धर्म म्हणजे काय?
धर्म म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडल्यास त्याचे काय उत्तर मिळते? मूळात हा प्रश्न पडायलाच हवा का? आजकालच्या परिस्तिथीला पाहिले की आपण म्हणतो की "त्या धर्मातच ती शिकवन आहे" मग त्यांचा आणी तुमचा धर्म वेगळा का? धर्म वेगळा असतो का?
पाहिलंत किती प्रश्न पडले ते?
वेबस्टर नुसार धर्माची व्याखा अशी केली आहे.
"a strong belief in a supernatural power or powers that control human destiny"
ही व्याख्या अयोग्य आहे असे मला वाटते. धर्म म्हणजे कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे व ती हे विश्व चालवते असे म्हणने व समजने मला स्वतःला अंधश्रध्दा वाटते. हा विचार मी आस्तिक असुनही करत आहे कारण एकदाका "तोच" हे सर्व चालवतो असे ठरविले की मग संपले. तिथे मग जगात घडनारी प्रत्येक गोष्ट त्यानेच घडविली व तेच बरोबर आहे असे समजने. मग ह्या व्याखेनुसार मुंबईत अशातच झालेला अतिरेकी प्रकार पण काही जण बरोबर ठरवतील कारण ती "त्याचीच" आज्ञा समजली जाईल.
हिंदु धर्मानुसार जर आपण व्याख्या करायला जाऊ तर एका वाक्यातली सोपी व्याख्या मी करेन.
"धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान"
विश्व कोणी तरी चालवतो व आपल्या सर्वांच्या नाड्या त्या देवाच्या वा अज्ञात शक्तीच्या हातात आहेत असे आपण जेव्हां माणतो तेंव्हा आपण धर्माला अर्धवट समजुन घेतले आहे.
जेंव्हा आपल्या सर्व प्राथमिक गरजा भागल्या जातात तेंव्हा माणुस "स्वतः बद्दल विचार" करायला लागतो. जेंव्हा विचार धार्मीक दृष्ट्या होतो तेंव्हा तो अंतर्मुख व्ह्यायला लागतो. व प्रश्न पडायला लागतात. " मी कोण", " माझे नंतर काय होणार्","मॄत्यू आहे का"? वैगरे वैगरे. हे प्रश्न जेंव्हा पडतात तेंव्हा त्याचे उत्तर द्यायला "धर्म" कामी येतो.
कुठल्याही धर्माला निर्मान व्हायला दोन मुख्य बाबी लागतात.
१. त्या धर्माचे तत्वज्ञान
२. त्या धर्मांची दैनंदिनी म्हणजेच कर्मकांड
नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.
वेंदातानुसार धर्म म्हणजेच सत्य आणी धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस.
आपल्या स्वतः मधील काही गोष्टींना दुर करुन माणूस हा त्या सत्याकडे जाउ शकतो. त्या सत्याचे जेंव्हा ज्ञान होईल तेंव्हा तो ज्ञानी होइल.
देव तुम्हाला दिसला का? ह्या प्रश्नावर उत्तर देताना रामकृष्णांनी हो सांगीतले व पुढे विवेकानंदाना "आत्मसाक्षात्कार" घडवुन आणन्यास मदत केली. हा आत्मसाक्षात्काराकडे जाणारा मार्ग म्हणजेच हिंदु पध्दती नुसार धर्म. आणि म्हणूनच विवेकानंदानीं "सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसीपी" लिहून नाही ठेवली कारण हा "आत्म" साक्षात्कार आहे जो फक्त अनुभुती घेउनच मिळू शकतो.
विवेकानंद एके ठिकानी म्हणतात, ""Religion is the manifestation of the divinity already within man." And to the question of what form this manifestation of divinity takes, the answer was "in consciousness".
वेदांता नुसारा धर्म म्हणजे आपल्याच मध्ये असलेल्या शक्ती कडे जाण्याचा रस्ता.
उदाहरणच द्यायचे झाले तर अधांरात तेवनार्या दिव्या कडे पाहील्यावर तुम्हाला असे वाटते की त्या दिव्याची वात म्हणजेच सर्वकाही. पण त्या वातीला एनर्जी पुरवीनार्या तेला कडे तुमचे दुर्लक्ष होते. ते तेल म्हणजेच कदाचित अंतिम सत्याचा एक भाग आहे.
