मानसोपचार आणि समुपदेशन

Submitted by साती on 6 March, 2015 - 07:08

(हा धागा प्रोग्रेसिव्ह असणार आहे. म्हणजे चर्चे दरम्यान जे काही प्रश्नं निर्माण होतील त्या अनुषंगाने मी या धाग्यात काही मुद्द्यांची वाढ करत जाईन. सध्या मोबाईलवरून लिहित असल्याने एकदम बरेचसे लिहिणे किंवा एडिट करणे किंवा संदर्भ देणे सोपे नाही. म्हणून जशी जमेल तशी भर या धाग्यात घालत जाईन)

माझ्या प्रॅक्टीसमध्ये मानसोपचाराची गरज असणारे खूप रुग्णं पहायला मिळतात. नोकरी, व्यवसाय,शिक्षणातले यश-अपयश, नातेसंबंधांतील गुंतागुंत अश्या मानसिक ताण वाढविणार्‍या कित्येक गोष्टी मधुमेह, उच्चरक्तदाब, अंगदुखी असे विविध आजार घडवून आणतात आणि असलेले आजार वाढवितात.

माझ्या कित्येक रूग्णांना तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे असे सांगितले तरी ते घेत नाहीत. तुम्हीच द्या एक गोळी असे म्हणतात. खरं तर एक फिजीशीयन म्हणून मी मानसोपचाराची औषधेही लिहू शकते पण फार्मसी बाबतच्या कडक नियमांमुळे बरीचशी 'शेड्यूल एच' ड्रग्जआमच्या दवाखान्यात जास्तीत जास्त किती ठेवता येतील यांचा नियम आहे. त्यामुळे असलेला ठराविक कोटाच पुरवून पुरवून वापरावा लागतो. त्याहूनही महत्वाचे म्हणजे मानसिक रूग्णांना औषधोपचारांइतकीच समुपदेशनाचीही गरज असते जी माझ्या क्लिनिकमध्ये मला देता येत नाही. आमच्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यात कायमस्वरुपी केवळ एकच सायकॅट्रीस्ट आहेत. ज्यांना त्यांच्याकडिल पेशंटच्या अतोनात संख्येमुळे एखाद्या पेशंटला द्यायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात समुपदेशन नावाचा प्रकार नाही. मूळात सायकॅट्रिस्टसुद्धा नाही अश्या गावात काउंसेलर असणे तर शक्यच नाही.

मग कधीतरी मला वाटतं, शहरातल्या लोकांची मज्जा आहे बुवा. छोट्या छोट्या स्ट्रेससाठी गल्लोगल्ली काऊंसेलर उपलब्ध असतात. पण खरंच असं आहे का? जातात का शहरातले लोक काऊंसेलरकडे? काऊंसेलरकडे जाणं अजूनही तितकंच नामुष्कीचं राहिलंय का? एखाद्याला मानसिक उपचारांची किंवा समुपदेशनाची फार गरज आहे असे आपल्याला दिसतेय आणि आपण त्याला ते सुचवितोय यात ती व्यक्ती ऑफेंड तर नाही ना होत?

माझ्या प्रॅक्टीसमध्ये माझ्याकडे आलेल्या रूग्णांना मी गरज असल्यास 'मानसिक उपचार घ्या' असे सहज सांगू शकते.
गंमत म्हणजे अगदी आत्महत्येचे रूग्णंजरी असतील तरी माझ्याकडून बरा झाला आता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग डिस्चार्ज देवू असं म्हणताच त्याच दुपारी बिल क्लिअर करून बहुतेक जण पळून जातात. ते डॉक्टर संध्याकाळी विजिटींगला येतात म्हणून. मग नंतर हे लोक कुढत जगतात, बरे होतात की परत एखादा आत्महत्येचा प्रयत्न करतात काही पत्ता लागत नाही.

