धर्म म्हणजे काय?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

धर्म म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडल्यास त्याचे काय उत्तर मिळते? मूळात हा प्रश्न पडायलाच हवा का? आजकालच्या परिस्तिथीला पाहिले की आपण म्हणतो की "त्या धर्मातच ती शिकवन आहे" मग त्यांचा आणी तुमचा धर्म वेगळा का? धर्म वेगळा असतो का?

पाहिलंत किती प्रश्न पडले ते?

वेबस्टर नुसार धर्माची व्याखा अशी केली आहे.
"a strong belief in a supernatural power or powers that control human destiny"

ही व्याख्या अयोग्य आहे असे मला वाटते. धर्म म्हणजे कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे व ती हे विश्व चालवते असे म्हणने व समजने मला स्वतःला अंधश्रध्दा वाटते. हा विचार मी आस्तिक असुनही करत आहे कारण एकदाका "तोच" हे सर्व चालवतो असे ठरविले की मग संपले. तिथे मग जगात घडनारी प्रत्येक गोष्ट त्यानेच घडविली व तेच बरोबर आहे असे समजने. मग ह्या व्याखेनुसार मुंबईत अशातच झालेला अतिरेकी प्रकार पण काही जण बरोबर ठरवतील कारण ती "त्याचीच" आज्ञा समजली जाईल.

हिंदु धर्मानुसार जर आपण व्याख्या करायला जाऊ तर एका वाक्यातली सोपी व्याख्या मी करेन.

"धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान"

विश्व कोणी तरी चालवतो व आपल्या सर्वांच्या नाड्या त्या देवाच्या वा अज्ञात शक्तीच्या हातात आहेत असे आपण जेव्हां माणतो तेंव्हा आपण धर्माला अर्धवट समजुन घेतले आहे.

जेंव्हा आपल्या सर्व प्राथमिक गरजा भागल्या जातात तेंव्हा माणुस "स्वतः बद्दल विचार" करायला लागतो. जेंव्हा विचार धार्मीक दृष्ट्या होतो तेंव्हा तो अंतर्मुख व्ह्यायला लागतो. व प्रश्न पडायला लागतात. " मी कोण", " माझे नंतर काय होणार्","मॄत्यू आहे का"? वैगरे वैगरे. हे प्रश्न जेंव्हा पडतात तेंव्हा त्याचे उत्तर द्यायला "धर्म" कामी येतो.

कुठल्याही धर्माला निर्मान व्हायला दोन मुख्य बाबी लागतात.
१. त्या धर्माचे तत्वज्ञान
२. त्या धर्मांची दैनंदिनी म्हणजेच कर्मकांड

नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.

वेंदातानुसार धर्म म्हणजेच सत्य आणी धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस.

आपल्या स्वतः मधील काही गोष्टींना दुर करुन माणूस हा त्या सत्याकडे जाउ शकतो. त्या सत्याचे जेंव्हा ज्ञान होईल तेंव्हा तो ज्ञानी होइल.

देव तुम्हाला दिसला का? ह्या प्रश्नावर उत्तर देताना रामकृष्णांनी हो सांगीतले व पुढे विवेकानंदाना "आत्मसाक्षात्कार" घडवुन आणन्यास मदत केली. हा आत्मसाक्षात्काराकडे जाणारा मार्ग म्हणजेच हिंदु पध्दती नुसार धर्म. आणि म्हणूनच विवेकानंदानीं "सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसीपी" लिहून नाही ठेवली कारण हा "आत्म" साक्षात्कार आहे जो फक्त अनुभुती घेउनच मिळू शकतो.

विवेकानंद एके ठिकानी म्हणतात, ""Religion is the manifestation of the divinity already within man." And to the question of what form this manifestation of divinity takes, the answer was "in consciousness".

वेदांता नुसारा धर्म म्हणजे आपल्याच मध्ये असलेल्या शक्ती कडे जाण्याचा रस्ता.

उदाहरणच द्यायचे झाले तर अधांरात तेवनार्‍या दिव्या कडे पाहील्यावर तुम्हाला असे वाटते की त्या दिव्याची वात म्हणजेच सर्वकाही. पण त्या वातीला एनर्जी पुरवीनार्‍या तेला कडे तुमचे दुर्लक्ष होते. ते तेल म्हणजेच कदाचित अंतिम सत्याचा एक भाग आहे.

धर्माची व्याखा करायला मी कोणी मोठा ज्ञानी माणूस नाही. पण हे प्रश्न जेंव्हा सतावित असतात तेंव्हाच आपण "स्वतःला" ओळखन्याच्या मार्गावर चालन्यास प्रवृत्त होतो.

ॐ वाड़ मे मन्सि प्रतिष्ठिता |
मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि |
वेदस्य म आणीस्थः श्रृतं मे मा प्रहासी: |
अनेनाधीते नाहोरात्रान्सन्दधाम्यॄतं वदिष्यामि |
सत्यं वदिष्यामि | तन्मामवतु |
तद्वक्तारम्वतु | अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम् ||
ॐ शान्ति: | शान्ति: || शान्ति: |||

अर्थात
माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणी माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो. हे ब्रह्म मला ज्ञान करुन दे. माझ्यात वेदांना (वेद म्हणजे ज्ञान) आणं. मी ऐकलेले कधीही विसरु नको असे कर. ह्या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. मी शास्त्रसंमत व आचारसमंत सत्याचा अवलंब करेन. हे बह्म माझे रक्षण करो.

प्रकार: 

केदार
छान विचार मांडले आहेत. पण अजून विस्ताराने अन अजून थोडं मुद्देसूद लिहायला हवं होतं. शिवाय शुद्धलेखनाकडे पण लक्ष हवंय .

पुढच्या वेळेस व्याकरण आणि विस्ताराकडे लक्ष देईल. Happy

धर्म ज्याचा त्याचा...

<<नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.

