विशेष सुचना: या धाग्यावर गंभिरपणे ज्योतिष/कुंडलीविषयक मार्गदर्शन विचारले आहे. व ते ज्यांना करणे शक्य आहे त्यांनी जरुर करावे.
मात्र अन्य कोणीही, खास करुन ज्योतिषावर विश्वास नसणारे, देवधर्म यांना न मानणारे, बुद्धिवादी, अन्निसवाले-श्रन्निसवाले, समाजवादी, निधर्मी, नक्षली यांनी इकडे फिरकू नये, हा धागा व विषय त्यांचे करता नाही.
जातकः स्त्री
जन्म दिनांक: ०३/१०/१९६९ रात्री ०.४० (२ ऑक्टोंबरची रात्र, उजाडती ३ ऑक्टोंबर),
स्थळः पुणे
मिथुन राशी, आर्द्रा नक्षत्र १ चरण, लग्न मिथुन राशी, पुनर्वसु नक्षत्र
अन्य माहिती:
विवाह मे, १९९५
अपत्यप्राप्ती मे १९९६ (मुलगी) व जानेवारी, २००४ (मुलगा)
या व्यक्तिला, ब्रेनट्यूमरचे निदान मे, २०१० मधे झाले, व ब्रेन ट्यूमरचे पहिले ऑपरेशन लगेच झाले.
त्यानंतर आजवर ४ ते ५ ऑपरेशन्स झाली असून, जवळपास १२ वेळा केमोथेरपी झाली आहे.
आता परिस्थिती बिकट आहे.
४/५ ऑपरेशन्स व १२ वेळा केमो, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
नातेवाईक "निदाना बद्दलच" साशंकता व्यक्त करताहेत.
त्याचबरोबर, आता हे कसे व किती वेळ चालणार, अजुनही पुढे केमोथेरपी, व त्याचे साईड इफेक्टस टाळण्यासाठी स्टेरॉइड्स यांचे उपचार चालूच ठेवायचे वा नाही याबाबत संभ्रमात आहेत.
मायबोलीवरील ज्योतिषी मंडळींना नम्र विनंती, की या कुंडलीबाबत काही आशादायक स्थिती असल्यास तसे इथे कळविणे.
(ता.क. ७ व ८ मार्चला मी इथे प्रतिसादासाठी उपलब्ध नसेन, तरीही आपापली प्रतिक्रिया मात्र जरुर नोंदवावि ही विनंती)
धन्यवाद.
या बाफवर दिलेला प्रतिसाद आता
या बाफवर दिलेला प्रतिसाद आता खालील लिंकवर हलवण्यात आलेला आहे.
http://www.maayboli.com/node/51918?page=49#comment-3791542
वर्ष होत आले. सद्यस्थिती अशी
वर्ष होत आले. सद्यस्थिती अशी की;
आता ट्यूमर साईज ४.५ सेमी आहे. डॉक्टरांनी ३ पर्याय दिले आहेत.
१) परत एकदा सर्जरी
२) कोणत्या तरी नविन ड्रगचा वापर करुन बघायचा, ज्याचा पुर्वी वापर केलेला नाहीये.
३) इश्वरावर हवाला ठेवुन बसायचे, जेव्हा की डॉक्टरांनी जास्तीत जास्त ३ महिन्यांची मुदत दिली आहे
जातकाच्या नातेवाईकांचा प्रश्न असा की वरील तिन पर्यायांमधे कोणता तरी एक पर्याय निवडुन तसे येत्या बुधवारपर्यंत डॉक्टरना सांगणे आवश्यक झाले आहे.
नातेवाईकांची अडचण अशी की या पर्यायांपैकी कोणता पर्याय उपयोगी पडेल, त्या पर्यायातुन काय नि:ष्पन्न होईल, अन हा निर्णय, जातक स्वतः निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसल्याने जातकाकरता नातेवाईकांनी घ्यायचा आहे.
वरील पर्यायांबाबत निर्णय घेताना कुंडलीद्वारे काही मार्गदर्शन होईल का ही विचारणा आहे.
मला पत्रिकेतल ० कळत पण या
मला पत्रिकेतल ० कळत पण या व्यक्तिचा लढा बघता पर्याय १ किवा २ करावे अस वाटत.
<<१) परत एकदा सर्जरी २)
<<१) परत एकदा सर्जरी
२) कोणत्या तरी नविन ड्रगचा वापर करुन बघायचा, ज्याचा पुर्वी वापर केलेला नाहीये>>
------- आजार-पणात मन सैरा-भैरा धावते. बरोबर-चुक हे ठरवता येत नाही. तिनही पर्याय परिस्थिती काय आहे कशी आहे यावर अवलम्बुन आहे. पर्याय १ किव्वा इच्छा असल्यास २.
