच चांगली जागा आहे. शिवसेना आणि मनसे मुले कधी कधी त्रास होतो पण दुर्लक्ष करायचे. राजकारणी सगळे सारखेच.
गुजरात - शिक्षणाला आणि नोकरीला चांगले. पैशांनी सगळ्या गोष्टी होतात. मराठी आणि गुजराथी जवळ पास सारखी असल्याने बोलायला, समजायला त्रास होत नाही. मुंबई आमचीच आहे. ( गुजराथी लोकांची). आमच्या (business ) मूळे तुम्हाला नोकरी मिळते. शिवाजी राजा हा चोर होता. त्याने आमची सुरत लुटली.
बंगाल- कोलकत्ता पेक्षा महाग आहे पण तिकडे जास्त नोकर्या नाहीत. शिवसेना मनसे नालायक
कानडी-तेलुगु - तुमच्या पेक्षा जास्त नोकर्या आमच्या कडे आहेत. काही दिवस इथे काम करून परत banglore / हैदराबाद ला जाणार. मराठी लोक चांगले असतात.
तमिळ- केरळी - शिवसेना - मनसे नालायक आहेत. महाराष्ट्रात नोकर्या भरपूर आहेत. आमचे पण खूप लोक आहेत. मराठी लोक कधी कधी चांगले तर कधी कधी नालायक पणे वागतात.

>>>>>>...>>>>>> आणि उत्तर भारतात राहणाऱ्या अनेक मित्रांचे विशेषतः मैत्रिणींचे अनुभव ऐकून मला महाराष्ट्र (सगळ्याच दृष्टीने) तुलनेने खरंच किती चांगला आहे असा साक्षात्कार झाला! <<<<<<<<<<<<<<<<<<<<<

मलापण अगदी हाच साक्षात्कार झाला..

>>>>>>>>>>>>>>>>>>> शिवसेना - मनसे नालायक आहेत <<<<<<<<<<<<<<<<<<<

हे त्यांचे मत असतेच आणि सोबत हि पण एक भावना मनात त्यांना बोचत असते कि 'आपल्याकडे (म्हणजे त्यांच्या राज्यांत) अशी आपली अस्मिता जपणारे पक्ष का नाहीत. आपले तर सगळे चोरच चोर आहेत. :D'

@ राज
इतक्या दिवसांची इच्छा - "महाराज जन्माला यावेत पण दुसर्‍यांच्या घरात", >>> अनभिज्ञ
@झक्की
मी गेले ५ वर्षे मुंबईत राहिलो आहे. आणि मला मुंबई शहर खूपच आवडले. पण माझे statement हे जनरल होते, की कोणत्याही शहराचे प्लस, निगेटीव्ह points असतातच

पुण्याबद्दलही माझे हेच मत आहे, गेले दीड वर्ष पुण्यात राहतोय, अक्षरशः बोअर झालोय.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बाहेर पडतो, तर पहिला प्रश्न मनात येतो, आता जायचं कुठे ? करायचं काय ? कारण almost सर्व पुणे explore करून झालंय. (किती छोटे आहे पुणे)
जवळ-जवळ सगळ्याच restaurant मधील मेन्यु कार्ड सेम (नॉर्थ इंडियन फूड फार रेयरली चांगल मिळत, साउथ इंडियन फूड मी लंच, डिनर साठी खाऊ शकत नाही, महाराष्ट्रीयन फूड restaurant मध्ये जाऊन खाण्याची इच्छा नसते), रिक्षावाले- बसवाले यांची अरेरावी. घरमालकाचा( किंबहुना आजूबाजूच्या प्रत्येकाचाच) नको इतका interference. overall पसरलेले orthodox वातावरण.
अशा चिक्कार गोष्टी अनुभवतोय
नाही म्हटलं तर केपी, कल्याणी नगर, विमान नगर जर बरे आहे, पण ते माझ्या घरापासून थोड लांब असल्याने रोज जाणे होत नाही.

@ नावात काय
मुंबई, पुणे सेफ आहे. रात्रभर धिंगाणा घालता येतो. >>>> पुण्यात रात्रभर धिंगाणा घालता येतो ??? Uhoh
(एकदा अपाचे मधून परत येत असताना, पोलिस सोडून रस्त्यावरच्याच दहा लोकांनी हटकल, घरी परत आलो तर watchman ने विचारलं, जिना चढून वर जात असताना घरमालकाने चार सल्ले दिले.)

हे सर्व माझे वैयक्तिक मत असल्याने कुणी तुटून वगैरे पडायची गरज नाही Happy

>>रस्त्यावरच्याच दहा लोकांनी हटकल, घरी परत आलो तर watchman ने विचारलं, जिना चढून वर जात असताना >>घरमालकाने चार सल्ले दिले.

यामुळेच पुणे सेफ आहे .. कळ्ल ??