आणि म्हणूनच विवेकानंदानीं "सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसीपी" लिहून नाही ठेवली कारण हा "आत्म" साक्षात्कार आहे जो फक्त अनुभुती घेउनच मिळू शकतो. >>

अगदी योग्य व बरोबर. विवेकानंदांनी 'रेसिपि' लिहून ठेवली नाही. गीतेत सांगितली आहे असे बर्‍याच जणांचे मत आहे. पण गीता समजण्यास नि आचरणात आणण्यास कठीण. मग साधूसंतांनी एक मार्ग सांगितला, तो म्हणजे नामस्मरण. एकाग्र चित्त करून नामस्मरण. संसारात राहून, नित्याचे आचरण करून मनात सतत नामस्मरण हा आमच्यासारख्या अज्ञानी माणसांना आचरण्यात येण्याजोगा सोपा मार्ग.

यावर एक प्रश्नः तुमचे नित्याचे आचरण, आजकालच्या जगात म्हणजे, कितीदा खोटे बोलणार, कितीदा पैशामागे धावणार, कितीदा अनैतिकपणा करणार? हे सगळे करून पुनः नामस्मरण?
तर त्याचे उत्तरः नामस्मरणाच्या प्रभावामुळे तुमच्या वाईट मनोवृत्ति नाहीश्या होतील. मग या जगात तुम्हाला पैसा कसा मिळेल? नाही मिळणार, पण तरीहि तुम्ही आनंदात नि सुखसमाधानात राहू शकाल. "माझी खात्री आहे, कारण मी असे केले नि मी सुखी समाधानी आहे, पण तुलाहि तसाच अनुभव आला नाही, तर तू मनापासून केले नाहीस, म्हणून!"

ही फक्त मला मिळालेली उत्तरे आहेत. ती खरी की खोटी याचा पडताळा फक्त 'आत्मानूभूति', म्हणजे परत सांगणार्‍याची जबाबदारी नाही. ते म्हणणार, तुम्ही मनापासून केले नाहीत तर तुम्हाला फळ मिळणार नाही. म्हणजे परत बरोबर नसेल त्यांचे सांगणे, तरी चुकी तुमचीच!

हटकेश्वर, हटकेश्वर.

मी कोण, मृत्यू म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी जे कामी येते त्याला काय म्हणावे हा प्रश्न आहे. वैचारिक बुद्धीभेद किंवा तत्त्वज्ञान हे कामी येत असेल तरी माझी हरकत नाही. मुळात मी वैचारिक बुद्धीभेदाला कमी प्रतीचे मानत नाही. असा बुद्धीभेद होतो त्याचा अर्थ असा की आपल्या बुद्धीला जे पटले होते ते त्यात काही भगदाडे राहिली आहेत. म्हणजे आपण जो विचार केला तो परिपूर्ण नव्हता. तेव्हा वैचारिक बुद्धीभेद हा आपल्या विचारपद्धतीमधला उणीवा दाखवणारा मार्ग आहे आणि त्याचे स्वागत करायला हवे. त्यामुळे आपण पुनर्विचाराला उद्युक्त होऊ. सारांश, वैचारिक बुद्धीभेद हा मला तरी एक स्वतःच्या विचारांना परिपूर्णतेकडे नेणारा मार्ग वाटतो. अर्थात, असा बुद्धीभेद झाल्याने माझा अहंकार (इगो) नक्कीच दुखावला जातो, पण त्यापलीकडे जाऊन, म्हणजेच 'या बुद्धीभेदाचा निष्कर्ष काय ?' हे बघितले पाहिजे असे वाटते.
सत्य काय आहे हा प्रश्न अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा असला तरी सत्य हे केवल असेल याची मला खात्री नाही. एकाच सत्याला अनेक पैलू असतात आणि आपल्याला जे कळले तेच सत्य आहे याची खात्री कशी करावी ? आत्मानुभूती हा एक वरकरणी उत्तम भासणारा मार्ग असला तरी माझी आत्मानुभूती ही इतर सर्वांशी जुळत असेल तरच त्याला गंभीरपणे घेता येते. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक पार्श्वभूमी यांमुळे या वैयक्तिक अनुभूतीत फरक पडत असेल तर त्या अनुभूतीला किती महत्त्व द्यायचे ?
सत्याकडे जाणारी रेसिपी नसते हे एका विशिष्ट विचारसरणीत मांडले गेले, सत्याकडे जाणारे अनेक मार्ग असू शकतात हेही त्या विचारसरणीत मांडले गेले. पण 'एकच मार्ग असतो' असेही काही दुसर्‍या विचारसरणीत मांडले गेले आहे. गंमत अशी की या सर्व विचारसरणीच्या अनुयायांत आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार झालेले लोक आहेत आणि त्यांचे सत्यासंबंधी एकमत नाही.
एक शक्यता अशी की त्या बाकीच्या विचारसरणी अजून 'पुरेशा' प्रगल्भ झालेल्या नाहीत. पण शेकडो वर्षे झाली तरी त्यांच्या प्रगल्भतेत काही फरक पडू नये हे मला लक्षणीय वाटते.
हिंदू विचारसरणीचा विचार करता मला प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे तिच्यात अंतर्भूत असलेला समाजपोषक विचार. सत्याकडे जाणारे मार्ग अनंत असणे, कुठलाही मार्ग निषिद्ध नसणे, सत्याचे कुठलेही रूप निषिद्ध नसणे हे समाजस्वास्थासाठी उत्तम विचार आहेत. मला ते विचार पटतात. पण याचे एकमेव कारण 'माझी पार्श्वभूमी (धार्मिक व सांस्कृतिक) हिंदू आहे' एवढेच नाही असे मला वाटते. ते माझ्या rational विचार करणार्‍या अंगाससुद्धा पटतात. मग 'सत्य काय असेल ते असो, समाजपोषक विचार म्हणजे धर्म' असा धर्माचा अर्थ असेल का हा विचार मला करावा लागतो.

