भारत म्हणजे गल्लाभरू संधी (slumdog To Daughter of India)

Submitted by मी मी on 7 March, 2015 - 12:55

तिथल्या' लोकांना आमच्यावर सिनेमा बनवावा वाटतो …ते येतात मुंबई सारख्या शहरात कितीतरी चांगल्या गोष्टी असतांना नेमके धारावी सारख्या जगप्रसिद्ध स्लम मानल्या जाणाऱ्या परिसरात शिरतात आणि तिथली जेवढी घाण मिळेल, जेवढं वाईट मिळेल सर्व शूट करत फिरतात. मग त्यावर सिनेमा बनतो जगभरातली लोकं नाक तोंड मुरडत भुवया चढवत तो सिनेमा बघतात आम्ही मुसमुसत बघतो…. सिनेमा करोडोचा गल्ला जमवतो आणि आम्ही आमच्यावर फिरंग्यांनी सिनेमा बनवला आणि त्याला अवार्ड मिळाला म्हणून 'जय हो' म्हणत त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो.

मग दोन पाच वर्षांनी ते पुन्हा येतात … आमच्या देशात नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी सारखी माणसं असतांना त्यांचे जगप्रसिद्ध काम असतांना… आमच्या देशात अनेक यशस्वी स्वकर्तृत्व गाजवलेल्या महिला असतांना… ४ माणसांच्या विरुद्ध करोडो चांगल्या विचारांची माणसं असतांना किंवा झालंच तर डोक्युमेंट्री बनवता येईल असे अनेक विषय असतांना नेमक्याच दुखऱ्या मर्मावर बच्चकन बोट लावून जातात. आमच्या जाणीव जागृत होतात खपली गळून पडते जखम भळभळू लागते… मग गाजावाजा होतो. एका देशात पाहून संपणारी ती डोक्युमेंट्री सगळीकडे पाहिली जाते. जगभरातली लोकं नाक तोंड मुरडत भुवया चढवत ते बघतात आम्ही पुन्हा मुसमुसत बघतो….
आम्ही स्लम मध्ये राहतोय आमच्या देशात अंतर्गत समस्या आहेत पण त्या आमच्या आहेत…. रडत पडत सोडव्तोय पण आम्ही लढतोय… चोमड्यांनी बाहेरून येउन टाळूवरचे लोणी खायचा प्रयत्न करू नये… मुळात त्यांचे असे करणे आपण खपवून घेऊ नये… पण ऐकतंय कोण ??

जेव्हा जेव्हा अश्या परकीयांशी लढायची पाळी आलीय आम्ही आमच्याच स्वकीयांचे पहिले कपडे फाडायला लागतो…. दुर्दैवी आहे हे सगळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्युमेंटरीवरील बंदीचा निषेध म्हणून एनडीटीव्हीने काल रात्री ९ ते १० या वेळात इतर कुठल्याही शोचं प्रसारण बंद ठेवून फक्त खालील चित्र ठेवलं होतं. हे आवडलं Happy
"We won't shout, but we will be heard." - सोनिया सिंग, एडिटर एनडीटीव्ही

nirbhaya.jpg

<चोमड्यांनी बाहेरून येउन टाळूवरचे लोणी खायचा प्रयत्न करू नये… मुळात त्यांचे असे करणे आपण खपवून घेऊ नये… पण ऐकतंय कोण ??

जेव्हा जेव्हा अश्या परकीयांशी लढायची पाळी आलीय आम्ही आमच्याच स्वकीयांचे पहिले कपडे फाडायला लागतो…. दुर्दैवी आहे हे सगळे>

स्त्रियांवरच्या अत्याचाराचा प्रश्न जागतिक स्वरूपाचा आहे. यात आतले आणि बाहेरचे काय?
रेपिस्ट जे बोलला, आरोपीचे वकील जे बोलले ते अगदी १६ डिसेंबरनंतरसुद्धा कोणीच बोलले नव्हते का? त्यातले 'मार्गदर्शक, नेते' म्हणवणारे नव्हते का? हे लाजिरवाणं सत्य ही डॉक्यु. समोर येईतो माहीत नव्हतं?

