काय करायचे अजून?

Submitted by Mother Warrior on 23 February, 2015 - 15:23

काय करायचे अशा वेळेला?

एक महिना झाला मुलगा आजारी पडून. आता ९५% बरा आहे. पण ५% फारच त्रास देत आहेत.
अधूनम्धून खोकतो. सर्दीने इतका बेजार की चिडचिड करतो. रात्रीबेरात्री किंचाळत रडत बसतो. रात्री झोपतानासुद्धा आयपॅड बरोबर असण्याचा हट्ट करत बसतो. बरं आयपॅड दिला तर शांत होतो का? नाही तरीही रडत बसतो.
तुमचं समजूतीचे एकही वाक्य पोचतच नाही त्याच्यापर्यंत.
तो किती दूरच्या जगात आहे ह्याची जाणीव अशा वेळेस अगदी हमखास होते.
सर्दीने त्याचे डोके दुखत आहे का? ते त्याला सांगता येत नाही म्हणून चिडलाय का?
पोटात काही होते आहे का? भूक लागली आहे का? (असणारच. आजारी पडला की खाण्यावर पहिला परीणाम होतो त्याच्या. ) मग अन्न दिसले तरी झिडकारून का पळतो.
अत्यंत झोप आली आहे का? मग मी जवळ घेऊन थोपटते तर तेव्हाही झिडकारतो.. आवडीचे गाणं म्हणा, युट्युबवर लावा, आवडीचे खेळणे/पुस्तक द्या. त्याच्या बेडवर झोपून आता झोपूया असं सांगा. काहीच कसं वर्क होत नाही?.. इतके तँट्रम्स.. तुम्ही जी काही गोष्ट करायला जाल त्याने टँट्रम्स न थांबता अजुन वाढत आहेत. रात्रीची सुनसान वेळ. हे असं रडणं काय बरोबर आहे ?. पण त्याला कोण समजवणार?आणि त्याला तरी कसे कळणार?

एक पालक म्हणून हा क्षण.. नाही क्षण नाही, हा तास मिनिमम. किती दमवणारा आहे? किती हरवणारा आहे? काल आयुष्यात प्रथम काही न सुचून , घाबरून, भेदरून हातापायाला कंप सुटला माझ्या. त्याला शांत करण्यापेक्षा मला स्वतःलाच शांत करण्याकडे लक्ष द्यावे लागले.
त्याला शेवटी कसेतरी डॉक्टरांनी सांगितलेले झोपेचे औषध, मेलॅटोनिन दिल्यावर अर्ध्या तासाने शांत बाळा सारखा झोपला तो. ऑटीझम असलेल्या मुलांना रात्री झोपायला जाण्याचा त्रास असू शकतो. आमच्या डॉक्टरांनी २ वर्षांपासून सांगून ठेवले आहे मेलॅटोनिनबद्दल. आधी कधी गरज पडली नव्हती. आता मात्र नक्की आहे. ते वापरणे ह्यात काहीच चुकीचे नाही. परंतू ते औषध दिल्यावर कुठेतरी अपयशी भावना आली आहे. मी समजूच नाही शकले माझ्या मुलाला? काय हवे होते त्याला? का रडत होता तो? ती भावना जाईल ना ?

आणि मी? मी झोपूच शकले नाहीये. कदाचित कधीच धड झोपू शकणार नाही. आपल्या लेकरापासून इतकं लांब टोकावर असल्याचे फिलिंग जे काही प्रमाणात आदळलंय अंगावर. जरा डोळा लागला तर दचकून जागी झाले. असं वाटले लेकरू परत किंचाळत रडतंय. तो झोपला होता शांत. मी कधी होईन शांत?

एक ऑटीझम अवेअरनेसची रिबिन ऑर्डर केली आहे अमेझॉनवरून. होपफुली शेजारपाजारांना जरा समजेल नक्की काय चालू आहे. त्यांना एक थँक्यूची नोटही पाठवेन म्हणते. बाकी अशा वेळेला जे जे करता आले असते ते केलेच काल. व अपयशी झालेच.

मी नेहेमी म्हणायचे, आमचे आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर राईड आहे. रोलर कोस्टर राईड फारच सोपी असते. आमच्या ह्या राईडला काय म्हणायचे? Uhoh

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म.वॉ., इतक्यात मी येल्लो सिनेमा पाहिला. तुझी ही पोस्ट म्हणजे त्या आईची डायरीतली पाने असावीत. फक्त तू ओपन फोरमवर ती मांडल्यामुळे तुला स्वीच ऑफ वगैरे सल्ले मिळणं साहजिक आहे. तुझी तू तुझे ब्रेक्स वरच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे करत असशील. करावंच लागेल नं?

