भारत म्हणजे गल्लाभरू संधी (slumdog To Daughter of India)

Submitted by मी मी on 7 March, 2015 - 12:55

तिथल्या' लोकांना आमच्यावर सिनेमा बनवावा वाटतो …ते येतात मुंबई सारख्या शहरात कितीतरी चांगल्या गोष्टी असतांना नेमके धारावी सारख्या जगप्रसिद्ध स्लम मानल्या जाणाऱ्या परिसरात शिरतात आणि तिथली जेवढी घाण मिळेल, जेवढं वाईट मिळेल सर्व शूट करत फिरतात. मग त्यावर सिनेमा बनतो जगभरातली लोकं नाक तोंड मुरडत भुवया चढवत तो सिनेमा बघतात आम्ही मुसमुसत बघतो…. सिनेमा करोडोचा गल्ला जमवतो आणि आम्ही आमच्यावर फिरंग्यांनी सिनेमा बनवला आणि त्याला अवार्ड मिळाला म्हणून 'जय हो' म्हणत त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो.

मग दोन पाच वर्षांनी ते पुन्हा येतात … आमच्या देशात नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी सारखी माणसं असतांना त्यांचे जगप्रसिद्ध काम असतांना… आमच्या देशात अनेक यशस्वी स्वकर्तृत्व गाजवलेल्या महिला असतांना… ४ माणसांच्या विरुद्ध करोडो चांगल्या विचारांची माणसं असतांना किंवा झालंच तर डोक्युमेंट्री बनवता येईल असे अनेक विषय असतांना नेमक्याच दुखऱ्या मर्मावर बच्चकन बोट लावून जातात. आमच्या जाणीव जागृत होतात खपली गळून पडते जखम भळभळू लागते… मग गाजावाजा होतो. एका देशात पाहून संपणारी ती डोक्युमेंट्री सगळीकडे पाहिली जाते. जगभरातली लोकं नाक तोंड मुरडत भुवया चढवत ते बघतात आम्ही पुन्हा मुसमुसत बघतो….
आम्ही स्लम मध्ये राहतोय आमच्या देशात अंतर्गत समस्या आहेत पण त्या आमच्या आहेत…. रडत पडत सोडव्तोय पण आम्ही लढतोय… चोमड्यांनी बाहेरून येउन टाळूवरचे लोणी खायचा प्रयत्न करू नये… मुळात त्यांचे असे करणे आपण खपवून घेऊ नये… पण ऐकतंय कोण ??

जेव्हा जेव्हा अश्या परकीयांशी लढायची पाळी आलीय आम्ही आमच्याच स्वकीयांचे पहिले कपडे फाडायला लागतो…. दुर्दैवी आहे हे सगळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयी
अगदी अशाच प्रकारच्या विपर्यस्त प्रतिसादाची अपेक्षा होती. तुम्ही अजिबातच निराश केलं नाही. मी तुम्हाला हे सुद्धा नाही विचारणार की "आपल्या देशात निव्वळ झोपड्या आणि बलात्कारीच आहेत " हे फक्त कुठे लिहीलय हे दाखवा कारण तुमच्या विचारांची दिशा, पातळी आणि कुवत पाहता त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

काहींच्या टाळक्यात घुसत नाही, तर काहींच्या घुसूनही न घुसल्याचं नाटक करतात. दोघांनाही टाटा.

तुम्हाला सल्ला द्यावासा वाटला होता की देशभक्त असाल तर कुणाला सांगून, गूगल सर्च करून किंवा चीनमधे जाऊन तिथल्या नद्यांचे फोटो प्रसिद्ध करा आणि गंगेच्या अपमानाचा बदला घ्या.किंवामग वाराणसी, कानपूरला जाऊन या. दिल्लीत यमुनेचे स्वच्छ पाण्याचे फोटो प्रसिद्ध करा. पण आता जाऊच द्या.