ब्रेन ट्युमरने त्रस्त व्यक्तीला परिस्थितीशी सामना करण्यासाठी माझ्यातर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा...
जगण्याच्या दुर्दम्य इच्छेचा
जगण्याच्या दुर्दम्य इच्छेचा विजय होऊन ताईंना बरे वाटू दे!
सदरहू जातकाचे नातेवाईकांस
सदरहू जातकाचे नातेवाईकांस दिलेला सल्ला अभ्यासकांचे माहितीसाठी पुढे देत आहे:
***********************************
मी कुंडलीचा परत परत अभ्यास केला. प्राप्त परिस्थितीचे प्रतिबिंब कुंडलीमधे जाणवत नाही हे पूर्वीपासुनच म्हणतो आहे. तरीही.... तू दिलेल्या ३ पर्यायांपैकी, तिसरा पर्याय निवडणे मानसिकदृष्ट्या अशक्य होते, व तो निवडू नये अशा मताचा मी आहे. आजवर तुम्ही इतके प्रयत्न केलेत, तर थोडे अजुन प्रयत्न करु. केवळ अन् केवळ आर्थिक कारणांमुळेच ३ रा पर्याय निवडणे भाग असल्यास मात्र पर्याय नाही, अन्यथा नंतर मन प्रचंड खंतावते जे सहन करणे अवघड होते. सबब, शक्यतो ३ रा पर्याय नको.
२ रा पर्याय, न वापरलेल्या औषधयोजनेचा आहे, जो देखिल मी येत्या "गोचर ग्रहस्थितीकडे" बघता सध्या, या वर्षी तरी नको असेच म्हणेन. कारण जातकाच्या षष्ठ स्थानातुनच शनिचे (जो अष्टमेश आहे) भ्रमण जानेवारी २०१७ पर्यंत आहे. तेथेच येत्या २१ फेब् पासुन् मंगळ (षष्ठेश) प्रवेशतो आहे. व हे दोनही ग्रह एप्रिल ते जुन या मोठ्या काळात याच स्थानी वक्री आहेत, व त्यांची युति २३ ऑगस्ट १६ ला होते. षष्ठ स्थान रोग स्थान, तिथेच अष्टमेशाचे भ्रमण, व षष्ठेश मंगळही तिथेच हा योग जरा अवघड आहे. मात्र माझे मनात खूपच आशादाई चित्र उभे रहाते आहे. परत ऑपरेशनचा पर्याय निवडावा लागेल असे दिसते आहे, व तो निवडावा ( अर्थात आर्थिक बाजु तपासुन्) असे सांगणे राहील. मात्र जर एप्रिलचे आधी ऑपरेशन झाले तर माझे मते फारसा धोका राहू नये.
आता मी संपुर्णपणे वेगळाच विचार करुन, तिचे स्वास्थ्याचे करता, व ती परत ठीकठाक व्हावी याकरता, माझेकडूनच, १) महामृत्युंजय मंत्राचे हवन (अरिष्ट टाळण्यासाठी) आणि २) अनिष्ट बाधा निवारणेसाठी विशिष्ट मंत्रांचा जप (बाधा कुठलीही असू शकते, जसे की वास्तू , वा कुठे आडजागी लागिर, वा पितरदोष, वा कुणाचे कूकर्म इत्यादी) करुन त्याचा अंगारा पाठवुन देईन. पूर्वी २०१३ मधे एकदा महामृत्युंजय मंत्राचे हजार आहुतींचे हवन केले होते. पण आता अधिक निष्ठेने, गांभिर्याने हे करीन.
जर जन्मवेळ/दिवस वगैरे चुकलेली नसेल्, तर मी आजही हेच म्हणू इच्छितो की जे घडातय, ते कुंडलीत कुठल्याच बाजुने प्रतिबिंबित होतच नाहीये. ग्रहस्थिती म्हणा, गोचर भ्रमणे म्हणा वा विशोत्तरी महादशा म्हणा, गेली चार वर्षे जे घडत आलय, ते मला कुंडलीमधे दिसतच नाहीये, असे कसे होईल? अन म्हणूनच मी आणि लिंबी, दोघेही जण आमच्या परीने हे अरीष्ट नाहिसे व्हावे याकरता आम्हांस ज्ञात असलेले आधिदैविक उपाय करुच करु.
***********************************
ताईंना लवकर बरे वाटू दे.
ताईंना लवकर बरे वाटू दे. त्यांच्या आणि आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळू दे, ही प्रार्थना आणि सदिच्छा.