तरिही रूग्णांना मानसोपचार देणे /द्यायची शिफारस करणे मला सहज शक्य आहे.
पण एखादा माझा रूग्णं नसेल तेव्हा? किंवा एखादा केवळ आंतरजालावरिल ओळखीचा असेल तेव्हा?
एकजण खूप चटका लावून गेला जीवाला. त्याला मानसोपचाराची गरज आहे हे त्या संस्थळावरिल प्रत्येकाला समजत होतं. काही ते उघडपणे लिहित तर काही उगाच वादासाठी वाद म्हणून त्या आयडीला / त्याच्या थोड्याफार विक्षिप्त लिखाणाला सपोर्ट करित. मग एकदा त्याने आत्महत्याच केल्याची बातमी आली. (कृपया त्याचे नाव माहित असलेल्यांनी इथे लिहू नका. मी केवळ एक उदाहरण घेतले आहे.) आपण अगोदरच त्याला समुपदेशनासाठी, मानसोपचारांसाठी का नाही जास्तं हॅमर केलं असं वाटत राहिलं.

आत्ताही कुणाला खरेच समुपदेशनाची गरज आहे असे केवळ आंतरजालावरच्या ओळखीतून लिहावे का, असा प्रश्नं मला पडलाय.

असो. तर मानसोपचारतज्ज्ञांचे एक जादाचे काम मला वारंवार पडत असल्याने माझ्यापुरते थोडेफार सतत वाचत असते.
पुस्तकांचा संदर्भ इथे दिला तर सगळ्यांनाच ते वाचायला जमेल असे नाही.
ढोबळमानाने जे आजारांचे वर्गीकरण आहे त्यापैकी कुठला आपल्याला आहे का हे समजण्यासाठी कित्येक टेस्ट जालावर उपलब्ध आहेत. यातल्या काही वर्तमानपत्रातल्या सो कॉल्ड आरोग्यविषयक स्तंभातही येत असतात. काही ठिकठाक असतात तर काही अगदीच यथातथा.
काहींची मांडणी इतकी सोप्पी असते की 'प्रत्येक प्रश्नात ए निवडला तर आपण रोगी , सी निवडला तर आपण अगदी फिट आणि बी निवडला तर सीमारेषेवर' असं कोरिलेशन चाचणी देणार्‍याला देतादेताच समजतं. त्यातही एखादा मुद्दाच उदाहरणार्थ नैराश्य, व्यसनाधिनता असे घेऊन त्यांच्या निदानासाठी बनविलेल्या चाचण्या बर्‍याच सापडतील. पण एकंदर स्वतःला मानसिक मदतीची गरज आहे का हे ठरविण्यात मदत करणार्या चाचण्या कमीच.
(याच लेखात मी अगोदर 'आपल्याला संभाव्य मानसिक आजारांकरिता समुपदेशन किंवा उपचारांची गरज आहे का?' याचा अंदाज करण्यास मदत करणारी एक चाचणी दिली होती. चर्चा पुढे जाण्यास किंवा अधिक मुद्दे पुढे येण्यास मदत व्हावी म्हणून. आणि एकदा ती चाचणी देऊन पहा असे सुचविले होते. पण त्यामुळे चर्चा पुढे सरकण्यास मदत होतेय असे न दिसल्याने ती मूळ लेखातून काढून खाली प्रतिसादात देत आहे.)
एकंदर मराठीत आरोग्यविषयक माहिती माहितीजालावर फार अपुरी आहे. इंग्रजीत प्रत्येक आजाराविषयी सामान्य माणसाला कळेल अश्या भाषेत ते अगदी व्यावसायिक आणि प्रशिक्षित डॉक्टरांसाठीच अश्या मोठ्या रेंजमध्ये माहिती उपलब्ध आहे.
आपल्याला सामान्यतः लहानमोठ्या शारिरीक आजारांच्या लक्षणांची माहिती असते. मात्र मानसिक आजारांच्या लक्षणांची माहिती नसते. आणि सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत ती सहज नेटवर मराठीत उपलब्धही नाही.
चर्चेच्या अनुशंगाने या लेखात किंवा पुढिल भागात अशी माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्यामुळे सगळ्या प्रश्नांचं या धाग्यावर स्वागत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशी गंमत आहे बघ बी. समुपदेशनाचा सल्ला दिला म्हणून तुला राग आला कारण तुला पर्सनली कुणी ओळखत नाही. (तुझा ज्यांच्यावर राग आहे ते तर नाहीतच). त्यामुळे त्यांची कशी काय हिंमत झाली तुला असं सांगायची. हो ना?
पण ह्याच बायकांना (तू ही ओळखत नाहीस त्यांना पर्सनली) तोंड वर करून तुम्ही वाईट आहात,(का? तर तुला भेटायला आल्या नाहीत म्हणून), तुमचे नवरे असे नी तसे म्हणत यांव नी त्यांव करत नावं ठेवत फिरतोस, तेव्हा आपलं काही चुकतंय हे दिसतच नाही. वर कुठे आत्मपरिक्षणाची टेस्ट असेल तर ती आधी करून घे.>>