तुमच्याकडूनही ह्याच प्रतिसादाची अपेक्षा होती कारण पुढे एखादी घटना कशी टाळता येईल बाहेरच्या लोकांशी डील करतांना काय करायला हवे काय नको अश्या सेन्सिबल चर्चा चालू असतांना तस काही न करता त्यांना काय दाखवायचे करायचे ते करू द्यावे आणि मग त्यांचा बदला त्यांच्याच स्टाइलने घेत फिरावे असे फिल्मी विचार ह्याच टाळक्यातून येऊ शकतात … हे म्हणजे पाकिस्तानने आतंकवाद पसरवून १०० मारले आता तुम्ही तुमच्या लोकांना आतंकवादी बनवून पाठवा आणि त्यांचे १००० मारा असे म्हणण्यासारखे आहे.

फक्त नावच बाळू नाहीये तुम्ही डोक्याने पण बाळू आहात तुमच्या विचारांची दिशा, पातळी आणि कुवत पाहता तुम्हाला एक सल्ला देते फार फिल्म पाहत जाऊ नका … त्यापेक्षा पुस्तकं वाचत चला म्हणजे बदला घेणे वगैरे असे स्टंट सुचणार नाहीत get well soon

हेरच्या लोकांशी डील करतांना काय करायला हवे काय नको अश्या सेन्सिबल चर्चा चालू असतांना >> कुणाच्या चर्चा ? कुनाच्या वतीने आणि कोण करणार ? तुम्ही चर्चा करणार म्हणून एक दिवस या लोकांनी अदृश्य व्ह्यायचं का ?

तुम्हाला सेन्सिबल या शब्दाचा अर्थ ठाऊक असेल असं वाटत नाही. जसे की तुमच्याशी वाद घालणे हे ही सेन्सीबल लक्षण नाही.

मयी नौटंकीबाज दिसता.
नाव बाळू आहे पण तुमच्या सारख्यांची दांभिकता नेटच्या पडद्यामागूनही ओळखतो.

हीच मानसिकता डोक्यात जाते.

आम्हाला खाऊ द्या, त्यासाठी तुमचं ओंगळवाणं दर्शन नको. किळस येते टाईप.
आणि हे सेन्सीबल चर्चा करायला जाणार.

सर्वांना सगळं माहीत असतं. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल मधे पाकिस्तानबद्दल छापून आलं की नाचणारे हेच आणि तेच भारताबद्दलचे अहवाल आले की एसीत बसून थयथयाट करणारे हेच.
हसू सुद्धा येईनासं झालय हल्ली.

देवाआआअ …. कुठून कुठून येतात हि अशी मंद लोकं … विषय काय आपण बोलतोय काय ??
कुठे भारतीयांबद्दल गैरसमज पसरण्याचा विषय आणि कुठे हा खाऊ द्या, ओंगळवाण दर्शन, किळस आणि काय काय

विषय समजायला आणि त्याची डेप्थ कळायला बाळा तुला मोठं व्हायला लागेल हो … जा तोपर्यंत नको उगाच तुझ्या बालबुद्धीला त्रास देऊ
बाहेर जाउन खेळ बघू …

Lol

असू द्या. तुम्हाला सांगून काही उपयोग आहे का ?
ज्यांना समजतंय त्यांच्यासाठी लिहीलय. तुम्ही नका टेण्शन घेऊ.
मुद्यात दम असता तर तुमची इतकी घरसण नव्हती व्हायला पाहीजे. सहानुभूती आहे(च).
काळजी घ्या.

अय्यो … घसरण माझी का तुमची ?? Rofl

आणि काही उपयोग नाही म्हणता आणि तरीही बिनबुडाचे विचार इथे थोपत जाता… फिल्मी काल्पनिक स्वप्नील दुनियेतील तुमचे ते बदला बीडला घेणाऱ्या विचाराचे इथे एकही माणूस (माणूस म्हणतेय हो मी) समर्थन करत नाही बर का …. तेव्हा घसरायला निदान वर तरी जायला लागतं तुम्ही आधीच तोंडाच्या भारावर चित आहात… आणि म्हणूनच मी बाहेर जाउन खेळ हो बाळ अस सजेस्ट केलंय नाहीतर मुसुमुसु रडतं ना बाळ … आणि नाक पुसायला रुमाल ने असेही सांगते आता