हे लोक फक्त भारतावरच डॉक्युमेंटरी बनवतात, अतिरेक्यांवर नाही असे म्हणणार्‍यांनी तशा डॉक्यु.पाहिल्या नाहीत इतकाच अर्थ निघतो.आय एस आय एस ने पत्रकारांचे शिरकाण केल्याच्या बातम्या पोचल्या नाहीत.

वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे बाहेरच्यांनी तुमच्या प्रश्नांत नाक खुपसायला नको असेल तर तुमची अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था कडीकुलुपात बंद करून ठेवा. कोणतीही परकीय मदतही घेऊ नका. यात फक्त चॅरिटीच्या नावाने होणार्‍या मदतीचा प्रश्न नाही.
बाकी भारतातील दारिद्र्याचेच तेवढे कलात्मक दर्शन घडवण्याच्या आरोपातून सत्यजित रायही सुटले नव्हते.

मी बघितली नाही, पण अनेकजणांची मते वाचलीत. मला तरी हा माहितीपट आताच निर्माण करावा आणि भारत सरकारने आक्षेप घेतल्यावरही तो प्रसारीत करावा, हे अजिबात आवडलेले नाही.
बीबीसी एक आब राखून होती. या संस्थेने असे करावे हे पण आवडलेले नाही.

भारतात चित्रीकरण करायचे म्हणजे रस्त्यावरच्या गायी, साधू, गारुडी वगैरे दाखवायचे असा एक मूर्ख पायंडा पाडला गेलाय.

द स्टोरी ऑफ मॅथ्स नावाचा एक सुंदर माहितीपट आहे. त्यात पायथागोरसचे प्रमेय, पाय ची किंमत, शून्याचा शोध वगैरे भारतातच लागले असे सुंदर रित्या दाखवलेय ( बीबीसीचाच आहे ) पण त्याच्याही चित्रीकरणात वरचे घटक आहेतच.

एन्डीटीव्हीची वरची कृती मला नक्राश्रू सारखी वाटली.
कारण डॉक्युमेंटरीवर बंदीची मागणी होण्याकरता, याच सर्व दृष्य मिडियाने मुलाखतीतील एकच एक वाक्य "सोईस्कररित्या" वापरून सनसनाटी निर्माण करून टीआरपी वाढवायचा अश्लाघ्य प्रयत्न केला होता.
तर मिडियाने बहकविले म्हणून बहकलेल्या यच्चयावत समुदायाने अत्यंत ढीसाळ पद्धतीने घाईघाईत आख्ख्या डॉक्युमेंटरीवर बंदी घालण्याची मागणी केली. (तशी संघावरही बंदी घालण्याची मागणी अधुनमधुन काहीकाही जण करत असतातच, त्यांच्याकरता तर "राजकीय पटलावर" दृष्यमान होण्याकरता ही सुसंधीच होती, असो)
सत्ताधार्‍यातील धुरीण डॉक्युमेंटरीचा हा प्रश्न हाताळू शकले नाहीत असे माझे मत.

वरील मयी यांचा लेख काही अंशी पटतो, तर बर्र्‍याच अंशी पटतही नाही.

उडदामाजी काळेगोरे याप्रमाणे देशाबाहेरील लोक इथे येऊन येथील काहीना काही टीपून त्यावर फिल्म वगैरे बनवुन उपजिविका करणारच व त्यातिल काही खरोखरीच्या कळवळ्याने/अभ्यासाकरता येत असतील, तर बरेचसे निव्वळ धन्दा व जमल्यास जमेल तितकी भारताबद्दल गैरसमज पसरविणे/निंदानालस्ती करणे या दृष्टीने. यात निवड अशक्य आहे.

