भारत म्हणजे गल्लाभरू संधी (slumdog To Daughter of India)

Submitted by मी मी on 7 March, 2015 - 12:55

तिथल्या' लोकांना आमच्यावर सिनेमा बनवावा वाटतो …ते येतात मुंबई सारख्या शहरात कितीतरी चांगल्या गोष्टी असतांना नेमके धारावी सारख्या जगप्रसिद्ध स्लम मानल्या जाणाऱ्या परिसरात शिरतात आणि तिथली जेवढी घाण मिळेल, जेवढं वाईट मिळेल सर्व शूट करत फिरतात. मग त्यावर सिनेमा बनतो जगभरातली लोकं नाक तोंड मुरडत भुवया चढवत तो सिनेमा बघतात आम्ही मुसमुसत बघतो…. सिनेमा करोडोचा गल्ला जमवतो आणि आम्ही आमच्यावर फिरंग्यांनी सिनेमा बनवला आणि त्याला अवार्ड मिळाला म्हणून 'जय हो' म्हणत त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो.

मग दोन पाच वर्षांनी ते पुन्हा येतात … आमच्या देशात नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी सारखी माणसं असतांना त्यांचे जगप्रसिद्ध काम असतांना… आमच्या देशात अनेक यशस्वी स्वकर्तृत्व गाजवलेल्या महिला असतांना… ४ माणसांच्या विरुद्ध करोडो चांगल्या विचारांची माणसं असतांना किंवा झालंच तर डोक्युमेंट्री बनवता येईल असे अनेक विषय असतांना नेमक्याच दुखऱ्या मर्मावर बच्चकन बोट लावून जातात. आमच्या जाणीव जागृत होतात खपली गळून पडते जखम भळभळू लागते… मग गाजावाजा होतो. एका देशात पाहून संपणारी ती डोक्युमेंट्री सगळीकडे पाहिली जाते. जगभरातली लोकं नाक तोंड मुरडत भुवया चढवत ते बघतात आम्ही पुन्हा मुसमुसत बघतो….
आम्ही स्लम मध्ये राहतोय आमच्या देशात अंतर्गत समस्या आहेत पण त्या आमच्या आहेत…. रडत पडत सोडव्तोय पण आम्ही लढतोय… चोमड्यांनी बाहेरून येउन टाळूवरचे लोणी खायचा प्रयत्न करू नये… मुळात त्यांचे असे करणे आपण खपवून घेऊ नये… पण ऐकतंय कोण ??

जेव्हा जेव्हा अश्या परकीयांशी लढायची पाळी आलीय आम्ही आमच्याच स्वकीयांचे पहिले कपडे फाडायला लागतो…. दुर्दैवी आहे हे सगळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी खरं! निर्भयाची डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी त्या आरोपीची मुळात भेटच नाकारली पाहिजे होती.म्हणे काय तर रेपिस्टची सायकॉलॉजी जाणून घ्यायची होती.

छान!
टिपीकल 'देशप्रेमी' लेख आहे.
कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं रहात नाही वगैरे वगैरे.
असो.
चर्चेसाठी शुभेच्छा!

त्या रेपिस्टच्या मुलाखतीसाठी परवानगी देणारे भारतीयच.
ती घेणार्‍यांनी काही लपूनछपून घेतली नाही ना मुलाखत?
अकलेचे दिवाळे काढत बोलणारे ते वकील भारतीय. त्यांना जबरदस्ती केली होती का कुणी इतकं घाण बोलायची?
उगाच बाहेरच्यांना नावे कशाला ठेवायची?

कोंबडं उघडू नये असे नाही पण ज्याचं कोंबडं त्यानंच उघडावं ना … कोंबडं कापून त्यांनी खावं आणि ह्यांनी का झाकलं म्हणून मग उघड्या बोंबा

मी डोक्युमेंट्री पाहिली आहे आणि मला त्यात भारताची प्रतिमा खराब होईल असे काही वाटले नाही.

