ज्योतिषसल्ला हवाय - ब्रेनट्यूमरची पेशंट

Submitted by limbutimbu on 6 March, 2015 - 06:57

विशेष सुचना: या धाग्यावर गंभिरपणे ज्योतिष/कुंडलीविषयक मार्गदर्शन विचारले आहे. व ते ज्यांना करणे शक्य आहे त्यांनी जरुर करावे.
मात्र अन्य कोणीही, खास करुन ज्योतिषावर विश्वास नसणारे, देवधर्म यांना न मानणारे, बुद्धिवादी, अन्निसवाले-श्रन्निसवाले, समाजवादी, निधर्मी, नक्षली यांनी इकडे फिरकू नये, हा धागा व विषय त्यांचे करता नाही.

जातकः स्त्री
जन्म दिनांक: ०३/१०/१९६९ रात्री ०.४० (२ ऑक्टोंबरची रात्र, उजाडती ३ ऑक्टोंबर),
स्थळः पुणे
मिथुन राशी, आर्द्रा नक्षत्र १ चरण, लग्न मिथुन राशी, पुनर्वसु नक्षत्र
अन्य माहिती:
विवाह मे, १९९५
अपत्यप्राप्ती मे १९९६ (मुलगी) व जानेवारी, २००४ (मुलगा)

या व्यक्तिला, ब्रेनट्यूमरचे निदान मे, २०१० मधे झाले, व ब्रेन ट्यूमरचे पहिले ऑपरेशन लगेच झाले.
त्यानंतर आजवर ४ ते ५ ऑपरेशन्स झाली असून, जवळपास १२ वेळा केमोथेरपी झाली आहे.
आता परिस्थिती बिकट आहे.
४/५ ऑपरेशन्स व १२ वेळा केमो, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

नातेवाईक "निदाना बद्दलच" साशंकता व्यक्त करताहेत.
त्याचबरोबर, आता हे कसे व किती वेळ चालणार, अजुनही पुढे केमोथेरपी, व त्याचे साईड इफेक्टस टाळण्यासाठी स्टेरॉइड्स यांचे उपचार चालूच ठेवायचे वा नाही याबाबत संभ्रमात आहेत.

मायबोलीवरील ज्योतिषी मंडळींना नम्र विनंती, की या कुंडलीबाबत काही आशादायक स्थिती असल्यास तसे इथे कळविणे.

(ता.क. ७ व ८ मार्चला मी इथे प्रतिसादासाठी उपलब्ध नसेन, तरीही आपापली प्रतिक्रिया मात्र जरुर नोंदवावि ही विनंती)
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

suhasg , तुमच्या मते जन्मवेळेत किती फरक वाटतो आहे. किती वाजता चा जन्म असावा ?

limbutimbu
मी ह्याच्या आधीही प्रतिसाद दिलेला आहे . suhasg हे पैसे घेताना 'माझ्या अंदाजांकडे मनोरंजन म्हणून बघा. मी अचूक अंदाज सांगू शकत नाही' हे specify करतात . ब्रेनट्यूमर च्या बाबतीत त्यांच्या सल्ल्याच्या नादी न लागणं हेच उत्तम

पत्रिकेची हीच समस्या आहे. जन्मवेळ / तारीख चूकली असा कोणी युक्तिवाद केला तर त्याचा प्रतिवाद करता येत नाही. प्रत्यक्ष जन्माच्या वेळी तिथे हजर राहणारे देखील नीट वेळ सांगू शकत नाहीत (परिचारिका, डॉक्टर इत्यादी) कारण ते तणावाखाली असतात. त्यापेक्षा तुम्ही हात / हाताचा छापा दाखवून सल्ला का घेत नाही?

लिंबुजी,

पत्रिका पाहिली. मेष रास बिघडली आहे. बुधही वक्री आहे त्यामुळे ब्रेन संदर्भात दुखणे आहे हे मान्य करायला कठीण आहे कारण ट्युमर मध्ये अतिरिक्त पेशींची संख्या वाढणे हा भाग माझ्या मते असतो ज्याचे कारकत्व गुरु कडे जाते जो बिघडलेला दिसत नाही. ( गुरु वक्री असता हे दिसते. अस्तंगत असताना गुरु प्रभावहीन असतो )

मंगळ षष्ठेश आहे आणि व्ययेशाच्या तसेच पंचमेशाच्या नक्षत्रात आहे आणि बुधाशी केंद्र योग करुन आहे हे वर अनेकांनी म्हणल्यापणे रोगाच्या अवस्थेचे मुळ आहे हे पटत आहे.

हा दोष रेअरेस्ट असावा व ज्याला सध्यातरी हीच ट्रीटमेंट उपलब्ध असल्यामुळे ती चालु असावी.