तरी एक नक्की खरे, की देशांतर्गत आजवर सरकारी अनुदानातून सरकारी कृपाछत्राखाली सरकारी मतांचे /सरकारी मनांनुसार प्रसाराकरीता बनलेल्या निवडकच (अतिशयच निरुपद्रवी/अनप्रॉडक्टिव्ह) विषयांवरच्या डॉक्युमेंटरी बघता या परदेशी लोकांच्या डॉक्युमेंटरी कितीतरी सरस / अभ्यासपुर्ण/ विविध विषय हाताळणार्‍या असतात, व मला तर यांच्याच डिस्कव्हरी वगैरे चॅनेलवरुन दाखविल्या जाणार्‍या डॉक्युमेंटरीमुळे माझ्याच देशाबद्दल नव्याने कळले. अर्थात जयपूरची माकडे वा "शहाजहानचा ताजमहाल" वगैरे बाबि मला अमान्य असल्या तरी तितक्या दुर्लक्षून बाकी तपशील/अभ्यासपूर्ण मांडणी ही उपयोगीच ठरली आहे.
वरील मते माझी वैयक्तिक आहेत.

ज्या संस्था भारताला मदत करतात त्यांनीच ही फिल्म बनवली आहे का? Proud

मागे चीनने भारतात जाऊ नका असे सांगत गंगेच्या काठावरील किळसवाणी चित्रे डकवली होती.

माझा एक सोपा प्रश्न…
आपण ज्या आवेशाने ही घोषणा केली की "BBC वर कारवाई केली जाईल" त्याच आवेशाने ही घोषणा का नाही केली की "आरोपीवर कारवाई केली जाईल"… (खरेतर ती करायची वेळ केव्हाच उलटून गेली आहे)

आणी या घटनेमुळेच किमान मला तरी आरोपीची खरी मानसिकता समजली. याला आपण केलेय कृत्याचा पश्चाताप नाही की खंत नाही वरून हा तोंड वर करून म्हणतो की चूक मुलीची आहे… मला एक सांगा अशा नराधमाला जगण्याचा काय अधिकार आहे?
आणी यांचे सभ्य वकील यांच्या बद्दल आणी यांच्या वक्तव्याबद्दल तर काही बोलायलाच नको.

खरेतर ही घटना घडून २ वर्षापेक्षा जास्त कालावधी निघून गेला आहे… अजून आपण मुहूर्ताची वाट पाहत आहोत काय?

म्हणजे अजून काय केले त्याने की तो शिक्षेसाठी पात्र होईल?

कोणीतरी म्हटलेच आहे

"Justice delayed is justice denied"

>>डॉक्युमेंटरीवरील बंदीचा निषेध म्हणून एनडीटीव्हीने काल रात्री ९ ते १० या वेळात इतर कुठल्याही शोचं प्रसारण बंद ठेवून फक्त खालील चित्र ठेवलं होतं. हे आवडलं स्मित
"We won't shout, but we will be heard." - सोनिया सिंग, एडिटर एनडीटीव्ही<<

मुर्खपणा आहे नुसता. अरे, तुमचं स्वत:चं चॅनल आहे, बनवा एक सनसनाटी डाॅक्युमेंटरी इंग्लंडवर. कोणी रोकलं आहे का तुम्हाला...

मला वाटतं त्यांचं स्वतःचं चॅनल आहे म्हणूनच त्यांनी १ तास प्रसारण बंद ठेवण्याचा उद्योग केला असावा.

@ IND govt - बनवा एक सनसनाटी डाॅक्युमेंटरी इंग्लंडवर. कोणी रोकलं आहे का तुम्हाला ??

NDTV चे नक्राशू ढाळणे पाहून गंमत वाटली. <तपशीलात गोंधळ झाल्याने प्रतिसाद संपादित केला आहे>.

बाकी त्या डॉक्युमेंटरीवर बंदी घातली हे चूकच झालं. एकतर त्यात बंदी घालण्यासारखं काहीही नव्हतं. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्काचा भंग झाला असेल तर माहित नाही. शिवाय एका सुमार दर्जाच्या माहितीपटाला अपरिमीत प्रसिद्धी मिळाली ते वेगळंच. मात्र डॉक्युमेंटरी बनवण्याचा नक्की काय हेतू असावा अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.
राहता राहिली भारताच्या प्रतिमेची गोष्ट. त्याबद्दल न बोललेच बरं.

