कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१५ व प्रकाशन

Submitted by अ. अ. जोशी on 18 March, 2015 - 06:54
ठिकाण/पत्ता: 
विशाल सह्याद्रि सदन, सदाशिव पेठ, टिळक रोड, अभिनव कला महाविद्यालयामागे, हॉटेल विश्वजवळ, पुणे ३०.

कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१५ (वर्ष ६ वे)

नमस्कार,
या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी दिले होते. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. आई आणि शेतकरी (सकारात्मक) या विषयावरच्या काव्यरचना कवीनी पाठविल्या. त्यातील २५ कवींची अंतिम फेरी दिनांक २२ मार्च २०१५ रोजी, पुण्यातच सायंकाळी ५:३५ ते ८ यावेळेत होणार आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.
या वर्षी डॉ. प्रतिमाताई इंगोले तसेच ज्येष्ठ कवी श्री. जयंत भिडे यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे.

या प्रसंगी मातृलहरी या माझ्या आईवरच्या व आईच्या कवितांचा समावेश असलेल्या छोट्याशा काव्यसंग्रहाचे प्रकाशनही होणार आहे.

धन्यवाद.

आपला,

अ. अ. जोशी

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, March 22, 2015 - 08:05
Group content visibility: 
Public - accessible to all site users