ओल्या लाल मिरचीच्या ठेच्यातले लिंबाचे लोणचे (फोटोसह)

Submitted by सारीका on 19 March, 2015 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

**जानेवारी ते मार्च २ महीने बाजारात कमी तिखट असणार्‍या ओल्या लाल मिरच्या मिळतात, त्यामुळे हे लोणचे याच दरम्यान केले जाते.

**लोणच्यासाठी लागणारा वेळ हा १५ दिवसांचा आहे, वर मी फक्त फोडणी करुन ती थंड करुन लोणच्यात मिसळण्याचा वेळ दिला आहे. प्रत्यक्ष फोडणीचा वेळ हा ५ मिनीटाचा आहे.

साहीत्यः

एक किलो लिंबु

अर्धा किलो मीठ

एक किलो ओल्या लाल मिरच्या (तिखटपणा कमी असलेल्या)

धणे आणि जिर्‍याची पूड प्रत्येकी अर्धी वाटी

एक वाटी आलं + लसूण पेस्ट

फोडणीचे साहीत्यः

एक वाटी शेंगदाणा तेल

२ चमचे मोहरी

१ चमचा जिरे

हिंग आवडीनुसार (फोडणी पुरता)

क्रमवार पाककृती: 

एक किलो लिंबू धुवून चांगले कोरडे करुन त्याच्या प्रत्येकी चार फोडी कराव्यात.
या फोडी एका पातेल्यात घेऊन वर सांगितलेल्या मीठापैकी पाव किलो मीठ चोळावे.
हे मिश्रण रोज एकदा चमच्याने ढवळावे. असे १५ दिवस करावे.

१५ व्या दिवशी ओल्या लाल मिरच्या आणुन त्या चांगल्या धुवुन कोरड्या कराव्यात, त्याची देठं काढुन घ्यावीत, एखादी सडली पिचलेली मिरची असेल तर ती काढुन टाकावी.
उरलेल्या पाव किलो मीठाबरोबर मिक्सरमधे वाटुन ओल्या मिरचीचा ठेचा करावा. अगदी फाइन पेस्ट करायची आहे.
यात अजिबात पाणी वापरायचे नाही.
आता हा ओल्या मिरचीचा ठेचा, धने जिरे पुड आणि आले + लसूण पेस्ट फोडींमधे मिसळावे.
.सर्व जिन्नस नीट मिक्स करुन घ्यावेत.
एक वाटी तेलाची फोडणी करुन त्यात मोहरी जिरे हिंग घालावे, फोडणी पुर्ण थंड करुन लोणच्यात मिसळावी.
लोणचे कालवुन घ्यावे.

हे तयार लोणचे Happy

IMG_1045.JPG

हि लिंबाची फोड (यम्मी Happy )

IMG_1046.JPG

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

१) मुळ कृतीचा वेळ १५ दिवसांचा आहे.

२)मिरचीचा ठेचा फ्रीज मधे ठेऊन नंतर लोणच्यात मिक्स केल्यास लोणच्याची चव आणि पुर्ण लोणचे बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे मिरच्या ताज्या घ्याव्यात.
३) मिरचीची चव बघुन मिरच्या घ्याव्यात, मिरच्या जर खुप जास्त तिखट असतील तर प्रमाण कमी करावे. फाईन पेस्ट करताना पाणी अजिबात वापरायचे नाही.

४) सासुबाई म्हणाल्या, मिरच्या आणुन फ्रीज मधे ठेऊन नंतर नॉर्मल टेंप्रेचर ला आणुन ठेचा केला तरी चालेल थोडा चवीत फरक पडेल पण त्यानंतर लोणचं फ्रिजमधेच ठेवावे लागेल.

५) वरील पद्धतीने केल्यास लोणचे खराब होत नाही.

६) १५ दिवसांतच लिंबाच्या फोडी चांगल्या मुरतात, नरम होतात.
त्यामुळे लोणचे लगेच खाण्यालायक होते.

उपवासाला न चालणारे जिन्नस वगळता उपवासाचे लिंबाचे लोणचे देखिल बनवता येते.

माहितीचा स्रोत: 
नवर्‍याची आत्या (तेलंगणा खासीयत)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स ऑल Happy

प्रभा खुप जास्त मुरलेल्या लोणच्यातही मिरची ठेचा मिक्स करता येईल.
मी करुन नाही बघितले पण थोडेसे करुन बघ चव आवडली तर अजुन वाढव. Happy

http://cdn1.maayboli.com/files/u30245/IMG_1045.JPG

.......http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/big-drooling-smiley-emoticon.gif

Lol

खरच तोंडाला पाणी सुटले. करून बघते
पण थोड्या प्रमाणात प्रयोग करेन
एक किलो म्हणजे अंदाजे किती लिंब होतील ?
५-७ लिंबाचा अंदाज दे ना .

मृणाल, पाच सात लिंबं म्हणजे एक पाव होतील, त्यात एक पाव ओल्या लाल मिर्चीचा ठेचा, अर्धा पाव मीठ, पाव वाटी तेल फोडणी साठी, पाव वाटी आले लसूण पेस्ट, पाव वाटी प्रत्येकी धणे जिरे पुड
असे प्रमाण घेऊन बघ. Happy
काही अडलेच तर विपु कर
शुभेच्छा!

मी करून बघितलं, मस्तच लागतंय. आधी लिहिल्याप्रमाणे १५ दिवस वाट बघणे शक्य नव्हते, म्हणून लिंबाच्या फोडी अगदी बारीक केल्या. आठवड्याभरातच त्या मऊ झाल्या.

सारीकाकडच्या लोणच्याच्या बाटल्या आता रिकाम्या आहेत. त्यातच भरुन ठेवलेय.

Mazyakade 15 diwas thambayacha patience navhata. 7 diwas muravale ani methi dane takale fodanit. Awesome zalay lonach - 2015-04-26 14.36.49.jpg2015-04-26 14.40.05.jpg

Pages