सिंगापुरातील खाद्यसंस्कृती (भाग-पहिला)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मला इथे सिंगापुरमधे येऊन तब्बल २० वर्ष पुर्ण झालीत. ३० वर्षाचा पुर्ण होता होता इथे आलो तो इथे इतके वर्ष होतील असे तेंव्हा जराही वाटले नव्हते. अगदी माझ्या पहिल्याच दिवशी मी भुकेजल्या पोटी अन्न शोधायला बाहेर पडलो आणि समोर दोन मोठी कावसे उलटी टांगलेली होती आणि त्यांच्या तोंडातून काळेकुट्ट लाल लाल भडक रक्त वाहत होते.

मी ते दृश्य बघून खंतावलो. त्यापुढे दोन पाऊले टाकली तर .. इथे माकडाच्या मेंदुचे सुप मिळेल अशी पाटी होती. त्याही पुढे गेलो तर सी-फुड ह्या नावाने परिचित असलेले अनेक जलचर प्राणी मला तिथे भेटले. मी जिथे उभा होता.. अर्थात गोल गोल फिरत होतो त्याला फुडकोर्ट असे नाव होते. सिगांपुरमधे आपल्या भारतातल्यासारखे हॉटेल्स, रेस्टॉरंट ह्यांच्यापेक्षा फुडकोर्ट च जास्त आहेत. आणि, सॅड टु से पण बहुतेक ठिकाणी खायला प्यायला सीफुडच जास्त प्रमाणात मिळते. अशा ह्या देशात तब्बल २० वर्ष राहूनही माझा शाकाहार भ्रष्ट झाला नाही ह्याला कारण म्हणजे मास चाखायची माझी कधीच च च हिम्मत झालेली नाही. माझं आणि मासाहारचं प्रचंड मोठ्ठ द्वंद्व आहे. जे कधीच मिटणार नाही! आमच्यात एक फार मोठी दरी होती, असेल आणि राहील.

माझ्या बालपणी मी आणि माझी बहिण आम्ही एकमेकांचे कान दोन्ही हाताचा डायगोनल करुन धरत .. च्याऊ म्याऊ घुगर्‍या खाऊ. पाळण्या खालच्या घुगर्‍या खाऊ असे काहीतरी म्हणत नंतर खूप जोरात हसायचो. तो खेळच तसा फार फनी होता. माझ्या वाट्याला घुगर्‍या (अख्ख्या तुरीच्या दाण्याची उसळ म्हणजे घुगर्‍या) आल्या नाहीत पण च्याऊ म्याऊ जेवण रोज बघायला मिळतं आणि रोज मला प्रश्न (उत्तर अपेक्षित नसलेला प्रश्न) पडतो की ही लोक हे अन्न कसे खातात!!! म्हणजे मला कुणाच्याही संस्कृतीचा अवमान करायचा नाहीये पण तरीही जे काही चालत फिरत सरपटत ते सगळ चिनी लोकांच्या पोटात जातचं जातं! शाकाहारी अन्नाचा जराही गंध नसलेली रेस म्हणजे चिनी लोक. इथे जे मॉक मीट मिळते ते शाकाहारी असते पण ते बघून असे वाटते की हे मॉक मीट नसून खरेखुरे मास आहे. ह्या लोकांच्या पोटात मॉकमीट मधून भाज्या वगैरे जात असतील पण केवढी ही मानसिकता! (आणि त्यांना दोष देता देता मग मलाही माझे हसायला येते की ते अन्न शाकाहारी दिसत नाही म्हणून मी मॉक मीट ग्रहण करत नाही. शेवटी मग मी आणि ते सारखेच की!)

माझे अनेक मित्र आपण शाकाहारी आहोत म्हणून स्वतःला कमी लेखत लेखत शेवटी मासाहारी बनली. एक मुलगी मेघना तिचे नाव. एके दिवशी मला भेटली. चांगली शाकाहारी होती. आणि म्हणाली आज मी परागला मास खाऊनच दाखवते. खरच तिने डक राईस मागवला आणि तो पुर्ण खाऊन दाखवला. आपण मास खाल्ले म्हणून तिच्या चेहर्‍यावर एक विजयी भाव उमटला होता. आणि मी ह्या कोडयात सापडलो होतो की नक्की काय बाजी मारली हिने ही हिला मास खाल्ले म्हणून इतका आनंद होतो आहे.