धर्माची व्याखा करायला मी कोणी मोठा ज्ञानी माणूस नाही. पण हे प्रश्न जेंव्हा सतावित असतात तेंव्हाच आपण "स्वतःला" ओळखन्याच्या मार्गावर चालन्यास प्रवृत्त होतो.
ॐ वाड़ मे मन्सि प्रतिष्ठिता |
मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि |
वेदस्य म आणीस्थः श्रृतं मे मा प्रहासी: |
अनेनाधीते नाहोरात्रान्सन्दधाम्यॄतं वदिष्यामि |
सत्यं वदिष्यामि | तन्मामवतु |
तद्वक्तारम्वतु | अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम् ||
ॐ शान्ति: | शान्ति: || शान्ति: |||
अर्थात
माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणी माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो. हे ब्रह्म मला ज्ञान करुन दे. माझ्यात वेदांना (वेद म्हणजे ज्ञान) आणं. मी ऐकलेले कधीही विसरु नको असे कर. ह्या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. मी शास्त्रसंमत व आचारसमंत सत्याचा अवलंब करेन. हे बह्म माझे रक्षण करो.
चला!
चला! स्वाति यांना आता ब्रह्मज्ञान प्राप्त झाले!! जय स्वातिमाता! प्रसादाचे लाडू पाठवून द्या.
जिवन हेच्ह
जिवन हेच्ह सत्य, मृत्यु ही माया. आपण अमर असतो - जिवंत असेपर्यंत >> मस्त विचार आहे...
'प्राचिन व
'प्राचिन व महत्वाची उपनिषदे प्रतिभेची म्हणजे अंतःस्फूर्तीची पिल्ले आहेत. ब्रह्मजिज्ञासू ऋषी विश्वविषयक गूढ गोष्टींच्या चिंतनामधे तन्मय होऊन जात. या तन्मयतेची अथवा ध्यानातील उत्कटतेची एक मर्यादा गाठली की त्यांच्यावर अध्यात्म प्रसाद होई.तो झाला की ब्रह्मज्ञान इ. बद्दलची नवीन तत्वे त्यांना आतून स्फुरत. अशा रीतीने अनेक ऋषींना अनेक तत्वे स्फुरली आणि ती त्यांनी प्रामाणिकपणे शब्दात व्यक्त केली. या कारणाने उपनिषदांमधे अनेक ऋषींची वेगवेगळी मते आढळतात!'
'ऊपनिषदांचा अभ्यास, लेखक के वि. बेलसरे त्रिदल प्रकाशन, मुंबई' पृ. १२-१३.
त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगून आपल्यावर उपकार करून ठेवले आहेत. कारण त्या विविध मतांतून एक सलग विचारधारा गीतेत सापडते. त्यात काही मूलभूत सिद्धांत आहेत. त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवलात तरच पुढचे तर्कशास्त्र तुम्हाला समजेल. ते मूलभूत सिद्धांतः
- परमात्मा हा शाश्वत आहे.
- त्याचा एक भाग प्रत्येक सजीव गोष्टीत आहे.
- जीवनात तुम्ही मायेमुळे अशाश्वत गोष्टींच्या मागे लागलात, दुष्कर्मे केलीत नि भगवंताकडे
दुर्लक्ष केलेत, तर हा आत्मा मलीन होतो.
- मग तो पुनः शुद्ध होईस्तवर तुम्हाला जन्ममरणाच्या फेर्यातून सुटका नाही!
अर्थात प्रत्येक जन्मात तुम्हाला जन्मापासून मरणापर्यंत अनेक यातनांना तोंड द्यावे लागते.
ते जर नको असेल, तर गीता वाचा, नि तसे करा.
ज्या लोकांना हे समजत नाही, पटत नाही, अश्या लोकांना गीतेत अज्ञानी म्हंटले आहे. त्यांना निष्काम कर्म करणे जमणार नाही. कारण त्यांची बुद्धी, मन यांना अहंकार, क्रोध इ. वाईट गुणांची बाधा होते नि त्या वृत्तीनेच ते कर्मे करतात, त्यांना कर्मफळाची आशा सोडवत नाही. त्याला उपाय आहे. नामस्मरण. नामस्मरणाने अहंकार क्रोधादि दुर्गुण नाहीसे होऊन अज्ञान दूर होईल. या नामस्मरणावर विश्वास बसायला इथे पूर्वी लिहीलेले सगळे खरे मानले पाहिजे. मग सगळे जमेल. म्हणून नामस्मरण मुख्य.