Arnab is not on ndtv since long. He has been supporting the ban and calling the documentary an insult to nirbhaya.

<<मुर्खपणा आहे नुसता. अरे, तुमचं स्वत:चं चॅनल आहे, बनवा एक सनसनाटी डाॅक्युमेंटरी इंग्लंडवर. कोणी रोकलं आहे का तुम्हाला...>>

इंग्लंडवर डाॅक्युमेंटरी बनवल्याने भारत सरकारच्या धोरणावर काय परिणाम होणार आहे म्हणे?

अर्णब = टाइम्स नाऊ = डाॅक्युमेंटरीवर बंदीचं समर्थन

बाकी त्या डॉक्युमेंटरीवर बंदी घातली हे चूकच झालं. एकतर त्यात बंदी घालण्यासारखं काहीही नव्हतं. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्काचा भंग झाला असेल तर माहित नाही. शिवाय एका सुमार दर्जाच्या माहितीपटाला अपरिमीत प्रसिद्धी मिळाली ते वेगळंच. मात्र डॉक्युमेंटरी बनवण्याचा नक्की काय हेतू असावा अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.
राहता राहिली भारताच्या प्रतिमेची गोष्ट. त्याबद्दल न बोललेच बरं.
<<<
अंजली ++++१
अत्यंत सुमार डॉक्युमेंटरीचा हेतु फक्त काहीतरी सेन्सेशनल करणे, काहीतरी कॉट्रोव्हर्शिअल करून पब्लिसिटी मिळवण्द एवढाच दिसला !

अत्यंत सुमार डॉक्युमेंटरीचा हेतु फक्त काहीतरी सेन्सेशनल करणे, काहीतरी कॉट्रोव्हर्शिअल करून पब्लिसिटी मिळवण्द एवढाच दिसला ! >>> +१ वेल सेड!

अत्यंत सुमार डॉक्युमेंटरीचा हेतु फक्त काहीतरी सेन्सेशनल करणे, काहीतरी कॉट्रोव्हर्शिअल करून पब्लिसिटी मिळवण्द एवढाच दिसला ! >>> +१ वेल सेड!

>>इंग्लंडवर डाॅक्युमेंटरी बनवल्याने भारत सरकारच्या धोरणावर काय परिणाम होणार आहे म्हणे?<<
वाक्यातला खुपच अर्थ काढता बुवा तुम्ही, अगदि नसलेला सुद्धा... Happy

अहो इंग्लंडमध्ये काय बलात्कार, ह्युमन राइट्स वायोलेशन होत नाहि? पैलवानांना विचारा...

'आयडीयाज देणे' यात भारताच्या पर्स्पेक्टीव्ह मध्ये काही तथ्य वाटले नाही. भारतातील सर्व मिडीयामधून फाशी हवी का नको आणि दोन्हीकडील कारणे मध्ये बलात्कारी व्यक्ती विक्टीम चा जीव घेईल हा मुद्दा प्रचंड चर्चिला गेला होता. सबटायटल आणि अ-हिंदी भाषिकांना समजेल असं असेल तर ठीक.
त्या व्यक्तीला आरोपी कृपया म्हणू नका, तो आरोप सिद्ध होऊन डेथ रो मधला निर्ढावलेला कणभरही पश्चाताप न होणारा खुनी आहे.

लोकहो,

निर्भया प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. तर मग आरोपी खुलेआम मुलाखत कशी काय देऊ शकतो? यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत व्यत्यय येणार नाही का? न्यायालयाने अशा मुलाखातीविरुद्ध कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे.

हे तथ्य उघडकीस आणण्याचे श्रेय भाऊ तोरसेकरांचे आहे.

आ.न.,
-गा.पै.