षष्ठ स्थानतला वृश्चिक राशीतला नेपच्युन डायग्नोसीस मधे साशंकता/ ट्रीटमेंट मधे घोळ इ दर्शवत असल्यामुळे आपल्या सर्वांना वाटत असलेली काळजी सुध्दा रास्त आहे.

लग्नेशाच्या सोबत रवि असल्यामुळे या सगळ्या ट्रीटमेंट मधुन आश्चर्यकारक रित्या ( ४/५ ऑपरेशन्स व १२ वेळा केमो, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.) निभाव लागला.

आता महादशा पाहु

विशोत्तरी दशेप्रमाणे शनिची १९ वर्षांची (०२/०१/२००१ ते ०२/०१/२०२०) दशा,

सध्या राहूची २०/०६/२०१७
व नंतर गुरूची ०२/०१/२०२० पर्यंत आहे.

शनि महादशेत राहु हा फारच त्रासदायक काळ असतो आणि भोगणे या शिवाय त्यावर उपाय दिसत नाही.

या काळात परिस्थिती बिघडेल किंवा स्थिर राहील. सुधारणा होणे कठीण वाटते.

अर्थातच दैवी उपाय यावर परिस्थीतीला नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी ठरतील.

कोणत्याही आजारात सुर्योपासना ( उगवत्या सुर्याला अर्ध्य देणे - ओम आदित्याय नमः ) हा जप प्रभावी आहे.

जर रुग्ण करु शकत नसेल तर संकल्प पुर्वक पतीने किंवा मुलाने करावा.

शनि- राहु काळ कसा जातो यावर पुढील भाकित करणे योग्य ठरेल.

लिंबुनी एक सुचना केली ते मला पटले. संस्थळाचा सार्वजनिक संपर्क माध्यम हा उपयोग करून या विषयासंबंधी काहीजण चर्चा करत आहेत तर आपण इतरांनी वाचनमात्र असावे असं वाटतं.
मीपण omganesh dot com वर कुंडली काढून पाहिली आणि चर्चा वाचतोय.

अन्विता ने जे लिहिले आहे . जे ग्रह्योग पत्रिकेत दिसतात त्यावरुन आजारपणाचा अंदाज येतोच .महादशेचा विचार करता ,
ह्या पत्रिकेनुसार सध्या शनि महादश चालू आहे .शनि मारक आणि बाधक ह्या दोन्ही भावांचा कार्येश होत नाही . तसेच तो शुक्राच्या नक्षत्रात आहे व शुक्र तृतीयात आहे व शुक्र पंचमेश व द्वाद्शेष आहे त्यामुळे शनि च्या महादशेत ह्यांचे हॉस्पिटल व औषध उपचार चालूच राहतील .सध्या शनि मध्ये राहू ची अंतर्दशा २०१७ पर्यंत आहे . त्यामुळे व्यक्तीस धोका उद्भभवणार नाही असा अंदाज आहे . पुढची अंतर्दश गुरूची २०१९ पर्यंत आहे त्याकाळात मात्र व्यक्तीस जास्त त्रास होण्याची शक्यता आहे . पण शनि महादशा पाठीशी असल्याने जीवितास धोका वाटत नाही .

काउ उगाच काहीतरी काय सांगताय ? १३ व अध्याय हा रोगानाशा साठी , शारीरिक व्याधी बऱ्या होण्यासाठी आहे . १४ व अध्याय हा सर्वांगाने दुःख नष्ट करण्यासाठी आहे . दोन्ही वाचले तरी चालतील . पण हे त्यांनी स्वतः किवा त्यांच्या पतीने वाचण आवश्यक आहे .
लिंबू तुम्ही पत्रिकेच्या नादी लागत बसणार आहात कि खरच काही उपाय करणार आहात ? सद्गुरु कृपा असणार्याला कळीकाळा चं भय नाही . पण तहान लागल्यावर विहीर खोदायची म्हनल तर अवघड आहे

सारिकाजी,
<<< लिंबू तुम्ही पत्रिकेच्या नादी लागत बसणार आहात कि खरच काही उपाय करणार आहात ? सद्गुरु कृपा असणार्याला कळीकाळा चं भय नाही .>>>> यास १००% अनुमोदन.