    ***
    '... जब एक कायर सडीयल डरपोक मॅक्वॅकने डकरिज की लडाई हारी थी !'

    माझ्या मते धर्म म्हणजे अशी आदर्श आचरणशैली जिच्यायोगे ईश्वराच्या आस्तित्वाची सतत जाणीव रहावी .
    जस वस्त्र आपण नित्य धारण करतो तस हे आदर्श आचरण सतत अंगीकाराव .धर्माच्या विचारात प्रथम
    चराचराचा विचार व मग स्वत;चा विचार असावा .धर्माच्या आचरणाने चराचराच कल्याण ,मग समाजाच ,
    आणि मग स्वत्;च .जस धर्माच दृढतेने आचरण वाढेल तसा अनंताचा प्रवास सुरु होत असावा हे निश्चीत .
    गीता शास्त्र व पातंजल योगशास्त्रात जी आचरणशैली नमूद केली आहे ती म्हणजे धर्माचरण .
    प्रत्येकाचा वेगवेगळा धर्म असू शकत नाही .तथाकथीत जे वेगवेगळे धर्म प्रचलीत आहेत ती स्थलकालानुसार
    केलेली वेगवेगळी प्रतिपादन आहेत .धर्म एकच व तो च मानवाने आचरण करण्यायोग्य .
    यज्ञ ,दान ,तप ,कर्म ,स्वाध्याय यांच नित्य आचरण म्हणजे धर्म .हे आचरण स्वेच्छेने अंगीकारलेल असत .
    तेव्हा या आचरणात धुसफुस किव्वा जगावर उपकार करण्याची भावना नसावी .कर्तव्य बुद्धीने याच आचरण
    असाव .जितके धर्माचरणी लोक वाढतील तस चराचराच्या आस्तित्वाची समस्या ,समाजाच्या स्थैर्याची
    समस्या व स्वत्;च्या विकासाची समस्या सुटत जाईल हे निश्चीत .

    .

    स्लार्टी पोस्ट आवडली.

    मी जो बुद्धीभेद म्हणू पाहतो, तो थोडा वेगळा आहे आणि तू जो नमूद करतोस ती मात्र बौद्धीक चर्चा वा स्वतःशी संवाद वैगरे. मतमतांतर हे व्हायला हवेच, नाहीतर काय बरोबर काय चूक हे लक्षात येणार नाही. पण बुद्धीभेद मात्र वेगळा असतो असे वाटते.

    सत्य हे केवल असेल याची मला खात्री नाही. >> अगदी बरोबर. त्या केवला कडे जाण्याचाच तर प्रयत्न. कारण अजुन ती खात्री नाही. (पुढे त्यासाठी छांदोग्योपनिषदातील काही वाक्य लिहीतो.)

    आपल्याला जे कळले तेच सत्य आहे याची खात्री कशी करावी ? >> एक उदाहरण देतो. लागू होईल असे वाटतेय पण लागू झाले नाही तर माबुदोस.

    २+२ = ४ हे केवल सत्य नाही, तर ४ ह आकडाच केवल सत्य. मग ते ३+१, ५-१, ६-२ वैगरे वैगरे, हे सर्व 'मार्ग' ज्यातून ४ हे केवल सत्य मिळते.

    छांदोग्योपनिषदाच्या सहाव्या अध्यायात श्वेतकेतूला, आरूणी ऋषी व त्यांचा पुत्र अंगिरस ( नातू, वडिल व आजोबा) हे 'सत्य' म्हणजे काय हे समजावून सांगतात. एके ठिकानी ते त्याला वडाचे फळ आणायला सांगतात व ते फोडायला सांगतात. त्यात अतिसुक्ष्म बी आढळते.
    त्यावर ते म्हणतात,

    "तं होवाच यं वै सौम्येतणिमानं न निभालयस एतस्य वै सौम्येषोSणिमम्न एवं महान्नग्रोधस्तिष्ठति श्रद्धस्त्व सोम्येती ||
    तं हं उवाच यं एतं आणिमानं न निभालयसे एतस्य आणिम्नः एव एषः महान् न्यग्रोधःतिष्ठति श्रद्धत्स्व इति"

    ज्या प्रमाने वडाच्या बीचे सूक्षम्त्व तुला दिसत नाही त्याच सूक्षत्म्त्वाचा हा असा मोठा वटवृक्ष तयार होतो त्याच प्रमाने सुक्ष्म सत् पासूनच हे प्रचंड जगत् निर्मान झाले आहे ह्यावर तू श्रद्धा ठेव.

    पुढे ते म्हणतात,
    " स य एषोS णिमैतदात्ममिदं सर्वं तत्सत्यंस आत्मा तत्वमसि श्वेतकेतो इति भूय एव मा भगवान् विज्ञापयत्विति तथा सौम्येति होवाच |

    हे जे सूक्षत्म आहे तद्रूपच हे सर्व जगत् आहे. तेच सत्य आहे. तोच आत्मा आहे. हे श्वेतकेतू, तेच तू आहेस.

    ---------

    कदाचित आपणच सत्य आहोत, पण ते समजून घ्यायला तयार नाही आहोत. अजुनही माझा गोंधळ आहेच. Happy तो राहणारच असे वाटते. कदाचित काखेला कळसा, गावला वळसा हेच असेल, पण तो कळसा दिसन्यासाठी गावभर फिरावे लागनार.

    धर्म म्हंटला की सत्य यायलाच हवे का?
    धर्म हा सत्याकडे(च) जाण्याचा मार्ग असायला हवा का?
    खरोखरच एक(च) सत्य असते का?
    सत्य चिरंतन व शाश्वत असते का? असायला हवे का?
    खरच असे एखादे सत्य असेल तर आयुष्यातिल मजा कमी नाही का होणार?

    --------------------------------------------------------------
    ... वेद यदि वा न वेद

    धर्म म्हंटला की सत्य यायलाच हवे का? >> हो असे वाटते खरे. कारण रिलीजनची व्याख्या निट नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.

    केवल सत्य (कदाचित) एकच असेन. सत्य अनेक असतात. जसे माझे नाव, माझे शिक्षन, माझा पगार, वैगरे वैगरे.
    कदाचित लिहीन्याचे कारण तो अंदाज आहे, फॅक्ट नाही.

    उरलेले प्रश्न मलाही पडलेले आहेत. मी उत्तर देउ शकेल असे वाटत नाही.

    >>कारण रिलीजनची व्याख्या निट नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.
    उलट मला वाटतं, आपल्या इतिहासात धर्माचा जितका सांगोपांग विचार केला गेला तितका इतर कुठल्याही संस्कृतीत केला गेला नसेल.