होपलेस लेख आणि त्याला सहमत असणारे प्रतिसाद हे अशा अवस्थेला गेलेत की त्यांना आरसा दाखवूनही फायदा नाही.

एखाद्या घरात एखाद्या बाईला मारहाण होत असेल तर त्यमधे पडायचं की नाही ? की तेव्हां तिच्या घरातल्यांनी हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे म्हटलं तर चालेल तुम्हाला ?

एव्हढा राग येतो तर उचला कॅमेरा आणि जा इंग्लंडला आणि आणा स्लम एरीयातलं शूट करून. ते तुमच्याकडं येतात कारण तुमच्याकडं या समस्या आहेत ज्याची तुम्हाला लाज वाटते पण ज्याची जाणीव अशा फिल्म्स समोर आल्यावरच होते. मग तुमचा संताप होतो. पण या समस्या सोडवाव्यात असं काही मनात येत नाही. अशी फिल्म आल्यावर या समस्या आहेत हे जाणवतं पण रिअ‍ॅक्शन अशी असते आणि निर्भया प्रकरण झालं की संताप व्यक्त करण्यात पण पुढं. असल्या साईटवर जर कुणी असं काही बोललं तर इग्नोर मारलं जाईल किंवा आपण काय कारणार ना ? अशी प्रतिक्रिया येईल. काहींची तर त्यांना फुकटे वगैरे म्हणण्यापर्यंत मजल जाईल.

महिला दिन या धाग्यावर कुणीही फिरकलेलं नाही. निर्भया केस ला प्रसिद्धी मिळाली. याच दरम्यान १२ वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार झाला. या प्रकरणातली क्रूरता वाचुन अंग शहारतं. ही मुलगी जीवन आणि मरणाच्या सीमेवर. पण मीडीयाला काही जाग नाही आली. पुढच्याच महीन्यात हरीयाणा मधे एका मुलीला ठाकूरांनी बलात्कार करून झाडाला टांगलं. पोलीसांनी एफआयआर घेतला नाही. पण तक्रार करायला गेले म्हणून घरच्यांना मारहाण झाली. या मुलीचं नाव आता जाहीर झाल आहे.

लोकसभा निवडणुका चालू असताना निर्भया केस पासून प्रेरणा घेत हरीयाणातल्या बलात्काराच्या शिकार झालेल्या चार सख्ख्या बहीणी न्यायासाठी दिल्लीत आल्या. निर्भया केस मधे दिल्लीत मेणबत्ती मोर्चे निघाले तसं आत्ताही होईल असं त्यांना वाटलं. रस्त्यावर त्यांनी आपली कैफीयत मांडली. लोक जमले पण मेणबत्तीवालेही नाही आले आणि मीडीयावालेही.

आपण असे दुतोंडी सापासारखे आहोत तर बाहेरच्यांना काय म्हणणार ? महाराष्ट्रात कितीतरी बलात्काराच्या केसेस होत असतात पण बाहेरच्या मीडीयाला कळतं पण आपल्यापर्यंत त्या बातम्या येत नाहीत. निर्भया प्रकरणात ती पत्रकारांच्या जातीची होती म्हणून एव्हढा गवगवा झाला का हा प्रश्न आता लोक विचारतात. कारण नंतर थेट शक्ती मिल मधेच पत्रकार जागे झाले आणि लोकसभा जिंकल्यावर बदायू मधे. कारण आता उप्र निवडणुका आहेत. त्यांना तरी काय म्हनायचं ?