लीम्बुजी, पत्रिकेतून रुग्ण बारा होण्यासाठीचा उपाय कोणी इथे सांगेलअसे वाटत नाही. तसा मिळाल्यास जरूर करावा. परंतु सारिकाजी यांनी आधी म्हणल्याप्रमाणे काही ज्योतिषी पैसे घेवूनही खात्रीशीर काही सांगतीलच ह्याची ग्यारंटी नाही. ज्योतिषांकडे उपाय खचितच दिसत नाही. उगाच 'आम्ही बघा कसे बरोबर भविष्य वर्तवले' हाच काय तो मोठेपणा ते मिरवणार. जर सगळेच काही आधी ठरल्याप्रमाणे होणार असेल तर ज्योतिषाची काय गरज? वेळेप्रमाणे समजेलच सर्व काही..आधी जाणून घेवून काय मिळणार?
पत्रिकेवर माझाही विश्वास आहे पण त्याहूनही जास्त तो परमेश्वर आणि सद्गुरूंवर आहे. प्रारब्धाला बदलण्याची ताकद जी केवळ परमेश्वर व सद्गुरुंकडे आहे त्यांना शरण जा. त्यातून नक्कीच मार्ग मिळेल.
रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना...

काउ उगाच काहीतरी काय सांगताय ? १३ व अध्याय हा रोगानाशा साठी , शारीरिक व्याधी बऱ्या होण्यासाठी आहे>>>
काउंनी प्रतिक्रिया सार्कास्टिक म्हणुन दिली आहे. सो शुड टेक इट इन दॅट वे! (काउ काय आणि कोण आहे हे लिंबुंना माहित आहे सो त्यांनी पण इग्नोर केलं आहे.)

सार्क्याटिक काय त्यात ! सर्वरोगासाठी १४ वा अध्याय आहे असे त्यान्नी स्वतःच लिहिले आहे की.

माझा पाय मोडला तेंव्हा मी १४ वा वाचायचो.

पण मला त्यातला दुसराच एक अध्याय लई आवडला ... तो आता सांगत नाही... उगाच मारामार्‍या नकोत

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
गेल्या शुक्रवारपासून मीच तापाने/सर्दी/खोकला/दमा याने आजारी असल्याने इथे सविस्तर प्रतिसाद देऊ शकलो नाहीये/शकत नाहीये, तरी सर्वांच्या प्रतिक्रिया गंभिरपणे वाचल्या आहेत. (इकडे पुण्यात म्हणे स्वाइनप्ल्यूचा जोर खूप आहे... मीच टेन्शन मधे! काय करणार? )

सुहासजी, मी नातेवाईकांशी बोलून जन्मवेळ/दिनांकाची खात्री करून घेतो आहेच.

नितिनचंद्र, तुम्ही म्हणता त्याच शंका मलाही येत आहेत.

अन्विता, तुम्ही दिलेले विश्लेषणही मी विचारात घेतोय.

>>>सध्या शनि मध्ये राहू ची अंतर्दशा २०१७ पर्यंत आहे . त्यामुळे व्यक्तीस धोका उद्भभवणार नाही असा अंदाज आह>>><<<
पशुपतीजी, इथे माझे वेगळे मत आहे, शनीअंतर्गत राहू अंतर्दशेमधेच मला धोका/तब्येतीतील चढ उतार जास्त वाटतो आहे. मात्र केतूअंतर्दशा आधीच पार झाल्याने, (राहू तीव्रता वाढवतो, तर केतू "संपवितो" असे मानतात - आता हे संपविणे रोगास की रोग्यास, याचा अभ्यास व्हायला हवाय) मला तितकी काळजीही वाटत नाही. सर्व पुण्याई फळाला आली, तर ही व्यक्ति मला दीर्घायुषीच भासते आहे. मात्र काही "डॅमेजेस" होऊनचे दीर्घायुष्य नाहीना, ते देखिल तपासणे आवश्यक आहे.

सारिका, मी स्वतःच जातकाकरता महामृत्युंजय मंत्राचे हवन करणार आहे. २०१३ मध्ये १००१ मंत्रांचे हवन केले होते माझ्याच घरि. नेमके आत्ता माझ्याच तब्येतीने मला होत नाहीये. पण करणार हे नक्की. माझ्याकडून वेळेत होऊदे, व त्याचा उपयोग होऊदे अशी प्रार्थना. अध्यायाचेही बघतोय.

अपरिहार्य कारणांमुळे, सदर व्यक्तिचे हात मी बघू शकत नाहीये किंवा त्याची इमेज मागवुन घेऊ शकत नाहीये, परंतू तो पर्यायही मी माझ्यापुढे खुला ठेवला आहे. वेळ येतात ते बघिन.

सर्वांना धन्यवाद. व वेळोवेळी परिस्थितीतील बदल/सुधारणा यांचा फिडबॅक (पाठपुरावा) करून तपशील इथे देईनच.

कूटस्थ, तुमचा मजकूर समजला.
मी स्वतःही ज्योतिषी (कुंडली व हस्तसामुद्रिक) असल्याने येथील अभ्यासकांसाठि एक विषय म्हणुन, व परिस्थितीचा अंदाज कुंडलीवरून किती घेता येईल याचा अभ्यास म्हणुनही हा विषय मांडला आहे.
इश्वरेच्छा बलियसि, तेव्हा तिला शरण जाणे हे करतोच आहे.