सायो, मला राग मुळीच आलेला नाही. जी लोक माझ्याशी धड वागत बोलत नाही त्यांनी मला सल्ला द्यावा आणि मझ्याबद्दल काळजी व्यक्त करावी हे खपले नाही. ही लोक सदैव स्वतःची पाठ थोपटतात आणि एका कंपूत राहतात. अशा लोकांना माझ्या परिघात मी येउ देणार नाही म्हणून त्यांनी दिलेले सल्ले माग परतवले. आणि मी अमेरिकेत असतना मी तुम्हाला भेटू शकतो का अर्थात मी येऊ का भेटायला असे लिहिले होते तुम्ही मला भेटायला या असे लिहिले नाही. त्याचा आणि ह्या विषयाला काहीही संबंध नाही. तू तर मला फोन नंबर सुद्धा दिला नव्हतास.

माझ्या मते, हेडर थोडं बदलल्यानंतर बराच ट्रॅक बदलला आहे धाग्याचा. तरीही हा धागा अजूनही बी यांना समुपदेशन सुचविणे या धाग्याशी सहज/मुद्दाम/अनवधानाने इ. जोडला गेलेला आहेच.

या धाग्याचा त्या धाग्याशी संदर्भ बदलून, निखळ समुपदेशन म्हणजे काय? त्याची गरज कोणत्या परिस्थितींत लागू शकते? समुपदेशन करतात म्हणजे नक्की काय करतात? ते घेताना, वा आपल्या ओळखीतल्या कुणाला ते घेताना सपोर्ट कसा द्यावा? स्वतःस कणखर बनवणे शक्य आहे का? त्यासाठी काय करावे? इ. मुद्द्यांना स्पर्श करणॅ हा धाग्याचा रोख असला तर तो जास्त परिणामकारक ठरेल असे वाटते.

बाळू तुम्हाला मी आज महिना दीन (दिन नाही) ह्या धाग्याबद्दल आज जो सल्ला दिला होता तो फारच चुकीचा होत हं. त्याबद्दल तुमचे पाय धरुन क्षमा मागतो. तुम्ही तो धागा अजून अजून चित्रांनी सुशोभित करु शकता. धन्यवाद.

>> तरीही हा धागा अजूनही बी यांना समुपदेशन सुचविणे या धाग्याशी सहज/मुद्दाम/अनवधानाने इ. जोडला गेलेला आहेच.

हो, मान्य. त्यामुळेच ही चर्चा ट्रिगर झालेली असल्यामुळे तो संदर्भ निराळा काढता येत नाहीये ये खरं आहे. तो संदर्भ वगळून पुन्हा विचार करायचा प्रयत्न करते. Happy

मी पण तुम्हाला सल्ला दिला होता की तुमच नाव बदला.

कारण बी लेटेड महीला दिन असं टायटल आहे. तिथं बी या नावानं तुम्ही धागा उडवायचा सल्ला दिल्याने विचित्र वाटत होतं. तुम्हाला पाहीजे असल्यास मी पन तुमचे पाय धरुन फिट्ंफाट करीन.