पण याचा अर्थ बाहेरच्या जगाने डोळे मिटून घ्यावेत का ?
अमेरीकन दराने मूठभर क्षेत्रात वेतन आहे. मिनिमम वेजेस ~एक्ट वरून काही लोक फारच संतापले होते. तर आता त्यांचेच पीएम आहेत. अमेरीकन दराने भारतात मिनिमम वेजेस ~एक्टची मागणी करा. मग स्लमवर बुलडोझर फिरवा. नाहीतर उठसूठ सिंगापूरची उदाहरणं देतो आपण, तिथं यंव कायदा झाला न त्यंव झाला. तर तिथं घरगुती नोकरांसाठी एक कायदा आहे की तुम्हाला त्याला क्वार्टर घेऊन द्यावी लागेल. ती कशी पाहीजे याचे पण नियम आहेत. फक्त लोकपाला कायदा तेव्हढा घ्यायचा आणि बाकीचे नको, मग हे नको असलेलं चित्र कसं हटायचं ?

झापडं लावली म्हणून स्लमचा पप्रॉब्लेम सॉल्ह होत नाही, आणि बाहेरच्यांना जीवनमूल्याची घसरण पाहून आश्चर्य वाटायचं थांबत नाही. जाऊ द्या. दगडावर डोकं आपटण्यासारख आहे.

Has anyone stopped anyone to make good movies depicting great things from India?
बरोबर आहे. हा एकच उपाय आहे. आणि इतक्या सुंदर डोक्युमेंटरीज, सिनेमे बनवा की जगभर कौतुक झालेच पाहिजे. हा मार्ग चांगला आहे.

शिवाय ती इंग्लंडची काय डॉक्यूमेंटरी होती ती किती खराब होती, अगदी वेडेपणाची आहे, मानसिक विकृति असलेल्या माणसाचे भांडवल करून, देशाची बदनामी करायचा प्रयत्न करणे हे किती घृणास्पद, निंद्य आहे, असल्या डॉक्यूमेंटरी ज्या देशातले लोक बनवतात ते किती हीन असला जोरदार प्रचार करावा, इतका की यू ट्यूब जॅम होईल नि जगाला वाचावेच लागेल की भारतीयांचे मत काय आहे, कोण हे घृणास्पद लोक याची दखल घेणे भाग पडेल. आहेत सुदैवाने १०० कोटीहून जास्त लोक, नि सगळ्यांकडे आय फोन, वगैरे आहे, त्याचा उपयोग करा! हा खरा निषेध.
इथे लिहून काय उपयोग? इथले लोक लै शाणे, लै बुद्धिवादी म्हणजे फालतू मुद्द्यावरून इतरांना वैयक्तिक शिव्या देणे एव्हढेच येते त्यांना! बाकी त्यांना काSSSही समजतच नाही, करताच येत नाही!

भारतीय संस्कृति चे एकच व्यवच्छेदिक लक्षण - कुठलेहि काम न करता फुक्कट फालतू वटवट करायची!

मागे चीनने भारतात जाऊ नका असे सांगत गंगेच्या काठावरील किळसवाणी चित्रे डकवली होती.>>>>>>हेच अगदी हेच म्हणायचं मला.

आणि हे महाशय बाळू साहेब म्हणताय त्याप्रमाणे आपल्या देशात निव्वळ झोपड्या आणि बलात्कारीच आहेत दाखवण्यासाठी. आणि त्यांच्या देशात असल्या काही म्हणजे काहीच समस्या नाहीचेय मुळी. म्हणून ते आपल्या देशातल्या समस्या सोडवायला अरररर सोडवायला म्हणजे (वाढवायला)दाखवायला येतात असे त्यांचे स्पष्ट मत आहे बर का

आपल्या देशात निव्वळ बलात्कारी नांदतात आपल्या देशातल्या पुरुषांची हि अशीच मानसिकता आहे असेच विचार जगभर पसरले कि मग इतर देशात शिकायला जाणाऱ्या मुलांना शंकेच्या नजरेने लोक बघू लागतील टूरिस्ट इथे फिरायला येतांना हजार वेळा विचार करतील तुमच्या शेजारी बसायला सुद्धा एखादी विदेशी महिला कचरेल …. मग म्हणा आहे तेच दाखवतंय … नाहीतर तुम्हीच एकदा विचार करा जे दाखवलं गेलंय खरच अगदी एकूण एक पुरुषांची हीच मानसिकता आहे का देशात ?

Pages