सिंगापुरमधे चिनी, मलय, ईंडोनेशियन, जॅपनिज, भारतीय-मुस्लिम, भारतीय-मलय, भारतीय, कोरियन, फिलिपीन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण एकाच ठिकाणी मिळते. ह्यामधे एक भारतीय जेवण बाजूला काढले तर बाकी पद्धतीचे जेवण जवळपास सारखेच दिसते. निदान मला तरी ह्या सगळ्यात सी-फुड असते म्हणून ते सारखेच वाटते. खूप वर्षांपासून मी इथे ईंडोनेशियाचा एक पदार्थ ऐकतो आहे - "मी-गोरे" पण हा मीगोरे नक्की कसा दिसतो हे काही मला अजून कळलेले नाही. मी कित्येकदा फुडकोर्टात गेल्यानंतर कुठे अभारतीय शाकाहारी अन्न कुठे मिळते का म्हणून प्रयास केलेले आहेत पण ह्या लोकांना चिकन पावडर, कुठल्या तरी मासाचा अर्क कमीतकमी हे घातल्याशिवाय त्यांचे अन्न शिजत नाही. वर आपल्याला सांगतात की ह्यात मास नाही पण एक जरी घास तोंडात टाकला की लगेच कळते ह्यात काहीनाकाही घातलेले आहे. माझा भ्रमनिरास चिक्कार वेळी झालेला आहे. आता तर मी वाट्यालाच जाणे सोडले.

हो.. पण इथल्या खीरी माझ्या प्रचंड आवडीच्या आहेत. इथले चायनीज डीझर्ट मला फार प्रिय आहे. मुगाची खीर, रेडबीन्सची खीर, रताळ्याची खीर, नाना प्रकारचे नट्स घालून केलेली खीर. कमळाच्या बिया घालून केलेली खीर. ह्या खीरींमधे नारळाचे दुध घातलेले असते आणि ह्या फार गोड नसतात. शिवाय पौष्टिक असतात.

ह्या पहिल्या भागाचा शेवट गोड केला आहे .. आता बघुया दुसरा भाग लिहायला मुहुर्त कधी उगवतो Happy

बी

प्रकार: 

देवकी, तु जे म्हणते आहे त्याची जाणिव आहे मला. माझी किमान अपेक्षा इतकीच की तुम्ही शाकाहारी अन्न ठेवा. अमेरिकेत मी होतो तेंव्हा तिथे केवढे पर्याय होते जेवणाला. तसे इथे नाही. फ्रांन्समधे होतो तिथेही अनेक पर्याय दिसायचे. इथे तसे नाही. बहुतेक ठिकाणी मास मास आणि मास.

बी, तुमच्या भावना आणि त्रागा पोहोचला.
आता पुढच्या लेखाची सुरुवात करा नाहीतर हा विषय इथंच रेंगाळत राहील आणि हा लेखाचा मुख्य मुद्दा नाही.
पुलेशु :).

बी.. मो ने सांगितल्याप्रमाणे तुला शाकाहारी सुद्ध जेवण मिळत नाही हा मूळ उद्देश नव्हता ना ,' खाद्यसंस्कृती' बद्दल लिहिताना.. ऑर वॉज इट???

तर तुझे स्वतःचे आक्षेप विसरून सरळ मुद्द्याला हात घाल ना...

( तुला एक फु स.. एखादे चायनीज बुद्धिस्ट रेस्टॉरेंट शोध.. १००% शुद्धा शाकाहारी तुला तिथे मिळेल)

बी पुढचा भाग कधी ?
<<शुद्ध शाकाहारी रेस्ट्राँ टाकण्यात भरपुर पोटेंशियल दिसतेय.>> राज +१११११
..

बी, कुतुहल म्हणून विचारतेय- तुला लिटल इंडिया मधली कोणतीच भारतीय उपहारगृहे चालत नाहीत का?

मी तेरा वर्षांपूर्वी सिंगापुरात होते तेव्हाही मला कधीच काही प्रॉब्लेम आला नाही. अन मी कट्टर शाकाहारी आहे. म्हणून विचारतेय.