>> तरीही हा धागा अजूनही बी यांना समुपदेशन सुचविणे या धाग्याशी सहज/मुद्दाम/अनवधानाने इ. जोडला गेलेला आहेच.
>>>

इब्लिस, मला जर विसरुन त्यांना काही लिहिता आले तर तो मग जो खराखुरा आनंद त्यांना ह्यातून मिळतो तो मला वगळून लिहिण्यात मिळणारच नाही. खरा आनंद म्हणजे बी विषयी आणि बी विरुद्ध भयंकर असे काहीतरी लिहिणे. तेवढे नाही लिहिले तर दिवस कोरडा ठण्ण जातो इथे अनेकांचा. वेडं व्हायची वेळ येते!!!

बाळू, हो मी तुम्हाला माफ केले. मला ना हल्ली काहीकाही गोष्टी कळता कळत नाहीये बघा. तुम्ही फार मायाळू अहात. धन्यवाद बाळूदादा.

सिंडरेला,
एखाद्या व्यक्तीने तिच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तीच्या मृत्यू बद्दल लिहिले तर त्या व्यक्तीला दु:खातून सावरायला मदत म्हणून ग्रीफ काउंसेलिंग बाबत सुचवणे वेगळे आणि एखाद्या व्यक्तीचे सर्वसाधारण वर्तन्/वावर पाहून मनात रेड फ्लॅग्ज येत असतील तर त्या व्यक्तीला काउंसेलिंगचा सल्ला सार्वजनिक रीत्या सांगणे वेगळे . अशावेळी ती व्यक्ती आधीच टोकाच्या डिफेंसिव मोड मधे असते. त्यात सार्वजनिक रीत्या असा सल्ला दिला तर अजूनच मागे हटते.

अहो चालत हो दीन / दिन. आता कोन शिकतं हो त्या स.पे. मराठीत ? आमची अहीराणी / कोकणी / व-हाडी / खानदेशी मराठी न चुकता बोलुन दाखवा बरं.

...

बी,
राग येईल कदाचित, पण मनापासून खरं सांगू का?

"मला जर विसरुन त्यांना काही लिहिता आले तर तो मग जो खराखुरा आनंद त्यांना ह्यातून मिळतो तो मला वगळून लिहिण्यात मिळणारच नाही"

↑हे थोडं पर्सेक्युशन अँक्झायटी टाईप होतंय.

तुमचे अती निरागस टाईप धागेही काहींदा विचित्र वाटतात. उदा. पुण्यात केरसुणी अमुकच नावाने मागितल्यास न मिळणे इ. (फडे आय थिंक)

तुमचं कित्येक लिखाण प्रचण्ड मॅच्युअर असतं, उदा परवाचा तो रसग्रहणाचा धागा. अन ते केरसुणीसारखं कित्येक लिखाण अगदीच बालिश वाटतं. अनेकदा तुम्ही लोकांना गृहित धरता, अनेकदा हक्काने मदत मागता, अन ती मिळाल्यावर साधे धन्यवाद द्यायाला विसरता. अशा दोन एक्स्ट्रीमला जाणार्‍या अनेक बाबी आहेत.

पण हे सगळे मिळून 'बी' नामक आयडी तयार होते. त्यापाठची संपूर्ण व्यक्ती नव्हे, याची जाणीव मलातरी आहे. 'वेडं करतात' किंवा 'वेड लागायची पाळी' 'त्या' आयडीज ना येते, व्यक्तींना नव्हे हे तुम्हीही ध्याने घेतलंत तर बरं. शिवाय लेबलच लावायचं, तर 'माझा' उल्लेख केला नाही तर असे होईल, हे मेगॅलोमेनिक टाईपचे होते Wink

या सगळयावरून, 'तुमच्या'बद्दल काहीही आडाखे बांधणे कठीण असले, तरी 'बी' यांच्या फीमेल बॉसच्या धाग्यावर तुम्हाला साडेतीन मीटर गेंड्याच्या कातडीचे सूटिंग गिफ्ट केले आहे Wink एक मस्त चिलखत शिवून घ्या अन फाटा दाखवा की लोकांना! लोड घेउ नका. तक्क्या घ्या अन टेका मस्त.

इथे समुपदेशनाबद्दल चर्चा चालू आहे. एन्ज्वाय करा.