भारतात बायकांची सुरक्षितता खूप वाईट परिस्थितीत आहे. निर्भयाच्या केस मुळे लोक कसे रस्त्यावर आले स्वतः हून, विशेषत: स्वत: मुली आणि बायका. प्रत्येक गोष्ट अशी झाकायची का ? त्या डोक्युमेंट्रीमुळे पहिल्यांदा कळले निर्भायाचे आई-वडील कसे दिवस काढत आहे.

मुंबई वर २६/११ हल्ला चे पण डोक्युमेंट्री आहे. ताज हॉटेल हे कसे सुंदर आलिशान आहे याची पण डोक्युमेंट्री आहे.

ऑफिसमध्ये मला २-३ लोक बोलले डोक्युमेंट्री पाहून कि जे झाले ते वाईट होते आणि त्यांना याचे वाईट जास्त वाईट वाटत होते कि ती डॉक्टर होती. कोणीच वकील काय बोलले , रेपिस्ट काय बोलला हे बोलत नाही आहे. लोकांना कळते कि क्रिमिनल बोलत आहे त्याने ना भारताची प्रतिमा वाईट होणार आहे,ना भारतीयांना विसा नाकारणार आहेत.

का भारतात अशी डोक्युमेंट्री नाही बनवली आहे ? का हे सारे असे Tv ads मध्ये दाखवत नाही आहे के जे झाले ते वाईट आहे आणि या पुढे खपवणार नाही. विचारू दे लहान मुलांना काय सुरु आहे कि फक्त fb वर निषेध करायचा.

निर्भाया नंतर खूप केसेस झाल्या मुंबई मिल, Uber taxi आणि खूप काही. कधी आपण याचा पाठपुरावा केला की या मुली कशा आहेत.

भारत गल्लाभरू वाटत आहे तर परदेशी शिक्षण, परदेशी काम, iphones आणि येणारा पैसा नाकारा.

जगभरातली लोकं नाक तोंड मुरडत भुवया चढवत ते बघतात आम्ही पुन्हा मुसमुसत बघतो … किती वेळ मुसमुसत आहोत ? आणि त्याने काय होणार आहे ??

बलात्कार ही अंतर्गत समस्या म्हणता येत नाही. बलात्कारीला मिळणारी शिक्षा ही अंतर्गत समस्या आहे. त्यावर ही फिल्म फारसे भाष्य करीत नाही.

बलात्कार करणार्‍या व्यक्तीची एक मुलगा, एक पिता, एक पती म्हणून ओळख ह्या फिल्म द्वारे समाजाला करून देण्यात आली आहे. शिक्षणाचा अभाव हे बलात्कारास कारणीभूत आहे अशी निरर्थक विधाने ही आहेत. हे पूर्णपणे अनावश्यक, उद्वेगजनक आणि खेदजनक आहे. फिल्म अजिबात आवडली नाही.

ह्या निमीत्ताने बलात्कार या विषयावर चर्चा पार्लमेंट, टी.व्ही वर इ घडावी का? नको, ती नियमितपणे दर २-३ महिन्याने घडावी.
ह्यावर बंदी हवी का? नको, उलट फिल्म्स कशा बनवू नये याचे उत्तम उदाहरण म्हणून अभ्यासक्रमात ठेवावी. Sad

Seemantini ++1
I thought it was mediocre documentary , example of bad journalism ! Commercialization of brutal rape, Commercialization of painful tears !
Baki nantar lihite, rumal.

सी, दीपांजली ला अनुमोदन! डॉक्युमेंटरी पाहिलेली नाही आणि पाहणारही नाहीये! मला अशा गोष्टींचा फार त्रास होत राहतो म्हणून. हे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणे जरी वाटले (मला ही वाटले थोडेसे) तरी त्यामुळे भारताची प्रतिमा खराब होईल अशा विचाराने तिच्यावर बंदी आणायची काहीच गरज नाही! हे असं एका डॉक्युमेंटरीवरून देशाची प्रतिमा घडत/बिघडत नसते! माझा अनुभव: मी slumdog millionaire पाहूच शकले नाही पण नंतर एका अमेरिकन मुलीशी बोलत होते तिला जय हो जाम आवडलं होतं आणि सिनेमा पण. बोलता बोलता ती म्हणाली ते कुठलं तरी शहर होतं सिनेमात, कोणतं होतं काय आठवत नाही! मला हसू फुटलं! She didn't care about where the story took place! It was just a cinema with an interesting story for her (As it should be).