>>
अमेरिकेत मी होतो तेंव्हा तिथे केवढे पर्याय होते जेवणाला. तसे इथे नाही. >>
बी, तुझा त्रागा पोहोचला. पण तू अमेरीकेबद्दलही किती सरसकट विधान करुन टाकलेस. आमच्या इथे वेज जेवणाचे पर्याय आजही लिमिटेड आहेत. बीफ स्टॉक मधल्या ग्रीन बिन्स , बिन्स सूप असले तरी ते चिकन ब्रॉथ मधले वगैरे वगैरे. Happy

सुपरमॉम, रोज रोज इतक्या दुर जाणार का तू लंच हावर्स मधे? नाही ना.. आजूबाजूला एक तरी पर्याय हवा.

स्वाती-२- अमेरिकेमधे मला तीन महिने काहीच प्रॉब्लेम नाही ला. ब्रेड आणि ब्लॅक बीन सुप तरी मिळायचेच मिळायचे. सॅन्डविज असायचे. इथे सॅन्डविच हा प्रकारच नाही जेवणाला.

बी , शक्यतो जैसा देश वैसा भेस अवलंबावं , जर नसेलच जमत तर सरळ आपल्या हाताने पाहिजे ते करुन खावं, इतरांना दोष देण्यात काहीच हशील नाही.
आता सिंगापुरातील खाद्यसंस्कृती वर लिही म्हणजे आम्हालाही थोडीफार माहिती मिळेल.

श्री, मला त्यावरच लिहायचे आहे पण इथे अभिप्राय असे येत आहेत की मला उत्तर देणे गरजेचे वाटते. इथे येऊन बघाव राहून बघाव मग स्वानुभवाने मत मांडावे. चार दिवस मौज करायला म्हणून लिटल ईंडियामधे राहून नाही कळणार इथली खाद्य संस्कृती.

बी तुम्ही पुढचा लेख लिहा. वाचायला आवडेल. तुम्ही खाद्यसंस्कृती असे शिर्षक दिले त्यामुळे तिथली संस्कृती दिसेल असे वाटलेले.

तुम्ही जे लिहिलेय त्याच्याशी सहमत. फिरायला गेलो असताना अनोळखी खाद्यसंस्कृती गंमत म्हणुन बघायला, चाखायला आवडेल पण हे रोजच करायचे म्हटले तर कठिण जाईल. पोटात कचकचुन भुक लागली असताना मनाजोगे जेवण मिळाले नाही तर चिडचिड होणार. आणि त्यात जर जेवणाचे हजार ऑप्शन्स समोर दिसताहेत पण नेमके आपल्याला हवे तेच त्यात नाही अस होत असेल तर अजुनच त्रागा होणार. इथल्याइथे भारतात एका ठिकाणाहुन दुसरीकडे गेले तरी खाण्याचे थोडेफार हाल होतातच. (मी राजस्थानला गेले होते तेव्हा दोन तिन दिवस सलग दाल बाटी खाल्ली . चौथ्या दिवशी नको ती दालबाटी, आधी वरणभात समोर आणा असा आक्रोश माझे पोट करायला लागले Happy )

दुपारच्या भुकेच्या वेळेस गरमागरम वरणभात नाहीतर भाजी पोळीच ताटात वाढुन हवी असते. अशा वेळी कितीही सफरचंदे खाल्ली तरी भुक भागत नाही. उलट तो सफरचंदाचा घास तोंडातल्या तोंडात फिरत राहतो, गिळवतही नाही. काही वर्षांपुर्वी मी डायटींग्च्या नादाला लागलेले तेव्हा अनुभव घेतलाय याचा. Happy

बी, प्लीज रागावू नकोस. पण आपला काही भारतीयांचा शाकाहार हा इतर देशातल्या लोकांना बरेचदा बुचकळ्यात टाकतो. मी तुझ्यासारखीच शाकाहारी आहे. म्हणजे अगदी अमेरिकन उपहारगृहांमधेही सूपचा बेस शाकाहारी आहे ना हे बघूनच जेवते.

पण तरीही आपल्यासारखे कट्टर शाकाहारी पदार्थ दुसर्‍या देशात असावेच असा आग्रह अनाठायी नाही का? उद्या एखादा अमेरिकन आपल्या देशात आला नि त्याने बीफ तेही जवळपास मिळालेच पाहिजे असे म्हटले तर ते बरोबर का? लिटल इंडिया दूर आहे हे मान्य, पण मला तरी तिथे पंजाबी, दाक्षिणात्य, सारेच भारतीय नि शाकाहारी पदार्थ मिळत होते हे फार आवडले. मे बी तू वीकांताला तिथे जाऊ शकशील.