बी
इथं तो विषय आहे का ? तुम्ही असं का केलं ? का तिकडची लिन्क इथ दिलि ? असं करुन तुम्हि चांगल नाहि केल. हि चुक खुप मोठि आहे. या चुकिला माफि असु शकते का ? तुम्हि लिंक देन्यापुर्वी लांबचा विचार करायला पाहीजे होता. इथ लिंक देन्याच कारन पन कळाल नाही. ज्याला वाचायच तो शोधुन घेईल. पहील्याच पानावर आहे. तरी पन इग्नोर मारला असल तर तुम्हाला कळायला पाहीजे होतं. अशा एका चुकितुन तुम्ही खुप चुका केल्या आहेत.

बी
तुम्ही चुक सुधारलि कारन ती तुम्हाला दाखवुन दिली. या चुकीमुळं बसलेल्या प्रचंड धक्क्यातुन तुम्हाला दाखवुन देन्यामागं फक्त चांगलिच भावना होति. राग नका ठेवु.

आंतरजालीय समुपदेशन सल्ल्याला अनुसरून आठवले,

सोशल साईटवर "येडा बनून पेढा खाणारे" किंवा "वेड पांघरून पेडगावला जाणारे" अशीही एक जमात असते. ते जसे दाखवतात तसे ते नसतात. ते कधी भोळेपणा दाखवतात, तर कधी विक्षिप्तपणा, तर कधी मुद्दाम प्रवाहाविरुद्ध खोड्या काढत फिरतात. यांचा काहीतरी हमखास प्रॉब्लेम आहे असे वाटावे अशी लाईफ ते सोशलसाईटवर जगत असतात. यांना समुपदेशनाचा सल्ला देणारे कदाचित कळकळीने देत असावेत वा यांची खिल्ली उडवायला देत असावेत. पण हे मात्र हा सारा प्रकार मनोमन एंजॉय करत असतात. यांच्यामते ते ईतर लोकांची शाळा घेत असतात. आणि बरेचदा खरोखर तसे असतेही, आपण इथे कीबोर्ड आणि डोके बडवत राहतो आणि ते मात्र यातून आनंदच घेत असतात. आता अश्या प्रकारांतून आनंद मिळवणे हि देखील एक समस्या आहे की नाही हा वेगळा विषय झाला, पण असेही असतात!

त्याचबरोबर इथे खूप खुशमस्करे, जॉली, बडबडे, फुल्ल ऑफ एनर्जी वाटणारे प्रत्यक्ष आयुष्यात प्रचंड एकाकी असू शकतात. त्यांच्या घुम्या दुर्बल स्वभावामुळे त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात मित्र मिळत नसतात, किंवा प्रत्यक्ष आयुष्यात जी मजा त्यांना करावीशी वाटते, वा ज्याची ते स्वप्ने बघतात, वा जी स्वप्ने अधुरी राहिली असतात, ती इथे पुर्ण करायचा त्यांचा प्रयत्न चालू असतो. कारण इथे पडद्यापलीकडील लोकांशी थेट संबंध येत नसल्याने त्यांना हे जमते. त्याचमुळे हे आभासी जग आहे हे विसरून प्रत्यक्ष जग असल्यासारखे ते इथे समरसून गेले असतात, त्यांचे प्रत्यक्ष जग खूप बोअरींग असते. आपण जिथे असतो तिथून पाहता आपल्याला त्यांच्या आयुष्यात सुखच सुख भरले आहे असे वाटावे, त्यांचा हेवा वाटावा. पण प्रत्यक्षात मात्र ते या सोशलसाईटच्या कुबड्या वापरून आपले आयुष्य जगत असतात. अगदी हे थांबताच त्यांचे आयुष्यही थांबावे इतपत!

वरील दोन्ही उदाहरणे माहितीत आहेत!

सोशल साईटवर लोक कसे दिसतात आणि कसे असतात याची बरीच उदाहरणं आहेत.