डिसेंबर २०१२ साली कोडई कॅनॉल, मुन्नार ला जाण्याचा योग आला होता. कोडईला फिरताना तामिळ भाषेतला फ्लेक्स ज्यावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि श्रध्दांजली होती. मुन्नार मध्ये सुध्दा असेच फ्लेक्स पहायला मिळाले.

बाळासाहेब फक्त मुंबईतच/ महाराष्ट्रातच प्रसिध्द नव्हते हे तेव्हा समजले.Balasaheb3.png

@नितीनचंद्र
>>>>>>>>>>>>>>>>>> मुन्नार मध्ये सुध्दा असेच फ्लेक्स पहायला मिळाले. <<<<<<<<<<<<<
मी सुद्धा साधारण त्याच काळी दक्षिण भारत फिरलो. खूपच ठिकाणी असे बोर्ड पाहायला मिळाले.
याबद्दल एकाला सहज विचारले असता त्याने छान उत्तर दिले, तो म्हणाला,
'बाळासाहेब सर्व गोष्टींवर (उदा. बाबरी प्रकरण) जितके रोकठोक आणि सहजपणे बोलत असत तसे इतर राजकारणी बोलण्यास धजावत नाहीत. आधी हजारदा विचार करणार आणि मग काहीतरी गुळमुळीत विधान करून सोडून देणार असेच लोक आमच्या वाट्याला आलेत. म्हणून आम्हाला बाळासाहेबांबद्द्ल अप्रूप वाटत.'

@ शाहिर,
"एकदा गुजरातमधे फिरून या , तिथे मराठी माणसांसाठी खास शब्द आहेत"

जरा आम्हाला सुद्धा कळुद्या की काय काय शब्द आहेत ते

माझ्या गावापासूनदहा बारा किमीवर एक खेडे आहे.तिथे शिवसेनेची शाखा आहे. बाळासाहेब, उधव, आणि आदित्यलेकराचा (सोबत इतर स्थानिक तमिळ नेते) यांचे फोटो असलेला भला मोठा फ्लेक्स लावलेला आहे. आज उद्या त्याचा फोटो टाकते. Happy ग्रामपंचायतीचे काही सदस्य शिवसेनेचे आहेत असंही समजलंय.

@नंदिनी
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> बाळासाहेब, उधव, आणि आदित्यलेकराचा (सोबत इतर स्थानिक तमिळ नेते) <<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

काय सांगता .. विशेषच आहे ..
परंतु तुमच गाव कोणत ते कळाल नाही. ते कृपया नमूद करता का ?

गुज्जूंच्या मते मराठी लोका घाटी आणि मॅनर्स नसलेली आहेत. बरेच गुज्जूं मराठी लोकांना दुजाभावाची वागणूक देतात. बहुधा सुरत लुटलेला राग अजून असावा

@शाहीर,
खरे आहे त्यांचा न आपला पिंडच वेगळा आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>> बहुधा सुरत लुटलेला राग अजून असावा <<<<<<<<<<<<<<<<<<
हे मात्र गुजरात्यांच मला हसूच आल. अस बोलतात जस त्यावेळी तिथे त्याचं स्वतःच राज्य होत . Lol Lol

प्रतिक कुलकर्णी, माझ्या गावाचे नाव इड्यांचीवाडी आणि मी तो फेक्स पाहिला ते गाव आतिपट्टीपुद्दूनगर.

@नंदिनी,
बापरे तामिळनाडू मध्ये म्हणजे आतातर मला अजूनच आश्चर्य वाटतयं. कारण तमिळ लोक त्यांच्या भाषेबद्दल फारच आग्रही असतात अस मी ऐकलंय..

@नाठाळ, असेल कदाचित Lol
त्यात महाराजांनी सुरत एकदा सोडून दोनदा लुटलीये. बिचारे गुज्जू ... Lol

माझी पत्नी दिल्लीची. २०११ साली तिनं मला पसंत केलं ते मी महाराष्ट्राचा म्हणजे संयमी आणि सभ्यच असणार या गृहीतकावरून. पुढे सहा महिने व्हिडीओ चॅटिंग करून आपला अंदाज योग्य असल्याची खात्री करून घेतली आणि मगच लग्न केलं, हा भाग वेगळा पण शादी डॉट कॉम वर माझा प्रस्ताव तिनं स्वीकारला तो मात्र या गृहीतकावरूनच. आणि हे गृहीतक तिनं बनविलं होतं लोकसभेतील शरद पवार यांचं वर्तन पाहून. समाजशास्त्राची अभ्यासक असल्याने ती नियमितपणे लोकसभेचं कामकाज थेट प्रक्षेपणातून पाह्यची. इतर राज्यांतले खासदार (सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही गटांतले) जेव्हा आरडाओरडा, गोंधळ करायचे तेव्हा शरद पवार मात्र कधीच संयम सोडून बोलल्याचं तिनं पाहिलं नाही. तसेच त्यांचे भाषण नेहमीच मुद्देसूद आणि परिणामकारक असे हे तिचे निरीक्षण. दिल्लीत शरद पवारांविषयी जनतेत आदर असल्याचे तिचे मत आहे.