ज्योतिषी, १००% जसे वाटले तशी उच्चारणा करूच शकत नाही, याचे व्यावहारिक उदाहरण सांगतो.
माझा मुलगा ग्रॅज्युएट झालाय, नोकरीच्या शोधात, त्याचा प्रश्न, "मला सरकारी नोकरी लागेल का?"
त्याच्या कुंडलीप्रमाणे माझ्या मते, त्याला "अधिकाराची भुमिका असलेली नोकरी नक्की मिळेल, पण ती सरकारी नक्की नसेल, तसेच तो कोणता व्यवसाय करू शकणार नाही"
आता हे जसेच्या तसे सांगितले असते, तर तो एकतर निराश तरी झाला असता, कारण विचारण्याच्या वेळेस त्याचे मनात तीव्र इच्छा की सरकारी नोकरीत जावे.
जर होईल असे सांगितले, तर माझे भविष्य तर चूकतेच, पण "खोटे" बोलण्याच्या पापाचाही मी धनी होतो.
तेव्हा मध्यममार्ग काढून त्यास इतकेच सांगितले की "तू प्रयत्न जरुर करीत रहा, पण त्याच्या फारसा नादी लागु नकोस, फार अपेक्षा बाळगू नकोस, खाजगी क्षेत्रातही तितकेच प्रयत्न कर."
पुढे त्याने दीडेक वर्ष निरनिराळ्या सरकारी नोकर्‍यांच्या ठिकाणी अर्ज/डीडी वगैरे भरुन प्रयत्न केले. कुठेही उपयोग झाला नाही.
सध्या तो एका खाजगि शिक्षणसंस्थेमधे आहे, इतक्या लहानवयातच "अकाऊंटंट" म्हणुन आहे. पगार यथातथाच आहे, पण "अधिकार" भरपूर आहे....
भविष्य कळले, तरी सांगण्यावर बंधने कशास्वरुपाची असू शकतात त्याचा अंदाज यावा असे एक अगदि छोटे घरातलेच उदाहरण वर दिले.
"तुला सरकारी नोकरी लागणार नाही" हे भविष्य मी जसेच्या तसे सांगू शकत नव्हतो, कारण भविष्य सांगण्याचा मूळ उद्देशच जातकाचा "धीर व आशा व त्याद्वारे प्रयत्नवाद" वाढविणे हा असतो, ना की ज्योतिष्याची बत्तीशी कशी खरी ठरते हे जिथे तिथे सिद्ध करीत बसणे. अन त्यामुळेच मी त्याला तेच सत्य, वेगळ्या शब्दात सांगितले म्हणण्यापेक्षा त्याच्या मनाचि मशागत वा पुर्व तयारी करू पाहिली.
नेमके इथेच, ज्योतिषाकडून "मोघम" बोलणे होते, ज्याचा फायदा घेऊन जिथेतिथे अन्निस/बुप्रा लोक हे सिद्ध करा, ते सिद्ध करा वगैरे आव्हाने द्यायला मोकळे असतात व ज्योतिषाचा/भाकितांचा प्रयत्नवादाशी काही संबंधच नाही, ज्योतिष माणसांना अंधश्रद्धाळू बनवून कर्महीन/कर्मच्यूत करते अशी निरर्गल व मूर्खपणाची मल्लीनाथी करीत रहातात.
(याव्यतिरिक्त, अर्धवट ज्ञानावर अर्धवटरित्या "मोघम" बोलून वेळ मारुन नेणारे कुडमुडे ज्योतिषी असतात हे वास्तव असले तरी त्यामुळे ज्योतिषीव्यक्ति खोटी ठरू शकते, शास्त्र नव्हे! पण त्यावरूनच वडाचि साल पिंपळाला लावून, ज्योतिष हे शास्त्रच नव्हे, व ते खोटेच असल्याचा कांगावा करायलाही अन्निस/बुप्रावाल्यान्ना संधी मिळते हे नाकारून चालणार नाही)