तथाकथित शाकाहार्‍यांच्या दबंगगिरीचा निषेध.

आधी दूध व दुधाचे पदार्थ खाणे संपूर्णतः बंद करावे व नंतर इतर लोकांच्या खाण्यावर नाके मुरडावीत. ते केलेत की सांगा, मग मी तुमच्या शुद्ध शाकाहारावर सकारण नाके मुरडून दाखवीन.

मायक्रोस्कोपखाली जरा एकदा दह्याचा थेंब घेऊन पहा. वळवळणारे लाखो जिवंत बॅक्टेरिया दिसतील

तुम्ही "प्युअर व्हेज" आहात म्हणजे सिंगापूरातल्या वा एकंदरीतच जगातल्या सर्व लोकांवर काही उपकार करीत आहात का?? व तुम्ही "मागितले" म्हणून त्यांनी त्यांचे रोजचे खाणे, जेवणे, चालीरीती सोडून तुम्हाला "शुद्ध" शाकाहारी जेवण बनवून दिले पाहिजे हा शुद्ध दांभिकपणा आहे. त्याचे दुकान आहे, तुमच्यासारखी २०० गिर्‍हाइके तयार करा, रस्त्यावर 'जैन पावभाजी'ची दुकानं आपोआप तयार होतात.

अन हो.

इतकाच संताप होतोय सिंगापूरात व्हेज न मिळण्याचा, तर सिंगापूरातल्या म्युन्शीपाल्टीत तक्रार करा, तिथल्या फूडमॉलवाल्यांचे जाऊन प्रबोधन करा. झालंच तर तिथल्या सोशल साईट्सवर लिहा. नच जमले, तर स्वतः एक शुद्ध व्हेज खाऊ-दुकानांची चेन सुरू करा, जी तुमच्यासारख्या प्रत्येक व्हेजिटेरियन माणसाच्या घर/कामाच्या ठिकाणाशेजारी असेल. इथे माबोवर धागे नाचवून काय मिळेल तुम्हाला? सिंगापूरात व्हेज जेवण? Wink

अन खिरींबद्दल लिहिलेस ते बरोबर. मस्त मिळतात हे पदार्थ. शिवाय मका, रेड बीन्स यांचे आईस्क्रीमही मस्त असतात.

बी, प्लीज रागावू नकोस.
<<
सुपरमॉम,
उगीउगी कसलं करताय? बी इज नॉट अ बेबी Wink according to what he says, he is a 50 years old man. Proud

बी, तुला एक मित्रत्वाचा सल्ला देऊ का?
आधी लेखाचं नाव बदलून 'बी यांची खाद्यसंस्कृती आणि सिंगापुरातील खाद्य-असंस्कृती' असं ठेव. मग अशा खाद्य-असंस्कृत देशात तू तुझा शाकाहार कसा सांभाळलास यावर पुढचा लेख लिही.

>> आणि त्यांना दोष देता देता मग मलाही माझे हसायला येते की ते अन्न शाकाहारी दिसत नाही म्हणून मी मॉक मीट ग्रहण करत नाही. शेवटी मग मी आणि ते सारखेच की!)

बी यांनी अगदी हसतखेळत आपल्याच स्वभावातील विसंगतीही मांडली आहे. अनेकांचं तसं धाडस होत नाही. त्यासाठी बी यांचं अभिनंदन.
ती त्यांनीच मान्य केल्यामुळे मलातरी प्रतिसादांत त्यांना निराळं आणखी झोडपायची काही आवश्यकता वाटत नाही. तेव्हा तसं कोणी करू नये असं सर्वांनाच मित्रत्वाचं आवाहन.