चार्वाक ऋषींना पण अन्तःस्फूर्ति झाली असेल, नि त्यांचे वेगळेच मत बनले असेल. माझ्या मते चार्वाक ऋषींचे म्हणणे मानणारे लोक भारतात होते, पण जसे अलिकडे मॉर्मन ख्रिश्चनांना इतर लोकांनी इथून तिथून हाकलून दिले, तसे त्या चार्वाकवाद्यांनाहि भारतातून हाकलून दिले. ते पुढे यूरोपमधे नि तिथून पुढे अमेरिकेत आले.
म्हणूनच अमेरिकन लोक चार्वाक नीति तंतोतंत पाळतात.
यावज्जीवेत, सुखं जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |
भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ||
आणि माझ्या सारखे कमी बुद्धीचे लोक, इतर काही समजत नाही, म्हणून तीच नीति पाळतात. शिवाय काही झाले तरी चांगल्या लोकांबरोबर तो कोळी मलाहि आत ओढूनच घेणार आहे, मग काळजी कसली?
झक्कि,
झक्कि, तुम्हि मायबोलीवर वेळ वाया घालवण्याऐवजी एखादे छान पुस्तक लिहायला हवे, प्रवचने द्यायला हवीत. स्वातिमाता पेक्षा झक्किबुवा अधिक समर्पक वाटतं
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
सध्या काय
सध्या काय कमी बुवा आहेत का भारतात किंवा अमेरिकेत? नि मला कोण देणार चाळीस रोल्स रॉइस, भगवान रजनीशांना दिल्या तश्या?
आणखी एक गंमतः केनोपनिषद्, मंत्र ६:
यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः |
अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम् ||
ज्याला (आत्मतत्व) कळत नाही असे वाटते त्याला ते कळलेले असते. ज्याला ते कळते असे वाटते त्याला ते कळलेले नसते. कारण (आत्मज्ञानी) पुरुषास कळण्याची जाणीव नसते तर आत्म्याचे अज्ञान असणार्या पुरुषास कळण्याची जाणीव असते.
वत्सा आस्चिगा, तुला आत्मतत्व कळले का?
कृष्णविवराच्या अस्तित्वावर विश्वास असेल तर उत्तर द्यायचा प्रयत्नहि करू नका.
यस्यामतं
यस्यामतं चा एवढा चांगला उपयोग पाहिला नाही. (म्हणजे उदाहरण म्हणून.)
खरे तर केनोपनिषद् इथेच सुरु होते आणि इथेच संपते. इतका गहन विचार आहे हा.
आत्मतत्व / आत्मा हे मांडलेच आहे तर एक विचार्/शंका. आत्मा आहे की नाही, चार्वाक खरे की इतर पंथ? की आद्य शंकराचार्यांनी लिहीलेले आत्मषटक / निर्वाणषटक बरोबर ह्याबाबत गोंधळ उडतो खरा.
मनोबुध्यहंकार चिताने नाहं । न च श्रोतजिव्हे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमी न तेजू न वायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ १ ॥ **
व नंतर त्या षटकात आलेले
अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणां ।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं || ६||
हे खरे.
मलाही कधी कधी आत्मा वगैरे नसावे असे वाटते, पण असे साहित्य / तत्वज्ञान वाचले तर जी गोष्ट नसेलच त्यावर इतके मोठे तत्वज्ञान कसे तयार केले असावे? असे असेल तर बेसच फसवा ठरतो. जे की बर्याच लोकांचे म्हणने आहे. पण इतके ऋषी, मोठी लोक हे विचार मांडतात म्हणून निदान त्यात काहीतरी तथ्य असावे कदाचित असेही वाटते.
* खाल्लेल्या अन्नापासून "मन" कसे तयार होते हे पण उपनिषदामध्ये लिहीलेले आहे. त्यावर काय भाष्य?
(मला हा विचारच जबरी वाटतो की मनाचे वा इतर गोष्टींचे भाष्य आपल्या शरीराच्या अनेक भागांचे वर्णन करुन केलेला आहे. शरीरशास्त्र प्रगत होते असा निष्कर्ष त्यातून निघू शकतो.)
** ह्या सर्व तत्वज्ञानाचा सार म्हणून तर कदाचित "मी" कोण ह्याचे उत्तर शंकराचार्यांनी असे दिले असावे. ज्यात अनेक उपनिषदांमध्ये जे सांगीतले आहे, ते केवळ एका षटकात शंकराचार्यांनी मांडले.
अगदीच
अगदीच रहावलं नाही म्हणून.