>>>> चलता है लिंबुदा. नरो वा.. भूमिका स्वत: धर्मराजास घ्यावई लागली होती. <<<< अगदी अगदी नाठाळा....
पण नेमका त्याचाच गैरफायदा अन्निस/बुप्रावाले घेत असतात. अन जिथेतिथे सान्ख्यिकी विश्लेषणावरून सिद्ध करा वगैरे बाष्कळ आव्हाने देत असतात.
सान्ख्यिकी विश्लेषण करायचेच, अन शास्त्रातील ग्रहगुणांच्या ग्रुहितकांशी ताळमेळ घालून बघायचाच तर आत्ताच अस्तित्वात असलेले गुन्हेगार/मनोरुग्ण/व्यसनी याचबरोबर पोलिस/सैन्य यांचेतील लोकांच्या कुंडलीशी, शेतकरी-सामान्यज-पोलिस/मिलिटरि यातील आत्महत्यांच्या केसेस, तसेच यच्चयावत रुग्णालयातील विविध विशिष्ट रोगांचे रुग्ण यांच्या भरपूर शेकड्याने कुंडल्या अभ्यासून त्यातिल कॉमन ग्रहयोग हे शास्त्रातील ग्रहगुणांच्या ग्रुहितकांशी जुळतात की नाही हा अभ्यास करण्या ऐवजी, आम्हि देतो त्या कुंडल्या बघा, अन सांगा भविष्य असले आचरट व मूर्खपणाची आव्हाने ज्योतिषी व्यक्तिंन्ना देण्यात ते वेळ घालवितात.
या अन्निस/बुप्रावाल्यांच्या "शास्त्रिय संशोधन"वगैरे बाबतच्या सांख्यिकी विश्लेषणाच्या बेअक्कलेची मजल, कुठल्यातरी जाहीर(?) पत्रकाद्वारे दहापाच कुंडल्या देऊन, दाखवा वर्तवून यांचे भविष्य अन सिद्ध करा ज्योतिष हे शास्त्र" इतपतच आहे.
या त्यांच्या आव्हानाने, ना ज्योतिष शास्त्राचा फायदा होत, व केवळ फारफारतर त्या त्या "ज्योतिषीव्यक्तिची" परिक्षा होऊ शकते. पण ते त्यांना अमान्य असते. उद्या डॉक्टरांचे निदान (ते देखिल अनेकवेळा चूकते व कित्येकवेळेस सेकंड ओपिनियन वेगळे येते) चूकले तर कोणी वैद्यकशास्त्राला दोषी ठरवित नाही, पण हिंदूधर्मश्रद्धांवर घाव घालण्याचेच योजिलेल्या निधर्मी/बुप्रा लोकांकडे असले नैतिक युक्तिवाद करुन काहीही उपयोग नसतो.
ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांमधे निव्वळ जुने ग्रंथाधार न घेता, प्रत्येक ग्रंथाधाराला साजेसा डाटा गोळा करून भरपूर नव्हे तर प्रचंड अभ्यास व्हायला हवाय, ज्यायोगे, अजुन नविन गृहितकेही नि:ष्पन्न होतील हे जाणकार ज्योतिषी मान्य करतोच. पण त्यास निदान भारतात (हिंदुस्थानात) तरी तशी कसलीही सुविधा, शिक्षणक्षेत्र/सरकारी क्षेत्र/योजना/संस्था यामधे उपलब्ध नसते. ज्योतिषाचे जे काही शिक्षण/प्रसार/ज्ञानार्जन/संशोधन होते, ते निव्वळ व्यक्तिगत व काही खाजगी संस्थांचे मार्फतच. बहुसंख्य हिंदूंच्या हिंदुस्थानात, हिंदू धर्मशास्त्राचाच एक भाग असलेल्या ज्योतिषविद्येचा काडीचाही अभ्यास कोणत्याही सरकारी अभ्यासक्रमात नाहिच्चे, संशोधन करणे ही फार दूरची गोष्ट, उलट असा अभ्यास करणार्‍यांना, ते शास्त्रच झूठ आहे असे मानून त्यांचेपुढे जिथे तिथे अडचणींचे डोंगर उभे करण्याचे काम मात्र तथाकथित बुद्धिवाद्यांकडून सर्रास होते आहे. (या उलट, सर्व वेदसाहित्य नेटवर जे उपलब्ध आहे, ते अमेरिकेतील महर्षी युनिव्हर्सिटीद्वारे आहे, भारतातील कोणत्याही युनिव्हर्सिटीद्वारे नाही)
अन वर पुन्हा या मूर्खांची आचरट आव्हाने व कायदेशीर कारवाईच्या धमक्या यातुन हिंदुस्थानात २१वे शतक उगविलेलेच नसुन, मध्ययुगिन युरोप मधे (तसेच भारतातील काही मुस्लिम राजवटीत) काहि शतकांपूर्वी जशी गूढ शास्त्रांवर बंदी होती, तशीच आजही आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे. असो.
कालाय तस्मै नमः....
वेद व वेदांगे हे अमर्त्य आहेत, अमानवीय आहेत, उत्स्फुर्त आहेत, व ती उत्स्फुर्तता दैवी प्रसाद आहे अशी श्रद्धा असल्यानेच, वर्तमानात या शास्त्रावर ते नष्ट व्हावे म्हणुन कितीही बंद्या/संकटे आली, तरी ते टीकून राहिल.
बर्‍याच वर्षांच्या दुष्काळानंतर पडलेल्या पावसाने तरीही बर्‍याच वर्षांनी जमीनीत लपलेल्या बीजाला फुटणार्‍या अंकुराप्रमाणे, जीवांमधे उत्स्फुर्तपणे प्रकट होईल यात मला तरी जराही शंका नाही.

kaau ,
Tumhi dekhil pothi vaachata??