ज्यांना हे माध्यमच नवीन आहे त्यातल्या (काही) रिटायर्ड आजोबांना त्याचे एकेक उपयोग वापरून पहावेसे वाटतात. हाताळावेसे वाटतात. मग याला फोन कर त्याला फोन कर सुरू होत.मग या माध्यमातच काही प्रकार कळतात. प्रत्यक्ष आयुष्यात जपून राहईलेली माणसं ही. पण इथं गुप्ततेचं वरदान असल्यानं बघू एकदा करून मग हलूच दुसरा आयडी बनवतात. काही सोडून देतात, काहींचा विरंगुळा बनतो,

आता रिटायर्ड माणसाचं ठीक आहे. पण तरुणांचं काय ? तर ते ही वय असतं, सगळं करून पाहण्याच. पण इतर अनेक गोष्टी असतात करण्यासारख्या. बिझी लाईफ असतं. अशा लोकांचा ववर जर या ना त्या रूपात सतत जाणवायला लागला तर त्यांना उपचाराची गरज आहे का ?

घरात तरूण बायको सोडून सोशल साईटवर मैत्री करणारे महाभागही असतात. हे सुद्धा नॉर्मल समजू. पण घरात बायको च्या पलिकडं जग नसणारे लेडी किलरच्या रूपात वावरतात, सतत त्याच नशेत राहतात, हे कशाचं लक्षण ?

खर तर हा मानसिक आजार नाही. आपण एका सुविधेचा गैरवापर करत आपल्याला हव ते जगतोय याचा विसर पडून नंतर त्यालाच नकळत खरं मानून बसतो. यात कौन्सिलिंगची गरज आहे का ?

खूपच गोड छबी निर्मान करणे हे पण डोक्यात जातं. मग मदतीसाठी तत्पर असल्याचा आव आणणे (आणि मागे सरकणे ), मदत कार्याच्या एखाद्द्या धाग्यावर जाऊन चेक चालेल का त्यांना ? असा प्रश्न विचारणे हे पण हास्यास्पद वाटतं. पण हा आजार नाही. हा बावळटपणा असतो. आपलं गुडी गुडी ढड्ढमढढ्ढू लोकांना कळणार नाही यातून ते येतं.

थोडक्यात काय जसं आहे तसं प्रत्यक्षात सुद्धा कुणी वावरत नाही तर संधी मिळताच मुखवटे का नाही चढवणार ?

आमचे एक मित्र आहेत जे दिवसाला सहाशे किमी रोजच्या रोज गाडी चालवतात. साठच्या वेगाने सुद्धा दहा तास होतात. शिवाय शहर, गाव इ. ठिकाणी १५ ते ३० किमी पेक्षा वेगात गाडी चालवणं अवघडच. म्हणजे दहा तासापेक्षा जास्तच. तसंच हे मित्र कायम ऑनलाईन उपलब्ध असल्याने काळजी वाटू लागली आहे. गाडी चालवत असताना ऑनलाईन ने हे भयंकर आहे.

यांना गाडी चालवण्याचं व्यसन असेल काय ? पण मग अर्थार्जनाचं काय ?
की कुणी दिवसाला अडीछशे किमी चालवल्याचा उल्लेख आवडला नाही म्हणून ठोकून देत आसतील ? हे ही लक्षण ठीक नाही.

पेट थेरपी बद्दल काय मत आहे? त्याचा उपयोग होतो हे माहीत आहे. पण जनतेला त्याची फारशी माहिती नाही.
ह्यात समुपदेशन प्लस पेट असे एकत्रित थेरपी असते.

पेट थेरपीने प्रचंड फायदा होतो ... माझ्या पाय लंगड्या काळात दोन वर्षे माझ्याबरोबर फक्त एक मांजर होते .. ते मांजर माझ्यावर खूप प्रेम करते. मीही करतो. आम्ही दोघे एका ताटात जेवायचो.

डॉ. डीन ऑर्निश यांच्या रिव्हर्सिंग हार्ट डिसीज या पुस्तकातही उल्लेख आहेत. जे लोक एकाकी असतात , ते हार्ट डिसीज, हायपरटेन्शन, डायबेटिस, कॅन्सर याना चटकन बळी पडतात ... ऑर्निशने यावर प्राणी पाळणे हा उपाय सांगितला आहे.. कुत्रे, मांजर ... अगदी एखादा फिश टँकही चालेल.