महत्वाची गोष्ट ही आहे की आरोपीच्या वक्तव्याचे कोणत्याही प्रकारे ग्लोरिफिकेशन होऊ नये. त्याची किंवा वकिलांची ही इतकी विकृत मानसिकता कशी बनत जाते आणि ती बनू नये ह्या साठी कोणते उपाय करता येतील ह्यावर फोकस केलं पाहिजे. कारण जो प्रश्न डॉक्युमेंटरी मधून पुढे आला आहे तो खरा आहे आणि शहामृगासारखं वाळूत तोंड खुपसून बसून तो सुटणार नाही!

जिज्ञासा ++ शेवटचा परिच्छेद तर खूपच पटला.
डॉक्युमेंटरी पहिली.
हे सगळं खरं आहे की स्क्रीप्टेड आहे, का केलं इ. प्रश्न आहेतच. मला हे ग्लोरिफिकेशन वाटलं नाही. तिच्या आई/ बाबांचे विचार आणि त्यापुढे घृणास्पद तर्कट वकील/ खुनी/ त्याच्या घरचे अत्यंत किळसवाणे वाटतात.
सीमंतिनी, शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण इ. असं नाही म्हटलंय मला वाटत. स्त्री/पुरुष या मध्ये जाणीवपूर्वक समानता आहे हे मनावर बिंबवणे टाईप असा अर्थ घेतला मी. मुलाला ग्लासभर दूध आणि मुलीला घोटभर अशी सेकड क्लास treatment इ. तून अशी मानसिकता येते का?
हा प्रयत्न कदाचित नसेल आवडला, पण हे असं का होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात का होतंय ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी असेच अजून प्रयत्न व्हावे. बंदी बिलकुल घालू नये. त्या जखमेवर खपली धरलेली काढली तर ग्रेटर गुड साठी चांगलीच असेल. नंबर आणि बातम्या बघता, जखम आहे ह्यात डिनाय करण्यासारखं काहीही नाही. अर्थात तिच्या कुटुंबाला किंवा कोणालाही त्रास न देता प्रायव्हसी जपण्याची इच्छा असेल तर त्याचा मान राखून, काळ सोकावतो असं होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी घेऊन.

आम्ही स्लम मध्ये राहतोय आमच्या देशात अंतर्गत समस्या आहेत पण त्या आमच्या आहेत…. रडत पडत सोडव्तोय पण आम्ही लढतोय >> खरेच ?? कधि ? केव्हा ??
मग सुधारण्या पासून कोणी अडवले ? लोक जंगली आहेत. तर त्यांना जंगला चा कायदा लावा. an eye for an eye. तरच ते सुधारतील. पण हे करण्याची कोणाचीच ( अगदी ५६ इंची छाती वाला पण ) हिम्मत नाही.
सत्तेवर जेव्हा आला तेव्हा म्हणाला होता कि बरेच कायदे कालबाह्य आहेत. इंग्रज लोकांच्या पासून चालत आले आहेत. vague आहेत. इ .. इ .. पण मग ते सुधारणार कोण ? कधी ?

http://www.niticentral.com/2015/02/15/pm-modi-vague-laws-biggest-reason-...
PM Modi: Vague laws biggest reason for pendency of cases

सीमंतिनी पूर्ण सहमत

जिज्ञासा सहमत पण वाळूत तोंड घालून बसायचेच नाही आपण आपल्या त्या प्रश्नांचं काय करायचं ते ठरवायचे आपण काय ते करायचे जे काही करायचे आहे ते आपल्याला करायला हवं …. बाहेरच्यांनी नेमक्या आपल्या मर्मावर बोट ठेऊ नये

मी लिहिलंय आधी आमचंच चुकतंय आमचं चुकतंय पण म्हणून कुणीही येउन टपली मारून जाऊ नये आणि आपण ते खपवून घेऊ नये.