Tumacha paay nemka kashya mule bara zaala?
Medical treatment?
Dhanagari tel
Ki 14 va adhyay?

Sorry for typing in english
and sorry limbuji for post not related to ur topic

>मी स्वतःच जातकाकरता महामृत्युंजय मंत्राचे हवन करणार आहे<
हा श्रद्धेचा प्रांत आहे हे मान्यच. त्यामुळे आपल्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल.आपल्याला बर वाटेल. पण संबंधीत जातकाची जर श्रध्दा नसेल तर? श्रद्धा किंवा अनुभूती ही हस्तांतरीत करता येत नाही. संबंधीत जातकाची पण तशी श्रद्धा असल्याशिवाय त्याला अनुभूती येणार नाही. अर्थात सश्रद्धता वा अश्रद्धता या मनाच्या अवस्था आहेत असे मी मानतो.त्या बदलू शकतात. वैद्द्यकीय उपचार तर चालूच आहेत साईड बाय साईड हे पण करुन पाहू या म्हणुन हे उपाय केले जातात. माझ्या मते यात गैर नाही. कारण त्यात॑ हानी नाही. झाला तर फायदाच होईल. जातकाला बरे वाटावे ही माझी मनापासून इच्छा आहेच.
आपली मनाची अवस्था सध्या संवेदनशील असल्याने लिखाणात काही उणे अधिक वाटल्यास क्षमस्व!
ता.क. माझ्या बहिणीच्या हृदयशस्त्रक्रियेच्या वेळी माझ्या मनावर ताण आला होता. सकाळी फिरुन येताना समोरच्या राममंदीराच्या बाकड्यावर मी बसतो. तेव्हा मी रामाला सांगितले की माईचे ऑपरेशन यशस्वी होउ देत मी तुला एक बीअर देईन.ऑपरेशन यशस्वी झाले मग मी बिअर ची बाटली आणुन रामाला लांबून दाखवली व घरी आणुन स्वतःच प्यायली. मला बर वाटल. गावी आमचेच राममंदीर असल्याने रामाशी आपला विशेष स्नेह आहे.

"ता.क. माझ्या बहिणीच्या हृदयशस्त्रक्रियेच्या वेळी माझ्या मनावर ताण आला होता. सकाळी फिरुन येताना समोरच्या राममंदीराच्या बाकड्यावर मी बसतो. तेव्हा मी रामाला सांगितले की माईचे ऑपरेशन यशस्वी होउ देत मी तुला एक बीअर देईन.ऑपरेशन यशस्वी झाले मग मी बिअर ची बाटली आणुन रामाला लांबून दाखवली व घरी आणुन स्वतःच प्यायली. मला बर वाटल. "

अरेरे . . . . . देवा या अनिस कार्यकर्त्याला 'तळीराम' होण्यापासुन पराव्रुत्त कर रे बा.

>>अरेरे . . . . . देवा या अनिस कार्यकर्त्याला 'तळीराम' होण्यापासुन पराव्रुत्त कर रे बा.<<
अहो आपल सध्या सगळ 'शास्त्रापुरतं' असतय. Happy

संबंधीत जातकाची जर श्रध्दा नसेल तर >>>
माझ्या मामीला cancer झाला होता . मला त्यावरचा अध्यात्मिक उपाय माहित होता . मी तिला विचारलं , सांगू का? करशील का ? तेव्हा ती म्हणाली
बघू वेळ मिळाला तर करीन . मी तिला नाही सांगितला . कारण मग देवसुद्धा म्हणणार बघू जमलं तर कृपा करू . आणि मग हे लोक स्वताची चूक लक्षात न
घेता देवाच्या नावाने ओरडत बसणार .

लिम्बुभाऊ देवाचेच करणार असाल तर एक सुचवावेसे वाटतेय. डॉ. ची मदत घ्याच, पण शक्य असेल तर "" दिनदयाल बिरदु सम्भारी| हरहू नाथ मम सन्कट भारी | "" या मन्त्राचे सम्पुट लावुन म्हणजे प्रत्येक दोह्या च्या आधी हा मन्त्र म्हणून श्री सुन्दरकान्ड कोणाकडुन तरी करवुन/ म्हणवुन घ्या आणी म्हणताना पाण्याने भरलेल्या भान्ड्यावर त्याचा/ तिचा हात ठेऊन ( म्हणणार्याचा हात ) ते पाणी रोगी स्त्रीला प्यायला द्या. सुन्दर् कान्ड तसे प्रभावी आहे. पण जबरदस्ती नाही की कराच म्हणून.

