सामाजिक उपक्रम २०१५ - आवाहन (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 9 March, 2015 - 10:45

नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे सहावे वर्ष. हा उपक्रम आता तसा आपल्याला नवा नाही. तरीही नवीन सभासदांसाठी थोडक्यात ओळख,
या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना वस्तुरुपात मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. त्याकरता देणग्या मागवण्याचे हे आवाहन आहे.

देणग्या मार्च-एप्रिल या २ महिन्यात मागवण्यात येतात. नंतर एकुण जमा झालेल्या निधीतुन संस्थांच्या प्राधान्यानुसार वस्तु खरेदी करुन त्यांना पोचवल्या जातात व त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते.

आतापर्यंत खालील संस्थांना या उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली,
शबरी, भगिरथ, सुमती बालवन, अपंग निवासी केंद्र सटाणा, सावली, मैत्री, गुरुकुल, कोथरुड येथील मुलींची अंधशाळा.

यावर्षी संस्थांना ज्या गोष्टींची गरज आहे ती यादी मागवुन इथेच पुन्हा लिहु.

सर्व संस्थांना जेव्हा देणग्या पोचतील तेव्हा त्या संस्था त्याचा उपयुक्त गोष्टींसाठी विनियोग करुन आपल्याला पोच देतील याची टीम सदस्यांनी खात्री करून घेतली आहे.

वरील संस्थांची माहिती व यावर्षीची गरज इथे वाचता येईल,
http://www.maayboli.com/node/53020#comment-3469660

मायबोली धोरणानुसार देणगीदारांना आपली मदत थेट संस्थेच्या ८०जी खात्यावर पाठवायची आहे.
पैसे जमा करण्याकरता सर्व संस्थांच्या बँक खात्यांची माहिती इथेच लिहिली जाईल.

गेल्यावेळेप्रमाणेच देणग्या खालील पद्धतीने स्विकारल्या जातील,
१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. ह्यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.
२) एप्रिलपासुन, किती देणगी मिळत आहे ते पाहुन सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतुन त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतुन काय सामान घेता येईल, ते कुठुन घेता येईल वगैरे ठरवले जाईल.
३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायचे हे त्यांना कळवण्यात येईल व मगच तुम्ही देणगी पाठवायची आहे. संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथे लिहिण्यात येईल.
४) देणगीदारांनी देणगी पाठवल्यावर स्वयंसेवकांपैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे. हे करणे फार महत्वाचे आहे नाहीतर आम्हाला त्याबद्दल काहीच कळु शकणार नाही.
४) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडुन खातरजमा केली जाईल.
५) सर्व जुळले की मग वस्तु विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.
६) वस्तु खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.

ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे बाकी काम उपक्रमाचे सभासद करतील.

संस्था अभारतीय चलन पण स्विकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी देखील संपर्कातुन कळवावे. जे मायबोलीचे सभासद नाहीत त्यांनी सुनिधीला lataismusic@yahoo.com या ईमेलवर कळवावे.

तर वर लिहिल्याप्रमाणे पहिले पाऊल म्हणुन फक्त आपण किती रक्कम देणगी देऊ इच्छित आहात ते आम्हाला संपर्कातुन कळवणे वा इथेच लिहिणे.

आपल्या मदतीकरता अनेक आभार.

सामाजिक उपक्रम टीम चमु - अकु, मो, स्वाती२, जिज्ञासा, मुग्धानंद, साजिरा, सुनिधी, जाई, कविन.

मनापासुन धन्यवाद.

अकुने सर्व संस्थांच्या खात्यांची माहिती इथे लिहिली आहे,
http://www.maayboli.com/node/53020#comment-3512287

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही देणगीदार अजूनही देणग्या देण्याच्या प्रक्रियेत आहेत. तर, अनेकांनी त्या त्या संस्थांना पैसे ट्रान्स्फर केले आहेत व त्याची त्यांना पावती, पोच इत्यादीही मिळत आहे.
मे महिनाअखेरीपर्यंत सर्व देणग्या त्या त्या संस्थांकडे जमा झाल्या असतील असा अंदाज आहे. नव्या शालेय वर्षाच्या दृष्टीने हे ठीकच आहे. पुढील कालावधीत गरज असलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यासंबंधीची माहिती संस्था देत राहातील व आम्ही ती माहिती इथे अपडेट करतच राहू. Happy

भगीरथ ग्रामविकासच्या झाराप येथील बँक अकाऊंटला ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करायला काहीजणांना अडचण येत आहे. त्यासाठी त्यांनी खाली त्यांच्या कुडाळ येथील बँक अकाऊंटचे तपशील पाठवलेत. वरही अपडेट करते आहे.

बँक ऑफ इंडिया, शाखा झाराप ऐवजी संस्थेच्या बँक ऑफ इंडिया, शाखा कुडाळ मधील बँक खात्याची माहिती देत आहोत. कृपया, या खात्यामध्ये रक्कम जमा करावी. धन्यवाद!

खाते नाव :- भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान.
बँक :- बँक ऑफ इंडिया, शाखा कुडाळ.
खाते नं. :- 147110210000004.
IFSC Code :- BKID0001471.

कोथरुड येथील अंधशाळेस देणगी द्यावयाची असल्यास :-

अकाऊंटचे नाव :
Pune blind school

Bank of Baroda, Branch: Wadia College Branch, Pune

(Indian Contribution)

Account No: 98100100000199

IFSC Code: BARB0WADCAM

MICR Code: 411012051

मी सावलीला online transfer करत आहे. अजुन काही प्रोसिजर आहे का? account details हेच आहेत का? नवीन असल्यास क्रुपया कळवणे. धन्यवाद.

राया, अकाऊंट डिटेल्स हेच आहेत. डोनेशन पैसे ट्रान्सफर केल्यावर त्याचे तपशील कळवाल का? तसेच, पावती कोणाच्या नावे हवी आहे, भारतातील पत्ता, ईमेल, फोन क्र. हेही तपशील आपल्याकडून लागतील. ते कृपया कळविणे. देणगीसाठी खूप खूप धन्यवाद!

Pages