सुधारायचे आहे, बदल हवाय आणि हि सतत चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे पाच पन्नास बदल घडवले कि आत्ता सगळ्या समस्या संपल्या अस होत नाही ते निरंतर चालत राहणार आहेत हे समजून घ्यायला हवे एक एका समस्यांशी झगड्तांना आपण लगेच सर्वप्रथम आपल्या माणसांना आधी नंगे करतो त्याला इतके पाडतो कि अगदी चढाओढ लागल्यासारखे तुटून पडत असतो आणि तसे करण्यात आपण स्वतःला बुद्धिवादी समजतो हि शोकांतिका.

सत्तेवर जेव्हा आला तेव्हा म्हणाला होता कि बरेच कायदे कालबाह्य आहेत. इंग्रज लोकांच्या पासून चालत आले आहेत. vague आहेत. इ .. इ .. पण मग ते सुधारणार कोण ? कधी ?>>>>>>>>>>>>>>>>>>म्हणजे इंग्रजांच्या काळापासून ७० वर्षांपासून चालणारे कायदे ७ महिन्यात सगळेच्या सगळे लगेच बदलले पाहिजे का ? जादूची कांडी आहे न सरकार म्हणजे … अपेक्षा करतांना जरा विचार करायला हवा नाही का… आपल्याजवळ अजिबात धैर्य नाही म्हणून रात्रभऱ्यात नव्हत्याचे होते आणि होत्याचे नव्हते होत नाही…

बळी तो कान पिळी:

भारतातील टूरिझम उद्योग बंद पडावा,

भारताची प्रतिमा जगात मलीन व्हावी.

इसिसचे काय वाकडे केले ह्या लोकांनी? हिम्मत आहे का?

दुसरे काहीच जमत नसेल तर मग भारतियांची मानसिकताच बलात्कारास कारणीभूत आहे हे दाखवायचे.

आपण आपल्या त्या प्रश्नांचं काय करायचं ते ठरवायचे आपण काय ते करायचे जे काही करायचे आहे ते आपल्याला करायला हवं …. बाहेरच्यांनी नेमक्या आपल्या मर्मावर बोट ठेऊ नये>> मयी, दुर्दैवाने हे प्रश्न खूप universal आहेत Sad त्यामुळे कदाचित ह्या देशांच्या सीमा पार करून ह्या प्रश्नांवर अधिक चांगले उत्तर शोधता येईल. निदान ह्या बाबतीत तरी आपले आणि बाहेरचे असे काही करण्याची गरज नाही.

>>>खरेच ?? कधि ? केव्हा ??
मग सुधारण्या पासून कोणी अडवले ? लोक जंगली आहेत. तर त्यांना जंगला चा कायदा लावा. an eye for an eye. तरच ते सुधारतील. पण हे करण्याची कोणाचीच ( अगदी ५६ इंची छाती वाला पण ) हिम्मत नाही.
सत्तेवर जेव्हा आला तेव्हा म्हणाला होता कि बरेच कायदे कालबाह्य आहेत. इंग्रज लोकांच्या पासून चालत आले आहेत. vague आहेत. इ .. इ .. पण मग ते सुधारणार कोण ? कधी ? <<<

व्वा व्वा!

आपण कुठे एन जे ला असता का? मराठी ही एक भारतीय भाषा आहे म्हणजे आपणही बेसिकली भारतीयच असाल, नाही का? तसे असेल तर हे प्रश्न कोणाला विचारताय? आणि कोणत्या अधिकारात? तुम्ही जिथे राहता तिथे एकही बलात्कार झाला नाही का? एकाही मुलीकडे कोणी वळून वळून पाहिले नाही का?