बी,
एका ठिकाणी ब्लॅक बीन सूप वेज आहे म्हणजे सगळीकडेच असेलच असे नाही ना! खंडप्राय प्रदेशात लहान लहान गावातून हॅम शॅन्क वापरून केलेला ब्रॉथ, चिकन ब्रॉथ हे सूप बेस म्हणून आमच्या इथे कॉमन आहे. माझे जे जैन फ्रेंड्स आहेत त्यांना अंड आहे म्हणून सॅन्डविचला मेयोही चालत नाही. मात्र इथे वेजिटेरिअन हवे असे सांगितले की सर्वर लोकं मेनू मधले काय चालणार नाही ते सांगतात, कारण बेकन ड्रिपिंग्ज, लार्ड हे तेला-तुपासारखे वापरले जाते. असो.

उगी उगी नाही हो इब्लिस, आजकाल इतक्या लवकर लोकांच्या भावना दुखावतात ना, मायबोलीवरच नव्हे तर इतरत्र नि प्रत्यक्ष आयुष्यातही. कुत्सितपणे नाही, खरंच म्हणतेय.

मी तर आजकाल बोलतानाही ' रागावू नका हं.'. अशीच सुरुवात करते. Happy

जोक्स अपार्ट, बी, विचार करून बघ एकदा. खरेच न रागावता Happy

बी, मी अकरा वर्ष जपानमध्ये काढली आहेत. मी ही शाकाहारी आहे. तुझ्याऐवढी नाटकं नाहीत माझी जेवणाची. चुकूनमाकून, नकळत बीफ, हॅमही खाल्लेलं आहे भाषा माहीत नसताना, वाचता येत नसताना. त्या कालावधीत सिंगापूरच्या दोन फेर्‍या झाल्या आणि तिकडे खाण्यापिण्याची ऐश होती. परत आल्यावर आपल्याकडे (टोक्योत) कसं काहीच मिळत नाही ह्याचा नव्याने साक्षात्कार झाला. पण जातो कुठे? दुसर्‍या देशात नोकरी शोधायची मनाची तयारी नाही. जेवण्याची तक्रारी घेऊन भारतात परत जायचीही इच्छा नव्हती. मग आहेच गड्या आपला (राहता) गाव बरा.. जॅपनीज जेवण ते ही शाकाहारी आवडून घ्यायला शिकलो. कुठे वेजिटेरियन मिळतं हे शोधून तिथे खायला लागलो. काही वेळा मेन्यूत वेज काहीच नाही आणि करून मिळणार नाही हे कळल्यावर बाहेरही पडलो आहोत. बाहेर खायचं तर अ‍ॅडजस्ट करायची तयारी ठेवावीच लागते. प्रत्येक ठिकाणी नाकाने कांदे सोलून चालत नाही हे एकदा लक्षात ठेवलं की सोप्पं होतं आयुष्य.

वरच्या पोस्टमध्ये लिहिलं होतंस (जे आता डिलीट केलं आहेस) की तू जिथे रहातोस तिथे तुला विकेंड शिवाय जेवण करायला अलाऊड नाही. जिथे तुला स्वतःच्या हातचं खाण्याशिवाय पर्याय नाही तिथे अशा जागा शोधाव्यातच का मुळात ? विकेंडला जेवण करता येतं तर मग आस्वपूचा पर्याय निवडावा ना.

इथे येऊन बघाव राहून बघाव मग स्वानुभवाने मत मांडावे. चार दिवस मौज करायला म्हणून लिटल ईंडियामधे राहून नाही कळणार इथली खाद्य संस्कृती.<<<<<
तसंच मत मांडलं होतं की, पण तू दुर्लक्ष केलंस बहुधा. मी होते चार वर्षं सिंगापुरात, नोकरीही केलीय तिथे. आणि स्वानुभवातूनच मत मांडलंय. आमच्या घराजवळच्या फूडकोर्टात एकही शाकाहारी स्टॉल नव्हता, पण सीफूड स्टॉलवाले केवळ लसूण सॉय सॉस घालून आणि फिश पेस्ट, अंडं वगळून मला स्टर फ्राय ब्रोकोली, कायलान वगैरे करून देत. चिकन राइस स्टॉलवर फ्राइड थाई टोफू वगैरे असत. एकही शाकाहारी स्टॉल नसलेल्या फूडकोर्टांतही माझ्या 'व्हेजिटेरियन कॅन?' या प्रश्नाला १००पैकी ८५-९० टक्के वेळा 'येस, कॅन ला!' हेच उत्तर मिळालंय. याशिवाय सिंगापुरातल्या शाकाहारी पर्यायांची माहिती देणारं 'व्हेजिटेरियन फूड गाइड' मिळतं. (हमखास मिळण्याचं ठिकाण - किनोकुनिया)

सॉरी, पण या लेखात सिंगापुरी खाद्यसंस्कृतीबद्दल काही नाहीये. आणि ती प्रचंड रंजक आहे.