    धर्म म्हणजे काय - धर्माचा दोन अंगांनी विचार करता येतो. आणि त्यांनुसार त्याच्या वेगवेगळ्या शब्दांत केलेल्या व्याख्या आहेत. त्यातल्या काही अशा,

    सामाजिक अंगाने धर्माचा विचार,

    * धारयति इति धर्म:। - जे (आचार, विचार आणि कर्म) धारण करण्यायोग्य आहे(त) ते म्हणजे धर्म.
    * लोकयात्रार्दम एवेह धर्मस्य नियमः कृतः। - सामाजिक व्यवहार सुरळीत चालावेत म्हणून धर्माचे नियम बनविले गेलेले आहेत.

    वैयक्तिक दृष्टीने बघितल्यास
    * यतो अभ्युदय: नि:श्रेयस सिद्धि: स: धर्म:। - जे नियम इहलोकांत उत्कर्षाचे आणि पारमार्थिक कल्याणाचे साधन आहेत ते म्हणजे धर्म अशी वैशेषिकांनी केलेली व्याख्या श्रीमत्‌ शंकराचार्यांनी देखील मान्य केली आहे.

    इतरही बर्‍याच अंगांनी याचा विचार केला गेला आहे. धर्मासंबंधी काही उत्तम विचार महाभारतातल्या भीष्म युधिष्ठीर संवादांत (१२वा अध्याय) आहेत.पण त्याचा निष्कर्ष असाच निघतो की धर्म हे कुठल्याही दृष्टीने "साध्य" नसून "साधन" आहे. आणि याच मूल विचारामुळे धर्माचे नियम कालस्वरुपे बदलण्यास सुद्धा काही हरकत नसते.

    >>धर्म म्हंटला की सत्य यायलाच हवे का?
    हा प्रश्न खूप सापेक्ष आहे. पण तुम्ही ज्या अर्थाने विचारत आहात ("धर्म पालन करणार्‍या व्यक्तीने "सत्य" जाणून घ्यायचे असेल तरच पालन करावे का" असा प्रश्नार्थ मी गृहीत धरला आहे) त्या अर्थाने त्याचे उत्तर "नाही" असे आहे. कारण वरच्या व्याख्येनुसार धर्माचे योग्य आचरण करणारी व्यक्ती सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह अशा (आणि इतर) नियमांचे पालन करुन देखील सत्याच्या दिशेने जायचा प्रयत्न करेलच असे नाही. अशी उदाहरणे आपण कित्येक पाहतो आणि त्यांत काहीही गैर नाही.

    >>धर्म हा सत्याकडे(च) जाण्याचा मार्ग असायला हवा का?
    तुमच्या कंसातल्या 'च' मुळे या प्रश्नाचे दोन अर्थ होतात. आपण दोन्हीही बाजू पाहू.
    १. धर्म हा सत्याकडे जाण्याचा मार्ग असायला हवा का? (प्रश्नार्थः सत्याकडे जाण्यासाठी धर्मपालन अपेक्षित आहे का?) - याचे स्पष्ट उत्तर होय असे आहे. सत्याकडे जायचे असेल तर धर्म हा साधन आहे.
    २. धर्म हा सत्याकडे जाण्याचा मार्ग असायला हवा का? (प्रश्नार्थः धर्मपालन हे फक्त सत्याकडे जायचे याचसाठी करायचे का?) - याचे बहुतांशी उत्तर वरच्या उतार्‍यात मिळायला हवे. सामाजिक दृष्टीने बघता धर्म हा सुदृढ समाजव्यवस्थेचे महत्वाचे अंग आहे. वैयक्तिक दृष्टीने धर्म अभ्युदयाचे साधन आहे पण त्याचबरोबर इथे परमार्थाचाही उल्लेख येतो. (परमार्थ - परम प्राप्तव्य - चारी अर्थांमधील - धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष- यांतला परम अर्थ म्हणजे मोक्ष) आणि ते प्रत्येक मनुष्य आपले प्राप्तव्य मानेल असे नाही.

    >>खरोखरच एक(च) सत्य असते का?
    >>सत्य चिरंतन व शाश्वत असते का? असायला हवे का?
    >>खरच असे एखादे सत्य असेल तर आयुष्यातिल मजा कमी नाही का होणार?

    केदार,
    हे तीनही प्रश्न मूळ विषयांशी सुसंगत आहेत असे तुझे म्हणणे असेल तर यावर चर्चा करणे योग्य होईल नाहीतर मूळ विषयाला फाटा फोडला जाईल.

    आश्चिग, गीतेतल्या दुसर्‍या अध्यावरील चिन्मयानंदांच्या किंवा इतरांच्याही भाष्याप्रमाणे, आपल्या मायारूप देह, मन नि बुद्धि यांना जे समजते त्याच्याहि पलिकडे 'काहीतरी' एकच, शाश्वत असे आहे. ते संपूर्णपणे स्थिर असते.
    असे कसे म्हणता येईल, याचे उदाहरण त्यांनी दिले आहे की नदीत 'वाहते' पाणी असते. वाहते म्हणजे काय? खाली तळ भक्कम नि जागच्या जागी असतो, म्हणून पाणी वाहते असे आपण म्हणतो. याचा अर्थ जर जगातील सर्व वस्तू सतत बदलत असतील, नि त्या बदलतच असतात, तर त्यामागे काहीतरी एक शाश्वत, चिरंतन असलेच ज्याच्या संदर्भात ते बदलते. त्यामुळे ज्याला मायारूपी बुद्धि सत्य समजते, जसे नाव, पगार, शिक्षण इ. ते सर्व माया आहे. शरीर, मन नि बुद्धि अश्या अशाश्वत आधारावर आपण जे पहातो ते तसेच अशाश्वत असते.

    ते जे काही शाश्वत आहे, त्याला आपण परमात्मा म्हणतो, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान म्हणतो, नि त्याचा अंश प्रत्येक जिवीत वस्तूमधे असतो. त्याकडे आत्मकेंद्रित होऊन बघितले तर ते आपल्याला समजेल. त्याला आत्मानुभूति म्हणतात, नि ते फक्त ज्याचे त्यालाच अनुभवता येते.