हे काय चाललंय काय?

>>>त्यामुळे कदाचित ह्या देशांच्या सीमा पार करून ह्या प्रश्नांवर अधिक चांगले उत्तर शोधता येईल. निदान ह्या बाबतीत तरी आपले आणि बाहेरचे असे काही करण्याची गरज नाही.<<<

सॉरी! असहमत! ज्या साम्राज्यावर कधीकाळी सूर्य मावळायचा नाही त्यांच्या इलाक्यात बलात्कार होत नाहीत हे आधी सिद्ध व्हावे. Happy

(माफ करा सगळ्यांनीच, पण भाषणे देण्याचा हा विषय नाही असे वाटते) Happy

जिज्ञासा प्रश्न मांडू नये हा मुद्दा नाहीये … प्रत्येकवेळी मर्मावर बोट का हा प्रश्न आहे … कैलास सत्यार्थी ह्यांना नोबेल मिळाला अस काय काम केलंय त्यांनी कि एवढा मोठा मान त्यांना मिळाला ह्या प्रश्नाचं उत्तर नाही का कुणाला शोधावं वाटत ?? निर्भया प्रकरण हे प्रत्येक भारतीयांच्या जिव्हारी लागलेलं प्रकरण आहे… त्यां आरोपींची मुलाखत घेणे आणि त्यासाठी त्यांना ४०००० देऊ करणे आणि नंतर ते सगळं जगभर प्रसारित करणे म्हणजे दीडशे कोटी भारतीयांच्या विरुद्ध केलेली कृती नाही का वाटत ?

ते सगळं जगभर प्रसारित करणे म्हणजे दीडशे कोटी भारतीयांच्या विरुद्ध केलेली कृती नाही का वाटत ? >> नाही.

त्या फिल्म मध्ये आरोपी आता कुणीही बलात्कारी पीडीत महिलेला एकटी सोडणार नाही, आम्ही तरी सोडली इ इ म्हणतो. त्याला सबटायटल्स ही आहेत. हे जगभरातील कुठल्याही बलात्कार करणार्‍या व्यक्तीस निष्कारण 'आयडीयाज देणे' ठरते. तेव्हा अशा गोष्टी मांडणे फार संतापजनक आहे. बीबीसी सारख्या संस्थेने भारतातील लोकांची मानसिकता म्हणून हे दाखवले हे निराशाजनक आहे. त्याचे दूरागामी परिणाम सगळ्याच बलात्कार पीडीतांवर (स्त्री- पुरूष, भारतीय-अभारतीय) होवू शकतात हे भान ठेवायला हवे होते.