राजधानीतील जनतेच्या मनात मराठी माणसाची प्रतिमा उजळविण्याच्या बाबत महाराष्ट्रातील नागरिक म्हणून मी शरद पवार यांचा (त्यांच्या राजकारणाचे इतर वादग्रस्त पैलू वगळता) नेहमीच आभारी राहीन.

माझी नोकरी खुद्द बिहार मधे आहे त्यातही बॉर्डर वर राहिल्यामुळे मला बिहारी , तराई बेल्ट मधले मधेसी लोकं अन नेपाळी लोकांचे विचार अन मते जवळून पहायला मिळाली. सर्वसाधारणपणे बिहारी लोकांत महाराष्ट्रात नोकरी करणे प्रतिष्ठेचे मानले जाते.पांढरपेशे लोकांत आयटी अन सर्विस सेक्टर मधे आपल्याकडे जे बिहारी काम करतात त्यात बिहारी कायस्थ जास्त असतात (सिन्हा, श्रीवास्तव इत्यादी) बाकी कैज़ुअल लेबर म्हणुन अन फॅक्ट्री वर्कर्स म्हणुन एसएमई उद्यमांत काम करायला येतात ते समस्त बिहारी ग्रामीण भागातले असतात !! एकदा तर मला पटना-जयनगर प्रवासात मस्त अस्खलित मराठी बोलणारा ड्राईवर भेटला होता."गणेश राय" नाव असलेला हा इसम अभिमानाने "साह्येब माला तिकडे समदे गण्या भाई म्हणत" असे सांगत होता 1993 ते 2012 होता मुंबईत मग मात्र म्हातार्या आई ची देखभाल करायला परत आला. बिहारी लोकं मराठी लोकांना खुप disciplined समजतात त्यांच्या नुसार मराठी माणुस घराबाहेर पडत नाही पण घरात राहुनही तो आळशी नसतो तर जबर मेहनती असतो शिवाय "सीधा हिसाब है साहब अगर हमरा घर मा इतना नौकड़ी होगा तो हम काहे बाहर जाएंगे" म्हणुन मराठी लोकं घराबाहेर न पडायचे समर्थन ही होते. इकडे रस्ते आताश्या खुप सुधरले आधी 130 किमी प्रवासाला साधारण पाच तास लागत!! महाराष्ट्रात आम्ही 130 किमी वरच्या गावात अपडाउन करुन नोकरी निभाऊ शकतो हे ऐकून हरखलेले लोक सहज सापडतात!! विद्यार्थ्यांत पुण्याची क्रेज जबरा होतकरु पोरे अभ्यास करुन अन करंटी केपिटैशन भरून ही तिकडे शिकायचे म्हणतात. त्याहुन मोठी गंमत म्हणजे आपल्याकडे इंजीनियरिंग मेडिकल च्या ट्रेंड्स मधे आपण खुप गोष्टी लक्षात ही घेत नाही ज्याचे कौतिक इकडच्या लोकांस खुप आहे उदा. अर्थशास्त्र शिक्षण घेण्यासाठी पुण्याचे गोखले इंस्टिट्यूट फॉर पॉलिटिकल इकॉनमी , मुंबई चे टाटा इंस्टिट्यूट ऑफ़ सोशल स्टडीज, आरबीआय द्वारा संचालित आयजीआयडीआर इत्यादी, शिकलेले लोकं महाराष्ट्र हा सामाजिक बदल लवकर एक्सेप्ट करणारा असे मानतात, सर्वाधिक मजेशीर म्हणजे माझे अस्खलित अन बिना मराठी एक्सेंट चे हिंदी ऐकून लोकांना फार नवल वाटते ! मग हळूच मी नागपुरकडचा आहे असे सांगितले की उलगडा झाल्यासारखे स्माइल देतात अन नागपुर मधे आपल्या असलेल्या नातलगाचा उल्लेख करुन नागपुर च्या स्वच्छते ची अन सौंदर्याची तोंडभरून तारीफ करतात अजूनही बरेच काही आहे ते अन नेपाळी लोकांची मते अन मजा परत कधी

@प्रशू
>>>>एकदा अपाचे मधून परत येत असताना, पोलिस सोडून रस्त्यावरच्याच दहा लोकांनी हटकल, घरी परत आलो तर watchman ने विचारलं, जिना चढून वर जात असताना घरमालकाने चार सल्ले दिले.>>>

रात्रभर धिंगाणा घालता येतो म्हणजे तो बाहेरच पाहिजे असा नाही. तर कोणाच्याही घरात एकत्र जमून धिंगाणा (?) घालता येतो. तसेही पुण्याच्या उपनगरात बाणेर, बावधन, केपी, विमाननगर, मगरपट्टा इकडे पोलिसांचा त्रास कमी होतो. झाला तरी पैसे देऊन सुटता येत.

Pages