    त्याकडे जाण्याचे जे मार्ग आहेत ते म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग नि भक्तियोग. त्यातल्या त्यात कर्मयोगावर भर. कारण जिवंत असलात तर काही ना काही करणे भाग आहेच. म्हणून कर्तव्य करा पण फळाची अपेक्षा न धरता, ते सर्व देवाला अर्पण करा, म्हणजे त्या कर्माचे वाईट फळ (जसे अर्जुनाला इतर लोकांना मारावे लागले) अनुभवावे लागणार नाही. या विचारप्रणालीलाच हिंदू तत्वज्ञान समजतात, नि धर्म म्हणजे ते तत्वज्ञान दैनंदिन आचरणात कसे आणावे ते सांगणारा धर्म.

    मुसलमान नि ख्रिश्चन नि ज्यू या तत्वज्ञानात त्यांनी काही वेगळेच सांगितले आहे. पण जे स्वतःला हिंदू म्हणवतील, ते वरील तत्वज्ञान मान्य करतात, नि त्या 'धर्माचे' आचरण करतात.

    आता मला तर बुवा समजत नाही की असे हे सगळे आहे, काहीतरी शाश्वत, अविचलित आहे, तर जगात जीवन कुठून आले? तो एक मोठ्ठा बदलच नाही का? म्हणजे पुनः गोंधळ! मग समजायचे की आपण हिंदू आहोत, नि गीता वाचून त्यात सांगितल्याप्रमाणे करता आले तर बघू कायमचा आनंद वा "मुक्ति" , 'मोक्ष' मिळेल. याला श्रद्धा म्हणतात, कळले नाही, पटले नाही तरी ते खरे मानायचे!

    नाहीतरी मला स्वतःला आत्मघातकी हल्ला करून निरपराध लोकांना मारले तर स्वर्गात जाऊन कित्येक कुमारिका मिळतील, असले काही पटत नाही. तेंव्हा हिंदू धर्मच बरा.

    बोलून चालून, सेवानिवृत्त झाल्यावर मन सैरभैर भटकत असते, नि रिकामे डोके म्हणजे सैतानाला आमंत्रण! तेंव्हा काहीतरी एक गोष्ट धरून त्यावर मन केंद्रित करणेच बरे.

    माझ्या मोठ्या भावाशी मी याबाबत बोललो. तो म्हणाला, मी धर्म वगैरे जाणत नाही. पण मन शांत ठेवणे यासाठी मी माझा दिनक्रम आखून घेतला आहे, नि माझे सगळे लक्ष तो दिनक्रम नियमितपणे पाळण्याकडे लावतो. दररोज संध्याकाळी ब्रिज खेळतो, एकाग्रपणे. एरवीहि ब्रिजचाच विचार करत असतो. मी संपूर्णपणे सुखी आहे.

    आपल्या इतिहासात धर्माचा जितका सांगोपांग विचार केला गेला तितका इतर कुठल्याही संस्कृतीत केला गेला नसेल >> हो क्ष. ती व्याख्या ही इंग्रजीनुसार आहे, व ती इतक्या सहजतेने मला पटत नाही म्हणून लिहीले. (त्या व्याखेचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही असे माझे म्हणने आहे.)

    धर्माची व्याखा हिंदू धर्मा प्रमाने वेगळी आहे. इथे विहीत कर्म म्हणजे धर्म समजले जाते, म्हणून योद्धा असेल तर शत्रूला यमसदनास पाठविने हा त्याचा धर्म.

    >> आता मला तर बुवा समजत नाही की असे हे सगळे आहे, काहीतरी शाश्वत, अविचलित आहे, तर जगात जीवन कुठून आले?
    झक्कीकाका, हा बाकी million dollar question!! Happy

    ते जे ब्रह्म ते अविकारी असेल तर त्याला माया उत्पन्न करावी असं का वाटलं असेल?

    तेच तर! म्हणजे नसती झेंझट नाही!! पण मग आपल्याला बा. रा. चे ए. वे. ए. ठि. कारून तुम्ही केलेले लाडू खाता आले नसते!!
    मला तर वाटते इथे अविकारी, निश्चल, शाश्वत जे काय आहे परमात्मा, परब्रह्म याखेरीज दुसरे कुणितरी असावे ज्यांनी माया उत्पन्न केली! आता जरा काहि दिवस उपनिषदे वाचून त्यात काय म्हंटले आहे ते पाहून सांगतो.

    काहि दिवस उपनिषदे वाचून त्यात काय म्हंटले आहे ते पाहून सांगतो >> मग परत हेच प्रश्न पडतील. स्वानुभव आहे. Happy

    >>मग परत हेच प्रश्न पडतील. स्वानुभव आहे
    केदार, तुला अजून तेच प्रश्न आहेत? ब्रह्माला अविकारी म्हंटल्यावरच त्यात सगळे काही यायला हवे खरंतर. मांडूक्योपनिषद होतं ना त्यांत?
    असो. याचा धर्म म्हणजे काय याच्याशी काही संबंध नाही त्यामुळे पुढे काही बोलणं योग्य नाही.

    >> ब्रह्माला अविकारी म्हंटल्यावरच त्यात सगळे काही यायला हवे खरंतर. मांडूक्योपनिषद होतं ना त्यांत?

    क्ष, मला माहिती करून घ्यायला आवडेल. मुंडकोपनिषदात कोळ्याच्या जाळ्याची उपमा वाचल्याचं आठवतं. ब्रह्म हेच कर्ता, कारण आणि साधनही - अशा अर्थी. तरीही मला 'कारण' कळलं नाहीच.

    इथे ही चर्चा अस्थानी होत असेल तर दुसरा धागा सुरू करून सांगू शकाल का? खरंतर केदारची हरकत नसेल तर इथेही लिहिता येईल.

    क्ष, अरे ते शब्दशः नको घेउ. मला असे म्हणायचे आहे की, उपनिषदं वाचून आणखी वेगळे प्रश्न पडतात. म्हणजे प्रश्नांतून सुटका नाही, असे म्हणायचे होते.