जिज्ञासा,

Happy

मी चेष्ट करत नाही. तुमचे हे विधानः

>>>निदान ह्या बाबतीत तरी आपले आणि बाहेरचे असे काही करण्याची गरज नाही.<<<

हे वाक्य तुम्ही सर्वात पहिल्यांदा अभि१ ह्यांना उद्देशून लिहायला हवेत ना? Happy

आणि ते झाल्यानंतर बीबीसीलाही सांगायला पाहिजेत नाही का? Happy

हा असा demeaning written/ mass media journalism करणे हा so cold developed countries मधल्या काही लोकांचा छंद असतो! (उदा. ते NY times मधलं भारताच्या मंगळयान मोहिमेवरचं कार्टून) तो भाग आपण सोडून देऊ . कारण कसं आहे एकदा चिडका बिब्बा नाव पडलं की सगळे चिडवायला येतात. सुदैवाने जगात भारताची प्रतिमा अजूनतरी तशी नाहीये. आपल्या देशात असलेली सांस्कृतिक विविधता आणि त्यातून जपली जाणारी सहिष्णुता ह्यामुळे आपल्याकडे अतिरेकी, मुलतत्ववादी एकांगी शक्ती अजून मूळ रोवू शकल्या नाहीयेत. ज्याची चिंता आज निम्म्या जगाला भेडसावत आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या ६७-६८ वर्षांत आपण एक समाज म्हणून ही सहिष्णुता मोठ्या प्रमाणात जपली आहे (जिला तडे गेलेच नाहीत असे नाही पण it never broke down) which is highly commendable!
जगातल्या सगळ्या देशांना जर माणसांच्या उपमा द्यायच्या ठरवल्या तर भारत देश मला एका ज्याची मुळे फार खोलवर गेली आहेत अशा गौरवशाली घराण्याच्या आणि ज्यांच्या शिरावर एका भल्या मोठ्या कुटुंबकबिल्याचे ओझे आहे अशा सुसंस्कृत आणि सुस्वभावी, आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय पण सुबत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या आणि लोकापवादाचे भय बाळगणाऱ्या दाम्पत्यासारखा वाटतो Happy हा असा भला मोठा खटला चालवायचा म्हणजे अनंत अडचणी आहेत मग एखाद्या श्रीमंत घरच्या माणसाने अहो तुमचे छप्पर गळते आहे असे सांगितले की कसे वाटते तसे अशी घटना घडली की आपल्याला वाटत राहते! चालायचेच! कूर्मगतीने का होईना पण सगळ्यांना बरोबर घेऊन आपण प्रगती करतो आहोतच ना, मग All is good!

ते कैलाश सत्यार्थींवर डॉक्युमेंटरी केली नाही ते बरेच झाले! नाहीतर छपराला पडलेले अजून एक भोक दिसले असते! सर्व देशांमध्ये Child trafficking च्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे गेली अनेक वर्षे! ज्याच्या विरोधात सत्यार्थी यांनी काम केले आहे/करत आहेत.

जिज्ञासा,

-१

सर्व वाचकांना आवडेलच अshyaa शैलीत शब्दबद्ध केलेला हा प्रतिसाद बेसिकली मयींच्या प्रश्नाचे उत्तर देतच नाही.

उदाहरणार्थः

>>>जगातल्या सगळ्या देशांना जर माणसांच्या उपमा द्यायच्या ठरवल्या तर भारत देश मला एका ज्याची मुळे फार खोलवर गेली आहेत अशा गौरवशाली घराण्याच्या आणि ज्यांच्या शिरावर एका भल्या मोठ्या कुटुंबकबिल्याचे ओझे आहे अशा सुसंस्कृत आणि सुस्वभावी, आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय पण सुबत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या आणि लोकापवादाचे भय बाळगणाऱ्या दाम्पत्यासारखा वाटतो <<<

असे वाटत असेल तर भारतातील ती एकच घटना जगासमोर इतक्या शंकास्पद पद्धतीने का आणण्यात आली?

भारतातील एखाद्या वाहिनीने यू एस किंवा यू के मधील क्राईम इतक्या जाणीवपूर्वक पद्धतीने जगासमोर का आणलेले नाहीत?

बेफि, मी अभि१ यांना उद्देशून काही म्हटले नाही कारण त्यांनी जो राजकीय रंग उगीच आणून ओतला आहे तो मला दुर्लक्षित करावासा वाटला.
BBC ला सांगता येत असेल तर मी जरूर सांगेन पण जर त्यांनी भारतातले सर्व कायदे पाळून ही डॉक्युमेंटरी बनवली असेल तर? कायदेशीररीत्या ह्या प्रकरणात बीबीसी दोषी आहे असे अजून माझ्या वाचनात आलेले नाही आणि त्यांनी डॉक्युमेंटरी कोणत्या विषयावर बनवावी हे सांगणारी मी कोण!

भारतातील एखाद्या वाहिनीने यू एस किंवा यू के मधील क्राईम इतक्या जाणीवपूर्वक पद्धतीने जगासमोर का आणलेले नाहीत?
Because we Indians are not (yet) that kind of people! And I wish we never will be! And the US/UK news channels are already doing that! तसा आपल्याकडेही थोडा थोडा सनसनाटी जर्नालिझम येतोच आहे Sad
असो, मला चर्चा भरकटवायची नाहीये!