प्रघा लिंक बद्दल खूप आभार - सर्वच छान बोलत आहेत. राजेंद्र बर्वे अमेझिंग बोलतायत!! आनंद नाडकर्णी सुद्धा. खतरनाक वाईज पीपल. प्रोफेशनल्सच आहेत. प्रचंड आवडल्या या लिंकस.
-------------------------------
- फक्त काना मात्रा वेलांटी, आकार, उकार म्हणजे काऊन्सिलिंग नव्हे तर पूर्णविराम केव्हा व कुठे द्यायचा हे सुद्धा कळायला हवे. केव्हा बोलायचे बरोबर केव्हा नाही बोलायचे किंवा थांबायचे ते ही तितकेच महत्वाचे - राजेंद्र बर्वे
- मानसशास्त्रातील आकृतीबंध काउन्सिलरच्या मनात पक्का हवा मात्र पेशंटला त्या गप्पा, संवाद, सुसंवाद वाटला पाहीजे. - आनंद नाडकर्णी
- व्यक्ती काय म्हणाली या इतकेच व्यक्ती काय म्हणाली नाही, हे काउन्सिलरला ऐकता आले पाहीजे. हे कौशल्य आहे. - अनुराधा सोवनी
- काऊन्सिलरचे वयही महत्वाचे असते -अनुराधा सोवनी ............................ हा मुद्दा मला अजिबात पटला नाही. धिस इज एजिझम.
- नवरा-बायको काउन्सिलंगमध्ये दोघं एकमेकांना बदलण्याकरताच आलेले असतात. पण काउन्सिलर सांगतो की तुम्ही पहील्यांदा बदलायचय. जे की दोघांना आवडत नाही - आनंद नाडकर्णी ......................... खूप हसले या मुद्द्यावर.
- फार्मॅकोथेरपी व सायकोथेरपी ही वेगवेगळी असू नये. दे शुड गो हँड इन हँड. - तीघांचेही मत आहे. पण अमेरीकेत औषधे देणारे व काऊंन्सिलर हे वेगवेगळेच होते.
https://www.youtube.com/watch?v=meuIdiOiBNE&list=PLc6RbyUBWjXwV-DvBckvEt...
व्हेन्टिलेशन व्हर्सेस काऊन्सिलिंग. ................... हा भाग फार आवडला.

https://www.youtube.com/watch?v=kdCBpH_BdMc&list=PLc6RbyUBWjXwV-DvBckvEt... ............ यात अनुराधा सोवनी यांनी पॉवरप्ले चा नुआन्स बरोब्बर पकडला आहे. राजेंद्र बर्वे व्हॅलिडिटी बद्दल फार मस्त बोलले आहेत.
------------------------------------------------------------------
एव्ह्रीवन नीडस अ नॉनजजमेन्टल, वाइजर स्पेस!!

- काऊन्सिलरचे वयही महत्वाचे असते -अनुराधा सोवनी ............................ हा मुद्दा मला अजिबात पटला नाही. धिस इज एजिझम.>>>>> कौन्सिलर ही पण एक व्यक्ती आहे. वयानुसार येणारी परिपक्वता ही तिला ही लागू आहे. त्यामुळे तो वयाचा मुद्दा असावा.
मी आयपीएच या आनंद नाडकर्णींच्या संस्थेचा हितचिंतक आहे. नुकतेच मी त्यंच्या पुण्यातील कर्वेनगर मधील संस्थेकडे क्लायंट या मोड मधे गेलो होतो. पहिल्या भेटीत केस चे आकलन समजण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो ते देउ शकले नाही असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. सगळ्यांना आनंद नाडकर्णी भेटू शकत नाहीत. त्यांच्या संस्थेत कौन्सिलर, सायकोथेरपीस्ट सायकियाट्रिस्ट असा सेटअप आहे.
मी एमसीएम आय ही पर्सनॆलिटी टेस्ट केली. माझ्या बायकोचीही केसची गरज म्हणुन केली. एकदा लिहितो त्यावर

Pages