Dholl Puri of Mauritius

Submitted by दिनेश. on 23 March, 2015 - 05:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
६/८ पुर्‍या होतील
माहितीचा स्रोत: 
प्रत्यक्ष बघितलेय आणि चाखलेही आहे.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे या ढोल पुरी वर अजिबात डाग पडलेले आवडत नाहीत लोकांना. ती फुगलेली व व्यवस्थित भाजलेली असते पण भाजल्याचे डाग नसतात.

ही तर दाल पुरी
मी बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सकाळचा नाश्ता म्हणून अनेकदा खाल्ली आहे. बरोबर बटाट्याची रस्साभाजी देतात. एकदम तोंपासु आणि पोटभरीचं प्रकरण.
पण ही पाकृ नक्की बंगालीच आहे का हे मात्र माहित नाही.

अधिक शोधाशोध करता ही बंगाल-बिहार या भागातली एक पारंपरिक पाकृ आहे असे दिसते. या भागातून मॉरिशसला स्थलांतरित झालेल्या लोकांनी हा पदार्थही तिकडे नेलेला दिसतो आहे Happy

वरदा, बंगाली किंवा भोजपुरी असणार हा प्रकार मूळात.. मॉरिशियस मधे तिथूनच लोक गेले होते. त्यांची अनॉफिशियल नॅशनल डीश आहे ही.

बंगाल-बिहार या भागातली एक पारंपरिक पाकृ आहे असे दिसते >>
मी एका बिहारी मित्राच्या बायकोच्या हातची खाल्ली आहे. पण तीने मुगाची डाळ वापरली होती. आणि राजम्या बरोबर खाल्ली होती. तिच्यामते तो खास बिहारी पदार्थ होता. Happy

दिनेश, फोटो मस्त.

बिहार च्या दक्षिण पश्चिम पट्टयात (आराह , भोजपुर, बक्सर) हा पदार्थ प्रसिद्ध आहे त्याला इकडे सुद्धा "दालपुड़ी" असेच म्हणले जाते, जसे दिनेश दा ने सांगितले मॉरिशस मधे साखर खुप होते ते काही आजचे नाही ब्रिटिश राज्यकर्ते लोकांनी सर्वप्रथम इथे उसाचे कमर्शियल फ़ार्मिंग सुरु केले होते व् लागवाड़ी वर मजूर म्हणून बिहारी /पूर्व युपी मधले मजुर नेले होते त्यांच्या सोबत हा पदार्थ गेला. सूरीनाम मधे जिथे भारतीय भोजपुरी लोक भरपूर आहेत तिकडे पण असल पदार्थ मिळतो बहुतेक एक

धन्यवाद..

मला नेहमी हे जाणवतं, मॉरिशियस काय, सुरिनाम काय, त्रिनिनाद काय कि पूर्व आफ्रिका काय. भारतीय मजूंरांना तिथे जबरदस्तीनेच नेण्यात आले असणार. आपली माणसं, देश सोडून जाणे त्यांना सोपे नक्कीच गेले नसणार..

पण अपार कष्ट करून त्यांनी ते देशच नव्हे तर स्वतःलाही तिथे वसवले. त्यांना भारताबद्दल प्रेम, जिव्हाळा आहे पण त्यांच्यापुरता भारत त्यांनी तिथेच निर्माण केलाय. अनेक जण तर कधी भारतात आलेही नाहीत. पण त्यांचे खाण्याचे पदार्थ असोत कि सण असोत, त्यात भारत दिसतोच.

मस्त व सोपा प्रकार वाटतोय... गुजराथी मत्रीणीकडे पुपो ची डाळ शिजवली की अर्ध्याची तिखट पोळी करतात त्यात बडीशोप, ओवा, आलं हि. को घालतात.

त्रिनिदाद, गायनीज ची पण फेमस रेसीपी आहे. पुरणपोळी ला मागे टाकेल इतकी मऊ आणि तलम असते.
ते मैदा वापरतात फक्त.