पण एक लक्षात ठेवा की कुठलिही उपासना करताना आधी सन्कल्प सोडुन/ करुन मग तुमची आराधना सुरु करा. सन्कल्पाशिवाय सिद्धी होत नाही.

तसेच पत्रिकेतला बुध बिघडलाय मग श्री विष्णू उपासना का नको? अहो बुधा साठी विष्णु उपासना आहे. श्री गजेन्द्र मोक्ष स्तोत्र मनापासुन/ ह्रुदयापासुन वाचा. तुमच्या नातेवाईक स्त्रीची तब्येत खडखडीत बरी होवो ही शुभेच्छा.

>>>> हा श्रद्धेचा प्रांत आहे हे मान्यच. <<<<<
धन्यवाद, अन थ्यान्क्स गॉडलाही.
>>>> त्यामुळे आपल्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल.आपल्याला बर वाटेल. <<<<
माझ्यावर कसलाच ताणतणाव नाही.

>>>> पण संबंधीत जातकाची जर श्रध्दा नसेल तर? <<<<<
हे जर तर काढण्याइतकी परिस्थिती नाहीये, व ४/५ ऑपरेशन्स अन १२ केमोथेरप्या यानंतर पेशंटची अवस्था बेडवर कशी झाली असेल याचा अनुभव वा अनुभुतीद्वारे वा इमॅजिनेशनद्वारे तुम्हाला कल्पना आलेली दिसत नाही. पेशंट श्रद्धा/अंधश्रद्धा/बुप्रावाद यासारख्या गोष्टींचा विचारही करण्याच्या स्थितीत नाही.
>>>> श्रद्धा किंवा अनुभूती ही हस्तांतरीत करता येत नाही. संबंधीत जातकाची पण तशी श्रद्धा असल्याशिवाय त्याला अनुभूती येणार नाही. <<<<<<
एका शारिरीक व भावनिक मर्यादेपर्यंतच हे बरोबर आहे.
मर्यादा अशी की मला गुलाबाचा वास जसा आला, व जी अनुभुती आली, जो अनुभव आला, अशी गरज नाही की तोच अनुभव/अनुभुती दुसर्‍यालाही यावी.
गुलाबाच्या सुवासाचे उदाहरण कळले नसेल, पुरेसे नसेल तर गुलाबाच्या ऐवजी सुकटबोम्बिलाच्या वासाचे उदाहरण घ्या.... एकाचा अनुभव/अनुभुती प्रमाणे सुकट बोम्बिलाच्या वासाने (दुर्गंध?) त्याच्या मनात किळस निर्माण करेल, तर दुसर्‍याच्याबाबतीत सुकट बोम्बिलाच्या वासाने (सुगंध?) खाण्याची वासना निर्माण होऊन त्याच्या तोंडाला पाणी सुटेल, दोघेही मानवच! अन याफरकामुळेच, अनुभव/अनुभूती हस्तांतरीत करता येत नाही जशीच्या तशी, पण इथेच "संस्कारांचा" संबंध येतो, व ब्राह्मणी घरातिल बालक, पूर्वापारच्या त्याचेवर घडविलेल्या संस्कारांमुळे व जाणिवपूर्व सुकटबोम्बिलापासून दूर ठेवल्यामुळे सुकटबोम्बिलाचा वास आल्यास नाक मुरडेल, तर तेच एखादे कोळ्याचे वा अन्य कोणत्या जातीचे बालक, लहानपणापासूनच घरात तोच सुकटाचा वास घेत अस्ल्याने, खाण्यापिण्यातहुंगण्यात त्याच वासाचा संस्कार त्यावर होत/झालेला असल्याने त्यास त्या वासाचे काहीच वाटणार नाही.
यात अनुभव व अनुभूतीमधे तुम्ही "श्रद्धा" हा शब्द विनाकारण घुसडवलेला आहे असे मला वाटते.
श्रद्धा ही याहून पूर्णतः भिन्न आहे. (पण त्याविषयी नंतर कधीतरी).

>>>>> अर्थात सश्रद्धता वा अश्रद्धता या मनाच्या अवस्था आहेत असे मी मानतो.त्या बदलू शकतात. <<<<<
नक्कीच बदलू शकतात. पण परत, मनाच्या सश्रद्ध व अश्रद्ध अशा विशिष्ट अवस्था यायला निदान तुम्हा आम्हासारख्या सामान्य जनांना बाह्य वास्तव परिस्थितीचे अनुभव/अनुभूती व जोडीने तर्क आवश्यक ठरतो. निखळ श्रद्धा या सर्वाहूनही वेगळी असू शकते जिला बाह्य संस्कारांची जोड आवश्यक असतेच असे नाही, ती मनात स्फुरूही शकते असे निदान मजसारखे हिंदूधार्मिक लोक मानतात.