थोडे विषयांतर पण विषयासंदर्भानेच....
२००८ साली ताजवरील अ‍ॅटॅक नंतर कोणा मन्त्र्यांसोबत कोणी फिल्ममेकर आतील "परिस्थिती" पहायला गेले होते, अन त्यावरील गदारोळानंतर सदरहु मन्त्र्यांना बहुतेक राजीनामा द्यावा लागला असे पुसटसे आठवते. (काये नाऽऽ, जनसामान्यांची स्मरणशक्ति अतिशय तकलादू असते, मी जनसामान्यातीलच एक असल्याने माझेही तसेच आहे)
मायबोलिवरील एक्स्पर्टस नी कृपया या संदर्भाबाबत थोडी अधिक माहिती पुरविली तर बरे होईल....
>> ती भेट कुणी दिली होती?
>> तिच्यावर काय आक्षेप होते?
>> आक्षेपांना काय उत्तरे मिळाली?

limbutimbu,

मी ऐकलेल्या बातमीप्रमाणे विलासराव देशमुखांच्या घरी त्यांचा मुलगा रितेश याच्याकडे त्याचा मित्र रामगोपाल वर्मा आला होता. नेमक्या त्याच वेळेस मुंबईवर २६/११ चा हल्ला चालू होता. विलासराव यथोचित वेळेस ताजला भेट द्यायला निघाले. तेव्हा सोबत रितेशहि होता. रामगोपाललाही बरोबर घेतले. कारण त्यालाही उत्सुकता होतीच.

रामगोपाल बरोबर असल्याची ही माहिती फक्त देशमुख आणि उच्चस्तरीय वर्तुळ यांनाच होती. देशमुखांनी नंतर पत्रकार परिषद घेतली तेव्हा या बातमीचा क्षुल्लक उल्लेख केला. हा उल्लेख आवश्यकही नव्हता. फक्त सरकारी वाहिनी (दूरदर्शन) शी देशमुखांनी वार्तालाप केला असता तरी चाललं असतं. पण विलासरावांनी सुसंस्कृत स्वभावाला धरून इतर पत्रकारांनाही परिषदेत सामील केलं.

रामगोपालच्या सहभागावरून मग विलासरावांच्या हितशत्रूंनी काहूर माजवलं. तो देशमुखांसोबत चित्रपटासाठी पाहणी वगैरे करायला तिथे गेला होता इत्यादि वावड्या निरर्थक आहेत. मात्र प्रसंगच मुळी इतका गंभीर होता की विलासरावांना खुर्ची सोडावी लागली.

आ.न.,
-गा.पै.

गामा, सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.
आता विचार करता त्यावेळचा गदारोळही मला अस्थानीच नव्हे तर हितशत्रुंनी निमित्त साधून विलासरावांचा काटा काढला असे वाटते आहे (कदाचित निव्वळ मिडीयावरील प्रचार वाचून/पाहून/ऐकून त्यावेळचे माझे मत वेगळे बनलेले असेल - पण काही आठवत नाही बोवा).

सिनेमा करोडोचा गल्ला जमवतो आणि आम्ही आमच्यावर फिरंग्यांनी सिनेमा बनवला आणि त्याला अवार्ड मिळाला म्हणून 'जय हो' म्हणत त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो.>>>> आणि अमेरिकन संस्कृती कित्त्ती वाईट आहे, ते कसे संस्कारहीन लोक आहेत आणि आमचीच संस्कृती किती महान आहे, हे वगैरे असले किती सिनेमे आपण बनवले आहेत त्याचं काय? ते सिनेमा त्यांनी पाहिले तर त्यांच्या किती भावना दुखावतील? त्याची काहीतरी चाड बाळगायला नको?

