Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या दोन भागांपेक्षा मला
आधीच्या दोन भागांपेक्षा मला कालचा ठीक वाटला. सुजय रॉकिंग, आशु मस्त पण मला काल पियु एवढी नाही आवडली, जेवढी आधी आवडली होती तेवढी.
ए मला सांगा ना काल काय काय
ए मला सांगा ना काल काय काय झाल?
अंजू होना पियू आता जरा जास्तच
अंजू होना पियू आता जरा जास्तच लाडावलेली वाटते ना
मुग्धटली, काही विशेष नाही ग सुजय आणि पियूची दिलजमाई झाली एकदाची. मी जरा पुढे ढकलतच पाहिला कालचा एपिसोड. शेवट क्यूट होता
भावा बहिणीची नोकझोक 
अंजली हो ना. सुजय तिला लहान
अंजली हो ना.
सुजय तिला लहान समजत होता ते आवडलं नाही तिला, मग मोठं समजायला लागला तेही आवडलं नाही पण का ते ती नीट दाखवू शकली नाही. Cofused होणं हे स्वाभाविक आहे असं होऊ शकतं पण ते तिला नीट दाखवता आले नाही असं माझं वै. मत.
सुजयने मात्र पूर्ण प्रोसेस नीट दाखवली, बहिणीचे मित्राच्या प्रेमात पडणं, त्यानंतर नक्की कसं वागू मित्राशी, मग बहिणीशी. परत बहिण मोठी झाली समजावं तर तेपण तिला आवडत नाहीये, मग वागायचं तरी कसं. सर्वच फार सुंदर पेललं सुजयने.
++११११
++११११
अरे बर्याच दिवसात कुणी
अरे बर्याच दिवसात कुणी लिहीले नाही यावर? कालचा भाग अपेक्षेप्रमाणे होता. मागे त्या रेश्माला एक मवाली त्रास देतो, तेव्हा आशु त्याला टॅक्सीमागे नेऊन जाम हाणतो आणी म्हणतो की मला परत हेच का करायला लावता आहात. यावरुनच आशुचा बॅकग्राऊन्ड कळला होता. तो प्रत्येक वेळेस पोलीसाना घाबरतो.
बाय द वे, ढिन्ग चिका! किन्जलचे खरे नाव कळले आणी आनन्दी आनन्द झाला. तिचे नाव सुवेधा देसाई आहे. आता ती गुज्जुच आहे की मराठी आहे हे आडनावावरुन नाही कळले. पण गुज्जु अॅक्सेन्ट मध्ये ती मस्त बोलते.
आशू मागे चोरी गेलेल्या
आशू मागे चोरी गेलेल्या पिशव्याही ( रेश्मा, मिनलच्या आणि इतरांच्याही) घेऊन आला होता... फक्त असला माणूस मुन्शिपालिटीच्या माणसाला घाबरतो..
काल आशुने डोळ्यातुन पाणी
काल आशुने डोळ्यातुन पाणी काढले. फार अप्रतिम अभिनय. तसा तो मला नेहेमीच आवडतो.
आजचा पण आवडला. सुजय
आजचा पण आवडला. सुजय मस्तच.
काहीही म्हणा पण आशु- कैवल्य असो वा सुजय- कैवल्य. कैवल्य कमीच पडतो त्यांच्यापुढे. पूर्ण सीन ते खाऊन टाकतात. हे माझं वै. मत.
अन्जू +१
अन्जू +१
अन्जु++१
अन्जु++१
अन्जु अनुमोदन.
अन्जु अनुमोदन.
त्या आशुने गुन्डाला कसे
त्या आशुने गुन्डाला कसे समजाविले? मला तो भाग पहायला मिळाला नाही.
आशुची बॅक्ग्राऊंड काय आहे ?
आशुची बॅक्ग्राऊंड काय आहे ?
कधी कधी सुजय पण ओव्हर
कधी कधी सुजय पण ओव्हर अॅक्टिंग करतोच
आशू मवली गुंड टाईप असतो
आशू मवली गुंड टाईप असतो त्याच्या बहिणीचंलग्न झालंय पण त्याला तिकडे येऊ देत नाहीत म्हणून हा इकडे एकटा राहतोय. अगदी सुरूवातीचे एपिसोड होते त्यात आशु राकेशला उलटा फॅनला टांगून स्वतःची सर्व कर्मकहाणी ऐकवतो. (आशूला घाबरूनच राकेश रेश्मासोबत नाटक करायला तयार होतो) तो अख्खा एपिसोड आशुने खाल्ला होता.
