दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलापण त्या आजी नाही आवडत. कैवल्य आणि अनाचा किती छान झाला होता. आजीनैवजी दुसरं कोणीतरी हवं होतं. इथे मीनल चालली असती.

सुजयला फारच दिवस गायब केले बाबा >>> ए हो ना.. Sad

कालच्या एपिसोडाची टोटल कुणाला लागलेली दिसत नाही.. काहीच कमेंट्स नाहीयेत.. कुणाला लागली असेल तर मलाही कळवा इथे..

रार+१
मला वाटलं मलाच एकटीला बोअर झालं की काय. मग मी स्वतःला रुक्ष, साहिर न समजणारी वगैरे ठरवून मोकळी झाले.

रार अगदी अगदी. +१०० मला फक्त त्या निमित्ताने साहीरची गाणी ऐकायला प्रेरणा मिळाली यातच खुश होतो. Happy

साहिर-आज्जी-कैवल्य वाला एपिसोड परवा झाला ना ! ओढून ताणून केल्यासारखा वाटला..
काल सगळ्या मुली मिळून सिनेमा सिनेमा खेळल्या (मध्येच रंगपंचमी पण खेळल्या) !

कालचा मी पाहीला नाही. पण तो आजी आणी कैवल्यवाला एपि मात्र खरच बोअर होता.

मला माधुरी दिक्षीत आवडते, तिचे हसणे आवडते. पण तू मधुबालासारखी दिसतेस आणी तशीच हसतेस असे तिला कोणीतरी सान्गीतल्यापासुन ती जास्तच हसत असते. मग आवडती असली तरी डोक्यात जाते. ( जया भादूरी तशाच गैरसमजात होती पूर्वी) तसेच कैवल्यचे झाले असावे.

काही वेळेस तो जेव्हा हसतो तेव्हा दुसर्‍याला खिजवतो आहे असेच वाटते. विशेषता त्या साहिरच्या एपिमध्ये त्याने हसण्याचा अतीरेक केला. उगाचच हसत होता. रीया सॉरी ग.:फिदी: कैवुला नावे ठेवली मी.

काल तीन बायकांचा (प्रगम्भा, किंजल, निशा) Episode होता. हल्ली बरेच लोक गायब असतात. (काल आशू, सुजय, कैवल्य, राकेश सगळेच).

साहिरच्या एपिसोडची एकमेव जमेची बाजू म्हणजे भीमराव पांचांळेंचा उल्लेख झाल्याने, बर्‍यच काळात न ऐकला गेलेला भीमराव फोल्डर उघडला गेला Happy

सिनेमावाल्या एपिसोडची कॉन्सेप्ट चांगली होती - 'ह्याला ही व्यक्ती जबाबदार आहे' टाइप्स.
पण मटेरीयल फारच म्हणजे फारच बालीश आणि बेसीक होतं.

बाकी आशुशी अबोला - एपिसोड मधे - आशुनी हातात टेबललँप घेऊन जो सीन केलाय... टोटल जबरी .. दिल खुश हुवा हमारा Happy

सुजय मला रविवारी माटुंग्याच्या तामिळ मार्केट मधे दिसला होता. कुठल्यातरी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता. शूटिंग सुरु होते. नवीन कार्यक्रम मिळालेले दिसतेय..

Shanivar chya Epi madhle he bhari hote, mala aawadale:
"Mazya Reshma tai chya kunkawache dhani aani Nisha chya mani aslele mananiya Rakesh Bhauji Inamdar...."

हो, आशुचे पंचेस भारीच असतात नेहेमी. पण हल्ली स्टोरी काही नीट सुचत नाहीये ह्या लोकांना. पण काही पंचेस मधेच चांगले असतात म्हणून मी बघतेय.

मिसिंग सुजय. परत येतोय कि नाही Sad .

"Mazya Reshma tai chya kunkawache dhani aani Nisha chya mani aslele mananiya Rakesh Bhauji Inamdar...."..+१ Proud

पण हल्ली स्टोरी काही नीट सुचत नाहीये ह्या लोकांना.... अगदी..अगदी..

शनिवारच्या एपिसोड मध्ये आशु सोसायटी च्या अंगणात कचरा टाकतो तरी तो सफाई वार्डेन त्याला दंड करतो. असे सफाई वार्डेन खरच असते तर भारत आज एक स्वच्छ देश असता आणी स्वच्छता अभियान सुरु करावे लागले नसते.

असे सफाई वार्डेन खरच असते तर भारत आज एक स्वच्छ देश असता आणी स्वच्छता अभियान सुरु करावे लागले नसते. >>> प्रचंड अनुमोदन. अतिशयोक्ती वाटली ती..

Pages