>>मलाही कधी कधी आत्मा वगैरे नसावे असे वाटते, पण असे साहित्य / तत्वज्ञान वाचले तर जी गोष्ट नसेलच त्यावर इतके मोठे तत्वज्ञान कसे तयार केले असावे?
हा युक्तिवाद पटला नाही. या न्यायाने भविष्य, हस्तसामुद्रिक, वगैरे गोष्टींवरही विश्वास ठेवावा लागेल.
शिवाय आपल्याला कोणते साहित्य/तत्वज्ञान आवडते त्यात संस्कारान्चा बराच मोठा वाटा असतो.
एखादा गोरापान दाढीवाला भारतीय माणूस अस्खलित सन्स्कृत मध्ये एखादे तत्वज्ञान सान्गत असेल तर आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा असे वाटेल. ते एखाद्या अमेरिकन ख्रिश्चन माणसाला तसे वाटणार नाही. एखादा पाद्री चर्च मध्ये धीर गम्भीर आवाजात बायबल मधले उतारे सान्गत असेल तर त्याला ते आवडेल, आपल्याला नाही.
असो, या पोस्ट मुळे विषयान्तर होते असे वाटले तर उडवेन मी.
केदार,
केदार, चार्वाकनी म्हंटले म्हणुन मला वरील काही गोष्टी पटतात असे नाही. खरंतर चार्वाकचे 'कर्ज काढुन तुप खा ..' हे मला पटत नाही (ते "चुकीचे" आहे म्हणुन नाही [कारण काहीच चूक नसते] आणि कोलेस्टेरोल मुळे पण नाही). या विचारांबाबतचा माझा गुरु आहे युक्लिड. आपण ज्याला युक्लिडिय भुमिती म्हणतो त्यातील पाचव्या गृहितिकाने त्याला बराच त्रास दिला. त्याच्या "सिस्टीम" करता पहिली चार आवश्यक होती, पण पाचवे अस्थानि वाटत होते. जितक्या कमी गोष्टी गृहीत धरता येतील तेवढ्या धराव्या. बाकी ज्याची त्याची मर्जी. Don't take life too seriously. You will not get out of it alive.
विकास, झक्कि: तुमच्या प्रश्नांवर विस्ताराने लिहावे लागेल. शनिवार आधि शक्य होईल असे वाटत नाही.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
सुरेख
सुरेख चर्चा. झक्की, पोस्टे आवडली.
बरेच साहित्य, तत्त्वज्ञान निर्माण झाले म्हणून त्यात तथ्य असेलच असे नाही, पण बरेच साहित्य, तत्त्वज्ञान निर्माण झाले, म्हणून त्याकडे गांभीर्याने नक्कीच बघावे लागेल. ते दुर्लक्षूनही चालणार नाही (अगदी ज्योतिष, सायंटॉलॉजी, ओम शिनरी क्यो इ. सकट).
'जे (आचार, विचार आणि कर्म) धारण करतो ते' म्हणजे धर्म असेल तर कुठले आचार, विचार, कर्म आपण धारण करणार आहोत ? जे आपल्याला योग्य वाटतील ते. (क्षने तोच मुद्दा मांडला आहे). खरा धर्म एकच का असावा ? सत्यच जर सापेक्ष असेल तर मग 'खरा धर्म एकच नसणे' हाच 'खरा धर्म' नव्हे काय ?
***
Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin
<<सत्यच जर
<<सत्यच जर सापेक्ष असेल >> हे सत्य, ब्रह्म, परमात्मा या गोष्टी भारतीय तत्वज्ञांच्या मते, स्थळकाळकारणाने मर्यादित असलेल्या जडबुद्धीला आकलन होणे कठीण. पण विचारशक्ति (खरे तर तीपण जड अश्या शरीर. मन, बुद्धि याने मर्यादित आहे) त्याबद्दल जास्तीत जास्त 'हे असे नाही, तसेहि नाही,' एव्हढेच म्हणू शकते.
चार्वाक नीती वर विश्वास ठेवणारे युरोपात नि अमेरिकेत गेले हे मी गमतीने लिहीले होते. पण वस्तुस्थिती अशी आहे की चार्वाक नीति, गेली पन्नास वर्षे सोडली तर, भारतात कुणालाच बरोबर वाटली नाही. त्यावर जास्ती चर्चा, उहापोह झाले नाहीत, ती बरोबर असल्याचे कुणालाच पटलेले दिसत नाही.(हजारो वर्षात) या उलट अगदी पूर्वीपासून (चार हजार वर्षांपासून)घोकून घोकून सर्वांनी वेदोपनिषदे जागृत ठेवली. नक्कीच कुणालातरि त्याची काहीतरी प्रचिती आली असेल, पण ते आपल्याला कळायला मार्ग नाही.
