दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंगळवारचा आवडला. तिघांनी चांगलं काम केलं पण सुजयने शेवटी ५-७ मिनिटं जे भाव दाखवले ते बेस्ट. अक्षरशः डोळ्यांनी बोलला तो.

कालचा एपिसोड आवडला. मीनल आणि रेश्माचे बाबा यांच्यातील संवादाचा प्रसंग विशेष आवडला.
रेश्माचं घर पण आवडलं.

रेश्मा आणि तिच्या बहिणीला कुठलीही acting नीट जमत नाही. फार बोअर करतात. रेश्मा रडीच आहे नुसती, कशीही.

रेश्माचं घर दाखवलंय ते असतं काही मराठी शिरेलीत.

कालचा भाग टोटली गंडला होता. डब्बू चा इतिहास फार पूर्वीच झाला होता की ! चुकून जुनाच भाग लावल्यासारखं वाटलं.

अ‍ॅना डोक्यात गेली काल. कालचा भाग मुळीच आवडला नाही. लहान मुले कशी भान्डतात तसे चित्रण होते काल. आणी फुरन्गट्यामुळे अ‍ॅना काल सुजलेला टॉमेटो वाटत होती. म्हणल रेश्माने कैवल्यला गब्बु, तर काय झाले हिला?

मीनल नन्तर दिसली नाही, तिने अ‍ॅनाचे वागणे पाहीले असते तर एका फटक्यात तिला सरळ केली असती. ही येडी रेश्मा उगाच अ‍ॅनाला मस्का मारत बसली होती.

थॅन्क्स अन्जू. ते गब्बुच आहे.:स्मित:

हो ना! एवढं काय पजेसिव्ह व्हायचं म्हणते मी?

अमेयचं खरच लग्न झालंय की नाही? (मला अजुनही चान्स आहे का एखादा? Proud )

रिया, अमेय माझ्या मैत्रिणीच्या कॉन्टॅक्टमधे असतो. थांब तिला विचारायला लावते.

काल सुजयला त्या तीन कैदाशिणी किती छळतात पाहिलं का? Lol सुरवातीला मजा आली. पण सुजयचा एकदम इंग्रजी बोलणारा प्रेमी नाही बघवला. प्रेम किंवा सेक्सबद्दल बोलताना अचानक इंग्लिश सिनेमातला हीरो कशाला व्हायला पाहिजे कळत नाही. मुलींनी त्याच्याविरूध्द काढलेले मुद्दे बरोबर होते पण शेवटची सारवासारव ओढून ताणून वाटली.

शेवटचे डायलॉग तिघींना द्यायला हवे होते.म्हन्जे त्यांच्या नजरेतुन तो कसा प्रेमात पडन्यासारखा आहे हे सांगायला हव होत तिघीनी.फक्त एकट्या मिनल ला च बोलायला लावल. पियु मस्तच करते अ‍ॅक्टींग.आवडते ती मला.:)

अमेयचं खरच लग्न झालंय की नाही? >>>> रिया, घर पे जाके तुम गुगळ करलो>>>>>>>>> उसके बारेमे विकीपीडीया पे पढलो Lol

मला आवडली हा सुजय्-मिनल जोडी ;). असं वाटलं त्यांनी प्रेमात पडावं एकमेकांच्या. ती रेश्मा नको ब्वा सुजयबरोबर, अ‍ॅनाही नको.

http://timesofindia.indiatimes.com/tv/trade-news/marathi/High-TVT-surpri...

ए रीया त्याचे लग्न झालेले नाहीये ग.:डोमा::फिदी:

लहान मुले- मुली सुद्धा या सिरीयलच्या प्रेमात आहेत. बर्‍याच वेळा कथा आणी यातले कलाकार सुद्धा गन्डल्यासारखे होतात, पण श्री-जानी, जय -अदितीपेक्षा बरीच सुसह्य आहे आणी घरातल्या सव्र मेम्ब्रासकट पाहु शकतो हे विशेष.

येस! सुजय काल खूपच आवडला. शेवटी सारवासारव केली म्ह्णण्यापेक्षा त्या मुलींनी त्याची समजूत काढली म्ह्णता येईल. त्यांचा उदेश तसाही त्याला हर्ट करण्याचा नसतोच ना!

काल 'राजवाडे' ची टीम आली होती. एरवी एखाद्या सिनेमाच्या प्रमोशन वाले एपिसोडस बोर होतात. कालचा त्यातल्या त्यात कमी बोर झाला. खोकल्याच्या औषधाचा ओवरडोस झाल्याने जीभ जड झालेला सुजय ठीक-ठाक .

Pages