लिंब्या . भुजंग नावाची तेरावी
लिंब्या . भुजंग नावाची तेरावी रास आलिय म्हणे. खरे आहे का ?
त्यांना लवकर बरे
त्यांना लवकर बरे वाटो.
डॉक्टरांच्या मदतीने आणि देवाच्या आशिर्वादाने त्याच बरोबर स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर जगातला कुठलाही आजार बरा होऊच शकतो.
पण देव, डॉक्टर आणि इच्छाशक्ती तिनही हवेत्च हवे
खरच मला तरी हे पटत नाही..
खरच मला तरी हे पटत नाही.. नुसते फक्त ज्योतिष बघून उपचार न करता राहायचे.. मी सुद्धा बघतो पण काही गोष्टी मला पटत नाहीत...
काही तरी प्रयत्न करणे गरजेचे आहे १ किव्हा २ नंबर पर्यायाचा जरूर विचार करावा...
याबाबत ज्योतिषी विजय जकातदार
याबाबत ज्योतिषी विजय जकातदार नारायण पेठ पुणे यांचा सल्ला घ्या.
त् तूमच्या बहिणीला बरे वाटू
त्
तूमच्या बहिणीला बरे वाटू दे.
>>>> खरच मला तरी हे पटत
>>>> खरच मला तरी हे पटत नाही.. नुसते फक्त ज्योतिष बघून उपचार न करता राहायचे.. <<<<
माफ करा हेमंतजी, पण इथे कुणीही, "नुस्ते ज्योतिष बघुन हातावर हात धरुन बसुन रहा" असे सांगितलेले नाहीये. धागा पूर्ण वाचा, या धाग्याचा तो विषयच नाहीये.
इथे सर्व वैद्यकीय उपचार चालू आहेत. अंतिम स्थितीमधे आता काय करावे याचे पर्याय, व त्याला मी दिलेले उत्तर सु:स्पष्ट आहे, ज्यात ऑपरेशन करावे असेच सांगितलेले आहे.
वर ठळक केलेल्याप्रमाणे एका वाक्यातील केवळ काही मोजक्या अस्थानी शब्दांनी आख्ख्या धाग्याबद्दल गैरसमज पसरतील अशी विधाने कृपया इथे नकोत.
Limbutinbu ji, Tumchya
Limbutinbu ji,
Tumchya bahinila lavkar bare vatel
ताईंना आरोग्य लाभो ही
ताईंना आरोग्य लाभो ही प्रार्थना.
जर जन्मवेळ/दिवस वगैरे चुकलेली नसेल्, तर मी आजही हेच म्हणू इच्छितो की जे घडातय, ते कुंडलीत कुठल्याच बाजुने प्रतिबिंबित होतच नाहीये. ग्रहस्थिती म्हणा, गोचर भ्रमणे म्हणा वा विशोत्तरी महादशा म्हणा, गेली चार वर्षे जे घडत आलय, ते मला कुंडलीमधे दिसतच नाहीये, असे कसे होईल?
शरीरातील नसांचा कारक बुध
शरीरातील नसांचा कारक बुध ग्रह हा लग्नेश आहे व तो अस्तंगत आणि वक्री आहे आणि विचित्रपणा आणणार्या हर्शल सारख्या पापग्रहा सोबत आहे तसेच राहूची द्रुष्टी यामुळे जे घडातय, ते
कुंडलीत कुठल्याच बाजुने प्रतिबिंबित होतच नाहीय असे म्हणण योग्य
ठरणार नाही .अष्टमाचा सम्बन्ध शस्त्रक्रियेशि आहे त्यामुळे शनिमहादशेत शस्त्रक्रिया झाली .मला वाटते आहे की 2019 ला अष्टमाची दशा सम्पून लग्नची आणि सुखाची दशा सुरू होत आहे त्या वेळी काही फरक पडेल असे वाटते.
वाय२जे, तुम्ही म्हणताय ते
वाय२जे, तुम्ही म्हणताय ते शक्य नाही, कारण, हर्षल देखिल अस्ती आहे, व हे ग्रह चतुर्थात, बुधाच्याच राशीत आहेत. मला मातुल बाजुस्/स्वगृहाचे बाबतीत तृटी आढळायला हव्या होत्या, तशाही नाहीयेत, कारण, हर्षलच अस्ती.
सप्तमेश, दशमेश गुरुही तिथेच, व त्याचेकडुन मात्र जॉब/नवरा याबाबतीत अतिशय सुंदर फळे मिळालेली आहेत. जर हर्षल प्ल्युटो तिथे परिणामकारक ठरत असते तर चतुर्थ स्थानाच्या संदर्भाने व अन्य स्थानी नजरेतही त्यांचे दु:ष्परिणाम दिसायला हवे होते, ते दिसत नाहीत.