ज्योतिष हि अनेक वर्षांपासून आहे, पण वरील तत्वज्ञानाप्रमाणे त्याला महत्व कमी. कारण सगळे भगवंताच्या हातात आहे, तो जे म्हणेल, तसे होणार. शरीर, पैसा इ. सर्व माया आहे, मृत्यू म्हणजेहि काही मोठीशी गोष्ट नाही या सर्व कल्पनांचा प्रभाव जास्त असल्याने त्याकडे जास्त लक्ष गेले नाही. ते तितके शुद्ध स्वरूपात जपले नाही, त्याची आता प्रचीति येत नाही. आणि म्हणून कुणि त्यावर जास्त संशोधनहि करत नाही. आणि तत्वज्ञानाप्रमाणे त्याची गरजहि नाही. फक्त देवाचे स्मरण करत रहा, कर्तव्य करत रहा, भविष्याची चिंता करू नका.
बुद्ध धर्म कमी झाला, सनातन धर्म का जिवंत राहिला? मंडन मिश्र नि श्री. शंकराचार्यांनी चर्चा केली, नि श्री. शंकराचार्यांचे म्हणणे सर्वांनी मान्य केले.
सायंटॉलॉजी, ओम शिनरी क्यो इ लोकांशी कुणा श्री. शंकराचार्यांनी वाद घालून ठरवले तर उत्तर मिळेल की त्यावर विश्वास ठेवावा की भारतीय तत्वज्ञानावर.
याबद्दल स्फुटः पूर्वी रेव. टिळक इ. शिकलेल्या सुसंस्कृत व्यक्तींनी विचार करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पण महात्मा गांधींनी मात्र तसाच खूप अभ्यास करून शेवटी हिंदू धर्मच स्वीकारला. आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला. (त्यामागे तत्वज्ञान तसेच सामाजिक सुधारणेचा हि विचार होता.)
थोडक्यात गेल्या हजारो वर्षात पुष्कळ लोकांनी त्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवला. म्हणून ते अजून मानले जाते.
याचा अर्थ असा नव्हे, की ते तुमच्या पेक्षा, किंवा आजकालच्या लोकांपेक्षा जास्त बुद्धिमान होते. तेंव्हा तुम्ही पण विचार करून ठरवू शकता, की काय खरे मानायचे? धर्म कशाला म्हणायचे, धर्म असे काही पाहिजे का? आजच्या जीवनात मुळात काही कमी आहे का, की ज्या योगे हे विचार करायला पाहिजेत?
--------------------------------------------------------------------------------
आजकाल इन्टरनेट वर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्याने समाधान होत असेल तर धर्म नावाचे काही हवे का?
Don't take life too seriously. You will not get out of it alive.
म्हणजे काय? मग ते परमात्मा वगैरेचे काय हो? आणि स्वर्गात जायचे की नरकात याचा विचार करायला नको का? जा, ताबडतोब चर्चमधे जाऊन पाद्र्याला तुम्ही काय काय गंमती केल्या ते सांगा, नि चांगले घसघशित १०० डॉ. देऊन या, किंवा एखाद्या बुद्ध, हिंदू, ख्रिश्चन अश्या माणसाला ठार मारून का.
जे
जे आपल्याला योग्य वाटतील ते. (क्षने तोच मुद्दा मांडला आहे).>> बरोबर आहे योग्य आणि अयोग्य हे व्यक्तिसापेझ आहे आणि म्हणुनच धर्म ह्या शब्दाला हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन इ. उपाध्या लागल्या. फक्त 'क्ष'नी 'स्वतःला' हा शब्द न वापरल्यामुळे माझा गोंधळ झाला इतकच.
खरा धर्म एकच का असावा ? सत्यच जर सापेक्ष असेल तर मग 'खरा धर्म एकच नसणे' हाच 'खरा धर्म' नव्हे काय ?>> ह्या प्रश्नात धर्म हा शब्द मला वैश्विक निर्मिती आणि लय ह्या अनुषंघाने (गुणधर्म ह्या) वेगळ्या अर्थाने अभिप्रेत होता. तो आशिषच्या विधानाशी निगडीत होता.
Pages