>>>> वैद्द्यकीय उपचार तर चालूच आहेत साईड बाय साईड हे पण करुन पाहू या म्हणुन हे उपाय केले जातात. <<<<<
अर्थातच ! उपलब्ध असल्यास व खर्चाच्या बजेटमधे बसणार असल्यास वैद्यकीय उपचार, निदान शहरी सुशिक्षितांमधे तरी आधी केले जातात. जेव्हा वैद्यकीय उपचारही दाद देत नाहीत, तेव्हाच मग देवधर्म आठवतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जसे की माणूस ठेच लागल्यावरच ऐन्शीनव्वदीचा झालेला असला तरी "आईग/मम्माग" म्हणून कित्येक काळापूर्वीच गचकलेल्या आईशीचीही आठवण काढतो. तेव्हा त्यात निव्वळ संस्कार वा सवईचा भाग नसतो, एरवी बायकापोरेनातवंडे यासोबत सुखाने कालक्रमणा करताना त्याला आईची आठवणही होत नाही. पण मुद्दा तो नसून, माणुस देवाचीही आठवण याच सुत्रानुसार गरजेच्या वेळेसच काढतो, व ती गरज निर्माण झालीये हे तेव्हाच ठरते जेव्हा सर्व भौतिक ज्ञात उपाय थकलेले आहेत.

>>>> माझ्या मते यात गैर नाही. कारण त्यात॑ हानी नाही. झाला तर फायदाच होईल. जातकाला बरे वाटावे ही माझी मनापासून इच्छा आहेच. <<<< धन्यवाद. अन परत एकदा थ्यान्क्स गॉडलाही.

>>>> आपली मनाची अवस्था सध्या संवेदनशील असल्याने लिखाणात काही उणे अधिक वाटल्यास क्षमस्व! <<<< मन २४ तास सजग/संवेदनशील राहू शकते, नव्हे नव्हे ते असतेच. फक्त माणूस भौतिक व्यावहारिक कृत्रिम उपचारांमधे इतका गुंततो की त्याचे स्वतःचे मन संवेदनशील/सजग आहे वा नाही याचीही फिकीर करीत नाही व सोंग आणतो की तो किती कठोरहृदयी/बेडर/निडर/करारी वगैरे आहे. अर्थात मी जेव्हा हे सांगू शकतोय, तेव्हा तुमची ही खात्री नक्की पटली असेल की मी इतकाही संवेदनशील नाही, गुळूमुळू नाही, की आल्या प्रसंगामुळे हेलपाटून जाईन (अन म्हणुन देवाधर्माचे करीन). मी पूर्णतः बौद्धिक/वैचारिक/तार्किक दृष्ट्या सुस्थितीत असताना व कोणत्याही अंमली पदार्थांच्या अंमलाखाली नसतानाच मला पटले, म्हणून स्वखुषीने स्वधर्माच्या आचारविचारशास्त्राचा अभ्यास करतो आहे, अनुकरण करतो आहे.
तुमच्या लिखाणात उणेअधिक वाटले नाही. अन तसेही तुम्ही वय/अनुभवाने/ज्ञानाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ व श्रेष्ठ आहात, तेव्हा तुम्ही क्षमा मागण्याची गरज नाही.

>>>> तेव्हा मी रामाला सांगितले की माईचे ऑपरेशन यशस्वी होउ देत मी तुला एक बीअर देईन.ऑपरेशन यशस्वी झाले मग मी बिअर ची बाटली आणुन रामाला लांबून दाखवली व घरी आणुन स्वतःच प्यायली. मला बर वाटल. गावी आमचेच राममंदीर असल्याने रामाशी आपला विशेष स्नेह आहे. <<<<
माझ्यामते, रामाने ती तुमची बिअरची ऑफर कालभैरवाकडे सुपुर्द करुन त्याला साकडे घातले असेल की बाबारे मी काय हे असले घेत नाही, पण तुला चालते, तेव्हा तूच याचे काम करुन टाक. किंवा असेही असेल, की तुमचे काम रामानेच केले असेल, पण तुमची बिअरची भेट आपण नै का लग्नात आलेल्या भेटवस्तू इकडच्या तिकडे फिरवतो, तशी ती कालभैरवाकडे फिरवली असेल..... Proud हो की नै? खरेखोटे राम जाणे !

साधना, परिस्थिति जैसे थे आहे, व आता हळू हळू ओळख विसरायला लागली आहे.
अधिक तपशील लिम्बीकडुन मागवुन घेतो. धन्यवाद.

Pages