गार्लिक रोस्टेड रेड पोटॅटोज

Submitted by चहाबाज खान on 25 February, 2015 - 12:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

लाल सालीचे बटाटे - ४ मध्यम
लसूण - १ किंवा २ पाकळ्या
लिंबाचा रस - १ चमचा
सॉल्टेड बटर - २ टेबलस्पून
मीठ
-
ऐच्छिक -
पारमेजान चीज
श्रेडेड चीज - कोणतेही

क्रमवार पाककृती: 

- बटाटे क्ष, य आणि झ अ‍ॅक्सिसमधून कापून 'क्वार्टर' करावेत.
- लसूण किसून घ्यावा.
- लसूण, बटर, लिंबूरस आणि मीठ एकत्र करून बटाट्यांना लावावे.
- ओव्हन ३५० फॅ. वर प्रीहीट करून घ्यावा.
- बटाटे ट्रेमध्ये पसरून कमीतकमी एक तास ते सव्वा तास रोस्ट करावेत. स्किन किंचित काळसर/सुरकुतलेली होईपर्यंत शिजू द्यावेत.
- ट्रे बाहेर काढून पाहिजे तितके पारमेजान चीज आणि/किंवा श्रेडेड चीज पसरावे आणि आणखी पाच मिनिटे चीज वितळेपर्यंत बेक करावे.
- झालं पण!
-

वाढणी/प्रमाण: 
साईड डिश म्हणून चार जणांसाठी
अधिक टिपा: 

१. यात भरपूर कॅलरीज असल्यामुळे मी चीज नावालाच घातलं. तुम्हाला डाएट प्रॉब्लेम नसेल तर ऐश करा.
२. फोटो 'खाऊन उरलेल्या' डिशचा आहे Wink

माहितीचा स्रोत: 
allrecipes.com
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो 'खाऊन उरलेल्या' डिशचा आहे ... >> हाहा .. टेम्प्टींग आहे पण रंग !
बटाटा तर आपला आवडीचाच, मनमिळावू भाजी Happy