‘वैकुंठ’ - शतशब्दकथा

Submitted by हर्पेन on 18 February, 2015 - 02:03

'वैकुंठ’-परिसर मला आवडतो. मी तिकडे नेहेमी जातो.

‘निवारा’मध्ये व्यायामशाळा आहे.

कोपऱ्यावरच अनेकविध चांगले कार्यक्रम होत असतात.

वैकुंठात असलेली झाडे, अनेकविध पक्ष्यांचे रात्रीचे वसतीस्थान असल्याकारणाने पक्षी-मोजणीसाठी म्हणूनही तिकडे जाणे होतेच.

एका भित्र्या मैत्रिणीच्या मागे लागलेल्या माणसाला हुकवताना ती इकडे शिरली होती आणि तिचा पाठलाग करणारा माणूस लक्षात आल्यावर घाबरून उलटा पळून गेलेला त्याची आठवण हसूच आणते.

पोचवायला येणाऱ्या माणसांचे आक्रोश मी ऐकलेत; मूठभर खरेखुरे दु:खी सोडता उरलेल्यांचे रडणेच काय आपापसातले संभाषणदेखील मोठेच मनोरंजक असते.

पण हल्लीच दिसले, ठोसरपागेतून रिकाम्या हाती भकास नजरेने परत येणारे जोडपे...

दोघेच दोघे होते

आणि एकदम गप्पही

‘वैकुंठ’-परिसर आता मला आवडत नाही.

आताशा मी तिकडे फिरकतही नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोहोचले .. अगदी अगदी...
त्या रस्त्याने कायमच जाणे होते...
आत नठरवताच तुमच्या या कथेची आठवण मनात रेंगाळणार.

शेवट समजण्यासाठी ठोसर पागेचा संदर्भ माहीत असणे आवश्यक!
>>>
मला नाही वाटत, म्हणजे मला तरी ठोसरपागा हा शब्द आयुष्यात पहिल्यांदाच ऐकूनही समजली, माझा प्रतिसाद फार सुरुवातीलाच आहे.

त्या भित्र्या मैत्रीणीच्या किस्श्यात हिंट आली होतीच.
आणि नंतर खालील वाक्य वाचतानाच त्या संदर्भाचा उलगडा झाला
<<<पोचवायला येणाऱ्या माणसांचे आक्रोश मी ऐकलेत; मूठभर खरेखुरे दु:खी सोडता उरलेल्यांचे रडणेच काय आपापसातले संभाषणदेखील मोठेच मनोरंजक असते. >>>

यानंतर ठोसरपागा काय ते समजणार होतेच.

असो, तरी आता वरची चर्चा पाहून गूगल केले अन ते बरोबरच निघाले.
(अवांतर - आपल्याला ठोसरपागा माहीत असल्याने `ते माहीत नसल्यास काही फरक पडतो की नाही' हे आपल्यापेक्षा ज्याला माहीत नाही अशी व्यक्ती ठामपणे सांगू शकते Happy )

पण एक आहे, ठोसरपागा हा शब्द आणि ती जागा ज्याला फॅमिलीअर आहे त्यावर या कथेचा इम्पॅक्ट तुलनेत जास्त होणार.

एक शंका आलीय, कदाचित चर्चेला विषय होईल, इथे मांडणे उचित नाही, प्रतिसाद वेगळ्या पद्धतीने घेतला जाण्याची शक्यता आहे, आणि कदाचित धाग्याशीही विसंगत होईल, तर आता ऑफिस सुटतेय, म्हणून घरून जमल्यास वेगळा धागा काढतो.

ठोसरपागेचा संदर्भ माहिती नव्हता तरी पुढील वर्णनावरून लक्षात आलं. एकदम शॉट बसला वाचताना. कथा म्हणून जमली आहे.

अमित, गम्मत ऐवजी खोच किंवा परिणाम लिहू शकतोस.

एका भित्र्या मैत्रिणीच्या मागे लागलेल्या माणसाला हुकवताना ती इकडे शिरली होती आणि तिचा पाठलाग करणारा माणूस लक्षात आल्यावर घाबरून उलटा पळून गेलेला त्याची आठवण हसूच आणते>>>>> हर्पेन नाही समजल ....

धन्यवाद गंध, मो, सिंडरेला, दाद, बोबो, जाई, सावली, रावी नाठाळ

प्रीती - " एखादी मुलगी माणसाला घाबरते, वैकुंठ मधे जायला नाही आणि तिचा पाठलाग करणारा ती वैकुंठात म्हणजेच स्मशानात शिरल्ये असे बघतो आणि घाबरतो " - ज्याने हसायला येते
मुद्दा हा आहे की एरवी वैकुंठ म्हटले की जी उदासी / दु:खाची भाव ना मनात असते ती तशी नसण्याची कार्णे इथे मांडली आहेत.

शेवट समजण्यासाठी ठोसर पागेचा संदर्भ माहीत असणे आवश्यक!>>>
खरंय . मी पुण्याची आहे पण ठोसर बागेचा संदर्भ माहित नाहीये . गुगलून बघितल्यावर लहान मुलांना पुरण्याची जागा असं सापडलं . एवढाच आहे कि आणखी काही संदर्भ आहे . ज्याला माहित आहे त्याने कृपया उलगडून सांगावा.

ठोसर पागेचा संदर्भ माहित नसतानासुद्धा कथा आत पोचली होतीच. वर सारिका यांच्या पोस्टनंतर संदर्भ लागला असला तरीही माझ्या मते, उलट तो संदर्भ माहित नसताना जास्त परिणामकारकरीत्या पोचली होती! असो.

यापुढे या कथेत काही "उलगडून" सांगण्यासारखे आहे असं तर अजिबात वाटत नाही.

Pages