ओके, धन्यवाद नंदिनी. तो
ओके, धन्यवाद नंदिनी. तो पंख्याला टांगण्याचा भाग पाहीलायं, मला वाटलं त्याच्याबद्दल अजून काही दखवलं की काय. कारण प्रोमो मधे गुंड कैवल्यला मारत किंवा दरडावत असताना मागून आशु येतो ते पाहीलं होतं.
रेशमा ला गायब केलय का? नविन
रेशमा ला गायब केलय का?
नविन कोण आहे ती मुलगी, रिमा लागू ची मुलगी असावी असं वाटतयं.
प्लिज रेशमा परत ये...
हो ना, रेश्माने सिरीयल सोडली
हो ना, रेश्माने सिरीयल सोडली की काय्?:अओ:
ते नवीन पात्र नाय आवडल. मीनल त्या पात्राला घरात घेऊन येते तो पण भाग ओढुन ताणुन आणल्या सारखा वाटला.
आम्हालाही शंका येतेय की
आम्हालाही शंका येतेय की रेश्माने सिरियलमधून ब्रेक घेतलाय.
सध्या खूप रटाळ होत चाललीये ही
सध्या खूप रटाळ होत चाललीये ही मालिका.
रेशमा ला माहेरी पाठवलयं तर स्टोरी पुढे जायला खूप चान्स होता.पण तिला दाखवतच नाहीयेत..
मीनल त्या पात्राला घरात घेऊन येते तो पण भाग ओढुन ताणुन आणल्या सारखा वाटला.+१
रिमा लागुची मुलगी नाहीये ती.
रिमा लागुची मुलगी नाहीये ती. रिमा लागुची मुलगी मृण्मयी लागु, बयो आणि दोघात तिसरा सगळं विसरा ह्या मुविंमध्ये नायिका होती.
मी रेश्माला अजिबात मिस करत नाहीये, पण सिरीयल रटाळ होतेय हे बरोबर आहे.
मीनल त्या पात्राला घरात घेऊन
मीनल त्या पात्राला घरात घेऊन येते तो पण भाग ओढुन ताणुन आणल्या सारखा वाटला.+१
>> प्रचंड बोरींग. शिवाय कैवल्यने त्यावर उतारा म्हणून पुन्हा त्या भंगारवाल्याला उचलून आणणे. महाबोर फंडा.
सुजयच्या बहिणीला कसला आजार
सुजयच्या बहिणीला कसला आजार आहे ?
प्रचंड उत्साहात बघायला
प्रचंड उत्साहात बघायला सुरुवात केलेली मालिका आता बोअर होऊ लागली आहे. एक प्रकारचा तोच तोच पण येउ लागलाय.
प्रत्येक भागात कोणीतरी एक अति प्रचंड मुर्खपणा करणार. बाकीचे त्यावर आपल्या अकलेचे तारे तोडणार.बाकीचे त्यावर अफाट सोल्युशन देणार आणि सगळ्यात शेवटी सगळ काही गोड गोड.
मला कालचा भाग बरा वाटला.
मला कालचा भाग बरा वाटला. मध्येच कैवल्यचं 'अरे चिंटु' म्हणणं आवडलंच.
मीनलने काय बदल केलाय लुक मध्ये. काल बर्यापैकी स्लिम आणि चिकनी दिसत होती.
आजची डॉक्युमेंटरी बघायला मी
आजची डॉक्युमेंटरी बघायला मी उत्सुक आहे. नक्की रडणार सगळे.
त्या निकमआजी कशाला येतात. पार
त्या निकमआजी कशाला येतात. पार मी टीव्हीसमोरून उठते तेव्हा.
मंगळवारचा आवडला. वेरी नाईस
मंगळवारचा आवडला. वेरी नाईस एपिसोड. त्यात निकम आजी नाही आल्या म्हणून अजूनच आवडला. मला धास्ती वाटत होती आजींनी कॅमेरा दिलाय म्हणून त्यांना बोलाऊन आणतात का हे सर्व. हुश्श झालं मला. टची एपिसोड.
निकम आज्जींबद्दल +१
निकम आज्जींबद्दल +१
Pages