स्वाती, माझ्या ऑफिसमधे तर एकदा एक माणूस पार्टीच्या आधी विचारायलाच येऊन बसला होता- व्हेज म्हणजे काय काय चालते ते समजावून घ्यायला.

त्याच्या मते सी फूड व्हेज होते Happy

मंडळी आता बास करा की. असेच प्रतिसाद देत राहिलात तर बी हा धागा बंद करुन चालता होईल आणि आमचे पुढचे वाचायचे राहुन जाईल. थोडे प्रतिसाद पुढच्या धाग्यासाठी राखुन द्या की.

बी तुझा त्रागा नक्कीच समजण्यासारखा आहे. पण "तू तिथे स्वतःहून गेला आहेस" हे लक्षात ठेवलेस तर उपायही तुलाच शोधावे लागतील हे साहजिक आहे.

शाकाहारी लोकांचे जेवणाचे हाल होतात हे नक्की पण जिथे जसे जमेल तसे जमवून घेणे आपल्याच हातात असते. शाकाहारी लोकांचे काय मांसाहारी लोकांचे देखील हाल होतात. Wink

मी ७-८ वर्षांपूर्वी बोटीवर कामाला लागलो तेंव्हा एकटाच भारतीय होतो. आख्खा किचन स्टाफ फिलिपिनो. आता बोला!!! तिथे मिळणारे पदार्थ बघता मला बरेच जमवून घ्यावे लागले. कधी नूसतेच भात, सलाड किंवा सूप. कच्चे चिकन किंवा पोर्क जात नसे. बीफ वगैरे तर दूरच.

पण मग जूळवून घेतले हळू हळू सांगून भारतीय पदार्थ बनवायला सांगितले. भारतीय पत्नी असलेल्या एका इंजिनिअरला देखील शेफला सांगायला लावले. तो देखील तयार झाला. Happy पहिला बनवलेला पदार्थ म्हणजे चिकन बिरयानी. मग हळू हळू अनेक भारतीय पदार्थ बनवू लागला. अजून १-२ भारतीय कामाला आले. ब्रिटिश चिफ आल्यावर तर करी वगैरे सर्वच!!!

>>>सॉरी, पण या लेखात सिंगापुरी खाद्यसंस्कृतीबद्दल काही नाहीये. आणि ती प्रचंड रंजक आहे.<<<

सिंगापुरी खाद्यसंस्कृतीबद्दल तुम्हीपण अ‍ॅडिशन्स द्या श्रद्धा, वाचायला आवडेल.

पूर्वेकडील शैलीतील खाद्यपदार्थ म्हणून इथे भारतात जे काही पदार्थ खायला मिळाले (येथे अर्थातच मांसाहारी व शाकाहारी दोन्ही मिळाले) ते काही खास वाटले नाहीत. म्हणजे काही खास चवीचे वाटले नाहीत. उलट जरा मवाळच वाटले.

मागे एक थाई मुलगी माझ्या चुलतभावाकडे चार दिवस आली होती. तिचा आहार आम्हाला विचित्रच वाटला पण तो उपयुक्ततेवर बेस्ड होता हे पटले.

ती सकाळी अनेक भाज्या व थोडे पाणी एकत्र करून मिक्सरमधून काढून त्यात नावाला तिखट, मीठ आणि साखर घालून तो लगदा खात असे. संध्याकाळी ती एकटीच एक संपूर्ण कलिंगड वगैरे संपवत असे. उंची जेमतेम साडे चार फूट आणि वजन जेमतेम पन्नास किंवा कमीच! तिला विष्णूजी की रसोईला घेऊन गेलो तर इतर पदार्थांबरोबरच तिने एक मोठा दुधी भोपळा आणि एक मुळा उचलून आणला. हा दुधी भोपळा, मुळा, गाजरे वगैरे तिथे निव्वळ शोभेला ठेवलेले होते. पण तिने ते दोन्ही सहज संपवले.

Pages