५०० वर्षांपूर्वीचे हरीनारायण मंदिर बेनवडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर

Submitted by मानुषी on 20 February, 2015 - 21:53

काही कारणाने अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या बेनवडी इथे जाणं झालं. आणि वाटलं आपल्या आसपास आपल्या संस्कृतीचे पुरातन अवशेष विखुरलेले आहेत आणि आपण त्याबद्दल अनभिज्ञ आहोत.
अगदी तशीच जाणीव बेनवडीला या पुरातन मंदिराला भेट दिल्यावर झाली.
या परिसरात गेल्याबरोबर मन अगदी कुठे तरीच पुरातन काळात ओढ घेऊ लागलं आणि मनात एक अनामिक हुरहुर ठाण मांडून बसली.
कर्जत तालुक्यात शिरल्यावर मेन रोड सोडून जेव्हा एका छोट्या रस्त्याला लागलो तेव्हा काही मिनिटांनी अचानकच समोर एक कळस दिसायला लागला.

या रस्त्याने थोडं अजून आत गेलं की हा गढीसदृश भाग दिसायला लागतो. आणि आपण या आधुनिक काळातून पुरतेच मागे खेचले जातो.

गढीच्या दरवाज्यातून आत गेल्यावर हे दृश्य दिसतं. या तुळशी वृंदावनाच्या खालच्या कोनाड्यातून थेट पुढे असलेल्या हरीनारायण मंदिरातली हरी नारायण स्वामींच्या मूर्तीचं थेट दर्शन होतं! हे सगळं पाहिलं की ....एक संस्कृती उदयाला येते आणि कालांतराने तिचा हळूहळू र्‍हास होतो आणि मग पुन्हा नवीन संस्कृती(सिव्हिलिझेशन) उदयाला येते.................. हा विचार पटतच जातो.

या तुळशी वृंदावनापलिकडे मंदिर आहे.......त्याचं आतलं प्रवेशद्वार

या आतल्या मूर्ती.............मधली हरीनारायण स्वामींची, डावीकडे देशपांडे कुटुंबियांचे वंशपरंपरागत आलेले देव, आणि उजवीकडे अन्नपूर्णेची मूर्ती.

या मूर्तींच्या वरच्या छताचा काही भाग...

या मंदिरातल्या भिंतींवर आणि छताच्या कॉर्नर्सवर ही असलेली पेन्टिन्ग्ज. ही चित्रकलाही ५०० वर्ष पुरातन आहे.

मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार

हे मंदिराच्या बाहेरून घेतलेले फोटो

मंदिराच्या चहुबाजूंनी देशपांडे कुटुंबियांचं राहतं घर आणि ही या फोटोत दिसणारी ओवरी आहे.

या ओवरीमधे राधाकृष्णाची आणि एक दोन मूर्ती आहेत.

ज्या गढीसदृश इमारतीत देशपांडे कुटुंबीय रहातात आणि हे मंदिर आहे त्या गढीचे बाहेरून दिसणारे दृश्य

वर दाखवलेल्या दिंडी दरवाज्या समोर ...म्हणजेच मंदिराच्या परिसरातून बाहेर आल्यावर दिसतात ...या हरीनारायण स्वामींच्या शिष्यांच्या समाध्या.

या समाध्यांवर दगडात कोरलेलं काही लिखाण आहे. ते मोडी लिपीत असावं असं श्री. देशपांडे यांचं म्हणणं आहे.
पुरातत्व खात्याचे लोक येऊन हे सगळं पाहून गेले आहेत. हा सगळा परिसर या खात्याने रिस्टोरेशनसाठी निवडला आहे.
हा त्या लिखाणाचा फोटो. नीटसा आलेला नाही.

दिंडी दरवाजा आणि समोर शिष्यांच्या समाध्या.

तिथे आम्हाला ही कुलुप किल्ली पहायला मिळाली. ही हातात घेतल्यावर अपेक्षेपेक्षा खूपच हलकी वाटली. त्याचं कारण दिसताना हे लोखंडी असेलसं वाटतं पण हे ब्रॉन्झ या धातूचं असल्याने लोखंडाच्या मानाने खूपच हलकं होतं. हेही खूपच पुरातन कालातलं.

हे कुलुप बंद झाल्यावर असं दिसतं.

हे देशपांडे कुटुंबीय या मंदिराची देखरेख करतात. हे तीन भाऊ आहेत. पैकी एक भाऊ आणि कुटुंबीय कायम इथेच राहतात. यांना गाव सोडता येत नाही. कारण सकाळ संध्याकाळ देवांची साग्रसंगित पूजाअर्चना यांना करायची असते. यांना जर कुठे जायचं असेल तर त्यांच्या उरलेल्या दोन भावांपैकी(एक पुणे, एक नगर) एखाद्याला इथे येऊन पूजेची जबाबदारी घ्यावी लागते.
आता सध्या तिथे हरिनारायण स्वामी जयंती व पुण्यतिथी उत्सव चालू आहे. दि.१९/२/२०१५ ते २२/२/२०१५ पर्यंत कीर्तन प्रवचन भजन भंडारा असा भरगच्च कार्यक्रम आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर. नगर जिल्ह्यात अशी खूप ठिकाणं आहेत. मागच्या भारतवारीत असंच अचानक टाकळीभानला एका मंदिरात जाणं झालं. या मंदिराएवढं मोठं नाहीये पण एकूण मंदिर, देव सगळंच खूप छान आहे. तुम्ही कधी गेलात त्या बाजूला तर अवश्य भेट द्या.

आमचं पण विठ्ठलाचं मंदिर आहे. पुढल्या वेळी मी आले की तुम्ही श्रीरामपूरला या मग दाखवेन Happy

बाकी, तुमची हरकत नसल्यास हा धागा अहमदनगर ग्रुपात पण ठेवाल का?

सिंड्रेला......नक्की नक्की.
सर्वांना धन्यवाद. देवनागरीच आहे का....ओक्के.

Pages