    शिवाय वाचन आणि आकलन हा भेद आहेच. त्या श्वेतकेतू सारखे. माझी अवस्था त्याचा सारखी आहे थोडीफार. म्हणजे श्वेतकेतूला, अनेकदा उत्तर देउनही जसे सारखे तेच तेच प्रश्न पडतात, तशी. एखाद्या अधिकारी व्यक्तीकडे जाऊन निट समजावुन घेतले पाहिजे सर्व.

    माझी काहीही हरकत नाही. आपण इथेही चर्चा सुरु ठेवू शकतो.

    त्याला विचारलंय खरंतर .. पण त्याचं उत्तर नाही आलं.

    मी संदर्भ देतोय ते मांडूक्य उपनिषद, तुमचा बहुतेक मुंडकोपनिषदाबद्दल संदर्भ आला आहे (अर्थात शेवटी विषय एकच आहे).
    पण अगदी स्पष्ट सांगू का? माफ कराल अशी आशा आहे. पण यांतल्या काही गोष्टी अधिकाराशिवाय सांगू नयेत (काही अगदी मूलभूत विचार सोडले तर) त्यामुळे आपण त्या अधिकारी व्यक्तीकडून ऐकाव्यात. मी त्यांबद्दल न बोलणे श्रेयस्कर.

    पण सत्य एक की अनेक वगैरे विचारांवर धागा सुरू करता येणं नक्कीच शक्य आहे.

    >>ओह, धन्यवाद. लिहीपर्यंत तुझं उत्तर आलंच

    हो, माझा संदर्भ मुंडकोपनिषदातला आहे आणि मी झक्कींच्याच प्रश्नाबाबत पुढे विचारत होते.

    >> पण अगदी स्पष्ट सांगू का?.....श्रेयस्कर.
    हरकत नाही. स्पष्ट सांगितल्याबद्दल आभारी आहे. Happy

    काहीतरी शाश्वत, अविचलित आहे, तर जगात जीवन कुठून आले?
    ते जे ब्रह्म ते अविकारी असेल तर त्याला माया उत्पन्न करावी असं का वाटलं असेल?
    >>

    स्वाती,
    स्वामी विवेकानंदांनी या प्रश्नांवर भाष्य केलेले आहे. मी वाचलेल्या काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या म्हणून इथे लिहित आहे.

    क्ष म्हणतो तसे ह्या गोष्टी अधिकारी व्यक्तीने सांगाव्यात. परंतु, ही चर्चा तात्विक (philosophical) स्वरुपाची आहे. हे बरोबर आहे आणि हे चूक आहे असे मी म्हणत नसल्यामुळे आणि कोणता उपदेशही करत नसल्यामुळे अधिकाराचा विचार न करता जे वाचले ते खाली अनुवादित करुन लिहित आहे. पहिला परिच्छेद पहिल्या प्रश्नाशी संबंधित आहे आणि दुसरा दुसर्‍या प्रश्नाशी. चू. भू. दे. घे. Happy

    ---
    हे जग अस्तित्वात आहे हे एक illusion आहे. हे जग, देव, जन्म आणि मरण ही सगळी स्वप्ने आहेत. हे अमर्याद जीव अनेक नसून ते एकच आहेत. 'ते' अनंत आहे आणि सत्, चित् आणि आनंद हे त्याचे स्वरूप आहे. सूर्य जसा पाण्याच्या अनेक थेंबांमध्ये परावर्तित झाल्यावर अनेक सूर्य आहेत असे वाटते, परंतु मूळ सूर्य एकच आहे तसेच हे अनंत जीव एकाच तत्वाची प्रतिबिंबे आहेत. स्थळ, काळ आणि कार्यकारणभावाच्या (space, time and causation) जाळ्यातून पाहिले असता ते 'एक' जे आहे ते अनेक दिसते. अगदी खालच्या पातळीवरुन पाहिले असता ते तत्व पदार्थ (material) दिसते. अजून थोड्या वरच्या पातळीवरुन पाहिले असता ते 'प्राणी' दिसते. अजून वरच्या पातळ्यांवरुन पाहत गेल्यास ते मानव, देव असे दिसत जाते. जेव्हा perfection च्या पातळीवरुन पाहू तेव्हा ते सत्, चित् आणि आनंद दिसते.

    आता प्रश्न असा आहे की मुळात जे perfect आहे ते imperfect कसे झाले? मुळात जे अविचल आहे ते विचलित कसे झाले? तर त्याचे उत्तर असे आहे की हा प्रश्न तुम्ही विचारु शकत नाही. कारण तर्कशास्त्राच्या नियमांनुसार तुम्ही परस्परविरोधी प्रश्न विचारत आहात. एकीकडे तुम्ही म्हणत आहात की 'जे शाश्वत आहे' आणि पुढे विचारत आहात की 'ते कसे बदलले?' त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्थळ काळ आणि कार्यकारणभाव ह्या जाळ्यातून हा प्रश्न विचाराल तेव्हा त्याचे उत्तर देता येणार नाही, आणि या जाळ्याच्या बाहेर त्या प्रश्नाचे अस्तित्व अतार्किक असेल. म्हणून शहाण्या माणसाने हा प्रश्न बाजूला ठेवणे हेच उचित होय.

    ---
    संदर्भः
    1. Complete works of Swami Vivekananda, Volume 1, Lectures and Discourses, Steps of Hindu Philosophic Thought

    2. Complete works of Swami Vivekananda, Volume 3, Lectures and Discourses, The Free Soul

    सचिन, संदर्भासाठी मनःपूर्वक धन्यवाद. Happy

    >> म्हणून शहाण्या माणसाने हा प्रश्न बाजूला ठेवणे हेच उचित होय.
    हे बाकी अवघड आहे. Happy

    स्वाती:
    मुंडकोपनिषद् मंत्र ७:
    यथोर्णनाभि: सृजते गृह्णते च यथा पृथिव्यामोषधयः संभवन्ति |
    यथा सतः पुरुषात् केश्लोमानि तथा अक्षरात् संभवतीह विश्वम् ||

    अर्थः ज्याप्रमाणे कोळि स्वतःच तंतु उत्पन्न करतो व पुनः आत घेतो, ज्याप्रमाणे ....
    त्याचप्रमाणे त्या अविनाशी ब्रह्मापासून विश्व निर्माण होते.