मागचा फॉल माझ्या ६ वर्षाच्या मुलाच्या काही तब्येतीच्या तक्रारीत गेले आणि त्याचं पर्यवसान शेवटी एका छोट्या सर्जरीमध्ये झालं. जी डिसेंबरला झाली. त्या सर्व काळात मी स्वतः अनेकदा या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे का? अशा विचित्र मानसिकतेतून गेले. आताही त्याला त्याच कारणासाठी दर सहा महिन्यांचा फॉलो अप वगैरे काही वर्षे असेल मग पुढचं कळेल वगैरे असल्यामुळे मग तेव्हा मी हे टाळण्यासाठी काही करू शकले असते का? अशा काही विचारांनी कुणाशीही काही दिवस बोलु पण नये वगैरे मधून मी आजकाल जात असते. काही वेळा वाटतं विंटरमुळे असं होतं, काहीवेळा सपोर्ट सिस्टिम नसल्यामुळेही असे विचार येतात. तुझ्या प्रश्नापुढे अर्थात माझा सध्याचा प्रश्न फारच गौण आहे पण लक्षात घे हे होत असतं. आपण पालक म्हणून जितकं करावं आणि जितकी चांगली सुविधा द्यावी तितकं मी करते. अर्थात आपलं मन आपलंही न ऐकता निगेटिव्ह विचार आणून हे असं वाटत राहाणंही सुरू असतं.
तुझी कळकळ कळते. स्टे देअर इतकंच म्हणेन. कदाचीत हेही दिवस जातील. आणि हो तुझ्या पोस्ट्स वाचल्या की निदान तेव्हासाठी तरी मला माझे प्रश्न किती छोटे आहेत हे पुन:पुन्हा कळतं. प्रत्येक वेळी तरीही आपापल्या भावनांतून जाणं हे आपाप्लया पर्सनलिटीप्रमाणे होत जातं गं. तू लिहून मोकळी झालीस हे चांगलं केलंस.

मदर, मला तुमच्या मानसिकतेची पूर्ण कल्पना आहे. तुमची परिस्थिती सर्वात जास्त तुम्हालाच माहिती आहे. पण एक मैत्रीण म्हणून तुमची काळजी वाटली म्हणून मी म्हटले. कधि कधी परिस्थिती आपल्याला खाउन टाकायला बघते तेव्हा तिच्या पासून थोडे दूर होउन बघायचे हाच तो ब्रेक. मग जरी आपन हाताने काम करत असलो तरी
मनाने दूर दूर जायचे. मला पण जबरदस्त सेपरेशन काळजीचा त्रास होतो. तुम्ही जमेल तसे कोप करताच आहात त्याला माझ्यातर्फे फुल इमोशनल सपोर्ट.

ऑटिझम् साठी स्वमग्नता हे नाव जरा वेगळं वाटतं. काही वेळा माझ्यासारख्या अंतर्मुखी (introvert) व्यक्तींच्या स्वभावालासुद्धा autism under control असं म्हणत असतील. लहान वयाच्या ऑटिझम् रुग्णाला झोप येत नसेल तर मेलॅटोनिन देण्याआधी हलक्या हाताने त्याला facial massage करून पहावा. आयुर्वेदाच्या परिभाषेत बोलायचं तर कदाचित अशा मुलाच्या शरीरात उष्णता साठली असेल. शक्य झाल्यास त्याची एखाद्या आयुर्वेदाचार्यांकडून तपासणी करून घ्या... (हे सल्ले डॉक्टरी ज्ञान नसलेल्या सामान्य व्यक्तीने दिलेले आहेत. तेव्हां ह्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)

ऑटिझम् साठी स्वमग्नता हे नाव जरा वेगळं वाटतं. काही वेळा माझ्यासारख्या अंतर्मुखी (introvert) व्यक्तींच्या स्वभावालासुद्धा autism under control असं म्हणत असतील. लहान वयाच्या ऑटिझम् रुग्णाला झोप येत नसेल तर मेलॅटोनिन देण्याआधी हलक्या हाताने त्याला facial massage करून पहावा. आयुर्वेदाच्या परिभाषेत बोलायचं तर कदाचित अशा मुलाच्या शरीरात उष्णता साठली असेल. शक्य झाल्यास त्याची एखाद्या आयुर्वेदाचार्यांकडून तपासणी करून घ्या... (हे सल्ले डॉक्टरी ज्ञान नसलेल्या सामान्य व्यक्तीने दिलेले आहेत. तेव्हां ह्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Pages