आमच्या देशात नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी सारखी माणसं असतांना त्यांचे जगप्रसिद्ध काम असतांना>>> कैलाश सत्यार्थीचं नक्की काय काम आहे ते तुम्हाल अमाहित आहे? चाईल्ड ट्राफिकिंग हा विषय माहित आहे? त्या कामावर बनवलेली डॉक्युमेंट्री आजवर तुम्ही पाहिली आहे? जगप्रसिद्ध जाऊ देत, त्यांना नोबेल मिळायच्या आधी त्याचं नाव तरी माहित होतं का तुम्हाला?

(हे हेडर वाचून. आता प्रतिक्रिया वाचू)

मयी तुमचे म्ह्णणे काही अंशी योग्य आहे. पण असे सिनेमे किंवा डॉक्युमेंटरीज आपल्याकडे येऊन बनवायची इतरांची हिम्मत होते हा दोष कोणाचा आहे? आपण इतके दुबळे का आहोत ह्याचा विचार करायची वेळ आली आहे!!

आमच्या देशात अंतर्गत समस्या आहेत पण त्या आमच्या आहेत>>> मग डॉक्युमेंटरी बॅन न करता होऊ द्यायची प्रदर्शित आणि ताठ मानेनी सांगावे की ही आमची अंतर्गत समस्या आहे आणि ती आम्ही आमच्या पद्धतीने सोडवत आहोत. आणि जर ती डॉक्युमेंटरी भारतीय कायद्यांचे पालन न करता बनविली गेली असेल तर पुन्हा तो दोष कोणाचा आहे?

त्या बॅनमुळे उगीचच एका सुमार दर्जाच्या माहितीपटाला अपरिमीत प्रसिद्धी मिळाली >> +१

आंतरराष्ट्रीय दबाव आला की प्रश्न सोड्वायला बसायचे....तोवर चालते ते चालू द्या असे कसे चालेल? डॉक्युमेंटरी झाल्यावर डीफेन्स लॉयरला बार काऊन्सिलने नोटीस पाठविली, पण कोर्टात त्यांनी हिच विधाने केली असतील ते चालते का?? फक्त जगासमोर उघड झाल्यावर कारवाई करणार का आपण? डॉक्युमेंटरीवरून जेवढ्या हिरिरिने संसदेत चर्चा झाली तेव्हढ्याच कार्यक्षमतेने गुन्हेगारांना वेळेवर शिक्षा झाली असती तर आज ही वेळच आली नसती!!

डॉक्युमेंटरीवरून जेवढ्या हिरिरिने संसदेत चर्चा झाली तेव्हढ्याच कार्यक्षमतेने गुन्हेगारांना वेळेवर शिक्षा झाली असती तर आज ही वेळच आली नसती!!>>>>>>> तेच चुकतंय आणि चुकत आहेच चुकीचे समर्थन नाहीच करणार पण असे पुन्हा कुणाशी होऊ नये हि काळजी घेणे महत्वाचे आहे आणि अश्या प्रसंगांवरून सुक्या सोबत ओलेही पिसले जाऊ नये हि भीती …

आणि अमेरिकन संस्कृती कित्त्ती वाईट आहे, ते कसे संस्कारहीन लोक आहेत आणि आमचीच संस्कृती किती महान आहे, हे वगैरे असले किती सिनेमे आपण बनवले आहेत त्याचं काय? ते सिनेमा त्यांनी पाहिले तर त्यांच्या किती भावना दुखावतील? त्याची काहीतरी चाड बाळगायला नको?>>>>>>>>>>>>> Uhoh

for example ??

Lol यात अस काही होतं ?? मी तर समजत होते कि आपलीच लोकं जरा बाहेर पडली कि थोडं चांगलं दिसू लागलं कि कशी बहेकतात वाह्यात होत जातात अस दाखवलंय… आणि असे दाखवणे म्हणजे सुद्धा कसे चुकीचे आहे आपल्याच लोकांना नेहेमी घालून पडून बोलू नये दाखवू नये असेच वाटत आलाय हे बघतांना … नवाच दृष्टीकोन कळाला आज Biggrin

Pages