    आपले सृष्टीबद्दलचे सर्व ज्ञान स्थळ, काळ आणि कारण यांच्या द्वारे मनात शिरते. उदाहरणार्थ जगात कोणतीही गोष्ट घडली, अगदी मनात आलेले विचार, हे सुद्धा अमक्या जागी, अमक्या वेळी, अमक्यामुळे घडली असे ज्ञान आपल्याला होते. जागेपणी काम करणारे आपले मन स्थळकाळकारण यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाऊच शकत नाही. सृष्टि निर्माण होण्या आधी स्थळ नव्हते, काळ नव्हता आणि कार्यकारण संबंध पण नव्हता. स्थळकाळकारण यांच्या बंधनात वावरून विचार करणारे आपण सृष्टीच्या आरंभी म्हणजे स्थळकाळकारण जिथे नव्हते तिथे पोचणार कसे?

    संदर्भ "ऊपनिषधांचा अभ्यासः लेखक प्रा. के. वि. बेलसरे, त्रिदल प्रकाशन गिरगाव, मुंबई.
    थोडक्यात Oh, shaddap, whaddu know?!

    "पण गंमत अशी की आपण स्थळकाळकारण या भोवर्‍यात सापडलो असलो तरी आपल्याला काळाच्या पलीकडे 'विचार करण्याची' शक्ति असते. म्हणून मग पिप्पलाद ऋषींनी एक गोष्ट सांगितली. (मोठी माणसे बाळ कसे होते या दोन वर्षाच्या मुलाला जसे उत्तर द्यावे तसे). ती थोडक्यात अशी: एकदा प्रजापतीला वाटले की प्रजा उत्पन्न करावी म्हणून त्याने नाना उद्योग करून, प्रजा निर्माण केली वगैरे वगैरे... " ibid.
    आता हा प्रजापति नि तो परमात्मा, ब्रह्म वगैरे काय आहे त्यांचा काय संबंध? ते शोधून काढायला पुनः संशोधन करावे लागेल.

    आता एतरेयोपनिषद् मंत्र २ काय म्हणतो ते पहा.
    आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत् |
    नान्यत्किन्चन मिषत् | स ईक्षत लोकान्नु सृजा इति ||
    आत्म्याने विचार केला की विश्व उत्पन्न करावे. .... ibid

    थोडक्यात केवळ कुणाला तरी काही तरी वाटले नि त्यांनी ही मायारूपी सृष्टि उत्पन्न केली नि आपल्याला जाळ्यात पकडले. आता तो कोण कोळी आपल्याला परत आत ओढून घेइस्तोवर ... हे अस्सेच चालायचे!!

    थोडक्यात मी मायबोलीवर का लिहीतो, माझे लिखाण अगदीच 'उथळ नि पांचट' असते! तरी पण मला 'वाटते' म्हणून मी लिहीतो हे त्याचे उत्तर.

    झक्किंनी योग्य लिहिले आहे. त्यांना सोयीचे, उपयोगाचे आहे म्हणुन ते जे करतात ते करतात, ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतात तो थेवतात. म्हणुन ते सत्य आहे असे मुळीच आवश्यक नाही. हे ते देखिल जाणतात. त्यांच्या भावाचा (मोठ्या!) धर्म वेगळा आहे, सत्य वेगळे आहे. सत्य हे सापेक्ष असते ते असे. कोणी सांगावे की त्यांचे सत्य सत्य नाही? एखादा "खरे" सत्य जाणलेला सांगुही शकेल. ईतरांनी अधिकाराशिवाय सांगायचा प्रयत्न करु नये.

    सत्य समजलेला त्यांना सागुही शकेल. पण ज्यांना "दुसरे" सत्य समजले आहे (उदा. बुद्ध) त्यांना कसे समजवायचे? किंवा बुद्धानी विवेकानंदांना समजावले तर? या वाक्यातील पहिल्या प्रश्नाचे कुणाला काही वाटले नसणार. विवेकानंद "आपल्या" "धर्माचे" आहेत त्यांनी इतरांना शिकवावे यात काय वावगे? पण दुसर्या कुणी विवेकानंदांना शिकवावे? ते देखिल एका "पर"धर्मियानी?

    याची सारवासारव म्हणुन सगळे धर्म एकच आहेत असे म्हंटल्या जाते. फक्त त्यांना माहित नाही

    झक्कि, मला विचाराल तर जिवन हेच्ह सत्य, मृत्यु ही माया. आपण अमर असतो - जिवंत असेपर्यंत . नंतर फरक पडत नाही. उपनिषदे, गिता ही तत्वज्ञान आहेत. उपनिषदात गिता समावलेली आहे. गितेत नसलेली इतर अनेक तत्व देखिल आहेत. त्याचप्रमाणे उपनिषदात (किंवा वेदांमध्ये) सर्व आहे असे समजणे थो..डे कोपमुंड सारखे आहे असे मला निषद करावेसे वाटते. नंतर होऊन गेलेल्या अब्जावधी लोकांप्रती, त्यांच्या विविध विचारांप्रति घोर अन्याय आहे.

    तुम्हाला जे काय वाटते ते आवडते म्हणुन करा, मेल्यानंतर काय होईल या विचारांना घाबरुन नका करु. काही अब्ज वर्षांनी पृथ्वीदेखील नष्ट होणार आहे - त्यावरिल समस्त धर्मांसहित. दुर कुठेतरी एखाद्या ग्रहावर आत्ता देखिल "खरा" धर्म जन्माला येत असेल ...

    सत्य धर्माइतकीच धुसर कल्पना आहे.

    --------------------------------------------------------------
    ... वेद यदि वा न वेद

    हं.
    आश्चीग, तू थोडे चार्वाक पंथा सारखे लिहीलेस. Happy

    वर विवेकांनंदानी सागीतले आहे ते देखील उपनिषदामधूनच असे वाटते. श्लोक आत्ता आठवत नाही, पण सत्य आणि असत्याचा उगम त्यात सांगीतला आहे. श्लोक नंतर लिहीतो. ह्यावर एक आख्खे उपनिषद आहे. निट लक्षात येत नाही, कुठले आहे ते.