सगळ्यात शेवटी, दुखणे उपटलय ते डोकेदुखीतुन, मेंदुचा विकार हे निदान, ब्रेनट्यूमरची चार मेजर ऑपरेशन्स गेल्या चार वर्षात, या सगळ्याचा संबंध बुधाशी, बुधाच्या चतुर्थात असण्याशी कसा काय लावणार? माझ्या माहितीतल्या तिन चार ब्रेन ट्युमरच्याच केसेस मधे रुग्ण निदान झाल्यापासुन सहा महिने ते वर्षभरातच गचकल्याची उदाहरणे आहेत, भले एखाददुसरे ऑपरेशन करायचाही प्रयत्न झालाय. मग इथे चार ऑपरेशन्स, चार वर्षे सलग रुग्णावस्था व ती देखिल ब्रेनशी संबंधीत राहू कशी शकते? जर रहात असेल, तर त्यादृष्टीने कोणता योग तारक ठरतोय? मग तोच तारक योग, मूळात ही दुखणे उपटण्याविरुद्धच कार्यरत कसा काय नाही?
अजुन एक डेव्हलपमेंट म्हणजे ५ सेमि चा युरिन स्टोन झालाय, त्याचेही ऑपरेशन, काल किंवा आज करित असतील.
युरिन स्टोन वा तत्सम दुखण्यांचा निर्देश कुम्डलीत कुठे होतोय?
अन हर्षल/प्ल्युतो व बुधाचे अर्थच लावायचे, तर एक अर्थ "निदानात फसगत" असाही निघतो आहे त्याचे काय?
लग्नबिंदु व राहू अंशात्मक नवपंचम करतात, तेव्हा आता त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय.
आशा आहे की डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊदे, व ती पहिल्यासारखी हसती खेळती फिरती बोलती होऊदे.
लीम्बुजी चंद्र व लग्नापासून
लीम्बुजी चंद्र व लग्नापासून असणार्या अष्टम स्थानावर असणारी शनीची द्रुष्टी तुमच्या बहिणीला तारतेय अशी माणसे दीर्घायुषी असतात असे म्हणतात .आणि प्रश्न चतुर्थ स्थानाचा नाहीच तर स्वता बुध बिघडण्यचा आहे बुधाचा शरीरातिल नसा रक्तवाहीन्या यावर प्रभाव असतो .तसेच बुधाचा शत्रु मंगळ याची सप्तमात असणे आणि लग्न स्थानावर द्रुष्टी हेही कारणीभूत आहेच . सप्तमात मंगल असणाऱ्या अनेक जणांच्या कुंडलीत यूरीन सम्बन्धी विकार असतात हे बघायला
मिळाले आहे .
आणि बुध स्वता शरीर स्थानाचा
आणि बुध स्वता शरीर स्थानाचा स्वामी म्हणून देखील बिघडला आहे
त्यामुळे दुष्परिणाम वाढला आहे .
माझा मित्र ब्रेन टूमरने पुर्ण
माझा मित्र ब्रेन टूमरने पुर्ण बरा झालेला आहे (नाव मनोज जोशी) अगदी लहान वयात झाला होता. त्यामुळे त्याची उंची कमी आहे.
धिरधरा सर्व व्यवस्थित होईल !
वाय२जे, तुमचे मुद्दे लक्षात
वाय२जे, तुमचे मुद्दे लक्षात घेतलेत.
खास करुन अकराव्या शनिची दृष्टी.
आशा करु की अंतिमतः चांगले नि:ष्पन्न होईल.
हो सगळ चांगलच होणार .
हो सगळ चांगलच होणार .
sorry लीम्बुजी... माझे असे
sorry लीम्बुजी... माझे असे म्हणणे नाही आहे कि यावेळी ज्योतिष बघावे.. कारण असा परीस्तीतीत ज्योतिष नुसते कामास येत नाही... त्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ताकद त्याला यातून बरे करते. सारखे ज्योतिष बघून काय होत नाही असे माझे वैक्तिक म्हणणे आहे.
त्या व्यक्तीची सभोतली असलेली positivity त्याला यातून बरे करण्यास मदत करते..
आणि त्या बरोबरच मी १ व २ पर्यायाचा विचार करवा असे म्हंटले आहे.. कृपया आपण गैरसमज करू नये...
आपण आपले प्रयत्न करत राहावे... आपोआपच चांगले निष्पन होईल..हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करावी..
आणि आपण सांगितलेल्या डीटेल्स वरून २०१८ च्या सुरवातीपासून चांगले योग आहेत.. थोडा धीर धरावा..
Pages