तिथे फार पटापट लाटत असतात स्टॉलवरच्या बायका किंवा पुरुषही. पण त्यात सरावाचा भाग जास्त आहे. आपल्याला ( निदान मला तरी ) थोडे काळजीपुर्वक लाटावे लागेल.

वा मस्तच. मी हि रेसिपी "फूड सफारी" या शोमध्ये पाहिली आहे.
तुम्हाला फणस पोळी किंवा फणसाचे सुकवलेले वेफर्स इत्यादी फणसापासुन तयार होणारे पदार्थ कसे करायचे माहित आहेत का ? असल्यास कृपया रेसिपी द्याल का ?

फणसपोळीसाठी बरक्या फणसाचे गरे घेऊन ते मिक्सरमधून काढायचे. ताटाला तेलाचा पुसटसा हात लाऊन त्यात तो रस ओतायचा. मग ते ताट कडकडीत उन्हात ठेवायचे. दोन दिवसांनी पोळी सोडवून उलटून टाकायची. एकूण चार दिवसात छान वाळते. अशी वाळवलेली पोळी वर्षभरही टिकते.

वेफर्स साठी कापा फणस घ्यायचा पण तो पुर्ण पिकलेला नसावा. त्याच्या गर्‍याचे लांबट तुकडे करायचे. मग ते खोबरेल तेलात तळून घ्यायचे ( तेल फार लागत नाही ) आणि तेल निथळून भरुन ठेवायचे.

वॉव सोबत वांग्याची भाजी .. यम्मी लागत असणार .. टू डू लिस्ट मधे ही पाकॄ पन.. :).
एक विचारू का ?
एवढ्या वेगवेगळ्या डिशेश आजपावेतो तुम्ही टाकल्या आणि नेहमीच्या पदार्थांचे व्हेरिएशन्स पन आहेतच.. दिनेशदा मग तुम्ही त रोजच वेगवेगळा पदार्थ करून खात असणार न.. Happy .. नै तर आमच आहेच आज काय तर वरण भात पोळी भाजी .. उद्या काय तर पोळी भाजी वरण भात .. परवा काय तर जर्रा चेंज .. पोळी भात भाजी वरण ..

हो टीना,

मी सहसा एखादा पदार्थ निदान महिनाभर तरी रिपीट करत नाही. पण रोजचे ४ प्रकार नसतात, दोनच पदार्थांवर किंवा कधी कधी वन डीश मील वर भागवतो.

रविवारी ३/४ भाज्या करुन ठेवतो. त्या आठवडाभर पुरतात. रोज चपाती / भात किंवा घरचा ब्रेड असतो.

पण रोजचे ४ प्रकार नसतात, दोनच पदार्थांवर किंवा कधी कधी वन डीश मील वर भागवतो. >> पुण्यात माझे पण हेच हाल असतात .. पण मला एकटीसाठी बनवण जाम जिवावर येत Sad .. असो.. पण असेच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाकॄ टाकत रहा.. मी घरी गेली कि त्यांच्यावर याचे प्रयोग करत राहते Proud

अरे! आम्ही मॉरिशस ला गेलो असताना लोकल खाद्य शोधण्याचा प्रयत्न केला पण एक चिकन शवर्मा (जो मला खाता आला नाही) आणि छोटा गुलाबी पेरू सोडून काहीच दिसलं नाही! खूपच इंटरेस्टिंग प्रकार आहे!

गायू, चिकन शेवरामा मेडीटरेनियन प्रकार आहे. खरे तर त्यात चिकन वापरणे म्हणजे प्रचंड कॉम्प्रोमाईज आहे, तिथे एक विशिष्ठ "मोठा" प्राणीच हवा.

मॉरिशियस मधे हि ढोल पुरी, किंवा नुसतीच रोटी, भजिया, दालवडे वगैरे खावेत. वेगवेगळी लोणची पण खासच असतात त्यांची.

Pages