बेफि, मी अभि१ यांना उद्देशून काही म्हटले नाही कारण त्यांनी जो राजकीय रंग उगीच आणून ओतला आहे तो मला दुर्लक्षित करावासा वाटला.<<<

त्या राजकीय रंगाशिवाय त्यांनी जो भारतीय असफलतेचा रंग आणला आहे त्याबद्दल एखादे वाक्य? चालले असते ना? Happy

BBC ला सांगता येत असेल तर मी जरूर सांगेन पण जर त्यांनी भारतातले सर्व कायदे पाळून ही डॉक्युमेंटरी बनवली असेल तर? <<< म्हणूनच बळी तो कान पिळी म्हणालो. भारतीय अश्या फिल्म्स बनवत नाहीत कारण भारतीय विकसनशील आहेत, विकसित नव्हेत.

कायदेशीररीत्या ह्या प्रकरणात बीबीसी दोषी आहे असे अजून माझ्या वाचनात आलेले नाही आणि त्यांनी डॉक्युमेंटरी कोणत्या विषयावर बनवावी हे सांगणारी मी कोण!<<<

समजा बीबीसी दोषी आहे असे तुमच्या वाचनात आले तरी त्यांनी काय करावे हे सांगणारे आपण कोण? नाही का? म्हणूनच हा प्रश्न देश टू देश पातळीवर हँडल केला जात असावा. Happy

>>>असो, मला चर्चा भरकटवायची नाहीये!<<<

अ‍ॅक्च्युअली ह्याच विषयावर चर्चा आवश्यक असावी असा माझा अंदाज आहे. Happy जे तुम्ही तुमच्या ह्या खाली कोट केलेल्या विधानात म्हंटलेले आहेत. Happy

>>>Because we Indians are not (yet) that kind of people! And I wish we never will be! And the US/UK news channels are already doing that! तसा आपल्याकडेही थोडा थोडा सनसनाटी जर्नालिझम येतोच आहे<<<

ह्या विधानातील हा भागः

>>>And I wish we never will be!<<<

तुमचे भारतीयत्व दर्शवतो. इतर व खासकरून प्रगत जग तसे नाही. ते चोचीच मारणार. अन्यथा ते ग्रेट कसे ठरतील? जगासमोर?

आपल्याकडे येत असलेला सनसनाटी जर्नॅलिझम हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. Happy

महत्वाची गोष्ट ही आहे की आरोपीच्या वक्तव्याचे कोणत्याही प्रकारे ग्लोरिफिकेशन होऊ नये. त्याची किंवा वकिलांची ही इतकी विकृत मानसिकता कशी बनत जाते आणि ती बनू नये ह्या साठी कोणते उपाय करता येतील ह्यावर फोकस केलं पाहिजे. कारण जो प्रश्न डॉक्युमेंटरी मधून पुढे आला आहे तो खरा आहे आणि शहामृगासारखं वाळूत तोंड खुपसून बसून तो सुटणार नाही! >>> +१

BBC नी सनसनाटी जर्नॅलिझम करुन आरोपीच्या आणि त्याचा वकिलाची विकृत मानसिकताचे ग्लोरिफिकेशन केले आहेत ज्याचामुळे आजुन अनेक जण हाच अपराध करायला मागे पुढे पहाणार नाही जे भारताला (कदाचित पुर्ण जगाला ) निस्तरावे लागेल. डॉक्युमेंटरी बनवणार्या महिलेने आपल्यावर अत्याचार झाल्याचे म्हटले होते. तिने तरी अश्या लोकाना त्याची मानसिकता जगापुढे थेवण्याची संधी द्यायची गरज न्हवती.
आरोपी आणि त्याचा वकिलाला प्लाट्फोर्म दिला तर अत्याचार वाढणार. त्यासाठीतर आतंकवादी लोकाची मुलाखात घेतली जात नाही. BBC मध्ये जर हिम्मत असेल तर त्याचा देशातिल पकडलेले आतंकवादी (जे मध्य आशिया मध्ये लढायला गेले होते ) त्याची अशीच मुलाखात घेउन दाखवावी आणि भारत सरकारला जे डॉक्युमेंटरी बघाय साठी जी कारणे दिली होती तीच कारणे त्याचा सरकारला द्यायचा प्रयत्न करावा.