    माझे वरील पोस्ट नीट दिसत नव्हते म्हणुन संपदीत केले आहे.
    -------------------------------------------------------------
    ... वेद यदि वा न वेद

    धारयति इति धर्म:। - जे (आचार, विचार आणि कर्म) धारण करण्यायोग्य आहे(त) ते म्हणजे धर्म.>>

    क्ष,

    मला वाटतं धारण करण्यायोग्य ऐवजी जे धारण करतो ते. कारण योग्य आणि अयोग्याची व्याख्या व्यक्तीसापेक्ष बदलणार.

    काही अब्ज वर्षांनी पृथ्वीदेखील नष्ट होणार आहे - त्यावरिल समस्त धर्मांसहित. दुर कुठेतरी एखाद्या ग्रहावर आत्ता देखिल "खरा" धर्म जन्माला येत असेल ...>> समस्त? खरा धर्म एकच का नसावा? दुसर्‍या ग्रहावर देखिल इथलाच धर्म जन्माला येत असण्याचीही शक्यता असु शकते.. Happy

    काही अब्ज वर्षांनी पृथ्वीदेखील नष्ट होणार आहे>> Can another galaxy cross milky way's path and pull earth in one of its own solar system? Happy

    हा लेख वाचनीय आहे.

    http://www.vridhamma.org/Dharma-Its-Definition-and-Universal-Application...

    >>कारण योग्य आणि अयोग्याची व्याख्या व्यक्तीसापेक्ष बदलणार.
    खरंय तुमचं म्हणणं, पण धर्माच्या दुसर्‍या व्याख्येकडे बघितल्यावर तत्कालीन समाजाच्या दृष्टीने योग्य अयोग्य हा गर्भितार्थ लक्षात येईल.
    असो. सत्य, ब्रह्म, देव आणि बाकी इतर संकल्पनांवर ज्यांची जी काही मते असतील ती छान आणि त्यांच्यासाठी सुयोग्य आहेत.

    <<झक्कि, मला विचाराल तर जिवन हेच्ह सत्य, मृत्यु ही माया. आपण अमर असतो - जिवंत असेपर्यंत . नंतर फरक पडत नाही. >>
    आता फक्त जिवंत असताना, माझे भरकटणारे मन, नि त्याने होणारा त्रास कसा थांबवावा? हिंदू तत्वज्ञान माझ्या बुद्धीपलीकडचे आहे. पण तसे इतर 'धर्मातले' सुद्धा पटत नाहीच (आत्मघातकी हल्ले केल्यास स्वर्गात गेल्यावर कुमारिका मिळतील?!!). कदाचित् त्यातहि काही तत्वज्ञान आहे, पण तेहि काही मला समजेल असे नाही.
    तेंव्हा वर्षानुवर्षाच्या 'संस्कारा' प्रमाणे मी हिंदू आहे, नि त्यात सांगितलेला नामस्मरण हा प्रकार सोपा आहे. मनातल्या मनात प्रचंड राग येतो पुष्कळ गोष्टींचा. अश्या वेळी मी नामस्मरण केले तर ते विचार मनातून नाहीसे होतात हा स्वानुभव आहे.

    बाकी सर्व तर्कशास्त्र.

    <<त्याचप्रमाणे उपनिषदात (किंवा वेदांमध्ये) सर्व आहे असे समजणे थो..डे कोपमुंड सारखे आहे असे मला निषद करावेसे वाटते. नंतर होऊन गेलेल्या अब्जावधी लोकांप्रती, त्यांच्या विविध विचारांप्रति घोर अन्याय आहे.>>
    इथे अडचण अशी की वेदोपनिषदात ज्या मूळ कल्पनेला 'सत्य' किंवा गृहित धरून पुढे सर्व तर्कशास्त्र निर्माण केले, ते जर इतर धर्मांनी मान्यच केले नाही, तर त्यांच्या मूळ कल्पनेवर त्यांनी रचलेले तर्कशास्त्र त्यांच्या दृष्टीने सत्यच. इथेच धर्म वेगळे होतात. सत्य वेगळे होते. सर्व हिंदू वेदोपनिषद मानतात म्हणून ते हिंदू. त्यांचे ते सत्य.

    कदाचित् कुणि आणखी अभ्यास करून दाखवून दिले की या सर्वांनी मानलेले सत्य हे एकच आहे. जसे हिरा, कोळसा, नि इतर काही पदार्थांत मूळ द्रव्य कार्बन आहे, ते फक्त निरनिराळ्या स्वरूपात आहे किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे आजकालच्या मोठ्या कं त बझवर्ड बदलतात, कल्पना, अर्थ जुनाच तसे. एकं सत्, विप्रा बहुधा वदंति | हे सिद्ध करता येण्याजोगे आहे.
    परत विश्वाच्या उत्पत्तीकडे:
    ब्रह्म, जे सत्य, संपूर्ण, शाश्वत आहे ते एक घरटे आहे. असे उपनिषदात एका ऋषीने म्हंटले आहे त्याला त्रिसुपर्ण कल्पना म्हणतात. तर या घरट्यातून ईश्वर, हिरण्यगर्भ व विराज् असे तीन पक्षी बाहेर पडले. ईश्वर संकल्प करतो, हिरण्यगर्भ निर्माण करून त्याचे धारण पोषण करतो आणि विराज् कर्ममय जीवन जगतो. तर असे ते पूर्ण ब्रह्म. सृष्टि हा त्याचा अपूर्ण, दोषयुक्त भागच. ते उत्पन्न का केले हा प्रश्न आता उद्भवत नाही, कारण ते आहेच!

    हे तुम्ही खरे मानले तर तुम्ही हिंदू. नाहीतर नाही. माझ्या हिंदू मनाप्रमाणे ही सगळी माया आहे, त्यामुळे तुम्ही नसला हिंदू तरी काही फरक पडत नाही, पण मुसलमानांपासून सावध रहा, त्यांचे सत्य सांगते की मुसलमान बना नाहीतर जीवे मारू!

    झक्कीकाका, आस्चिग, विकास, धन्यवाद. Happy

    Pages