आरोपी आणि त्याचा वकिलाची मुलाखत सोडुन बाकी डॉक्युमेंटरी ला विरोघ नाही, उलट स्वागतच आहे.

गेट्स फाऊंडेशन भारतात एड्सग्रस्तांसाठी कोट्यावधी डॉलर्सची चॅरिटी करते, त्यांच्या कार्याबद्दल तुमचे काय मत आहे?
तुम्ही बाणेदारपणे म्हणणार का आमच्या मर्मावर मलम लावायचा तुमचा काय हक्कं?

देशांचा प्रश्न येतो कुठे? ती दिग्दर्शिका काही ब्रिटिश सरकारची रिप्रेझेंटेटिव नव्हती, डॅनी बॉयलला ही काही राणीने पाठवले नव्हते.
तुम्ही WHO, UNICEF, UN च्या वेबसाईट्स एकदा बघा. ज्याबद्दल तुम्ही ईथे बोलत आहात त्या अणि तश्याच असंख्य चिंताजनक वाटाव्या अश्या विषयाबद्दलच्या याद्यांमध्ये भारताचा क्रमांक बराच वरचा आहे. किंबहूना भारतातल्याच अनेक समस्यांवर बेतलेली छायाचित्रे मेन पेज वर कायमच असतात. एखाद्या देशात मानवतेची, सुरक्षेची पायमल्ली होत असलेल्या सगळ्या विषयांबद्दल UN स्वतः शोधकार्य करते, डॉक्युमेंट्री करते आणि प्रकाशित सुद्धा करते. बर्‍याचश्या केसेसची सर्व माहिती आधीपासूनच सगळ्या जगासाठी ऊपलब्ध आहे. ह्या डॉक्यूमेंट्रीला सवंग प्रसिद्धी मिळाली म्हणून तुम्हाला ह्याबद्दल माहिती झाले ईतकेच. वेगवेगळ्या शोधकार्यांचा डेटा घेऊन बरेच फाऊंडेशन आणि संस्था भारतात येऊन त्या पिडीतांसाठी चांगले काम करीत आहेत ना?

एका बाजूला आम्ही वैश्विक शक्ती, जगाचे अध्यात्मिक गुरू म्हणून शेखी मिरवयची, आम्हाला ऑस्क,र नोबेल, क्रिकेटचा वर्ल्डकप मिळाला म्हणून कौतुक करून घ्यायचे , टाळ्या मिळवायच्या आणि त्याच टाळ्या वाजवणार्‍या हातांनी वाईट गोष्टींकडे बोट दाखवले की 'आम्ही आमचे बघू, तुम्हाला काय आमच्या घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणायचा हक्कं असा पवित्रा घ्यायचा.' हा दुटप्पीपण नव्हे काय्?
नाही तर तुम्ही ऊत्तर कोरिया सारखी घराची सगळी दारे बंद तरी करून घ्या.

वेगवेगळ्या शोधकार्यांचा डेटा घेऊन बरेच फाऊंडेशन आणि संस्था भारतात येऊन त्या पिडीतांसाठी चांगले काम करीत आहेत ना?
<<
छे छे!
अहो, ते धर्मप्रसारासाठी आलेले मिशनरी आहेत. कैच्याकै काय बोलता तुम्ही? पीडीतांसाठी चांगले काम म्हणे

मयी - तुम्ही डॉक्युमेन्टरी बघितली आहे?

तब्बल १६ तास गुन्हेगाराची मुलाखत झाली, परवानगी देताना सरकारने काही विचार केला असेलच ना? त्यान्ना या माहितीपटाची आणि त्या मागच्या कारणान्ची पुर्व कल्पना होती.

Pages